Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

walmik karad: शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड याने या तीन राज्यांमध्ये केला प्रवास, पुण्यात येण्यापूर्वी…

Santosh Deshmukh Case Valmik Karad : सीआयडीकडून आज केजमध्ये तीन जणांची चौकशी करण्यात आली. फरार आरोपी सुदर्शन घुले आणि इतर तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी आरोपींच्या नातेवाईकांची कसून चौकशी झाली. आरोपींना मदत करू शकतील अशा नातेवाईकाकडून अधिकची माहिती जमा करण्याचे काम सीआयडी करत आहेत.

walmik karad: शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड याने या तीन राज्यांमध्ये केला प्रवास, पुण्यात येण्यापूर्वी...
वाल्मिक कराड असा आला पुण्यात
Follow us
| Updated on: Jan 01, 2025 | 5:10 PM

Valmik karad case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी शरण आला. तब्बल २२ दिवसांनंतर त्याने शरणागती पत्करली. त्याच्या तपासासाठी सीआयडीची नऊ पथके त्याचा शोध घेत होती. या पथकात १५० अधिकारी आणि कर्मचारी होते. परंतु तो पोलिसांना काही मिळाला नाही. अखेर वाल्मिक कराड याने शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवले. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी त्याने आत्मसमर्पण केले. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान या कालावधीत तो कुठे कुठे लपला होता, त्याचा खुलासा आता होऊ लागला आहे.

तीन राज्यात वाल्मिक कराडचा प्रवास

पोलिसांना शरण येण्याआधी वाल्मिक कराड मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गोवा राज्यात लपला होता. वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण येण्याआधी उज्जैनमध्ये गेला. त्यानंतर तो गोवा आणि कर्नाटक राज्यातही लपला. मध्य प्रदेशातील उज्जैननंतर गोवा आणि त्यानंतर कर्नाटक राज्यातून पुण्यात तो आला. वाल्मिक कराड स्वतःच्या कारने या सगळ्या ठिकाणी फिरल्याचे सीआयडीच्या चौकशीतून समोर आले आहे.

आता वकील करणार ही मागणी

वाल्मिक कराड आणि इतर आरोपींची बँक खाती सध्या सीआयडीने गोठवली आहेत. ज्या ज्या बँकेत आरोपींची खाती आहे, त्या बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांना सीआयडीने पत्रव्यवहार केला. बँक अकाऊंटस आणि त्यातील तपशीलावर माहिती सीआयडीने मागवली आहे. वाल्मिक कराड याची सर्वाधिक बँक अकाउंट परळी आणि आसपासच्या परिसरात असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर राज्यात वेगवेगळ्या शहरातही अनेक बँक अकाऊंटस असल्याची माहिती मिळाली आहे. या बँक अकाउंट्सना गोठवल्यानंतर सबंधित मालमत्ता जप्त करण्याची परवानगी कोर्टाकडून मागण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच वाल्मिक कराड शरण आला. आरोपी वाल्मिक कराड शरण आल्यामुळे मालमत्तावर जप्तीची कारवाई होऊ नये, अशी भूमिका आरोपीच्या वकिलांकडून घेतली जाण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

सीआयडीकडून आज केजमध्ये तीन जणांची चौकशी करण्यात आली. फरार आरोपी सुदर्शन घुले आणि इतर तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी आरोपींच्या नातेवाईकांची कसून चौकशी झाली. आरोपींना मदत करू शकतील अशा नातेवाईकाकडून अधिकची माहिती जमा करण्याचे काम सीआयडी करत आहेत.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.