सर्वाधिक जागा लढून कुणाला मुख्यमंत्रीपद हवं होतं?, संजय राऊत यांनी बॉम्ब टाकला; महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद उघड झाले आहेत. संजय राऊत यांनी जागावाटपात झालेल्या विलंब आणि काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली आहे. त्यांनी काही नेत्यांना मुख्यमंत्रीपदाच्या आकांक्षेचा आरोप केला आहे. यामुळे मविआतील मतभेद अधिक उघड झाले आहेत.

सर्वाधिक जागा लढून कुणाला मुख्यमंत्रीपद हवं होतं?, संजय राऊत यांनी बॉम्ब टाकला; महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर
संजय राऊत
Follow us
| Updated on: Jan 10, 2025 | 11:38 AM

विधानसभा निवडणुकीच्या निकालांना आता दोन महिने उलटून गेले आहेत.या निवडणुकीत घवघवीत यश मिळवून महायुती पुन्हा सत्तेवर आली, मात्र महाविकास आघाडीला राज्यातील या निवडणुकीत पराभवाचा मोठा फटका बसला. निवडणूक निकालाच्या दीड-दोन महिन्यांनंतरही मविामधील धुसफूस कायम असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नव्या विधानामुळे आता मोठा वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे. निवडणुकीतील जागावाटपाला झालेला विलंब, त्याला कोण कारणीभूत या सगळ्यावर भाष्य करताना वडेट्टीवार यांनी त्यांच्याच पक्षातील अनेकांसह मविआ नेत्यांना टोला हाणला. जागा वाटपाचा तिढा दोन दिवसात सुटला असता, तर प्रचाराला जास्त वेळ मिळाला असता असं म्हमत जागावाटपाच्या वादामुळे कोणंतही प्लानिंग करू न शकल्याचं वडेट्टीवार म्हणाले.

त्याच्या या विधानानंतर मविआतील धूसफूस आता समोर येत असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही यावर भाष्य केलं आहे. जागावाटपावर वाद होता, अनेक जागा अशा होत्या ज्या आम्ही जिंकू शकलो असतो, पण काँग्रेसने त्या सोडण्यास नकार दिला. उदा. – चंद्रपूरची जागा, कोल्हापूर उत्तरची जागा . कोल्हापूर उत्तरची जागा आम्ही 6 वेळा जिंकली , आम्ही ती मागत होतो, पण काही वेळा सकारात्मक चर्चा होऊ शकली नाही, प्रत्येकाला आपापल्या जागा हव्या होत्या, कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं होतं असा गौप्यस्फोट करत राऊतांनी नाव न घेत अप्रत्यक्षपणे नाना पटोलेंवर निशाणा साधला. काँग्रेसच्या केंद्रीय समितीने म्हणावा तसा ( जागावाटपाच्या चर्चेत) हस्तक्षेप केला नाही, तो करायला पाहिजे होता, असंही म्हणत राऊतांनी काँग्रेसलाही पराभवासाठी जबाबदार ठरवलं आहे.

त्यांच्या या विधानामुळे आता महाविका आघाडीतील अनेक वाद, मतदभेद समोर येण्यास सुरूवात झाली असून धूसफूस चव्हाट्यावर आली आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?

जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीने लांबली गेली त्याची गरज नव्हती. ती का? कोणामुळे कशी लांबली हे बहुतेक विजय वडेट्टीवार यांना माहीत असेल. फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप संपलेलं नव्हतं हे सत्य आहे. कोणत्याही आघाडीत जागा वाटप इतक्या विलंबाने झालं तर अस्वस्था पसरते. कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळत नाही. या उलट महायुतीत दोन महिन्यांपूर्वीच जागा वाटप झलां होतं. बाकी त्यांच्या चर्चा सुरू असतील. विजय वडेट्टीवार यांची जी वेदना आहे. ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे. चुका झाल्या. त्या स्वीकारल्या पाहिजे. अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सीट शेअरिंग झालं. आता आम्हाला कळतंय. तेव्हा आम्ही सांगत होतो. पण त्यावर आता चर्चा करण्यात अर्थ नाही, एवढंच सांगतो,अस राऊत म्हणाले.

काँग्रेसला सर्वाधिक जागा हव्य होत्या

वाद सुरू होताच. त्या पद्धतीचा वाद नव्हता. काँग्रेसला जास्त हवा होत्या. पण काँग्रेसच्या सर्वात कमी जागा निवडून आल्या. आम्ही जास्त जागा जिंकलो. पण आता त्यात कशासाठी वाद करायचा. जागा वाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे. जागा वाटपाला विलंब झाला त्यात मिस्टर वडेट्टीवार होतेच की. विदर्भातील काही जागा वडेट्टीवारांनी सोडल्या असत्या राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला तर बरं झालं असतं. आम्ही मागितलेल्या जागा काँग्रेस या क्षणी हरलेली आहे. उदा. चंद्रपूरची जागा. किशोर जोरगेवार. हे अपक्ष आमदार होते. ते शरद पवारांकडून लढायला तयार होते. त्यांनी पत्र दिलं होतं. ती जिंकणारी जागा होती. शरद पवार, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि अनिल देशमुख वारंवार समजावत होते ही जागा जिंकणारी आहे. किशोर जोरगेवार निवडून येतील. ते आमच्याकडून लढणार आहेत. ती जागा सोडा. ती जागा सोडा. ती जागा राष्ट्रवादीला मिळाली नाही. आणि किशोर जोरगेवार भाजपात गेले. विजयी झाले. अशा अनेक जागा असल्याचं राऊतांनी नमूद केलं.

काही लोकांना वाटत होतं आम्हीच जिंकू. आम्हाला जास्त जागा मिळाल्या पाहिजे. देशातील वातावरण बदललंय. आमचं म्हणणं होतं की आपण काळजीपूर्वक लढलं पाहिजे. समोर आव्हान मोठं आहे. लोकसभेतील विजय वेगळा आहे. लोकसभेनंतर सत्ताधारी सावध झाला आहे. त्यामुळे जागा वाटपात आमचं तुमचं न करता लढू. पण याला सर्वच जबाबदार आहे, असं म्हणताना त्यांचा रोख नाना पटोलेंच्या दिशेने होता.

तर भविष्यात त्याची किंमत मोजावी लागेल

काँग्रेसच्या केंद्रीय समितीने म्हणावा तसा हस्तक्षेप केला नाही. तो करायला पाहिजे होता. महाराष्ट्रासारखं राज्य महाविकास आघाडीच्या हातून जाणं हे या राज्यासाठी दुर्घटना आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निकालानंतर तीन पक्षात अजिबात समन्वय राहिला नाही. हे सत्य आहे, तो जर नाही राहिला तर भविष्यात त्याची किंमत मोजावी लागेल,असा इशाराही राऊत यांनी दिला.

'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.