Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात मतदानाचा ३० वर्षांचा विक्रम तुटला, फायदा कोणाला? कोणत्या ‘M’ ला मिळणार महाराष्ट्राची सत्ता

२०१४ मध्ये मतदान चार टक्के वाढले. त्यानंतर राज्यात सरकार बदलली. २०१४ मध्ये ६३.३८ टक्के मतदान झाले. भाजपने १२५ तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. राज्यात गेल्या ३० वर्षांत कमी मतदान झाल्यावर सरकार रिपीट झाल्याचे प्रसंग आहे.

राज्यात मतदानाचा ३० वर्षांचा विक्रम तुटला, फायदा कोणाला? कोणत्या 'M' ला मिळणार महाराष्ट्राची सत्ता
महाविकास आघाडी आणि महायुती
Follow us
| Updated on: Nov 21, 2024 | 1:08 PM

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. या मतदानात मतदारांनी जोरदार उत्साह दाखवला. यामुळे मतदानाचा गेल्या ३० वर्षांचा विक्रम मोडीत निघाला. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ६५.१ टक्के मतदारांनी मतदान केले. राज्यात महायुती (M) आणि महाविकास आघाडी (M) यांच्यात मुख्य लढत आहे. आता यामध्ये कोणता M बाजी मारणार आहे? हे २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे समर्थक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले. राज्यातील १०० विधानसभा मतदार संघात बंपर मतदान झाले. राज्यात १९९५ मध्ये जोरदार मतदान झाले होते. ७१.६९ टक्के मतदान झाले होते. त्यावेळी राज्यात प्रथमच गैर काँग्रेस सरकार बनली होती. यामुळे वाढलेल्या मतदानाचा फायदा नेमका कोणाला होणार? याची चर्चाही रंगली आहे.

मतदानाचा टक्का का वाढला?

विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी दोघांची जोरदार प्रचार मोहीम राबवली. भाजपने ‘बंटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक हैं तो सेफ हैं’ या घोषणांनी निवडणुकीतील रणनीती बदलली. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसने भावनात्मक अपील केली. तसेच मतदानाचा दिवस शनिवार, रविवार असा सुट्टीला जोडून ठेवला नाही. त्यामुळे लोक बाहेरगावी न जाता मतदानासाठी मतदान केंद्रावर गेले.

आतापर्यंत ट्रेंड कसा राहिला?

निवडणुकीचा ट्रेंड पहिल्यास जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा सत्तेत परिवर्तन होते. परंतु महाराष्ट्र याबाबत अपवाद आहे. अनेकवेळा मतदानाचा टक्का वाढल्याचा फायदा सत्ताधारींनाही झाला आहे. २०२४ च्या लोकसभेत मतदानाचा टक्का वाढल्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला. यावेळी ६१.३९ टक्के मतदान झाले. त्यात मविआला ४३.९१ टक्के तर महायुतीला ४२.७१ टक्के मतदान पडले. यापूर्वी २००४ मध्ये वाढलेल्या मतदानाचा फायदा सत्ताधारी काँग्रेसला मिळाला होता. त्यावेळी ६३.४४ टक्के मतदान झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीला ७१ तर काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या होत्या. शिवसेना ६२ तर भाजपला ५४ जागा मिळाल्या होत्या.

यापूर्वी काय झाले होते?

२०१४ मध्ये मतदान चार टक्के वाढले. त्यानंतर राज्यात सरकार बदलली. २०१४ मध्ये ६३.३८ टक्के मतदान झाले. भाजपने १२५ तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. राज्यात गेल्या ३० वर्षांत कमी मतदान झाल्यावर सरकार रिपीट झाल्याचे प्रसंग आहे. २००९ मध्ये कमी मतदान झाले. त्यानंतर काँग्रेस ८२ आणि एनसीपी ६२ जागा जिंकून सत्तेत आली. शिवसेना भाजपला ११० तर मनसेला १३ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजप-शिवसेनेच्या जागा कमी झाल्या. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काय होणार? हे आता येत्या २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.