महाविकास आघाडीची चर्चेची गाडी अखेर ट्रॅकवर, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

महाविकास आघाडीची चर्चेची गाडी अखेर ट्रॅकवर आल्याचं दिसतं आहे. काँग्रेस हायकमांडनं चर्चेची धुरा दिल्यानंतर थोरातांनी आधी शरद पवार आणि नंतर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर महाविकास आघाडीची बैठकही सुरु झाली. दरम्यान जागा वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित झाल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडीची चर्चेची गाडी अखेर ट्रॅकवर, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Follow us
| Updated on: Oct 22, 2024 | 9:48 PM

बाळासाहेब थोरात यांच्याकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याची धुरा काँग्रेस हायकमांडनं दिल्यानंतर जागा वाटपावर तोडगा निघताना दिसतोय. सूत्रांच्या माहितीनुसार महाविकास आघाडीत काँग्रेसला 100-105 जागा, ठाकरेंची शिवसेना 96-100 जागा, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 80-85 जागा लढणार असल्याची माहिती आहे.

काही जागांवरुन पटोले आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद झाल्यानंतर थोरातांकडे चर्चेची धुरा सोपवण्यात आली. त्यानुसार सकाळी बाळासाहेब थोरातांनी शरद पवारांची भेट घेतली. सिल्व्हर ओकवर जवळपास तास भर चर्चा झाली. शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर बाळासाहेब थोरात मातोश्रीवर गेले आणि उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. उद्धव ठाकरेंसोबत विदर्भातल्या वाद असलेल्या जागांवर थोरातांची चर्चा झाली.

उद्धव ठाकरेंसोबत बैठक झाल्यानंतर ग्रँड हयात हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही हजर होते. इकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. विदर्भातल्या जागांसाठी ठाकरेंना काँग्रेससमोर लोटांगण घालण्याची वेळ आल्याची टीका बावनकुळेंनी केली.

विदर्भातल्या काही जागांवरुन पटोले आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद वाढला होता. पण शरद पवारांची मध्यस्थी आणि त्यानंतर थोरातांकडे चर्चेची जबाबदारी दिल्यानंतर तोडगा निघताना दिसतोय.

राज्यात भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करुन आघाडी घेतली आहे. दुसऱ्या यादीसाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत ते गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच इच्छूक उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. पण असलं तरी आपल्याला तिकीट मिळणार की नाही याची धाकधूक देखील उमेदवारांना लागली आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवार आपल्या पक्षातील नेत्यांची भेट घेत आहेत.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली असून आता उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याची सुरुवात होणार आहे. पण महायुती आणि महाविकासआघाडीत काही जागांवरुन अजूनही रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.