‘आम्हाला मंत्रिमंडळात भागिदारी पाहिजे’, निकालापूर्वीच महादेव जानकर यांनी ठेवल्या अटी

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी मैत्री करण्यासाठी अटीच ठेवल्या आहेत. महादेव जानकर यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी याबाबत सविस्तर भाष्य केलं.

'आम्हाला मंत्रिमंडळात भागिदारी पाहिजे', निकालापूर्वीच महादेव जानकर यांनी ठेवल्या अटी
महादेव जानकर
Follow us
| Updated on: Nov 22, 2024 | 6:16 PM

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी उद्या महत्त्वाचा दिवस आहे. कारण विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. पण निकालाआधीच राज्यात संख्याबळाची जमवाजमव सुरु असल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, राज्यात छोटे पक्ष आणि अपक्षांची बार्गेनिंग पावर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे छोट्या पक्षांकडूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी मैत्री करण्यासाठी अटीच ठेवल्या आहेत. महादेव जानकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी याबाबत सविस्तर भाष्य केलं.

“महाराष्ट्रातील तमाम मतदार बंधू-भगिनींचा मी आपल्या माध्यमातून आभार मानतो आणि अभिनंदन करतो. लोकशाहीचा उत्सवामध्ये मतदारांचा टक्का वाढल्यामुळे अभिनंदन करतो. हा जो टक्का वाढलेला आहे तो परिवर्तनाची शक्यता असू शकते”, असं मोठं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलं.

‘रासपला चांगलं यश मिळेल’

“आज माझं एवढंच म्हणणं आहे की, आम्ही खातं खोलतोय. पाठीमागच्या विधानसभेत माझा एक आमदार होता आणि वरच्या सभागृहात एक असे दोन आमदार होते. पण आता आमचे दोनाचे चार, चाराचे सहा वाढतील. जनतेचा कौल शेवटी, त्यांच्या हातात आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला चांगलं यश मिळेल, असा मला भरोसा आहे”, असं महादेव जानकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

कोणासोबत जाणार?

“जर मेजॉरिटी महाविकास आघाडी किंवा महायुतीला असेल तर आमचा कोणाला विरोध असेल असं नाही. मी सध्या महाविकास आघाडी बरोबर पण जायला तयार आहे आणि महायुती बरोबर पण जायला तयार आहेत. सध्यातरी 50-50 टक्के दोघांची शक्यता आहे. आम्ही सध्या तरी महायुती बरोबर पण नाही आणि महायुती बरोबर पण नाही. आम्ही छोटे पक्ष असल्यामुळे किंग मेकर ची भूमिका अदा करणार आहोत”, असं जानकर म्हणाले.

‘…तर ताज हॉटेल बुक करायला आम्ही पण सक्षम आहोत’

ज्याच्या पक्षाच्या आमदारांवर ज्यांना विश्वास नसेल त्या पक्षांनी हॉटेल बुक केल्या आहेत. पण माझ्या पक्षाचे जे आमदार निवडून आले त्यांच्यावर मला विश्वास आहे आणि माझ्या पक्षाचे आमदार बाहेर जाणार नाहीत. जर वेळ आली तर ताज हॉटेल बुक करायला आम्ही पण सक्षम आहोत, असं महादेव जानकर म्हणाले.

जानकारांच्या अटी काय?

“महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून आम्हाला कोणाच्या निमंत्रण किंवा फोन आलेला नाही आणि आम्ही बिन बुलाय कोणाकडे जाणार नाही. आम्हाला मंत्रिमंडळात भागीदारी पाहिजे. आमची इच्छा आहे, जर 12 आमदार आमचे आले तर 12 चे 12 कॅबिनेट मिनिस्टर झाले पाहिजे. आणि जर दोघांना वाटले तर मुख्यमंत्रीपण आमचा पक्षाचा झाला पाहिजे. त्यांनी हे मान्य केलं तर आम्ही त्यांच्या वेलकम करू. तुम्ही आम्हाला सपोर्ट करावा”, अशा अटी महादेव जानकर यांनी सांगितल्या.

Non Stop LIVE Update
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.