Mahadev Jankar | महादेव जानकरांनी दंड थोपटले, आगामी लोकसभा निवडणूक परभणीतून लढवणार
ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे माजी मंत्री महादेव जानकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. त्यांनी मी आगामी लोकसभा निवडणूक परभणी जिल्ह्यातून लढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. ते नांदेड दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी वरील कक्तव्य केलं.
नांदेड : ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे माजी मंत्री महादेव जानकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. मी आगामी लोकसभा निवडणूक परभणी जिल्ह्यातून लढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. ते नांदेड दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.
परभणीतून पूर्ण ताकदीने लोकसभा निवडणूक लढवणार
महादेव जानकर नांदेड दौऱ्यावर होते. येथे पक्षाचा मेळावा घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचा विस्तार देशभरात केला जाईल. आम्ही निवडणुकादेखील लढवणार आहोत. म्हाडा, परभणी, सांगली अशा जागा आम्ही मोठ्या ताकदीने लढवणार आहोत. मी परभणी मतदारसंघातून लढावं असं मत परभणी येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आहे. मराठवाडा ही भूमी आमच्यासाठी फर्टाईल लँड आहे. प्रत्येक जिल्ह्यात खातं कसं उघडेल या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरु आहे. संघटना कशी वाढेल यावरही आमचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्र तसेच इतर राज्यातही आमचे दौरे सुरु आहेत. मी स्वत: परभणीमधून स्वत:च्या पक्षाच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. परभणी लोकसभेची निवडणूक लढवू आणि विजयदेखील मिळवू,” असं जानकर यांनी म्हटलंय.
परभणी मतदारसंघावर शिवसेनेचा प्रभाव, जानकरांचं काय होणार ?
ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महादेव जानकर चांगलेच आक्रमक भूमिका घेतात. या मुद्द्यावरुन ते केंद्र तसेच राज्य सरकार अशा दोघांना फटकारतात. विधानसभा निवडणुकीदरम्यान ते भाजपसोबत होते. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर जानकर भाजपवरदेखील टीका करताना दिसतात. दरम्यान, सध्या लोकसभा निवडणूक लांब असली तरी जानकर यांनी परभणीतून निवडणूक लढवणार असल्याचे सांगत एका प्रकारे निवडणुकीच्या तयारीला सुरुवातच केली आहे. मात्र परभणी मतदारसंघ शिवसेनेच्या हातात आहे. या जिल्ह्यावर शिवसेनेचं मोठं वर्चस्व पाहायला मिळतं. त्यामुळे रासपने दिलेलं आव्हान किती तगडे असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर बातम्या :