कल्याण-डोंबिवलीत म्युकरमायकोसिसचा धोका वाढला; आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू

राज्यातील इतर शहरांपाठोपाठ कल्याण-डोंबिवलीतही म्युकरमायकोसिस आजाराचा धोका वाढला आहे. (Maharashtra: 43 cases of black fungus arise in Kalyan-Dombivli; 8 fatalities reported)

कल्याण-डोंबिवलीत म्युकरमायकोसिसचा धोका वाढला; आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू
नाशिकमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढला
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 11:14 AM

अमजद खान, टीव्ही9 मराठी, कल्याण: राज्यातील इतर शहरांपाठोपाठ कल्याण-डोंबिवलीतही म्युकरमायकोसिस आजाराचा धोका वाढला आहे. कल्याण-डोंबिवलीत म्युकरमायकोसिसचे आतापर्यंत 43 रुग्ण आढळले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 11 जण या आजारावर उपचार घेत आहेत. (Maharashtra: 43 cases of black fungus arise in Kalyan-Dombivli; 8 fatalities reported)

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत म्यूकरमायकोसिस आजारामुळे आतार्पयत 8 जणांचा मृत्यू आला आहे. आतार्पयत या आजाराचे 43 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 18 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. सध्या 11 रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर सरवणकर यांनी दिली आहे. या रुग्णावर उपचार करण्यासाठी त्यांना महात्मा फुले आरोग्य योजनेतून उपचार मिळावेत असा प्रस्ताव महापालिकेच्यावतीने राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

सिव्हिल सर्जनकडे इंजेक्शन्स उपलब्ध

दरम्यान, कंत्रादारामार्फत या आजारावरील 100 इंजेक्शन्स मागवण्यात आली होती. मात्र, या आजारावर पालिका रुग्णालयात उपचार करण्यात येत नसल्याने इंजेक्शन्सचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना या आजारावरील इंजेक्शन हवे असल्यास ही इंजेक्शन्स सिव्हिल सर्जनकडे उपलब्ध आहेत. सरकारच्या संकेतस्थळावरून त्याची नोंदणी करून इंजेक्शन्स मागवता येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राज्यात 14,123 नवीन कोरोना रुग्णांचे निदान

राज्यात गेल्या चोवीस तासात 477 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूदर हा 1.67 टक्के एवढा झालाय. राज्यात चोवीस तासात 14,123 नवीन रुग्ण सापडल्याने राज्यातील कोरोन रुग्णांची संख्या 57,61,015वर गेली आहे. सध्या राज्यात 2,30,681 सक्रिय रुग्ण आहेत. (Maharashtra: 43 cases of black fungus arise in Kalyan-Dombivli; 8 fatalities reported)

संबंधित बातम्या:

शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा लसीकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद, ठाण्यात दिवसभरात 195 जणांनी लस टोचली

Thane new rules Guidelines : ठाण्यात दुकानांची वेळ बदलली, काय सुरु काय बंद?

धक्कादायक ! ठाणे महापालिका ग्लोबल कोविड सेंटरमधील 46 डॉक्टरांना कमी करणार?

(Maharashtra: 43 cases of black fungus arise in Kalyan-Dombivli; 8 fatalities reported)

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.