बाजार समिती निवडणुकीत उदयनराजे यांना मोठा धक्का, ग्रहण हद्दपार करु म्हणत शिवेंद्रराजेंची टीका

साताऱ्यात पुन्हा एकदा दोन्ही राजेंमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. सातारा बाजार समितीच्या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला.

बाजार समिती निवडणुकीत उदयनराजे यांना मोठा धक्का, ग्रहण हद्दपार करु म्हणत शिवेंद्रराजेंची टीका
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 5:49 PM

संतोष नलावडे, सातारा : सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले ( Shivendra Raje Bhosale ) यांनी खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale) यांच्यावर टीका केली आहे. फक्त पद भोगायची मात्र लोकांची कामे करायची नाहीत. यामुळेच मतदारांनी त्यांना नाकारलं असून उदयनराजे यांचा मार्केट कमिटीची जागा हडपण्याचा डाव आम्ही हाणुन पाडला. येणाऱ्या नगरपालिकेला लागलेलं उदयनराजेंचे ग्रहण हद्दपार करु. त्यांचा भ्रष्ठाचारी कारभार लोकांनी बघितलाय असं देखील शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे. उदयनराजे यांची ताकत ही आता भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठाना कळाली असल्याचे सुद्धा शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे.

सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ( Satara APMC Election Result ) आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचं वर्चस्व पाहायला मिळालं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला (उदयनराजे गटाला) धूळ चारत 18 जागांवर शिवेंद्रराजे गटाने विजय मिळवला आहे. सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजें भोसले यांचे पारडे जड असल्याचं दिसलंय.

कोरेगाव बाजार समितीत राष्ट्रवादीचा डंका

कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 16 जागा निवडून आल्या असून पुन्हा एकदा आमदार शशिकांत शिंदे यांचा जलवा बाजार समितीवर कायम असल्याचा पाहिला मिळाला. आमदार महेश शिंदे गटाचा बाजार समितीमध्ये 1 जागा जिंकत प्रवेश झाला आहे. तर अपक्षाने 1 जागा मिळवली आहे.
Satara APMC Election 2023 Result 
सातारा जिल्ह्यातील आठ कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल
*सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती*
आमदार शिवेंद्रराजे भोसले गट 18/0 ने विजयी
स्वाभिमानी शेतकरी संघटना (उदयनराजे गट पराभूत)
————————————-
*कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती*
राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे 16/2 ने विजयी
शिवसेनेचे आ. महेश शिंदे 1 जागेवर समाधान
 अपक्ष 1
—————————————
*फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती*
राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर 14 जागांवर विजयी
राष्ट्रवादीच्या 4 जागा बिनविरोध
रासप आणि शिवसेनेचा गटाचा मोठा पराभव
———+-++++++++++++++++———–
*वाई कृषी उत्पन्न बाजार समिती*
राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील 17/1 ने विजयी
भाजप नेते मदन भोसले 1 जागेवर समाधान
——————————-
*वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती*
खटाव तालुका विकास आघाडीला 13/5. ने विजयी
राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना 5 जागांवर समाधानी
——————————————-
*लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती*
राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील 17/1 ने विजयी
भाजपच्या शेतकरी विकास परिवर्तन पॅनलला 1 जागेवर मानावे लागले समाधान
—————————————–
*कराड कृषी उत्पन्न बाजार समिती*
काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या रयत पॅनलचा गट 12/6
मंत्री बाळासाहेब पाटील डॉक्टर अतुल भोसले यांना शेतकरी विकास पॅनलचे 6 जागांवर समाधान
—————————————–
*पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती*
शिंदे गटाच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई  15/3 ने विजयी
राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला 3 जागांवर समाधान
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.