चंद्रपूर जिल्ह्यात किती मतदार आहेत? विधानसभेची तयारी काय? वाचा A टू Z माहिती

चंद्रपूर जिल्ह्यात 6 विधानसभा जागांसाठी 18 लाख 43 हजार 540 मतदार मतदान करणार आहेत. तर 37 हजार 873 नवमतदार मतदान करणार आहेत. तसेच 2076 मतदान केंद्रावर 10 हजार 728 अधिकारी-कर्मचारी यंत्रणेत तैनात असतील.

चंद्रपूर जिल्ह्यात किती मतदार आहेत? विधानसभेची तयारी काय? वाचा A टू Z माहिती
Follow us
| Updated on: Oct 15, 2024 | 10:08 PM

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा जाहीर झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पत्रकार परिषद घेत जिल्ह्याबाबत महत्त्वाची माहिती दिली. चंद्रपूर जिल्ह्यात 20 नोव्हेंबलार होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत 6 विधानसभा जागांसाठी 18 लाख 43 हजार 540 मतदार मतदान करणार आहेत. यात 37 हजार 873 नवमतदार मतदान करणार आहेत. 2076 मतदान केंद्रावर 10 हजार 728 अधिकारी-कर्मचारी यंत्रणेत तैनात असतील. जिल्हा प्रशासनाने आज यासंबंधी आयोजित पत्रपरिषदेत विस्तृत माहिती दिली. 6 विधानसभा जागांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हास्तरीय नोडल अधिकारी देखील नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिली.

चंद्रपूर जिल्ह्यात 85 आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या 13722 असून दिव्यांग मतदार 8642 एवढे आहेत. आदर्श आचार संहिता अंमलबजावणीसाठी फिरते निगराणी पथक, स्थायी निगराणी पथक ,व्हिडिओ पथके, खर्च आणि सनियंत्रण पथकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने मतदान झाल्यानंतर मतदान यंत्र सुरक्षागृहांचा तपशील देखील पुरवला असून विविध 6 विधानसभा क्षेत्रात मतमोजणी केंद्र निश्चितीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

आदर्श आचारसंहिता उल्लंघनाची कुठलीही तक्रार सी-व्हिजिल या ॲपद्वारे 100 मिनिटांच्या आत निकाली काढण्यात येणार असून यंदाच्या निवडणुकीपासून इलेक्शन सिजर मॅनेजमेंट सिस्टीम याद्वारे निवडणुकीदरम्यान विविध यंत्रणांकडून जप्त करण्यात येणाऱ्या रोख रक्कम, मद्य, मादक पदार्थ आणि आमिषाच्या वस्तू यांचा तपशील नोंदविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारींनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर, कशी असणार संपूर्ण प्रक्रिया?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर, कशी असणार संपूर्ण प्रक्रिया?.
पिपाणी वाजणारंच...निवडणूक आयोगाने शरद पवारांची 'ती' मागणी फेटाळली
पिपाणी वाजणारंच...निवडणूक आयोगाने शरद पवारांची 'ती' मागणी फेटाळली.
निवडणुकीच्या तारखा घोषित होताच जरांगे संतापले,'फडणवीसांनी खुन्नस दिली'
निवडणुकीच्या तारखा घोषित होताच जरांगे संतापले,'फडणवीसांनी खुन्नस दिली'.
विधानसभा निवडणुकीत मतदान जास्त व्हावं म्हणून आयोगाकडून 'या' सुविधा
विधानसभा निवडणुकीत मतदान जास्त व्हावं म्हणून आयोगाकडून 'या' सुविधा.
Assembly Election बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान
Assembly Election बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 23 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून बेड्या
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 23 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून बेड्या.
उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा
उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा.
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत.
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ.
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ.