Maharashtra Breaking News LIVE : मी लोकसभेला पाठिंबा दिला आणि विधानसभेच्या कामाला लागा सांगितलं- राज ठाकरे
Maharashtra Election News LIVE : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. आज 11 नोव्हेंबर 2024 राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशात ठिकठिकाणी प्रचारसभा सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज महायुतीसाठी प्रचार दौरा करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना आणि मुंबईत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विविध सभा आणि रॅलीत उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बारामती विधानसभेचे उमेदवार अजित पवार यांचा आज गाव भेट दौरा होत आहे. आज ते अनेक गावांना भेटी देणार आहेत. शरद पवार यांच्या उद्या नाशिक जिल्ह्यात तब्बल सहा जाहीर सभा होणार आहेत. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अविनाश लाड यांची 6 वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
अखिलेश यादव यांनी आझम खान यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली
सपा सुप्रीमो अखिलेश यादव सोमवारी रामपूरला पोहोचले, जिथे त्यांनी आझम खान यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
-
शरद पवार यांना वयानुसार गोष्टी आठवत नसतील- राज ठाकरे
शरद पवार यांना वयानुसार गोष्टी आठवत नसेल. मी ज्या अनेक गोष्टी केल्या त्याची पुस्तिका पाठवतो. माझ्याकडून एक गोष्ट नाही झाली. मी जातपात नाही पाळली. मी जातीवादी राजकारण केलं नाही. मागच्या बाजूने पिल्ले सोडायची हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. छोट्या मोठ्या संघटना उभ्या करायच्या त्यांना पैसे पुरवायचे या गोष्टी सर्वांना माहीत आहे. काही गोष्टी मला पर्सनली बोलायच्या नाही. नाही तर त्याही बोललो असतो. पण त्याचा राजकारणाशी संबंध नाही.
-
-
लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरेंचं रोखठोक मत, म्हणाले..
लाडकी बहीण योजना टिकली दर महिन्याला टिकवता आलं तर मी त्याला गिफ्ट म्हणेल. टिकवता आली नाही तर त्याला ब्राईब म्हणेल. मला इतर राजकारण्यांसारखं नाही वागता येणार. तशी अपेक्षा करणार असाल तर ते होणार नाही. चांगल्याला चांगलं म्हणणं वाईटाला वाईट म्हणणार. मला वाटतं प्रत्येकाने ही गोष्ट केली पाहिजे. याचा अर्थ भूमिका बदलत आहात असं होत नाही. ,स्वार्थासाठी केलं तर ती गोष्ट लागू होते. तुमचा स्वार्थ नसेल एखादी भूमिका पटली तर तुम्ही चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे.
-
माझा कम्फर्ट झोन भाजपासोबत आहे- राज ठाकरे
मनसेच्या मदतीने युती सरकार येईल. एकमेकांचे या लोकांनी किती वाभाडे काढले आतापर्यंत. टोकाला जाईपर्यंत काढले ना. मग हे प्रश्न त्यांना विचारता का तुम्ही. तिथे बोलती का बंद होते. या सर्वात भाजप किंवा युतीचं सरकार येईल. भाजप आणि आघाडीचं सरकार यात माझा संबंध किंवा कन्फर्ट झोन पहिल्या पासून भाजपसोबत आहे. तो कधी लपवला नाही. मी शिवसेनेत असताना दुसरा पक्ष समोर आला तो भाजप होता.
-
भाजपचं सरकार येणार म्हणजे युतीचं सरकार येणार- राज ठाकरे
भाजपचं सरकार येणार म्हणजे युतीचं सरकार येणार, असा त्याचा अर्थ होतो. माझं असं भाकीत आहे फडणवीस मुख्यमंत्री होतील. या गोष्टीचे संकेत दोनदा अमित शाह यांनी दिले. त्यांच्या पक्षाचे नेते भाकीत करत आहे.
-
-
मी लोकसभेला पाठिंबा दिला आणि विधानसभेच्या कामाला लागा सांगितलं- राज ठाकरे
मी लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला. गुढीपाडव्याच्या सभेत मी जाहीर सांगितलं होतं की, बिनशर्त पाठिंबा दिला आणि विधानसभेच्या कामाला लागा असं सांगितलं. अमित ठाकरेला उभं करायचं की नाही हा प्रश्नच नव्हता. त्यामुळे उमेदवार पाठी घ्यायचा का नाही हा प्रश्नच नाही. ते त्यांनी ठरवायचं होतं. त्यात चर्चा करण्याचा प्रश्न नाही.
-
पोहरादेवी देवीचे महंत सुनील महाराज 13 नोव्हेंबरला करणार भाजप प्रवेश
यवतमाळमधून मोठी बातमी समोर आली आहे. पोहरादेवी देवीचे महंत सुनील महाराज 13 ला करणार भाजपात प्रवेश करणार आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत पोहरादेवी येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. या ठिकाणी महंत भाजपात प्रवेश करणार आहेत. सुनील महाराज उबाठा गटात होते. मात्र उमेदवारी न दिल्याने त्यांनी उबाठाला सोडचिठ्ठी दिली होती.
-
खूप धमक्या आल्यात मात्र जनता माझे कवच कुंडल : एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांना खूप धमक्या आल्यात. मात्र जनता माझे कवच कुंडल आहेत. पोलिस बांधवांना सुरक्षेबाबत थोड्या अडचणी आल्या, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेवासा येथीस प्रचारसभेत म्हणाले.
एकनाथ शिंदे आणखी काय म्हणाले?
“एवढ्या मोठ्या संख्येने मंडप तुडुंब भरलाय. आणखी लाडके भाऊ आणि बहिणी मंडपाच्या बाहेर उभे आहेत. एवढे सगळे लाडके भाऊ आणि बहीण 20 तारखेला रस्त्यावर उतरले तर समोरच्या उमेदवाराचे डीपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मला विठ्ठलराव लंघे यांच्या विजयी सभेला यावं लागेल असं वाटतंय”, असं म्हणत शिंदेंनी सभेला उपस्थित जनेतेचे आभार मानले आणि लंघे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षांचा हिशोब दिला पाहिजे : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. मोदींनी जाहीर सभेतून शरद पवारांनी काय केलं? असा प्रश्न केला होता. पवारांनी या प्रश्नला उत्तर देत मोदींवर निशाणा साधलाय. महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे मंत्री दौरे करत आहेत. आमच्यावर टीका करत आहे. त्यांनी दहा वर्षाचा हिशोब दिला पाहिजे. दहा वर्षे सत्ता त्यांची आणि ते आम्हाला विचारतात शरद पवारांनी काय केलं. आज महाराष्ट्रामध्ये सातशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. केंद्रात आमचं सरकार असताना आम्ही शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले, असं शरद पवार म्हणाले.
-
वैजापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा
वैजापूर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार रमेश बोरणारे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज वैजापूर शहरात जाहीर सभा पार पडत आहे. यावेळी मला कुणाचेही आव्हान वाटत नाही, मी अजूनही रामगिरी महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, अशी प्रतिक्रिया रमेश बोरणारे यांनी दिली आहे,
-
अमित ठाकरे यांची प्रचार फेरी
मनसे उमेदवार अमित ठाकरे यांनी माहीममध्ये प्रचार फेरी केली. माहीम मच्छिमार नगर परिसरात घरो घरी जाऊन अमित ठाकरे यांनी प्रचार केला. प्रचारा दरम्यान अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे सुद्धा सोबत होत्या.
-
मक्याची बंपर आवक
अशिया खंडात कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती धान्यातील पिवळे सोने म्हणून ओळख असलेल्या मक्याची बंपर आवक विक्रीसाठी येत आहे. गेल्या आठवड्यात 40 हजार क्विंटल मक्याची आवक झाल्याने कांद्याबरोबर मक्याची ही बाजारपेठ म्हणून उदयास लासलगाव बाजार समिती येत आहे.
-
दारु पाजणाऱ्यांना पाडा
गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेत मुक्ती पथमार्फत अनोखे अभियान राबवले जात आहे. निवडणुकीत जो उमेदवार दारू पाजेल किंवा दारू वाटप करेल त्या उमेदवाराला नक्कीच पाडा, असे आवाहन डॉक्टर अभय बंग यांच्याकडून करण्यात येत आहे.
-
संभाजीनगरात मोदी यांची सभा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती संभाजी नगर शहरात 14 नोव्हेंबर रोजी जाहीर सभा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील चौदा विधानसभा मतदारसंघासाठी नरेंद्र मोदी ही सभा घेणार आहे.
-
बाळासाहेबांवर आपलं इतकं प्रेम असतं तर बाळासाहेबांची शिवसेना गैरमार्गाने फोडली नसती- राऊत
“बाळासाहेबांवर आपलं इतकं प्रेम असतं तर बाळासाहेबांची शिवसेना आपण गैरमार्गाने फोडली नसती. बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय यांचा पक्ष एक इंच पुढे सरकत नाही. तुमच्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची लोकं अधिक चांगली आहेत. त्यांना बाळासाहेबांविषयी अत्यंत आदर आहे. त्यांचं तुमच्यासारखं ढोंगी प्रेम नाही,” असा टोला संजय राऊतांनी अमित शाहांना लगावला.
-
भाजपला शेतकऱ्यांपेक्षा कोंबड्या महत्त्वाच्या वाटतात- कैलास पाटील
उस्मानाबादमधून ठाकरे गटाचे कैलास पाटील निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. भाजपला शेतकऱ्यांपेक्षा कोंबड्या महत्त्वाच्या वाटतात, अशी टीका त्यांनी केली. सोयाबीन आयत केल्याच्या निर्णयावरून कैलास पाटलांनी भाजपवर टीका केली. कोंबड्या महत्त्वाच्या असणाऱ्यांना मतदान करावं का, असा सवाल त्यांनी केला.
-
भाषणावेळी वीज जाताच शिवानी वडेट्टीवारांकडून शिवराळ भाषा
भाषणाच्यावेळी वीज जाताच शिवानी वडेट्टीवारांनी शिवराळ भाषेचा वापर केला. वीज मंडळासह सरकारवर टीका करताना त्यांनी शिवीगाळ केली. विरोधी पक्षनेता पुढचा मुख्यमंत्री असतो असंही त्या म्हणाल्या.
-
संजीव खन्ना यांनी सरन्यायाधीश पदाची जबाबदारी घेतली
संजीव खन्ना यांनी सरन्यायाधीश पदाची जबाबदारी घेतली आहे. राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. खन्ना हे 13 मे 2025 पर्यंत सरन्यायाधीश पदावर असणार आहेत.
-
ठाकरे गटाला राजकारण स्वतःपुरता केंद्रित करायचा आहे- संजय शिरसाट
“आदित्य ठाकरेंच्या वेळी राज ठाकरे यांनी काकाची भूमिका निभावली आणि त्यांनी तिथे उमेदवार दिला नाही. पण त्या उपकाराची साधी जाणीवसुद्धा ठेवली नाही. ठाकरे गटाला राजकारण स्वतःपुरता केंद्रित करायचा आहे. नातेवाईकांनाही ते सोडत नाहीत. त्यांना आपुलकी नाही. राहुल गांधी आणि शरद पवार यांना जपणे ही त्यांची प्रायोरिटी आहे,” अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.
-
Maharashtra News: राज ठाकरेंच्या मनात काय होतं कळलं नाही – सरवणकर
राज ठाकरेंच्या मनात काय होतं कळलं नाही… शिंदे म्हणाले होते राज ठाकरे यांची भेट घ्या… असं वक्तव्य सदा सरवणकर यांनी रेलं आहे.
-
Maharashtra News: न्यायाधीश संजीव खन्ना यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ
न्यायाधीश संजीव खन्ना यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ… भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून खन्ना यांनी कार्यभार स्वीकारला… संजीव खन्ना हे 13 मे 2025 पर्यंत सरन्यायाधीश पदावर राहणार… राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झाला शपथविधी सोहळा…
-
मोदी मुस्लिम टोपी इस्लामी राष्ट्रात जाऊन घालतात – संजय राऊत
मोदी मुस्लिम टोपी इस्लामी राष्ट्रात जाऊन घालतात. भाजपकडे कोणताही विषय नाही. विकासाचा नाही, रोजगाराचा नाही. त्यांच्याकडे फक्त धर्म आणि टोप्या. याच्याशिवाय त्यांच्याकडे १०-१२ वर्षात हाच विषय राहिला आहे…. संजय राऊत यांनी असं वक्तव्य केलं आहे.
-
Maharashtra News: अमित ठाकरे वयानं लहान, त्यांनी शांतपणे निवडणूक लढावी – संजय राऊत
अमित ठाकरे वयानं लहान, त्यांनी शांतपणे निवडणूक लढावी… बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना भाजपनं शिंदेंना विकली… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
Maharashtra News: आम्हाला आत्मविश्वास आहे, आम्ही जिंकणारच – देवेंद्र फडणवीस
आम्हाला आत्मविश्वास आहे, आम्ही जिंकणारच… सर्व्हेच्या आधारे मी बोलत नाही… जनता आम्हाला निवडून देणार – देवेंद्र फडणवीस
-
एका आमदाराला नाही तर मुख्यमंत्री माणसाला मतदान करायचंय, नाना पटोलेंच्या लेकीचे वक्तव्य
मी तुम्हा सर्वांना विनंती करतेय की आपल्याला एका आमदार नाही तर मुख्यमंत्री माणसाला मतदान करायचा आहे. माझ्या वडिलांनी या क्षेत्रासाठी खूप संघर्ष करुन काम केलं आहे. नागरिकांसाठी लढत असताना वेळे प्रसंगी ते जेलमध्येही गेले. त्यांच्या पाठी तुमचा आशीर्वाद राहू द्या. त्यांचे हात बळकट करा. येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वांनी पंजा समोरील बटण दाबून नाना भाऊंना विजयी करा, असे प्रिया नाना पटोले म्हणाल्या.
-
महायतुीला १७५ जास्त जागा मिळतील – अजित पवार
बारामतीत लाखाच्या पुढे लीड मिळेल. महायतुीला १७५ जास्त जागा मिळतील. अमित शाहांसोबत महायुती आणि घटक पक्षांच्या समन्वयसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती, असे अजित पवार म्हणाले.
-
घाटकोपर पूर्वमध्ये मनसेकडून सांस्कृतिक प्रचार, पहाटे वासुदेवाचं नृत्य पाहण्यासाठी गर्दी
घाटकोपर पूर्वेत मनसेकडून सांस्कृतिक प्रचार केला जात आहे. गोंधळी आणि टाळ मृदुंगाचं भजन करून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. भल्या पहाटे वासुदेवाचं नृत्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मनसेचे उमेदवार संदीप कुलटे यांचा प्रचारात सांस्कृतिक कलेचं दर्शन पाहायला मिळत आहे.
-
भाजपाचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारासाठी पत्नी कांचन कुल मैदानात
महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे दौंडचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारासाठी पत्नी कांचन कुल देखील सक्रिय झाल्याचं पहावयास मिळत आहे. दौंडमधील गावागावात नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्या संवाद देखील साधत असून प्रचाराला मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील सहभाग आहे.. दौंड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रमेश थोरात आणि राहुल कुल यांच्यात प्रमुख लढत होत आहे.
-
विजय वडेट्टीवारांच्या लेकीची शिवीगाळ, भाजप आणि वीज मंडळावर अभ्रद भाषेत टीका
चंद्रपूर: शिवानी विजय वडेट्टीवार संतापल्या आणि शिवीगाळीवर उतरल्या, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील आकापूर गावात त्यांच्या भाषणादरम्यान वीज गेली होती. त्यावेळी शिवानी वीज मंडळ भाजप आणि सरकारला अभद्र शब्दात शिवीगाळ केली. शिवानीचे वडील विजय वडेट्टीवार या जागेवरून काँग्रेसचे उमेदवार आहेत.
राज्याचा विरोधी पक्षनेता पुढील मुख्यमंत्री असतो असे शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या. भाजप आणि वीज मंडळाला धडा शिकवणार, असे शिवानी वडेट्टीवार यांनी सांगितले. विजय वडेट्टीवार राज्यभर प्रचार दौरे करत असताना शिवानी यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. मात्र आकापूर येथील शिवीगाळीच्या वायरल व्हिडीओने शिवानी वडेट्टीवार अडचणीत आल्या आहेत.
-
शंकर जगताप मोरेश्वर भोंडवेंचा पाठिंबा
महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी पाठिंबा दिला आहे. मोरेश्वर भोंडवे यांनी अगदी निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे पिंपरी चिंचवड शहरातील ठाकरे गटाचे शिवसैनिक नाराज झाले होते त्यांचं काम न करण्याची भूमिका घेतली होती. त्याच मोरेश्वर भोंडवे यांनी भाजपचे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
-
शरद पवारांच्या नाशिकमध्ये सहा सभा
नाशिक जिल्ह्यात शरद पवार यांच्या उद्या तब्बल सहा जाहीर सभा होणार आहेत. स्व पक्षाच्या मतदारसंघात पवारांच्या चार, तर मित्र पक्षांच्या मतदारसंघात प्रत्येकी एक सभा होणार आहे. कळवण, दिंडोरी, निफाड,पिंपळगाव, येवला, सिन्नर, नाशिक पूर्व, या मतदार संघात शरद पवारांच्या जाहीर सभा होणार आहेत.
-
मुंबईतील काही भाग प्रदूषणाच्या विळख्यात
मुंबईतील चार मतदारसंघ गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. मुंबईतील भायखळा, शिवडी, देवनार आणि मानखुर्द या चार प्रमुख मतदारसंघांमध्ये प्रदूषणाच्या भीषण समस्येमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. औद्योगिक कार्य, विकास प्रकल्प आणि इतर विविध कारणांमुळे या भागातील हवेचा दर्जा मोठ्या प्रमाणात खालावला आहे. प्रदूषित हवेचा परिणाम म्हणून या भागात श्वसनाचे आजार, फुप्फुसाचे आजार, तसेच इतर अनेक आरोग्य समस्या वाढल्याने नागरीक हवालदिल झालेत. स्थानिक नागरिकांना आरोग्याशी संबंधित समस्या भेडसावत असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
-
अविनाश लाड यांची 6 वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी
रत्नागिरीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अविनाश लाड यांची 6 वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अविनाश लाड राजापूर मतदार संघात अपक्ष उमेदवारी अर्ज भरत बंडखोरी केली. पक्षाच्या वरिष्ठांचे आदेश न मानता अविनाश लाड अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार असताना अविनाश लाड अपक्ष उमेदवार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही कारवाई केली आहे.
Published On - Nov 11,2024 8:09 AM