Maharashtra Breaking News LIVE : उबाठाला खिंडार पाडत अपक्ष उमेदवार राजाभैय्या पवार-गजानन ठेंगडेंचा भाजपात प्रवेश
Maharashtra Election News LIVE : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. आज 17 नोव्हेंबर 2024 राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. असं असताना राजकीय नेत्यांच्या सभा होत आहे. गडचिरोली आरमोरी अहेरी या मतदारसंघासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज प्रचार सभा होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी देसाईगंज इथं प्रचार सभा होणार आहे. करमाळयात आज सकाळी 10. 30 वाजता शरद पवार यांची सभा होणार आहे. शिवसेना उमेदवार संजय शिरसाठ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमरावतीच्या दर्यापूरमधील खल्लार गावात माजी खासदार, भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या सभेत राडा झाला आहे. खुर्च्या फेकून मारल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
उबाठाला खिंडार पाडत अपक्ष उमेदवार राजाभैय्या पवार-गजानन ठेंगडेंचा भाजपात प्रवेश
वाशिम विधानसभा मतदारसंघातील उबाठाचे पदाधिकारी आणि अपक्ष निवडणूक लढवत असलेले उमेदवार राजाभय्या पवार आणि उबाठाच्या युवा सेनेचे जिल्हा सचिव गजानन ठेंगडे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करून उबाठा शिवसेनेसह सर्वांना धक्का दिला आहे.
-
नाशिक मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन
नाशिक मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहेत. नाशिक शहरातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. नाशिकच्या गोल्फ क्लब मैदान येथे ही सभा पार पडणार आहे.
-
-
लोकसभा निवडणुकीतील सुभाष भामरे यांच्या पराभवाचा बदला घ्यायचाय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लोकसभेत विरोधी पक्षांनी संविधान बदलाचं खोटं नॅरेटीव्ह पसरवलं, आता ते खोटं चालणार नाही. लोकसभा निवडणुकीतील सुभाष भामरे यांच्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धुळ्यातील प्रचार सभेतन म्हणाले.
-
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांची हकालपट्टी
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. माढ्यात आमदार पुत्र अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांना समर्थन दिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचे कारण देत गणेश पाटील यांची पदावरून हकालपट्टी आणि पक्षातून निलंबन केले आहे.
-
Maharashtra News: अजित पवार यांच्या बद्दल बोलणं सुप्रिया सुळे यांनी टाळलं
महिला अत्याचारावर शेतकरी प्रश्नावर आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकांनी काम केलं त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. आमचं सरकार आल्यावर आशे सर्वच जुने आम्ही तात्काळ मागे घेणार आहोत… अजित पवार यांच्या बद्दल बोलणं सुप्रिया सुळे यांनी टाळलं.. राम कृष्ण हरी म्हणत हात जोडले…
-
-
Maharashtra News: पैसे दिले तर तुमच्या बापाचं काय जात विरोधकांना टोला – एकनाथ शिंदे
या मतदार संघातील १ लाख १० हजार महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले… विरोधक या विरोधात न्यायालयात गेले… अरे पैसे दिले तर तुमच्या बापाचं काय जात विरोधकांना टोला.. या योजनेचा विरोध करणाऱ्यांना जोडे दाखवा… या योजनेचे डिसेंबरचे पैसे ही मी सत्तेत आलो की देणार… असं वक्तव्यमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धडगाव सभेत केलं आहे.
-
Maharashtra News:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा…
-
वंचित बहुजन आघाडीच्या अण्णा जाधव यांच्यावर प्राण घातकहल्ला
वंचित बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ आण्णा जाधव यांच्यावर रत्नागिरीतील नरवण येथे जीव घेणा हल्ला झाला आहे.
-
अकबरुद्दीन ओवेसी यांची संभाजीनगरात पदयात्रा
अकबरुद्दीन ओवेसी यांची आज छत्रपती संभाजी नगर शहरात इम्तियाज जलील आणि नासेर सिद्धकी या उमेदवारांसाठी पदयात्रा होत आहे.पदयात्रेसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित आहे.
-
तिसऱ्या आघाडीशिवाय सरकार बनणार नाही, बच्चू कडू यांचा इशारा
आर्वी येथे प्रचार सभेत इशारा कोणत्याही पक्षाकडे बहूमत राहणार नाही, आमच्याशिवाय तुमचं सरकार बसणार नाही असा इशारा प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी दिलेला आहे.
-
इथेनॉलवर चालणाऱ्या वाहने येणार
पुढील गाड्यांची निर्मिती इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांची होणार आहे. इथेनॉलचे 400 पंप उघडले जाणार आहेत. मोटरसायकल देखील इथेनॉलवर चालणार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
-
वसमत तालुक्यात कोट्यवधीची रक्कम जप्त
वसमत तालुक्यातील चिखली शिवारात मुंबईवरून नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधून कोट्यावधी रुपयाची रक्कम जप्त केली आहे. एकूण तीन बॅगांमध्ये ही रोकड असल्याची माहिती निवडणूक भरारी पथकाचे प्रमुख मंगेश ईभूते यांनी दिली.
-
कराड विमानतळावर उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी
कराड विमानतळावर उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. त्याचा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांनी स्वतः बनवला. त्यांनी कर्मचाऱ्यांना विचारले कोणाकोणाची बॅग आतापर्यंत तपासली. मोदी, शहांची बॅग तपासली का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी पथकाला विचारला.
-
छत्रपती संभाजीनगरात 3 लाख 20 हजार वाहनांची तपासणी
छत्रपती संभाजीनगरात 3 लाख 20 हजार वाहनांची आजपर्यंत तपासणी करण्यात आली. या तपासणीत 29 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच 285 आचारसंहिता भंगाचा तक्रारी आल्या. त्यातील 255 तक्रारी निकाली काढल्या.
-
सुप्रिया सुळे यांच्या बॅगची तपासणी
सोलापूरमधील मंगळवेढा येथी हेलिपॅडवर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्याकडून खासदार सुप्रिया सुळे यांच्या बॅगाची तपासणी करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून ही तपासणी करण्यात आली. त्या महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ आल्या आहेत.
-
सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार त्यांना नव्हता- एकनाथ शिंदे
“सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार त्यांना नव्हता. विकासाला स्टे (स्थगिती) देण्याचं काम त्यांनी केलं. ते सत्तेत राहिले असते तर महाराष्ट्र दहा वर्षे मागे गेला असता,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची धुळ्यात सभा
धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघात दहिवेल या गावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. शिवसेनेच्या उमेदवार आमदार मंजुळा गावित यांच्या प्रचारासाठी साखरी इथल्या दहिवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेसाठी मोठा शामियाना, मंडप आणि 25000 नागरिक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात आहे.
-
मंगळवेढा इथं राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी
पंढरपूर- मंगळवेढा इथं राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. मंगळवेढा इथं हेलीपॅडवर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून विधानसभे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या आणि स्टार प्रचारकांच्या बॅगांची तपासणी केली जात आहे. पंढरपूरमधील मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे दाखल झाल्या आहेत.
-
हाती सत्ता असलेल्यांना शेतकऱ्यांची कवडीची किंमत नाही- शरद पवार
करमाळा- “महिलांवरील अत्याचार थांबवायचे असतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तरुणांच्या हाताला रोजगार पाहिजे असेल तर महाविकास आघाडीला मतदान करा. मी सत्तर हजार कोटींचं कर्ज माफ केलं होतं. ज्यांच्या हातात सत्ता आहे, मग ते देवेंद्र फडणवीस असो किंवा त्यांचे सहकारी असो.. त्यांना शेतकऱ्यांची कवडीची किंमत नाही,” अशा शब्दांत शरद पवारांनी टीका केली.
-
जे तुमच्या हाताला काम देऊ शकत नाही, त्यांचा उपयोग नाही- शरद पवार
करमाळा- “जे तुमच्या हाताला काम देऊ शकत नाही, त्यांचा उपयोग नाही. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात वीस हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सोन्यासारखं पीक आलं आणि ते अतिवृष्टीमुळे नष्ट झालं. कर्ज डोक्यावर तसंच राहिलं,” असं शरद पवार म्हणाले.
-
मुख्यमंत्री नंदुरबार दौऱ्यावर
राज्याचे मुख्यमंत्री आज नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथे जाहीर सभा घेणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमश्या पाडवी यांच्यासाठी मुख्यमंत्री यांची जाहीर सभा घेत आहेत.
-
हेमंत पाटील यांचा गंभीर आरोप
नांदेड उत्तर – दक्षिण मतदारसंघातील बंडखोर काँगेसचे हस्तक आहेत असा गंभीर आरोप आमदार हेमंत पाटील यांनी केला आहे. काँगेसकडून पैसे घेऊन शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महायुतीचे मतदान खराब करण्यासाठी काँग्रेसने मॅनेज करून यांना उभे केल्याचा आरोप त्यांनी केला.
-
उद्धव ठाकरे पालघरमध्ये
महाविकास आघाडी शिवसेना उबाठा गटाचे पालघर बोईसर विधानसभा मतदार संघातील दोन उमेदवार साठी उद्धव ठाकरे यांची आज बोईसर मध्ये जाहीर प्रचार सभा होत आहे.
-
बेईमान कसा वारस होणार? संजय राऊतांची खरमरीत टीका
नक्कीच या नेत्यांशी बेईमानी करणारा त्यांचा वारस होऊ शकत नाही कोणीही असेल कोणत्या पक्षाचा नेता असेल त्या नेत्याची बेइमानी करणारा त्यांचा वारस किंवा मी त्यांच्यानंतर हे कसं काय होऊ शकेल असं होऊ शकत नाही, अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली. शरद पवारांची लेगसी फार मोठी आहे आणि ती आज आहे आणि शरद पवार यांना उदंड आयुष्य लाभणार आहे हे मला माहिती आहे, असे ते म्हणाले.
-
साधुसंत भूमिका मांडणार
देवेंद्र फडणवीस यांच्या धर्मयुद्धाच्या घोषणेनंतर साधुसंत आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती गोविंददेवगिरी महाराज यांनी दिली. त्यांची पुण्यात पत्रकार परिषद होईल. यावेळी महाराष्ट्रातील संतांचे शिष्टमंडळ सोबत असेल.
-
आंबेगावच्या पाण्यासाठी सत्तेत जाणाऱ्या गटात सामील झालो
भाजप सोबत जाण्याची वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. झालेली चर्चा मला माहीत असली तरी जाहीररित्या सांगणार नाही. पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक झाली व त्यात सत्ते सोबत जाण्याचे ठरले. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला व 41 आमदार सोबत मीही सत्तेत गेलो. राष्ट्रवादीत फूट पडली. मी पक्षाच्या सत्तेत जाणाऱ्या आमदारांसोबत राहिलो मला ही भूमिका घ्याव लागली कारण आपला पाण्याचा प्रश्न, आंबेगावच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा होता, असे विधान सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
-
बारामती हेलिपॅडवर शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. बारामती हेलिपॅडवर शरद पवारांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे. बारामतीहून करमाळ्याकडे रवाना होताना ही तपासणी करण्यात आली आहे.
-
पिंपरी-चिंचवडमध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महापालिकेची अनोखी शक्कल
पिंपरी चिंचवड : शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मार्फत वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जात आहेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अशीच शक्कल वापरून शहरात पहिल्यांदाच “भव्य विंटेज कार आणि बाईक रॅली व प्रदर्शनाचे” आयोजन केले होते. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ऐतिहासिक दुर्मिळ कार व बाईक्स पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र रस्त्यावर पाहायला मिळालं.
-
गडचिरोलीतील अहेरी मतदारसंघातील नक्षलग्रस्त भागात मतदान पथके रवाना
गडचिरोली अहेरी मतदार संघातील नक्षलग्रस्त भागात मतदान पथके हेलिकॉप्टरने रवाना करण्यात आली आहेत. नेहमीच निवडणुकीच्या तीन दिवसा अगोदर मतदान पथके नक्षलग्रस्त भागात पाठवण्यात येतात. बेस कॅम्पवर दोन दिन मुक्काम करून ही पथके पायदळी प्रवास करून मतदान केंद्रापर्यंत पोहोचतात. अहेरी मतदान संघातील एटापल्ली भामरागड या दुर्गम भागात मतदान पथके वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने रवाना करण्यात आले
-
एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे काय माहिती आहेत? संजय राऊतांचा सवाल
एकनाथ शिंदे हे दिल्लीचे बूट चाटतात. हे बाळासाहेबांना मान्य नव्हतं. बाळासाहेबांनी कधीच काँग्रेसचा तिरस्कार केला नाही. इंदिरा गांधी, राजीव गांधींना राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात कायम एकोपा राहिल याची त्यांनी काळजी घेतली. एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे काय माहिती आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थितीत केला.
-
उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल, पत्नीसह केले विनम्र अभिवादन
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतीदिन. यानिमित्त उद्धव ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना विनम्र अभिवादन केले. यावेळी पत्नी रश्मी ठाकरे, खासदार अनिल देसाई यांसह अनेकजण उपस्थितीत होते.
-
जळगावात ५९ लाख ६१ हजाराचे सोने-चांदी जप्त
जळगावात पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच कोटी ५९ लाख ६१ हजाराचे सोने-चांदीचे दागिने जप्त केले आहे. जळगावातील रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी नाकाबंदी करत ही कारवाई केली आहे. कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाल मध्ये चार किलो सोने व ३४ किलो चांदीचा समावेश आहे. जळगाव शहरातील तीन सराफ व्यावसायिकांचे हे सोने-चांदी असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ
शिवसेना उमेदवार संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. निवडणूक प्रचाराच्या खर्चात तफावत आढळल्याने निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा नोटीस वाजवली आहे.छत्रपती संभाजी नगर शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चात तफावत आढळल्यामुळे चार उमेदवारांना निवडणूक विभागाने नोटीस बजावली आहे. 48 तासात याबाबत खुलासा करण्याचेही निर्देश देखील दिले आहेत. यामध्ये महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट, महाविकास आघाडीचे राजू शिंदे,रमेश गायकवाड यांना निवडणूक विभागाने ही नोटीस बजावली.
-
उद्धव ठाकरेंची बोईसरमध्ये सभा
उद्धव ठाकरे यांची आज पालघरच्या बोईसरमध्ये जाहीर सभा होणार आहे. पालघर विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार जयेंद्र दुबळा आणि बोईसर विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विश्वास वळवी यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा होत आहे. दुपारी दोन वाजताच्या सुमारास उद्धव ठाकरे यांचे खैराफाटा येथील मैदानावर जाहीर सभा होणार आहे.
-
मनोज जरांगेंचं विधान चर्चेत
मी थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे. जरांगे पाटील लासलगाव येथील सभेत भावूक झाले. माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय याची काळजी वाटते. मी कधी जाईल माहित नाही. मी तुमच्यात किती दिवस राहील. माहीत नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
Published On - Nov 17,2024 9:09 AM