Maharashtra Election News LIVE : वसंत देशमुख यांच्यावर कारवाई करा-जयश्री थोरात

| Updated on: Oct 26, 2024 | 11:36 AM

Maharashtra Assembly Election 2024 LIVE News and Updates in Marathi : आज 26 ऑक्टोबर 2024. महाराष्ट्रात आज महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. काही महत्त्वाचे पक्ष प्रवेश होऊ शकतात. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्व महत्त्वाच्या, लेटेस्ट अपडेट या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Maharashtra Election News LIVE : वसंत देशमुख यांच्यावर कारवाई करा-जयश्री थोरात
महत्वाची बातमीImage Credit source: tv9

LIVE NEWS & UPDATES

  • 26 Oct 2024 11:55 AM (IST)

    संजय राऊत यांचा महायुतीला चिमटा

    बाळासाहेब थोरात हे मातोश्रीवर कधीही येऊ शकतात आम्हीपण त्यांच्याकडे जाऊ शकतो. मी सुद्धा शरद पवार व जयंत पाटील यांच्याकडे बसून चर्चा केली .288 जागेवरती प्रश्न निर्माण होतो महाराष्ट्र मोठे राज्य आहे इतर राज्य प्रमाणे नाही तीन पक्ष प्रमुख आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.

  • 26 Oct 2024 11:40 AM (IST)

    जयश्री मला बहिणीसारखीच -सुजय विखे पाटील

    मला माझ्या कार्यकर्त्यांचा जीव महत्वाच आहे. त्यांचे भविष्य महत्वाचे , मी काल एक फोन केला असता तर चार पट माणसे आली असतील. मुद्दयावर बोला , नाही तर मी अधिकृतपणे सांगतो सहन करणार नाही. गणेशच्या विजयी मिरवणुकीत काय काय बोलले. 23 तारखेला मतपेटी बाहेर येताच कळेल एक लाखांच मताधिक्य आपणास मिळेल. मी ते भाषण थांबवल असत मात्र ती घटना अचानक घडली. जयश्री मला बहिणीसारखीच आहे. कोणी कार्यकर्त्यांनी देखील बोलू नये, असे सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

  • 26 Oct 2024 11:29 AM (IST)

    काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

    काँग्रेस पक्षाने त्यांची दुसरी यादी जाहीर केली. पहिल्या यादीत ज्यांना स्थान मिळाले नव्हते, त्यातील काही जणांचा दुसर्‍या यादीत समावेश आहे. अशी आहे यादी…

  • 26 Oct 2024 11:22 AM (IST)

    लोणीत वातावरण तापले

    भाजप कार्यकर्ते आणि विखे पाटील समर्थकांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ लोणी येथे विखे समर्थकांकडून निषेध सभा घेण्यात येत आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकवटले आहेत.सुजय विखे पाटील , त्यांच्या मातोश्री शालिनीताई विखे पाटील यांचीही निषेध सभेस उपस्थिती आहे.

  • 26 Oct 2024 11:10 AM (IST)

    15 लाख रुपये सापडले

    कराडहून साताऱ्याकडे जाणाऱ्या कारमध्ये 15 लाख रुपये सापडले. तासवडे टोल नाक्यावर कारची तपासणी करत असताना रक्कम सापडली. ही बोलेरो कार गुजरात पासिंगची असल्याचे समोर आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

  • 26 Oct 2024 11:00 AM (IST)

    मुंबईवर येऊन अडलं महायुतीचं घोडं

    महायुतीने जागा वाटपात आघाडी घेतली आहे. पण महायुतीचं गाडी मुंबईवर येऊन अडकली आहे. मुंबईतील काही जागांवर अजूनही एकमत झाले नसल्याचे चित्र आहे.

  • 26 Oct 2024 10:52 AM (IST)

    Maharashtra News: माझी गाडी जाळणार अशी मला आधीच माहिती मिळाली – सुजय विखे

    माझी गाडी जाळणार अशी मला आधीच माहिती मिळाली… माझ्या मार्गावर जमाव येणार अशी माहिती मला मिळाली… आमच्या लोकांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली… कालचा राडा आधीच ठरवून झाला होता… असं वक्तव्य देखील सुजय विखे यांनी केलं आहे.

  • 26 Oct 2024 10:44 AM (IST)

    Maharashtra News: मविआत उत्तम समन्वय, 90 – 90 – 90 जागांचा फॉर्म्युला – संजय राऊत

    नाना पटोलेंसोबत माझा चांगला संवाद सुरू… मविआत उत्तम समन्वय, 90 – 90 – 90 जागांचा फॉर्म्युला… 175 जागा जिंकून मविआ सरकार बनवेल… नांदेड उत्तर, हिंगोलीच्या जागेबाबत पटोलेंशी चर्चा… संजय राऊत यांचं वक्तव्य

  • 26 Oct 2024 10:37 AM (IST)

    Maharashtra News: इचलकरंजी विधानसभामध्ये महायुतीमध्ये बिघाडी

    अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल चोपडे यांनी आपला प्राथमिक अर्ज दाखल केला… राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा दिला राजीनामा आणि अपक्ष उमेदवार म्हणून लढणार विठ्ठल चोपडे… 28 तारखेला आपला अपक्ष उमेदवारी अर्ज विठ्ठल चोपडे करणार दाखल… महायुतीला मोठा धक्का आणि अजित पवार गटालाही मोठा धक्का

  • 26 Oct 2024 10:20 AM (IST)

    Maharashtra News: कराडहून साताऱ्याकडे जाणाऱ्या कारमध्ये सापडले 15 लाख

    कराडहून साताऱ्याकडे जाणाऱ्या कारमध्ये सापडले 15 लाख… तासवडे टोल नाक्यावर कारची तपासणी करत असताना सापडली रक्कम… बलेरो कार गुजरात पासिंगची… पैसे नेमके कशाचे याचा तपास सुरु…

  • 26 Oct 2024 10:07 AM (IST)

    Maharashtra News: तिरुपती कदम कोडेंकर जरांगे पाटलांच्या भेटीला

    तिरुपती कोंडेकर आहेत नांदेडच्या भोकर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार… भोकर विधानसभा मतदारसंघात अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण आहेत भाजपाकडून उमेदवार…

  • 26 Oct 2024 09:57 AM (IST)

    शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी?

    शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात प्रदीप कंद रिंगणात? शिरूर हवेलीत महायुतीत बंडखोरीची शक्यता आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, भाजप नेते प्रदीप कंद अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा पारंपारिक मतदार संघ असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेणार निर्णय आहे, असं प्रदीप कंद म्हणालेत. लोकसभेला ही प्रदीप कंद यांना इच्छुक आहेत. पण उमेदवारी न मिळाल्याने काहीही झालं तरी आता लढायचं असा कार्यकर्त्यांनी  निर्धार केला आहे.  त्यामुळे शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार का? याकडे लक्ष आहे.

  • 26 Oct 2024 09:50 AM (IST)

    सोलापूर दक्षिणच्या जागेवरून मविआत रस्सीखेच

    शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी काँग्रेस नेत्यांना आवाहन केलं आहे. सोलापूर दक्षिणची जागा शिवसेनेचीच असून शिवसनेनेचे अमर पाटीलच निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस नेते दिलीप मानेंच्या दबावानंतर शिवसेना उपनेते शरद कोळी आक्रमक झाले आहेत. काँग्रेसकडून दबावतंत्राचा वापर केला जातोय मात्र दक्षिण सोलापूरची जागा शिवसेना लढणार आहेत. काँग्रेसवाल्यांनी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होईल अशी कृत्य करू नये. येत्या सोमवारी महाविकास आघाडी शिवसेनेचे उमेदवार अमर पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, असं शरद कोळी म्हणालेत.

  • 26 Oct 2024 09:40 AM (IST)

    नांदेडमधील काँग्रेसमधील उमेदवार जरांगेंच्या भेटीला

    तिरुपती कदम कोडेंकर मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला पोहोचले आहेत. तिरुपती कोंडेकर आहेत नांदेडच्या भोकर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघात अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण आहेत भाजपकडून उमेदवार आहेत.

  • 26 Oct 2024 09:27 AM (IST)

    रावेरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस लढत

    रावेरमध्ये सध्या भाजप विरुद्ध काँग्रेस अशा लढत होत आहे. भाजपाचे अमोल जावळे विरुद्ध काँग्रेसचे धनंजय चौधरी अशी लढत होत आहे. स्वर्गीय हरिभाऊ जावळे माजी खासदार माजी आमदार यांचे चिरंजीव अमोल जावळे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आले आहे. तर काँग्रेसचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांचा मुलगा धनंजय चौधरी येथे रिंगणात आहे.

  • 26 Oct 2024 09:22 AM (IST)

    संभाजीराजे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला

    स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. संभाजीराजे पुण्याहून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झालेत. संभाजीराजे छत्रपती संभाजीनगरहुन अंतरवाली जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. संभाजीराजे तिसऱ्या आघाडी महाशक्तीचे प्रमुख नेते आहेत.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. अशात विविध घडामोडी घडत आहेत. अहमदनगरच्या संगमनेरमध्ये भाजप नेत्याच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाने वाद निर्माण झाला आहे. यावरून राजकारण तापलं आहे. तर शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी आली आहे. याचसोबत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत आहेत. याबाबतचे सर्व महत्त्वाच्या घडामोडी, तसंच मनोरंजन, क्रीडा विश्वातील घडामोडींचेही अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा हा ब्लॉग फॉलो करा.

Published On - Oct 26,2024 9:09 AM

Follow us
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा.
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा.
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'.
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?.
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?.
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक.
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?.
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'.
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने.