Maharashtra Breaking News LIVE : सतेज पाटलांच्या कार्यालयात बैठक, काय निर्णय घेणार?
Maharashtra Election News LIVE : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. आज 6 नोव्हेंबर 2024 राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
Maharashtra News: गोंदिया जिल्ह्यातील चार जागांसाठी 64 उमेदवार रिंगणात
गोंदिया जिल्ह्यातील चार जागांसाठी 64 उमेदवार रिंगणात… 39 उमेदवारांची रिंगणातून माघार… अर्जुनी मोरगावात – 19, तिरोडात- 21, गोंदिया-15 तर आमगाव – 9 उमेदवार…
-
Maharashtra News: शिवसेना बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे हे सर्वांना माहिती आहे – संजय राऊत
शिवसेना बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे हे सर्वांना माहिती आहे… शिवसेना आणि धनुष्यबाण बाळासाहेबांचीच प्रॉपर्टी… बाळासाहेब राज ठाकरे यांना माफ करणार नाहीत… मोदी – शहांनी बाळासाहेबांची प्रॉपर्टी शिंदेंना दिली… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
-
Maharashtra News: निवडणूक आयोगानं उशिरा का होईना शहाणपणाचा निर्णय घेतला – संजय राऊत
निवडणूक आयोगानं उशिरा का होईना शहाणपणाचा निर्णय घेतला… गृहमंत्र्यांना नैतिकता प्रशासन कळत नाही… सरकारने अनेक नियुक्त्या बेकायदेशीरच केल्यात… रश्मी शुक्लांवरून संजय राऊतांची सरकारवर टीका…
-
Maharashtra News: काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा ऑफिसवर इंडिया आघाडीची तातडीची बैठक
बैठकीला सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे घटक पक्ष… कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन… आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीला कसं सामोरे जायचं याबाबत विचारमंथन… कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतून मधुरीमा राजे छत्रपती यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता…
-
सोलापूर शहर मध्य मतदारसंघात चौरंगी लढत
सोलापूर शहर मध्य मतदारसंघात भाजपकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन केलं गेलं. सोलापूर शहर मध्य मध्ये चौरंगी लढत होणार आहे.काँग्रेसचे चेतन नरोटे, माकपचे नरसय्या आडम तसेच एमआयएमचे फारूक शाब्दी आणि भाजपकडून देवेंद्र कोठे अशी चौरंगी लढत असणार आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत ही पदयात्रा काढण्यात आली.
-
-
सतेज पाटलांच्या कार्यालयात इंडिया आघाडीची बैठक
कोल्हापुरात काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा ऑफिसवर इंडिया आघाडीची तातडीची बैठक बोलावली आहे. बैठकीला सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीला कसं सामोरे जायचं याबाबत विचारमंथन होणार आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतून मधुरीमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.
-
कोल्हापूरच्या मेरी वेदर मैदानावर महायुतीची पहिली सभा
कोल्हापूरमध्ये आज महायुतीची पहिली एकत्रित प्रचार सभा घेणार आहेत. कोल्हापूरच्या मेरी वेदर मैदानावर प्रचार सभा होणार आहे. मेरी वेदर मैदानावर महायुतीच्या निर्धार सभेची जय्यत तयारी सुरु झालेली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार महायुतीचा प्रचार शुभारंभ होणार आहे.
-
-
शंकर जगताप यांच्या प्रचाराचा उद्या शुभारंभ
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या बुधवारी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यासाठी चिंचवड विधानसभेत पहिली प्रचार सभा होणार आहे.चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शंकर जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे असा सामना रंगणार आहे.
-
Maharashtra Election 2024 : कोकणातून उद्धव ठाकरे सेना प्रचाराचा बिगुल आज फुंकणार
उद्धव ठाकरे कोकणातल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा करणार शुभारंभ. आज कोल्हापूर दौऱ्यानंतर सायंकाळी उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीत सभा. साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळ ठाकरेंची होणार जाहीर सभा. उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी. रत्नागिरीचे उमेदवार बाळ माने यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सभा.
-
Maharashtra Election 2024 : भाजपा पक्षाला आता अहंकार आला आहे – हरिष भगत
“भाजपा पक्षाला आता अहंकार आला आहे, सत्तेचा माज आला आहे. मी बंडखोरी करत माझा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. पण भाजपाचा जिल्हाध्यक्ष किंव कोणत्याही पदाधिकाऱ्याने माझ्याशी संपर्क केला नाही. त्यामुळे मी नालासोपारा विधानसभेतून अपक्ष निवडणूक लढवत आहे. लोकसभा निवडणुकीत राजन नाईक यांच्याकडून आम्हाला खूप वाईट आनुभव आला होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात आम्ही निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता” असं भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार हरिष भगत यांनी सांगितलं.
-
Maharashtra Election 2024 : रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात किती उमेदवार रिंगणात?
रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात 38 उमेदवार निवडणुक रिंगणात. दापोली विधानसभा मतदार संघात सर्वात जास्त 9 उमेदवार निवडणुक रिंगणात. गुहागर विधानसभा मतदार संघात 7, चिपळूण विधानसभा मतदार संघात 6 तर रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदार संघात प्रत्येकी 8 उमेदवार रिंगणात. पाच पैकी चार विधानसभा मतदार संघात मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशीच लढत.
-
Maharashtra Election 2024 : सिंधुदुर्गात बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराची भाजपातून हकालपट्टी
सिंधुदुर्गातील भाजपाचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून विशाल परब यांनी बंडखोरी केली होती.वरिष्ठांनी समज देऊन देखील विशाल परब यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी हकालपट्टी केली. निवडणूक काळात विशाल परब यांना मदत करणाऱ्या भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर देखील दिले कारवाईचे संकेत.
-
Maharashtra Election 2024 : महाराष्ट्रात 288 जागांसाठी किती हजार उमेदवार रिंगणात?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. एकूण 288 जागांसाठी 4140 उमेदवार रिंगणात होते. त्यात महाडमध्ये सर्वात कमी 5 उमेदवार आहेत. बीडच्या माजलगावमध्ये सर्वाधिक 34 उमेदवार रिंगणात आहेत.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. महायुतीला 90 ते 95 टक्के बंडखोरी रोखण्यात यश आलं. पण महाविकास आघाडीला तितक्या प्रमाणात बंडखोरीला वेसण घालता आली नाही. एकूण 288 जागांसाठी 4140 उमेदवार रिंगणात होते. त्यात महाडमध्ये सर्वात कमी 5 उमेदवार आहेत. बीडच्या माजलगावमध्ये सर्वाधिक 34 उमेदवार रिंगणात आहेत. कालच्या दिवसात दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. माहीममध्ये तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झालय. शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला नकार दिला. अखेरच्या क्षणी त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या दिवशी कोल्हापूरच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आलाय. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी माघार घेतली. काँग्रेसमध्ये जे काही घडलं, त्यामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना रडू कोसळलं.
Published On - Nov 05,2024 8:28 AM