Maharashtra Breaking News LIVE : पनवेलमध्ये शरद पवारांच्या पक्षाला झटका

| Updated on: Nov 07, 2024 | 11:13 AM

Maharashtra Election News LIVE : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. आज 7 नोव्हेंबर 2024 राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : पनवेलमध्ये शरद पवारांच्या पक्षाला झटका
महत्वाची बातमीImage Credit source: tv9

LIVE NEWS & UPDATES

  • 07 Nov 2024 11:13 AM (IST)

    पनवेलमध्ये शरद पवारांच्या पक्षाला झटका

    पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकास कामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) पक्षातील पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश केला. त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले आणि भाजप परिवारामध्ये सामिल झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

  • 07 Nov 2024 11:09 AM (IST)

    नाशिकमधील भाजपा उमेदवार राज ठाकरेंशी बोलणार

    “नाशिक मध्य मतदारसंघात मनसेने उमेदवार दिलेला नाही. मनसेने माझ्या प्रचारात सक्रिय व्हावं. यासाठी मी स्वतः राज साहेबांशी बोलणार. अशोक मुर्तडक नाशिकचे माजी महापौर आणि आमचे सहकारी. मनसेची मला मतदारसंघात निश्चितपणे ताकद मिळेल असा विश्वास आहे” असं भाजपा उमेदवार देवयानी फरांदे म्हणाल्या. “ताईंचे आणि आमचे 30 वर्षांचे संबंध आहेत. राजकारणापलीकडे सुद्धा संबंध टिकवण्याची आपली परंपरा. मध्य मतदारसंघात मनसेने उमेदवार दिलेला नाही, ही देखील एक प्रकारे मदतच आहे. माझ्या मतदारसंघात 15 हजारांहून अधिक मतदान” असं अशोक मुर्तडक म्हणाले.

  • 07 Nov 2024 11:01 AM (IST)

    सदाभाऊ खोतसारख्या वाचाळविराला महायुतीच्या नेत्यांनी वेळीच आवरा- दिलीप मोहितेपाटील

    “सदाभाऊ खोतसारख्या वाचाळविराला महायुतीच्या नेत्यांनी वेळीच आवरा,” अशा शब्दात अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेपाटलांनी थेट इशारा दिला आहे. “एखाद्या व्यक्तीच्या आजार, व्यंग, शरीरावर बोलणं योग्य नाही. सदाभाऊ खोत यांच्या विधानाचा अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय. याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहे असं नाही,” असं ते म्हणाले. आम्ही महायुतीचे घटक पक्ष असल्याचंही मोहितेपाटीलांनी यावेळी स्पष्ट केलं.

  • 07 Nov 2024 10:47 AM (IST)

    नाशिक- भाजप उमेदवार देवयानी फरांदे यांनी मनसेचे अशोक मुर्तडक यांची घेतली भेट

    नाशिक- भाजप उमेदवार देवयानी फरांदे यांनी मनसेचे अशोक मुर्तडक यांची भेट घेतली. अशोक मुर्तडक नाशिकचे मनसेचे माजी महापौर आहेत. तर देवयानी फरांदे भाजपाच्या मध्य मतदार संघातील उमेदवार आहेत. मनसेने मध्य मतदार संघातून माघार घेतली आहे. मनसेची मदत घेण्यासाठी भेट घेतल्याचं देवयानी फरांदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर राजकारणापलीकडचे संबंध असल्याने भेट झाल्याचं अशोक मुर्तडक यांनी म्हटलंय.

  • 07 Nov 2024 10:37 AM (IST)

    17 नोव्हेंबरला शिवसैनिक शिवाजी पार्कवर येणारच- उद्धव ठाकरे

    “17 नोव्हेंबरला शिवसैनिक शिवाजी पार्कवर येणारच. संघर्ष टाळायचा असेल तर शिवाजी पार्कवर परवानगी द्या. माहीममध्ये मला सभा घेण्याची आवश्यकता नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 07 Nov 2024 10:27 AM (IST)

    मुलांना मोफत शिक्षण देणार, कोळीवाड्यांचा प्रशस्तपणा कायम राखणार- उद्धव ठाकरे

    “मुलांना मोफत शिक्षण देणार. आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून दाखवलं. कोळीवाड्यांचा प्रशस्तपणा कायम ठेवून आम्ही विकास करणार. मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देणार. जीवनावश्यक वस्तूंचं दर पाच वर्षे कायम ठेवणार,” अशी आश्वासनं ठाकरेंच्या वचननाम्यात देण्यात आली आहेत.

  • 07 Nov 2024 10:19 AM (IST)

    ठाकरे गटाच्या वचननाम्याचं प्रकाशन

    “आमचा वचननामा दोन प्रकारात असेल. वचननाम्यावर क्यूआर कोडदेखील देण्यात आला आहे. आमच्या आणि मविआच्या वचननाम्यात फार असं काही वेगळं नाही. मविआचा सविस्तर जाहीरनामा काही दिवसांत समोर येईल. कोळीवाड्यांची ओळख आम्ही पुसू देणार नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 07 Nov 2024 10:10 AM (IST)

    सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी – अजित पवार

    “सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी. खोत यांनी अत्यंत निंदनिय प्रकार केलाय. त्यांचं वक्तव्य निषेधार्ह आहे. भूमिका मांडा पण त्याला ताळमेळ हवा. विरोधकांवर बोलताना पातळी सोडू नये,” असं अजित पवार म्हणाले.

  • 07 Nov 2024 09:59 AM (IST)

    कोकणातील सहा जागांवर महाविकास आघाडी जिंकणार

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातील सहाही जागा महाविकास आघाडीचे आमदार निवडून येतील असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. हमखास निवडून येणारे आमदार म्हणून मतदार प्रशांत यादव यांच्याकडे पाहत असल्याचे ते म्हणाले. उदय सामंत यांच्या सारख्या टीवल्या बावळ्यांची टीका करण्याची सवय असल्याची टीका त्यांनी केली.

  • 07 Nov 2024 09:50 AM (IST)

    भाजपने राज्यात विष पेरले -संजय राऊत

    भाजपने राज्यात कायम विष पेरल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. मोदी ज्यांना कधी कधी राजकीय गुरू मानतात. त्यांच्यावर सदाभाऊ खोत अशा खालच्या पातळीवरील टीका करतात, त्यांना लाज वाटत नाही का? असा सवाल राऊत यांनी केला.

  • 07 Nov 2024 09:42 AM (IST)

    आज शरद पवार यांच्या तीन सभा

    शरद पवार हे आज नागपूर येथे प्रचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्या तीन सभा होणार आहेत. काल राहुल गांधी यांनी नागपूरमध्ये जातनिहाय जनगणना करण्याची आग्रही भूमिका घेतली होती. त्याला पूरकच भूमिका शरद पवार यांनी घेतली.

  • 07 Nov 2024 09:30 AM (IST)

    सलमान खानला धमकी देणाऱ्याला बंगळुरूमधून अटक

    सलमान खान याला धमकी देणाऱ्या आरोपीला बंगळुरूमधून अटक केली आहे. बीकाराम बिष्णोई याने पाच कोटींच्या खंडणीसाठी ही धमकी दिली होती. वाहतूक शाखेच्या संपर्क क्रमांकावर ही धमकी देण्यात आली होती.

  • 07 Nov 2024 09:20 AM (IST)

    पूर्व विदर्भात आम्हाला केवळ एकच जागा – भास्कर जाधव

    पूर्व विदर्भात एकूण 28 जागा आहेत. त्यात एकच जागा आमच्या पदरात पडली. तिथे पण काँग्रेसची बंडखोरी झाली. राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केल्याने वेदना झाल्याचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी सांगितले. त्यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली.

  • 07 Nov 2024 09:11 AM (IST)

    देवळालीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता

    शिवसेनेच्या देवळालीतील उमेदवार राजश्री अहिरराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे. उमेदवारी अर्ज मिळाल्यानंतर राजश्री अहिरराव नॉट रीचेबल राहिल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला आहे. याच मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरोज अहिरे ह्या उमेदवार असताना राजश्री अहिरराव यांना शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध शिंदे शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.

  • 07 Nov 2024 08:57 AM (IST)

    अमर पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ

    दक्षिण सोलापुरातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. हत्तुर येथील सोमेश्वर मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचार शुभारंभात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. प्रचार शुभारंभाच्या सभेत अमर पाटील यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी दहा वर्षात केवळ कागदावर विकासकामे केली. शेती पाणी तसेच बेरोजगारी हे मुद्दे दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता परिवर्तनाची वेळ आली असून मला संधी द्या, असं अमर पाटील म्हणालेत.

  • 07 Nov 2024 08:45 AM (IST)

    नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर आली आहे. निवडणुक शांततेत पार पडण्यासाठी शहरातील विविध भागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या 20 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. अंबड,सातपूर, नाशिक रोड, उपनगर आणि देवळाली कॅम्प परिसरातील 20 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. हद्दपारीची कारवाई केलेल्यांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी नाशिक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

  • 07 Nov 2024 08:30 AM (IST)

    वर्ध्याच्या भूगाव स्टील कंपनीत दुर्घटना १८ कामगार जखमी

    वर्ध्याच्या भूगाव येथील एवोनिथ स्टील कंपनीत दुर्घटना घडली आहे. कंपनीतील स्लॅगपिट परिसरात कुलिंग प्रोसेस सुरू असताना फ्लॅश होऊन दुर्घटना घडल्याची माहिती आहे. दुर्घटनेत १८ कामगार जखमी, जखमीपैकी ३ कामगारांवर नागपूरमधील रूग्णालयात उपचार सुरु आहेत. १५ कामगार सावंगी येथील रूग्णालयात भरती आहेत. जखमी कामगारांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती आहे.

  • 07 Nov 2024 08:15 AM (IST)

    मान खटावमधील मविआतील वाद पुन्हा चव्हाट्यावर

    साताऱ्याच्या मान खटाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील नेत्यांचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. प्रभाकर देशमुख यांना डावल्याने भर प्रचार सभेत कार्यकर्त्यांमध्ये वाद आहे. शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख आणि अभय जगताप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे. महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांच्या उमेदवारी बाबत मान खटाव मधील नेत्यांमध्ये वाद आहे.

राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. त्यासाठी ठिकठिकाणी प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. काल वांद्र्यातील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा झाली. या सभेतून राहुल गांधींसह इतर नेत्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी जनतेला आश्वासन दिलं. हातात सत्ता आल्यास एकाही मशीदीवर भोंगा दिसणार नाही, असं राज ठाकरे काल झालेल्या सभेत म्हणालेत. आजच्या दिवसभरातील महत्वाच्या बातम्या या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.

Published On - Nov 07,2024 8:06 AM

Follow us
'लाडक्या बहिणीं'ना आता 1500 नाही 2100 रूपये मिळणार, राज ठाकरेंचा विरोध
'लाडक्या बहिणीं'ना आता 1500 नाही 2100 रूपये मिळणार, राज ठाकरेंचा विरोध.
राज ठाकरेंचा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांना सवाल, 'आरक्षण कस मिळेल?'
राज ठाकरेंचा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांना सवाल, 'आरक्षण कस मिळेल?'.
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य.
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा.
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका.
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी.
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”.
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा.
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर..
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर...