Maharashtra Breaking News LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज महाराष्ट्रात पहिली सभा, देवेंद्र फडणवीस धुळ्यात दाखल
Maharashtra Election News LIVE : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. आज 8 नोव्हेंबर 2024 राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळ्यात दाखल, थोड्याच वेळात भाषण करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धुळ्यात आगमन झाले आहे. आज महाराष्ट्रात मोदींची पहिली सभा होणार आहे. थोड्याच वेळात ते व्यासपीठावर दाखल होणार असून जोरदार भाषण करतील. सध्या धुळ्यात देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे सभास्थळी दाखल झाले आहेत.
-
लक्ष्मण हाकेंवर हल्ला : १० जण पोलिसांच्या ताब्यात, 30 जणांवर गुन्हा दाखल
नांदेड : प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी 10 जणांना कंधार पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या तक्रारीवरुन 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गैर कायद्याची मंडळी जमवून उमेदवाराचे वाहन थांबवले, तसेच पोलीस कर्मचाऱ्याशी झटापट करुन जखमी केले, गाडीवर दगडफेक आणि पोलिसांशी वाद घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
-
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आज निवृत्त होणार
नवी दिल्ली : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे आज निवृत्त होणार आहे. सरन्यायाधीश पदावरून धनंजय चंद्रचूड आज निवृत्त होणार आहेत.
-
भाजपने महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास केला, विजय वडेट्टीवारांची टीका
भुजबळ जे म्हणताय ते खरं आहे, आम्ही आधी हेच बोलत होतो. मात्र आमचे आरोप राजकीय आहे असे सांगितले जात होते. भाजपमध्ये जी लोक गेली आहे, ती सर्व ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवूनच गेली आहेत, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास भाजपने केला आहे. क्लीन चीट देणारे तेच आहेत. आरोप लावणारेही तेच आहे आणि भाजपमध्ये प्रवेश देणारे तेच आहेत, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
-
Maharashtra News: काँग्रेस पक्षाच्या सहसचिव प्रियांका गांधी गडचिरोलीत करणार प्रचार
काँग्रेस पक्षाच्या सहसचिव प्रियांका गांधी गडचिरोलीत करणार प्रचार… १३ नोव्हेंबर रोजी गडचिरोलीमध्ये करणार रोड शो… गडचिरोली मधील आदिवासी मतदारसंघासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोर्चेबांधणी… काँग्रेसचे गडचिरोलीचे उमेदवार मनोहर पोरोटी आणि आरमोरीचे उमेदवार रामदास मसराम यांच्या प्रचारसाठी रोड शो…
-
-
Maharashtra News: 95 % ईडी, सीबीआयच्या केसेस विरोधी पक्षावर आहेत – सुप्रिया सुळे
ईडी, सीबीआयच्या केसेस फक्त विरेधी पक्षांवर आहेत… ईडी, सीबीआयच्या गैरवापरातून पक्ष फोडणं सुरु… अदृश्य शक्ती महिलांमागेही लागतेय… असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
-
Maharashtra News: भोंगा काढण्यासाठी सत्तेची गरज नाही – संजय राऊत
राज ठाकरे फडणवीसांसोबत सत्तेतच… भोंगा काढण्यासाठी सत्तेची गरज नाही… आपला पक्ष सोडायचा आणि भाजपसोबत जायचं असा दबाव असतो… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं.
-
-
Maharashtra News: शिंदे, अजित पवारांसह सर्वजण गेले ते ईडीला घबरुन – संजय राऊत
सगळे स्वतःला वाचवण्यासाठी शिंदेंसोबत गेले… शिंदे, अजित पवारांसह सर्वजण गेले ते ईडीला घबरुन.. भाजपमध्ये जाताच अनेकांच्या ईडी, सीबीआयच्या फाईली कपाटात… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे…
-
Maharashtra News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या जुन्नर युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांवर हल्ला
युवकचे तालुका अध्यक्ष सुरज वाजगे यांच्या गाडीवर दगडफेक… जुन्नरहून नारायणगावला परतत असताना कुरण येथे झाली दगडफेक… हल्लेखोर कुरणच्या जंगलात पळाले सुरज वांजगे सुखरूप … खासदार अमोल कोल्हे, बाबू पाटे यांनी घटनास्थळी दिली भेट… जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल…
-
Maharashtra Election 2024 : ‘पवार साहेबांना दु:ख दिलं. याचा हिशोब…’
शरद पवार गटाचे माढ्याचे उमेदवार अभिजीत पाटलांचा आमदार बबनराव शिंदेवर जोरदार निशाणा. अभिजीत पाटलांना मत म्हणजे शरद पवारांना मत असणार आहे. मतदान करताना शरद पवारांना या वयात पक्ष आणि पार्टी फोडणाऱ्या सही करणाऱ्या 40 गद्दार आमदारांमध्ये माढ्याचे आमदार देखील होते. त्यांनी पवार साहेबांना दु:ख दिलं. याचा हिशोब या निवडणुकीतून दाखवून द्यायचाय. निकाल देखील आपल्याच बाजुने लागणार आहे असं अभिजीत पाटील म्हणाले.
-
Maharashtra Election 2024 : राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते अजित पवारांच्या भेटीला मुंबईत
धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला. मुंबईच्या देवगिरी बंगल्यावर आले भेटीला. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर अमोल मिटकरी, सुनील तटकरे, धनंजय मुंडे दाखल. मुंबईच्या देवगिरी बंगल्यावर आले भेटीला. थोड्याच वेळात अजित पवार यांच्या बंगल्यावर बैठक होण्याची शक्यता.
-
हर्षवर्धन जाधव यांची जीवाला धोका असल्याची तक्रार
कन्नडचे माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याची पोलिसात तक्रार केली आहे. काही गाड्या माझा पाठलाग करत आहेत, काही लोक अपहरणाचा कट रचत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्या मागे भाजप नेते रावसाहेब दानवे असल्याचा त्यांचा आरोप आहे
-
Maharashtra Election 2024 : आज पीएम मोदींची महाराष्ट्रात पहिली सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातली तसेच उत्तर महाराष्ट्रातील पहिली सभा आज धुळ्यात पार पडत आहे. विधानसभेतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी आज येथे येत आहेत. धुळे शहरातील गोशाळा मैदानाच्या 45 एकरावर नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. अडीच हजार पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. भव्य सभा मंडप व्यासपीठ अशी संपूर्ण तयारी पूर्ण झालेली असून सभेला एक लाख लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातली तसेच उत्तर महाराष्ट्रातील पहिली सभा आज धुळ्यात पार पडणार आहे. विधानसभेतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची ही सभा होत आहे. धुळे शहरातील गोशाळा मैदानाच्या 45 एकरावर नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. अडीच हजार पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारे आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि महिलाध्यक्ष सुजाताताई घाग यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात लेखी पत्र दिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सध्या भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षात जबरदस्त बॅनर वॉर. एकीकडे देवेंद्र फडणवीस तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे बॅनर चर्चेचा विषय.
Published On - Nov 08,2024 9:00 AM