Maharashtra Assembly Election 2024 LIVE : जयंत पाटील, अमोल कोल्हे शरद पवारांच्या भेटीला, जागावाटपाचा आढावा देणार

| Updated on: Oct 18, 2024 | 10:38 AM

Maharashtra Assembly Election 2024 LIVE News and Updates in Marathi : महाराष्ट्रात सध्या बैठकांच सत्र सुरु आहे. आजही महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा मुख्य सामना आहे. महायुती त्यांच्या सरकारने जी काम केलीयत, त्याच्या प्रचारावर भर देत आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीकडून कायदा-सुव्यवस्था आणि अन्य मुद्दे उपस्थित केले जात आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 LIVE : जयंत पाटील, अमोल कोल्हे शरद पवारांच्या भेटीला, जागावाटपाचा आढावा देणार
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

LIVE NEWS & UPDATES

  • 18 Oct 2024 10:38 AM (IST)

    Maharashtra News: मविआची जागावाटपाची चर्चा अधिक वेगाने झाली पाहिजे – संजय राऊत

    आम्हाला माहाराष्ट्राचा जास्त अनुभव आहे. मविआची जागावाटपाची चर्चा अधिक वेगाने झाली पाहिजे… जागावाटपावर राहुल गांधींसोबत चर्चा करणार… मविआची जागावाटपाची चर्चा अधिक वेगाने झाली पाहिजे… जागावाटपासाठी अत्यंत कमी वेळ, गती मिळावी… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 18 Oct 2024 10:25 AM (IST)

    Maharashtra News: मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते शरद पवार गटाच्या वाटेवर

    नाशिक मध्ये भाजपला मोठा धक्का… मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते शरद पवार गटाच्या वाटेवर… नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते तुतारी घेण्याची शक्यता.. मुंबईत आज घेणार शरद पवारांची भेट… नाशिक पूर्व मतदारसंघातून गणेश गीते निवडणूक लढण्यास इच्छुक… नाशिक पूर्वमध्ये राहुल ढिकले आहेत भाजपचे विद्यमान आमदार… भाजपाकडून उमेदवारी मिळत नसल्याने गणेश गीते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर

  • 18 Oct 2024 10:06 AM (IST)

    Maharashtra News: जिल्ह्यातील 415 कोटींच्या कामांना आचारसंहितेमुळे ब्रेक

    नाशिक जिल्ह्यातील 415 कोटींच्या कामांना आचारसंहितेमुळे ब्रेक… 900 पैकी 415 कोटींच्या नियोजनास मान्यता… जिल्ह्याच्या विकासाची गती आचारसंहितेमुळे मंद… उर्वरित 415 कोटीचे नवीन आमदारांना असणार नियोजन… तर पालकमंत्र्यांची भूमिका ठरणार महत्त्वपूर्ण…

  • 18 Oct 2024 09:57 AM (IST)

    आदित्य ठाकरेंनी आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या, खोटं बोलू नका, आशिष शेलार यांचा घणाघात

    आदित्य ठाकरेंनी आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या, खोटं बोलू नका, आशिष शेलार यांचा घणाघात

  • 18 Oct 2024 09:45 AM (IST)

    केंद्रीय गृहमंत्रालयाकडून शरद पवारांशी पुन्हा संपर्क, झेड प्लस सुरक्षेबाबत चर्चा

    नवी दिल्ली : झेड प्लस सुरक्षेबाबत पुन्हा शरद पवार यांच्याशी संपर्क साधला जाणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालय हा संपर्क साधला जाणार आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार यांना सीआरपीएफची झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी संपर्क साधला जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक आणि पदाचा विचार करता सुरक्षा घेण्यासाठी पवारांशी संपर्क साधला जाणार आहे. दोन महिन्यांपूर्वी झेड प्लस सुरक्षा देऊनही शरद पवार यांनी सुरक्षा न घेतल्याने सीआरपीएफचे अधिकारी शरद पवार यांना भेटून याबाबतची माहिती देऊ शकतात

  • 18 Oct 2024 09:43 AM (IST)

    नाशिकमध्ये 415 कोटींच्या कामांना आचारसंहितेमुळे ब्रेक

    नाशिक जिल्ह्यातील 415 कोटींच्या कामांना आचारसंहितेमुळे ब्रेक लागला आहे. 900 पैकी 415 कोटींच्या नियोजनास मान्यता देण्यात आली होती. मात्र जिल्ह्याच्या विकासाची गती आचारसंहितेमुळे मंदावली आहे. उर्वरित 415 कोटीचे नवीन आमदारांना असणार नियोजन आहे. तर पालकमंत्र्यांची भूमिका यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

  • 18 Oct 2024 09:23 AM (IST)

    समीर वानखेडेंनी दोनदा घेतली एकनाथ शिंदेंची भेट, चेंबूर विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा

    IRS अधिकारी समीर वानखेडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. समीर वानखेडे हे दोन वेळा एकनाथ शिंदेंना भेटले. यावेळी त्यांनी चेंबूर विधानसभा मतदारसंघासंदर्भात सखोल चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. IRS अधिकारी समीर वानखेडे यांनी स्वत: चेंबूर मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असल्याचंही सांगितले. तर IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्यासाठी शिवसेनेकडून दोन मतदार संघाची चाचपणी केली जात आहे. धारावी मतदार संघातून राहुल शेवाळेंनीही दावा केल्याने धारावीची जागा कोण लढवणार हा पक्षापुढे मोठा प्रश्न आहे.

  • 18 Oct 2024 09:19 AM (IST)

    अखेर जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी फोडला प्रचाराचा नारळ

    जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांची तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चेला आता आमदार बेनकेंनी पूर्णविराम दिला आहे. आज सकाळी ओझरच्या विघ्नहर्ता गणपती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी बेनकेंच्या गळ्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचे चिन्ह असलेला पट्टाही पहायला मिळात आहे. आता बेनके घड्याळ चिन्हावर जुन्नरमधून लढणार असल्याचे निश्चित झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक संघ असल्याचा विश्वास व्यक्त करत अजित पवार आणि शरद पवार आपलेच असल्याचा नारा ही बेनकेंनी दिला आहे. त्यामुळे बेनकेंनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकसंघ असल्याचा केलेला दावा सध्या चर्चेचा विषय ठरतोय

  • 18 Oct 2024 08:57 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : मनोज जरांगेंच्या भेटीसाठी आलेले शंभूराजे जगताप कोण?

    करमाळयातील शंभूराजे जगताप यांनी अंतरावली सराटी येथे येऊन घेतली मनोज जरांगे यांची भेट. करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी मराठा समाजाकडून उमेदवारीसाठी शंभूराजे जगताप इच्छुक. शंभूराजे जगताप हे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे पुत्र आहेत.

  • 18 Oct 2024 08:56 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : चंद्रशेखर बावनकुळे कालपासून पुण्यात, तिथे काय घडतय

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कालपासून पुण्यात. काल सायंकाळी पुण्यातील इच्छुक उमेदवारांसोबत केली चर्चा. रात्री उशिरापर्यंत बावनकुळे यांनी अनेक इच्छुकांच्या घेतल्या भेटीगाठी. पुणे शहरातील अनेक विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी नगरसेवक आहेत इच्छुक. पर्वती, खडकवासला, वडगावशेरी, कसबा विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • 18 Oct 2024 08:43 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : भाजपा नेता मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला

    भाजपा नेते माजी आमदार सुरेश धस यांनी काल मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मध्यरात्री 1 वाजता अंतरवाली सराटी येथे जाऊन घेतली भेट. मनोज जरांगे पाटील व सुरेश धस यांच्यात राजकीत विषयावर चर्चा झाली. सुरेश धस हे बीड जिल्ह्यातील आष्टी – पाटोदा मतदार संघातून भाजपाकडून निवडणूक लढवणार आहेत.

  • 18 Oct 2024 08:42 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : शिरोळचे अपक्ष आमदार कुठून निवडणूक लढवणार?

    शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर राजर्षी शाहू विकास आघाडी पक्षातर्फेच निवडणूक लढवणार?. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी tv9 शी बोलताना दिले संकेत. चार दिवसात जाहीर मेळावा घेऊन अधिकृत भूमिका स्पष्ट करणार. यड्रावकर यांची माहिती

  • 18 Oct 2024 08:39 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : MIM पार्टी नांदेडमध्ये किती जागा लढणार?

    “नांदेड हा एमआयएम’चा गड. निवडणुकीत आम्ही विजयी होऊ. मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात काँग्रेस बोलत नाही. मग काँग्रेसला मुस्लिमांकडे वोट मागण्याचा अधिकार आहे का?” असा सवाल सय्यद मोईन यांनी केला. ते एमआयएम पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.

  • 18 Oct 2024 08:37 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात येणार आहेत. ठाण्यात शिवसेना शिंदे गटातील उपविभाग प्रमुख सचिन यादव याने विनयभंग केलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आणि यादव याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची राज ठाकरे घेणार भेट. काही दिवसांपूर्वी ठाण्यात अकरा वर्षे अल्पवयीन मुलीचा झाला होता विनयभंग. याप्रकरणी पोलीस अंकात गुन्हा दाखल झाला.

  • 18 Oct 2024 08:34 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : छत्रपती संभाजी नगरमध्ये ठाकरे गटात उमेदवारीसाठी चढाओढ

    छत्रपती संभाजी नगरमध्ये मतदारसंघात ठाकरे गटात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू. किशनचंद तनवाणी, डॉ. शोएब हाश्मी, नंदू घोडेले, बाळासाहेब थोरात यांच्यात रस्सी खेच सुरू. मध्य मतदारसंघात ठाकरे गटाची उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच. शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी होणार लढाई. मध्य मतदारसंघात एमआयएमचेही असणार मोठे आव्हान तर मध्य मतदारसंघात ठाकरे गटाकडून मुस्लिम चेहरा देण्याची मागणी. डॉ. शोएब हाश्मी या मुस्लिम चेहऱ्याचाही विचार सुरू असल्याची माहिती

  • 18 Oct 2024 08:32 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : सिंधुदुर्गात भाजपाला धक्का

    सिंधुदुर्गातील राजन तेली भाजप सोडणार ही TV9 ची बातमी खरी ठरली. राजन तेली यांनी प्राथमिक सदस्यत्व व पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या मतदारसंघात चालत असलेली घराणेशाही (केसरकर) आपल्याला मान्य नाही तसेच राणे परिवाराकडून होत असलेले अंतर्गत खच्चीकरण, याला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे तेली यांनी म्हटलं आहे.राजन तेली आज ठाकरे सेनेत प्रवेश करणार,

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी अजून जोरात तयारी सुरु केली आहे. फक्त आता कुठला पक्ष, किती जागांवर लढणार? उमेदवारांची नाव कधी जाहीर होणार? याचीच उत्सुक्ता आहे. यंदा महाराष्ट्राच्या निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा प्रभावी ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात? ते महत्त्वाच ठरणार आहे. भाजपा नेते माजी आमदार सुरेश धस यांनी काल मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मध्यरात्री 1 वाजता अंतरवाली सराटी येथे जाऊन घेतली भेट. मनोज जरांगे पाटील व सुरेश धस यांच्यात राजकीत विषयावर चर्चा झाली. सुरेश धस हे बीड जिल्ह्यातील आष्टी – पाटोदा मतदार संघातून भाजपाकडून निवडणूक लढवणार आहेत. बीड जिल्ह्यात जरांगे फॅक्टर चालत असल्याने सुरेश धस जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते.

Published On - Oct 18,2024 8:30 AM

Follow us
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'.
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.