Maharashtra Assembly Election 2024 LIVE : रत्नागिरी जिल्ह्यात महाविकासआघाडीत धुसफूस, काँग्रेसकडून जागाची मागणी

| Updated on: Oct 22, 2024 | 10:56 AM

Maharashtra Assembly Election 2024 LIVE News and Updates in Marathi : महाराष्ट्रात विधानसभा निवडूक जाहीर झाली आहे. आता महिन्याभरापेक्षा पण कमी कालावधी उरला आहे. वेगाने राजकीय हालचाली सुरु आहेत. आज काही पक्ष उमेदवार याद्या जाहीर करण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मतभेद आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 LIVE : रत्नागिरी जिल्ह्यात महाविकासआघाडीत धुसफूस, काँग्रेसकडून जागाची मागणी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

LIVE NEWS & UPDATES

  • 22 Oct 2024 10:56 AM (IST)

    Maharashtra News: यूती असते तेव्हा 1 -2 पाऊल मागे यावं लागतं – अजित पवार

    आघाडी, युती करतो तेव्हा पुढेमागे करावं लागतं… यूती असते तेव्हा 1 -2 पाऊल मागे यावं लागतं… प्रत्येकाला तिकीट मागण्याचा अधिकार… असं वक्तव्य अजित पवार यांनी वक्तव्य केलं आहे.

  • 22 Oct 2024 10:43 AM (IST)

    Maharashtra News: शिंदे, फडणवीस, अजित पवारांकडून पैशांचं वाटप सुरु – संजय राऊत

    शिंदे, फडणवीस, अजित पवारांकडून पैशांचं वाटप सुरु… फक्त 5 कोटी रुपये जप्त झाले, 10 कोटी रुपये सोडून दिले… 30 – 30 कोटी सुद्धा आता लवकरच वाटप करतील… सांगोल्याच्या गद्दार आमदारांसाठी रोकड जात होती… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 22 Oct 2024 10:29 AM (IST)

    Maharashtra News: नाशिकमध्ये महायुतीतील इच्छुकांकडून बंडाचा झेंडा

    दिंडोरीचे माजी आमदार आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते धनराज महाले बंडाच्या तयारीत… दिंडोरीतून धनराज महाले शिंदेंच्या शिवसेनेकडून होते इच्छुक… मात्र दिंडोरीची जागा अजित पवार गटाला सुटल्याने आणि नरहरी झिरवाळ यांना पक्षाचा AB फॉर्म मिळाल्याने महालेंचं बंड… २४ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा धनराज महाले यांचा निर्णय… राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने महायुतीचा धर्म पाळला नाही, तर आम्ही का पाळायचा? धनराज महाले यांचा विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांना सवाल…

  • 22 Oct 2024 10:25 AM (IST)

    Maharashtra News: मुंबईत अनेक ठिकाणी योगींचे पोस्टर

    मुंबईत अनेक ठिकाणी योगींचे पोस्टर लावण्यात आले आहेत… मुंबईतील अंधेरी पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि वांद्रे परिसरात होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत… होर्डिंग्जवर योगींच्या चित्रासह बंटेंगे तो कटेंगे अशी घोषणा होती… हरियाणानंतर आता योगींचा नारा महाराष्ट्राच्या निवडणुकीत उतरला आहे…

  • 22 Oct 2024 10:11 AM (IST)

    Maharashtra News: अजीत पवार आणि अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत गाणं लाँच

    पैलवान या चित्रपटाच्या गाण्याचं अजीत पवार आणि अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत लाँचिंग… अजीत पवार यांचे खाजगी सचिव अजित सोलवट यांचंही या चित्रपटातून केलंय पदार्पण… काही वेळात अनेक पैलवानांच्या उपस्थितीत गाणं होणार प्रदर्शित

  • 22 Oct 2024 09:55 AM (IST)

    रत्नागिरीत उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, लवकरच फुटणार प्रचाराचा नारळ

    रत्नागिरी विधानसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रांन्त कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. विधानसभा निवडणुकांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. प्रमुख पक्षाचे उमेदवार कधी अर्ज भरणार याची उत्सुकता सध्या सर्वांना आहे.

    रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 विधानसभा मतदार संघ आहेत. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच प्रचाराचा नारळ फुटणार आहे. इच्छुक उमेदवारांना 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरपर्यत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.

  • 22 Oct 2024 09:51 AM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्यात महाविकासआघाडीत धुसफूस, काँग्रेसकडून जागेची मागणी

    रत्नागिरी जिल्हा कार्यालयात काँग्रेसची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. राजापूर मतदारसंघातील उमेदवारी संदर्भात काँग्रेस निर्णायक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे महाविकासआघाडीमध्ये जिल्ह्यातंर्गत धुसफूस समोर येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा मिळत नसल्याने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस वेगळी भूमिका गेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    या बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष आणि राजापूरमधून इच्छूक असलेले अविनाश लाड भूमिका स्पष्ट करणार आहेत. यामुळे राजापूरमध्ये सांगली पटर्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार राजन साळवी यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यामुळे काँग्रेसने आक्रमक पावित्रा घेतला आहे.

  • 22 Oct 2024 09:25 AM (IST)

    राजहंस सिंग, राहुल कनाल शिंदे सेनेतर्फे निवडणूक लढवण्याची शक्यता, सूत्रांची माहिती

    राजहंस सिंग, भाजपचे विधान परिषदेचे सदस्य (एमएलसी), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे निवडणूक लढवणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सिंग हे डिंडोशी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, जिथे त्यांनी २००९ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली होती. तर शिंदे सेनेचे राहुल कनाल, जे आदित्य ठाकरे यांचे माजी निकटवर्ती होते आणि आत्ता श्रीकांत शिंदे यांचं जवळचे मानले जातात. त्यांचा कालिना मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय पोटणीस यांच्याशी थेट सामना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • 22 Oct 2024 09:14 AM (IST)

    आमदार सतीश चव्हाण शरद पवार गटात प्रवेश करणार

    आमदार सतीश चव्हाण यांचा शरद पवार गटात प्रवेश निश्चित झाला आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी तुतारी हाती घेण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे सतीश चव्हाण यांचा प्रवेश लांबला होता. मात्र अखेर हा प्रवेश निश्चित झाला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या राजीनामे देण्याच्या धमकीमुळे सतीश चव्हाण वेटिंगवर होते. मात्र एक ते दोन दिवसात सतीश चव्हाण यांचा प्रवेश निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • 22 Oct 2024 09:00 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : राज ठाकरे-एकनाथ शिंदे एकाच दिवशी असणार ठाण्यात

    मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे येत्या गुरुवारी 24 तारखेला विधानसभा उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच अविनाश जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठाण्यात उपस्थित राहणार आहेत. ठाण्यात मनसेचे मोठे शक्ती प्रदर्शन पहायला मिळणार आहे. मनसे आणि अविनाश जाधव हे ठाणे शहर या ठिकाणी दुसऱ्यांदा आपले नशीब आजमावणार आहेत. भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या समोर अविनाश जाधव पुन्हा एकदा विधान सभा रिगणात उतरणार आहेत. त्याच दिवशी शिवसेनेकडून एकनाथ शिंदे देखील कोपरी पाचपाखाडी येथून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

  • 22 Oct 2024 08:54 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : ठाकरे गटाकडून आतापर्यंत किती उमेदवार निश्चित?

    तिढा नसलेल्या जागावर संबंधित उमेदवाराला लढण्यासंदर्भात तयारीचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले आहेत. ठाकरे गट महाविकास आघाडीत 96 ते 98 जागांवर लढणार असल्याची सूत्रांची माहिती. त्यापैकी 86 जागावरील इच्छुक उमेदवारांची यादी ठाकरे गटाकडून निश्चित करण्यात आली आहे. 86 मतदार संघातील ज्या मतदार संघात एकापेक्षा जास्त इच्छुक आहेत, त्यांचा सर्वे करून उमेदवारांना मातोश्रीवर बोलवण्यात येत असून त्यांना सूचना दिल्या जात आहेत. अशा पद्धतीने आतापर्यंत एकूण 53 जणांना उमेदवारी निश्चितीबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत.

  • 22 Oct 2024 08:43 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : शरद पवार गटाची माढ्याची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच

    मविआमधून शरद पवार गटाची माढ्याची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि शरद पवारांची आज भेट होणार. आज शरद पवार-जयंत पाटील यांच्या समवेत भेटीला बोलावल्याची माहिती असून या तिघांमध्ये मुंबईत बैठक होणार आहे. शरद पवार आमदार बबनराव शिंदेना तिकीट देण्यास सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आमदार शिंदेचा मुलगा रणजितसिंहला तिकीट देण्याचा आग्रह पवारांकडे सुरु असल्याची माहिती tv9 ला सुत्रांकडून मिळाली आहे.

  • 22 Oct 2024 08:42 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

    विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरण्यासाठी म्हणजेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसीलनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 29 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवार यादी जाहीर करणारा भाजपा पहिला पक्ष ठरला आहे. भाजपाने पहिल्या यादीत 99 उमेदवार जाहीर केलेत. भाजपाला उमेदवार यादी जाहीर करण्याचे जसे फायदे आहेत, तसे तोटे सुद्धा आहेत. या यादीमुळे काही ठिकाणी बंडाचे संकेत मिळाले आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर ज्यांना तिकीट मिळालं, ते आभार मानण्यासाठी आले, तसच ज्यांच नाव जाहीर झालेलं नाही ते सुद्धा होते. दरम्यान राजापूर लांजा साखरपा या विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित यशवंतराव हे आज उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मातोश्रीवर आज दुपारी साडेबारा वाजता होणार प्रवेश. स्थानिक आमदार राजन साळवी यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी प्रवेशावेळी मातोश्रीवर असणार हजर.

Published On - Oct 22,2024 8:41 AM

Follow us
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम.
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक.
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?.