Maharashtra Assembly Election 2024 LIVE : हितेंद्र ठाकुरांची नवी खेळी, महाविकासआघाडीचा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरु

| Updated on: Oct 17, 2024 | 10:52 AM

Maharashtra Assembly Election 2024 LIVE News and Updates in Marathi : महाराष्ट्रात आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीची चर्चा आहे. सगळेच राजकीय पक्ष उमेदवार अंतिम करण्याच्या कामाला लागले आहेत. राज्यात दिवाळीनंतर निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 LIVE : हितेंद्र ठाकुरांची नवी खेळी, महाविकासआघाडीचा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरु
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

LIVE NEWS & UPDATES

  • 17 Oct 2024 10:59 AM (IST)

    Maharashtra Assembly Election 2024 LIVE : वरुण सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, अनिल परबांचे मोठे विधान

    अनिल परब यांनी गट प्रमुख मेळाव्यातून मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. तर वरूण सरदेसाई हे बांद्रा विधानसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार असाही विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  • 17 Oct 2024 10:36 AM (IST)

    Maharashtra Assembly Election 2024 LIVE : वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात भाजप नेत्या शनाया एनसी लढण्यास इच्छुक

    Maharashtra Assembly Election 2024 LIVE :  वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंच्या विरोधात भाजप नेत्या शनाया एनसी लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. भाजप नेत्या शनाया एनसी या वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे आता वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे विरुद्ध शनाया एनसी अशी लढत होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 17 Oct 2024 10:27 AM (IST)

    Maharashtra Assembly Election 2024 LIVE : हितेंद्र ठाकुरांची नवी खेळी, महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरु

    बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर हे सध्या महाविकासआघाडीचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्नात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बविआचे कार्याध्यक्ष राजीव पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे हितेंद्र ठाकुरांनी नवी खेळी केली आहे आहे. महाविकासआघाडी हे हितेंद्र ठाकुरांच्या बविआ उमेदवारांना पाठिंबा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    पालघर जिल्ह्यातील 6 पैकी 3 आमदार हितेंद्र ठाकुरांचे आहेत, ठाकुरांच्या 3 आमदारांना मविआ कडून पाठिंबा मिळाला तर इतर मविआ च्या तीन आमदारांना बविआ पाठिंबा देऊन निवडून आणणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

  • 17 Oct 2024 10:22 AM (IST)

    Maharashtra Assembly Election 2024 LIVE : सुनिल राणेंचा पत्ता कट होणार? बोरिवलीत गोपाळ शेट्टींना उमेदवारी मिळण्याची शक्यता

    आमदार सुनिल राणेंचा पत्ता कट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. बोरीवली मतदारसंघातून गोपाळ शेट्टी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. भाजपच्या दिल्लीतील बैठकीत याबद्दलची चर्चा रंगली होती. मात्र गोपाळ शेट्टींच्या उमेदवारीवरून बैठकीत दोन नेत्यांमध्ये वाद निर्णाण झाला आहे.

    लोकसभेत गोपाळ शेट्टींचे तिकीट कापल्यानंतर पुर्नवसन करण्याची मुंबईतील नेत्यांनी विनंती केली आहे. मुंबईतील एका नेत्याचा गोपाळ शेट्टींसाठी आग्रह असल्याची माहिती समोर येत आहे. बोरिवली विधानसभेबाबत कालच्या बैठकीत तोडगा निघाला नाही. यामुळे आता पुढील बैठकीत यावर चर्चा करण्यास पक्षश्रेष्ठींनी सांगितलं.

  • 17 Oct 2024 10:15 AM (IST)

    Maharashtra Assembly Election 2024 LIVE : दोन वर्षांपासून फक्त तारखांवर तारखा दिल्या जातात – संजय राऊत

    न्यायालयाचे काम हे संविधानाला वाचवणे हे आहे. पण सध्या संविधानाची हत्या होत आहे. दोन वर्षांपासून फक्त तारखांवर तारखा दिल्या जात आहे. असे अनेक निर्णय आहेत. – संजय राऊत

  • 17 Oct 2024 10:12 AM (IST)

    Maharashtra Assembly Election 2024 LIVE : धनंजय चंद्रचूड यांच्याकडून संजीव खन्ना यांच्या नावाची मुख्य न्यायमूर्ती म्हणून शिफारस

    नवी दिल्ली : देशाचे पुढील मुख्य न्यायमूर्ती म्हणून सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. CJI धनंजय चंद्रचूड यांनी सुप्रीम कोर्टचे दुसरे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नावाची केली शिफारस केली आहे. चंद्रचूड यांनी केंद्र सरकारकडे त्यांच्या नावाची शिफारस पाठवली आहे. धनंजय चंद्रचूड हे 10 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. केंद्र सरकारने ही शिफारस मान्य केल्यास 11 नोव्हेंबरपासून सरन्यायाधीश संजीव खन्ना असतील. संजीव खन्ना यांचा कार्यकाळ 6 महिन्यांचा असेल

  • 17 Oct 2024 09:57 AM (IST)

    वसमत विधानसभेच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच

    हिंगोलीतील वसमत विधानसभेवर शिवसेना आणि भाजपने दावा केला आहे. शिवसेना पाठोपाठ आता भाजपाचा ही वसमत विधानसभेवर दावा केलाय. महायुतीमध्ये वसमत विधानसभेचे अजित पवार गटाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे तयारी करत आहेत. येणाऱ्या काळात वसमत विधानसभेत महायुतित बिघाडी होण्याची शक्यता आहे.

  • 17 Oct 2024 09:45 AM (IST)

    सुजय विखे पाटील निवडणूक लढवणार नाहीत

    अहमदनगरच्या संगमनेर विधानसभा मतदार संघातून माजी खासदार सुजय विखे पाटील निवडणूक लढवणार नाहीत. पक्षाकडे सुजय विखे यांनी निवडणूक लढवण्यासाठी तयारी दाखवली होती. पण पक्षाकडून सुजय यांच्या नावाचा उमेदवारीसाठी विचार नाही. ती जागा महायुतीत शिवसेनेकडे असल्याने उमेदवार कोण याची चर्चा होत आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात सुजय विखे यांनी तयारी केली होती.  एकाच घरात 2 तिकीट नको म्हणून पक्षाने निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 17 Oct 2024 09:30 AM (IST)

    मतदार नोंदणीसाठी शेवटचे तीन दिवस

    मतदार नोंदणीसाठी तीन दिवस बाकी 19 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. निवडणुकीच्या दहा दिवस अगोदर पर्यंत अर्ज करता येत असल्याने 19 ऑक्टोबर पर्यंत नवीन मतदार होता येणार आहे. लोकसभेत पुणे जिल्ह्याची टक्केवारी घसरल्याने निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीत मतदान टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

  • 17 Oct 2024 09:15 AM (IST)

    मंगलदास बांदल यांना ईडीकडून मोठा धक्का

    पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि मंगलदास बांदल यांना ईडीकडून मोठा धक्का देण्यात आला आहे. शिवाजीराव भोसले बॅंकेच्या फसवणूक प्रकरणी बांदल यांची स्थावर मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. बांदल यांच्यासह हनुमंत शंभाजी खेमधरे, सतीश आणि यतिश जाधव यांचीही संपत्ती जप्त करण्यात आली आहे. एकूण 85 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली

  • 17 Oct 2024 09:00 AM (IST)

    समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

    वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात. अपघातात एक ठार.कारची ट्रकला मागून धडक. समृद्धी महामार्गावर कारंजा तालुक्यातील वलाई गावाजवळ लोकेशन 182 वर झाला अपघात. अपघातात कार चालक ठार. अपघातात कारचा समोरील भाग चक्काचूर.

  • 17 Oct 2024 08:50 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : आचारसंहितेमुळे जळगावात 35 कोटींच्या कामांना ‘ब्रेक’

    आचारसंहितेमुळे जळगाव जिल्हा परिषदेच्या तब्बल 35 कोटींच्या कामांना लागला ‘ब्रेक’. सर्व कामांना प्रशासकीय मंजुरी. मात्र, निविदा प्रक्रिया, कार्यादेश रखडल्याने लागला ब्रेक. जिल्हा परिषदेकडून प्रस्तावित 203 कोटींच्या कामांपैकी जवळपास 35 कोटींच्या कामांना 45 दिवसांपर्यंत ब्रेक लागणार. 35 कोटीपैकी 30 कोटीची कामे बांधकाम विभागाची आहेत. त्यापैकी काही कामे निविदा प्रक्रियेत, तर काही कामांना कार्यादेश देण्याचे राहिले आहेत.

  • 17 Oct 2024 08:33 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : जयंत पाटील यांच्याबाबत शरद पवार यांचं मोठं विधान

    “जागांचा निर्णय जयंत पाटील घेतील. जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदाबाबत बोलण योग्य” असं शरद पवार म्हणाले.

  • 17 Oct 2024 08:23 AM (IST)

    धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या वाहनाला अपघात

    पुणे सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या वाहनाला अपघात. कार आणि ट्रॅव्हल बस यांच्यात जोरदार धडक होऊन झाला अपघात. अपघातात जयश्री मुंडे किरकोळ जखमी. पहाटे 4.30 वाजता झाला अपघात.

  • 17 Oct 2024 08:22 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : मतदार नोंदणीसाठी तीन दिवस बाकी

    मतदार नोंदणीसाठी तीन दिवस बाकी. 19 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार. लोकसभेत पुणे जिल्ह्याची टक्केवारी घसरल्याने निवडणूक आयोगाने व्यक्त केली होती नाराजी. विधानसभा निवडणुकीत मतदान टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू.

Maharashtra Assembly Election 2024 LIVE : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा मुख्य सामना आहे. कुठल्या पक्षाच्या वाट्याला किती जागा मिळणार? याची उत्सुक्ता आहे. लवकरच जागावाटप जाहीर होईल, असं काल महायुती आणि महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान रात्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राजेश टोपे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. दरम्यान परिवर्तन महाशक्तीची आज पुण्यात बैठक होणार आहे. यात जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. परिवर्तन महाशक्तीची आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन बैठक आहे. मविआ, महायुतीसह आता ‘परिवर्तन महाशक्ती’ देखील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. शिवाजीनगर येथे दुपारी ३ वाजता नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीकरीता छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू,राजू शेट्टी, वामनराव चटप, शंकरअण्णा धोंडगे, नारायण अंकुशे, यांच्यासह समविचारी पक्ष एकत्रित येणार आहेत.

Published On - Oct 17,2024 8:20 AM

Follow us
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील.
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री.
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस.
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा.