Maharashtra Assembly Election 2024 Voting LIVE : धुळ्यात 500 महिला एकाच वेळी वाजत गाजत मतदानासाठी निघाल्या
Maharashtra Assembly Elections 2024 Voting LIVE : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 पासून मतदानाला सुरूवात होणार असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहेत. राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महायुती वि. महाआघाडी असा सामना रंगणार असून मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकतात याकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी बजावला मतदानाचा हक्क
भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी मतदानाचा हक्क बजावला. महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात कल्याणकारी योजना आणल्या, त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुती कार आणण्यासाठी राज्यभरातील लोक उत्सुक आहेत. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय नेते आहेत त्यांना कुठेतरी जाऊन पैसे वाटप करण्याची गरज नाही. तावडे यांनी पैसे वाटल्याचे आरोपात कोणतंही तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी मतदानानंतर दिली.
-
Maharashtra Assembly Elections 2024 : चाळीसगाव – मॉक पोलदरम्यान 7 व्हीव्हीपॅड , दोन कंट्रोल मशीन बदलली
मॉक पोलदरम्यान चाळीसगाव मध्ये सात व्हीव्हीपॅड तसेच दोन कंट्रोल मशीन बदलण्यात आली. मात्र याचा मतदानावर कुठलाही परिणाम झाला नाही. मॉक पोलदरम्यान व्हीव्हीपॅड व कंट्रोल मशीन मध्ये बिघाड झाल्याने ते बदलण्यात आले. व्हीव्हीपॅड व कंट्रोल मशीन बदलण्यात आलेल्या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.
-
-
Maharashtra Assembly Elections 2024 : धुळ्यात 500 महिला एकाच वेळी वाजत गाजत मतदानासाठी निघाल्या
धुळ्यामध्ये तब्बल 500 महिला एकाच वेळी मतदानासाठी निघालेल्या आहेत. सर्वांनी बाहेर पडून जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे, ही जनजागृती करण्यासाठी या महिला एकत्रितपणे वाजत गाजत मतदान केंद्रावर जाण्यासाठी निघाल्या आहेत.
-
Maharashtra Assembly Elections 2024 : रामनगर गावाचा मतदानावर बहिष्कार
कन्नड तालुक्याती रामनगर गावाने मतदानावर बहिष्कार टाकला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रावर शुकशुकाट पसरला आहे. गावात पायभूत सुविधा नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
-
Maharashtra Assembly Elections 2024 : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही केलं मतदान
क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. सचिनने संपूर्ण कुटुंबासह मतदान केलं. सर्वांनी बाहेर पडून मोठ्या प्रमाणाता मतदान करा, मतदानाचा हक्क जरूर बजावा, असं आवाहन सचिनने नागरिकांना केलं.
-
-
Maharashtra Assembly Elections 2024 : नांदगाव मतदारसंघातील मतदान केंद्रावरील ईव्हीएम दोनदा पडलं बंद
नांदगाव मतदारसंघातील 164 नंबर मतदान केंद्रावरील मशीन पडले दोनदा बंद पडले. न्यू.इंग्लिश स्कूल येथील आदर्श महिला मतदान केंद्रावरील १६४ नंबरचे मतदान केंद्रांवरील प्रकार असून दोनदा मशीन बंद झाल्याने मतदार ताटकळले. ईव्हीएम पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-
Baramati Assembly Elections 2024 : सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा अधिकार
सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. बारामतीमध्ये पुन्हा पवार.वि.पवार असा सामना रंगला आहे. सर्व जनतेने बाहेर पडून जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं. कथित ऑडिओ क्लिपमधील आवाज आपला नसल्याचेही स्पष्ट करत सुप्रिया सुळे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
#WATCH | #MaharashtraAssemblyElections2024 | NCP-SCP MP Supriya Sule casts her vote at a polling station in Baramati.
NCP has fielded Deputy CM Ajit Pawar and NCP-SCP has fielded Yugendra Pawar from the Baramati Assembly constituency. pic.twitter.com/u9bsZu9zSp
— ANI (@ANI) November 20, 2024
-
-
Maharashtra Assembly Elections 2024 : मनसेचे इंजिन जोरात धावणार – मतदानानंतर अमित ठाकरेंना विश्वास
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यंदा मनसेचे इंजिन जोरात धावणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
-
Maharashta Assembly Elections 2024 : युगेंद्र पवारांनी कुटुंबियासह केलं मतदान
युगेंद्र पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. युगेंद्र पवार हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांचा सामना अजित पवार यांच्याविरोधात आहे. बारामतीची जनता कोणाच्या पारड्यात कौल टाकते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
-
Baramati Assembly Elections 2024 : बारामतीमध्ये सुप्रिया सुळे मतदानाठी मतदान केंद्रावर दाखल
बारामतीमध्ये सुप्रिया सुळे मतदानाठी मतदान केंद्रावर दाखल झाल्या असून थोड्यात वेळात मतदानाचा हक्क बजावतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक असून येथे पवार वि. पवार असा सामना रंगणार आहे.
-
Maharashtra Assembly Elections 2024 : वरूण सरदेसाईंनी बजावला मतदानाचा हक्क.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत असून सकाळी 7 पासूनच अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार वरूण सरदेसाई सुद्धा यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांचा सामना झिशान सिद्दीकी यांच्याविरोधात होत आहे. वरूण सरदेसाई यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला.
-
Malshiras Assembly Elections 2024 : माळशिरस विधानसभा मतदारसंघात मविआचे उत्तम जानकर यांच्याकडून मतदान
माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर यांनी माळशिरस तालुक्यातील धानोरे गावात केले मतदान.
-
Shiwadi Assembly Election : शिवडी विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अजय चौधरी यांचं मतदान
शिवडी विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अजय चौधरी यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाला जाण्यापूर्वी अजय चौधरी यांचं औक्षण करण्यात आलं.
-
जळगाव – जामोद मतदारसंघात स्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर हल्ला
जळगाव – जामोद मतदारसंघात स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. शेगाव ते कालखेड गावाजवळ अज्ञात दुचाकी स्वारांकडून सकाळी साडेपाच ते पावणे सहा दरम्यान हल्ला झाला. हल्यानंतर प्रशांत डिक्कर यांच्यावर अकोला येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
-
Maharashtra Assembly Election : अभिनेता राजकुमार रावने बजावला मतदानाचा हक्क
अभिनेता राजकुमार रावने मुंबईत मतदानाचा हक्का बजावला. सर्वांनी बाहेर पडून जास्तीत जास्त प्रमाणात करा मतदान, मतदारांना केलं आवाहन.
#WATCH | Actor Rajkummar Rao leaves from a polling booth in Mumbai after casting his vote for #MaharashtraAssemblyElections2024.
He says, “It is very important (to vote). Everyone, please step out and vote. This is the voting day, it is very important.” pic.twitter.com/ySUFI3Loee
— ANI (@ANI) November 20, 2024
-
Ghatkopar Assembly Election : घाटकोपरमध्ये भाजपाचे उमेदवार पराग शाह यांचं मतदान
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज निवडणूक होत असून सकाळी 7 पासून मतदानास सुरूवात झाली आहे. घाटकोपर पूर्व भाजपचे ऊमेदवार पराग शाह यांनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला.
-
Maharashtra Assembly Election : अभिनेता अक्षय कुमारने बजावला मतदानाचा हक्क
अभिनेता अक्षय कुमारने बजावला मतदानाचा हक्क. वांद्रे येथील पाली हिल मतदान केंद्रावर अक्षय कुमारने मतदान केलं. सकाळी सात वाजता सर्वात प्रथम येऊन केलं मतदान.
-
Maharashtra Assembly Election : मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात मशीन बंद, मतदान थांबलं
मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत बूथ क्रमांक 292 येथील मशीन बंद असल्याने मतदान प्रक्रिया थांबली आहे. सकाळी 7 पासून मशीन इन्व्हॅलिड दाखवत असल्याने मतदान प्रक्रिया पूर्णपणे ठप्प असून अनेक मतदार रांगेत ताटकळत उभे आहेत.
-
Maharashtra Assembly Election : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मतदानास सुरुवात
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच मतदानासाठी नागरिकांची मोठी गर्दी असून मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहेत.
-
Maharashtra Assembly Election Voting : नांदेड मधील मतदान केंद्रावर 10 मिनिटे विलंबाने मतदान प्रक्रियेला सुरुवात.
नांदेडमधील आंबेडकर नगर मतदान केंद्रावर रूम नंबर दोन मध्ये 10 मिनिटे विलंबाने मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. कर्मचाऱ्याकडून शाईच्या बॉटलचे झाकण निघत नसल्याने मतदान प्रक्रियेला विलंब. नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभेसाठी मतदान पार पडत आहे .
-
Nagpur Assembly Election : सरसंघचालक मोहन भागवतांचं मतदान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
-
Baramati Assembly Election : बारामतीमध्ये अजित पवार, सुनेत्रा पवारांनी केलं मतदान
बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. बारामतीमधील जनता यावेळी मला मोठ्या मताधिक्याने निवडून देईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
-
Maharashtra Assembly Elections 2024 : प्रत्येकाने सद् विवेकबुद्धीने मतदान करावं, कोणाच्याही दबावाला बळी पडू नये – अजित पवारांचे मतदारांना आवाहन
खुल्या वातावरणात सर्वांनी मतदान करावं. कोण चांगल्या प्रकारे काम करू शकेल, नेतृत्व करू शकेल याचा मनाापासून विचार करावा, प्रत्येकाने आपल्या सद् विवेकबुद्धीला स्मरून मतदान करावं. जनतेने कोणाच्याही दबावाला बळी पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मतदारांना केलं
-
Maharashtra Assembly Elections 2024 : परळी विधानसभेसाठी आज मतदान, धनंजय मुंडे वि. राजासाहेब देशमुख रंगणार सामना
परळी विधानसभेसाठी आज मतदान होत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची संपूर्ण तयारी आहे. परळी मतदारसंघांमध्ये एकूण 12 संवेदनशील केंद्र आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार 11 रिंगणात आहेत मात्र मुख्य लढत दोघांमध्ये असणार आहे. महायुतीचे धनंजय मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीचे राजासाहेब देशमुख असा सामना रंगणार आहे.
-
Maharashtra Assembly Elections 2024 : थोड्याच वेळात मतदानाला होणार सुरूवात
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. थोड्याच वेळात सर्वत्र मतदानाला सुरूवात होणार असून निवडणूक आयोग सज्ज आहे.या निवडणुकीत महायुती-महाविकास आघाडीच्या प्रमुख 6 पक्षांमध्ये थेट टक्कर आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. आज सकाळी 7 पासून राज्यभरात असंख्य मतदारांनी मतदानाचं कर्तव्य पार पाडलं असून अनेक नेत्यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवारांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. आज सकाळी 7 पासून राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. राज्यात महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीचे की इतरांच्या मदतीने कुणाचे सरकार येणार हे लवकरच स्पष्ट होईल. त्यासाठी आज मतदार कोणाच्या पारड्यात मताचा कौल टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मतदान सुरळीत पार पडावं म्हणून निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात एकूण 25 हजार 696 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतदानाचे प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत. हे अपडेट जाणून घेण्यासाठी दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
Published On - Nov 20,2024 6:43 AM