Maharashtra Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने सांगितल्या पाच महत्वाच्या गोष्टी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देणे, पैसे वाटप करणे, ड्रग्स वाटप करणे, दारूचे वाटप करणे यावर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष असणार आहे. सर्वत्र चेकपोस्टवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. २४ तास चेकींग होणार आहे. एक्साईजचे अधिकारी आणि इतर अधिकारी चेक पोस्टवर राहतील.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या निवडणुकीची घोषणा केली. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने पाच महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. मतदारांसाठी काही सुविधा दिल्या आहेत.
२४ तास चेकींग होणार
मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देणे, पैसे वाटप करणे, ड्रग्स वाटप करणे, दारूचे वाटप करणे यावर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष असणार आहे. सर्वत्र चेकपोस्टवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. २४ तास चेकींग होणार आहे. एक्साईजचे अधिकारी आणि इतर अधिकारी चेक पोस्टवर राहतील.
गर्दी असल्यास खुर्ची देणार
मतदानासाठी रांगा असल्या तर त्या ठिकाणी खुर्ची ठेवण्यात येणार आहे. यामुळे ज्येष्ठ मतदार किंवा महिलांना त्या ठिकाणी काही वेळ खुर्चीवर बसता येणार आहे. तसेच मतदान केंद्रांमध्ये मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा असणार आहे.
ज्येष्ठ लोकांना घरुन मतदानाची सुविधा
८५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांसाठी घरुन मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे. त्या लोकांकडून फार्म १२ भरुन दिला जाणार आहे. हा फॉर्म भरून देणाऱ्याकडे आमची टीम जाणार आहे. तिकडे जाताना सर्व उमेदवारांना रूट चार्ट देणार आहे. त्यांनाही सोबत घेतले जाईल. सर्व गोष्टींची व्हिडिओ शुटिंग करण्यात येणार आहे. त्याचे रेकॉर्ड ठेवले जाणार आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना….
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना पेपरमध्ये तीनवेळी माहिती द्यावी लागणार आहे. सर्व पोलिंग स्टेशन दोन किलोमीटरच्या आत असावेत, यासाठी निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे.
संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरण होणार
निवडणूक आयोगाकडून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येणार आहे. तसेच ज्या जेष्ठ मतदारांचे घरी जाऊन मतदान करुन घेण्यात येणार आहे, त्यांचीही व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येणार आहे.