Maharashtra Exit Poll 2024 : कधी आणि किती वाजता येणार महाराष्ट्र विधानसभेचे एक्झिट पोल?; कुठे पाहाल?

Maharashtra Exit Poll 2024 LIVE Stream Date and Time : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. त्यापूर्वी आज राज्यभरात मतदान होत आहे. मतदान संपल्या संपल्या टीव्ही९ मराठी आपल्या प्रेक्षकांना विविध एजन्सींचे एक्झिट पोल लाईव्ह दाखवणार आहे. टीव्ही९ मराठी वेबसाइट, युट्यूब चॅनल आणि टीव्ही चॅनलवर एक्झिट पोलची सविस्तर माहिती मिळेल.

Maharashtra Exit Poll 2024 : कधी आणि किती वाजता येणार महाराष्ट्र विधानसभेचे एक्झिट पोल?; कुठे पाहाल?
Follow us
| Updated on: Nov 20, 2024 | 10:46 AM

महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघासाठी  आज ( 20 नोव्हेंबर)  एका टप्प्यात मतदान होत आहे.  त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी महाराष्ट्रातील विधानसभेचं चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीचे की इतरांच्या मदतीने कुणाचे सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील 288 जागांवर एकूण 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. आज राज्यात सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजेच्या सुमारास एक्झिट पोल यायला सुरुवात होणार आहे.

एक्झिट पोल अनेकदा खरे ठरतात. काही वेळा एक्झिट पोलच्या उलटाही निकाल लागतो. पण तरीही नागरिकांमध्ये एक्झिट पोलची उत्सुकता असते. निवडणुकीच्या दिवशी काय निकाल येईल याचा एक ढोबळ अंदाज या एक्झिटपोलमधून येत असतो. यावेळी महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

टीव्ही9 मराठीची खास तयारी

राज्यातील जनतेला एक्झिट पोलची एक एक अपडेट मिळावी म्हणून टीव्ही9 मराठीने खास तयारी केली आहे. तुम्ही टीव्ही9 मराठी चॅनल, टीव्ही9 मराठी युट्यूब लाइव्ह, टीव्ही 9 मराठी संकेतस्थळ आणि टीव्ही9 मराठीच्या लाइव्ह टीव्हीवर जाऊन एक्झिट पोलची संपूर्ण माहिती घेऊ शकता. सर्वात फास्ट आणि अपडेट तुम्हाला टीव्ही9 मराठीवर पाहायला मिळणार आहे.

एक्झिट पोल कुठे पाहाल?

https://www.youtube.com/watch?v=qcZNKRVp7G4

https://www.youtube.com/watch?v=PXRUc5O4J84

https://www.tv9marathi.com/live-tv

https://www.tv9marathi.com/

इतर एजन्सीचेही एक्झिट पोल दाखवणार

टीव्ही9 मराठीवर टीव्ही9 मराठीचे एक्झिट पोल तर पाहता येणार आहेतच. पण इतर एजन्सींचेही एक्झिट पोल तुम्हाला टीव्ही9 मराठी चॅनल आणि वेबसाईटवर पाहता येणार आहे. टीव्ही9 मराठीच्या लाइव्ह स्ट्रिमिंग, सोशल मीडिया, टीव्ही9 मराठी न्यूज चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब लाइव्हसह टुडे चाणक्य, ॲक्सिस माय इंडिया, सीएसडीएस, सी व्होटर, टाइम्स नाऊ सारख्या एजन्सींचेही एक्झिट पोल तुम्हाला पाहता येणार आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.