मतदानाच्या शेवटच्या 1 तासात नेमकं काय घडलं? फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीकडून पोलखोल

मविआच्या नेत्यांनी शेवटच्या एक तासातच मतदानाची टक्केवारी कशी वाढली? असादेखील प्रश्न उपस्थति केला. अखेर महाविकास आघाडीच्या आरोपांना भाजपकडून आकडेवारीसह स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

मतदानाच्या शेवटच्या 1 तासात नेमकं काय घडलं? फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीकडून पोलखोल
देवेंद्र फडणवीस, भाजप नेतेImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 10:10 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. विशेष म्हणजे महायुतीला तब्बल 230 जागांवर यश मिळालं आहे. यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय. मविआच्या नेत्यांनी शेवटच्या एक तासातच मतदानाची टक्केवारी कशी वाढली? असादेखील प्रश्न उपस्थति केला. अखेर महाविकास आघाडीच्या आरोपांना भाजपकडून आकडेवारीसह स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचे माध्यम सल्लागार केतन पाठक यांनी लेखातून आकडेवारी टाकत उत्तर देत याबाबत विश्लेषण केलं आहे. त्यांनी ईव्हीएम आणि वाढलेल्या आकडेवारीवर लेखातून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सायंकाळी 5 नंतर मतदान वाढल्याचा विरोधकांचा आरोप लेखातून खोडून काढला आहे. केतन पाठक यांनी मतदानाच्या दिवशीच्या आकडेवारीचा तपशील देत विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

केतन पाठक यांनी लेखात काय दावा केलाय?

  • “विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण मतदार होते, ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ (९,७०,२५,११९), त्यापैकी एकूण झालेले मतदान होते ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ (६,४०,८८,१९५) म्हणजेच ६६.०५ टक्के.”
  • “सकाळी ७ ते ९ या काळात ६.६१ टक्के म्हणजे ६४ लाख १३ हजार ३६० इतके मतदान झाले.”
  • “सकाळी ९ ते ११ या काळात ११.५३ टक्के, म्हणजेच एक कोटी ११ लाख ८६ हजार ९९६ इतके मतदान झाले.”
  • “सकाळी ११ ते दुपारी १ या काळात १४.०४ टक्के म्हणजेच एक कोटी ३६ लाख २२ हजार ३२७ इतक्या मतदारांनी मतदान केले.”
  • “दुपारी १ ते ३ या वेळेत १३.३५ टक्के इतके मतदान झाले, ते एक कोटी २९ लाख ५२ हजार ८५३ इतके आहे.”
  • “दुपारी ३ ते ५ या वेळात १२.६९ टक्के मतदान झाले म्हणजेच एक कोटी २३ लाख १२ हजार ४८८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.”
  • “सायंकाळी ५ ते ६ या वेळात आणि सायंकाळी ६ पूर्वी मतदानकेंद्रांत घेतलेल्या ७५ लाख ९७ हजार ६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.”
  • “हे लक्षात घेतले पाहिजे की सायंकाळी ५ ते ६ हीसुद्धा मतदानाची वेळ आहे आणि नियमाप्रमाणे सायंकाळी ६ पर्यंत पोहोचलेल्यांना मतदानासाठी आत घेणे, हे आयोगाचे कर्तव्य ठरते.”
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब.
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?.
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?.
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?.
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी.
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.