AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभेनंतर शरद पवार-अजित पवार एकत्र येणार का? सुप्रिया सुळेंनी केलं मोठं विधान, म्हणाल्या…

आता अजित पवार पुन्हा स्वगृही परतणार का? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे. आता यावर शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केले आहे.

विधानसभेनंतर शरद पवार-अजित पवार एकत्र येणार का? सुप्रिया सुळेंनी केलं मोठं विधान, म्हणाल्या...
अजित पवार, सुप्रिया सुळेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 2:58 PM

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकासआघाडीमध्ये लढत होणार आहे. राज्यात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष याकडे लागले आहे. त्यातच आता अजित पवार पुन्हा स्वगृही परतणार का? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे. आता यावर शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केले आहे.

अजित पवारांनी राष्ट्रवादी खिंडार पाडत भाजपसोबत युती केली. यावेळी त्यांनी 40 आमदारांना सोबत घेत मोठी खेळी केली होती. यानंतर अजित पवार हे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्‍या महायुती सरकारमध्‍ये सहभागी झाले. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर सध्या राजकीय वर्तुळात अजित पवार निवडणुकीनंतर पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा रंगली आहे. आता यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. सुप्रिया सुळे यांनी नुकतंच पीटीआयला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावर भाष्य केले.

“आमच्या विचारधारा वेगळ्‍या”

“शरद पवार आणि अजित पवार हे राजकीयदृष्ट्या पुन्हा एकत्र येतील की नाही हे सांगणे कठीण आहे. अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत आहेत, तोपर्यंत अशाप्रकार एकत्र येणं सोपं होणार नाही. कारण राजकीयदृष्ट्या आमच्या विचारधारा वेगळ्‍या आहेत”, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

“४८ जागांपैकी महाविकासआघाडीने ३० जागा जिंकल्‍या”

“लोकसभा निवडणुकीत राज्‍यातील जनतेने ठामपणे मतदान केले. लोकसभेच्‍या ४८ जागांपैकी महाविकासआघाडीने ३० जागा जिंकल्‍या. आताही राज्‍यातील मतदारांच्‍या मनात स्‍पष्‍टता आहे. त्‍यामुळे लोकसभा निवडणुकीसारखीच कामगिरी महाविकासआघाडी विधानसभा निवडणुकीतही करेल”, असा विश्‍वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

“आमचा पक्ष काँग्रेससोबत आहे आणि ते (अजित पवार) भाजपसोबत आहेत. ही एक वैचारिक लढाई आहे. नेत्यांना जनतेत आपल्‍या भावना दर्शवण्‍याची परवानगी नाही. जर नेता तुटला तर घरातील लोक कसे जगतील. नेता होणे हे एकटेपणाचे काम आहे. आपण आपल्या वागण्यात सहानुभूतीशील आणि दयाळू असले पाहिजे”, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.