Maharashtra Assembly Session 18 July 2023 | किरीट सोमय्या प्रकरण, महिलेची ओळख फक्त पोलिसांना सांगितली जाणार
Maharashtra Assembly Monsoon Day 2 Session 18 July 2023 Full Updates : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा मंगळवारी दुसरा दिवस होता. किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडिओच्या विषयावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न झाला.
मुंबई | 18 जुलै 2023 : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आज हा विषय सभागृहात गाजण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आधीच यावरुन भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन आक्रमक भूमिका घेतली होती.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्याच्या अन्य भागात अजून म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीच संकट आहे. यंदाच्या अधिवेशनात सभागृहात एक वेगळ चित्र पहायला मिळतय. शिवसेनेसारखीच राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आणि विरोधी बाकांवर पाहायला मिळतेय. शरद पवार गटातील आमदार सत्ताधारी बाकावर असलेल्या अजित पवार गटाच्या आमदारांना काय प्रश्न विचारणार? सभागृहात संघर्ष कसा रंगणार? याची चर्चा आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
Maharashtra Monsoon Session 2023 Live | ‘व्हिडिओ खोटा आहे असं सोमय्या म्हणालेले नाहीत, याचा अर्थ….’ अनिल परब नेमकं काय म्हणाले?
| “आतापर्यंत पैशाच्या खंडणी बद्दल ऐकलं आहे ही सेक्स खंडणी आहे का? कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून बरच काही बाहेर आलय. हे प्रकरण गंभीर आहे” वाचा सविस्तर….
-
Maharashtra Monsoon Session 2023 Live | बाळासाहेब थोरात यांचं भाषण LIVE
सभागृहात काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांचं भाषण सुरु आहे. ते शेतकऱ्यांचे मुद्दे मांडत आहेत. LIVE पाहा
-
-
Maharashtra Monsoon Session 2023 Live | एक दिवस तोच त्या खड्ड्यात पडतो – नाना पटोले
जो दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो, एक दिवस तोच त्या खड्ड्यात पडतो. किरीट सोमय्यांवर नाना पटोलेंची प्रतिक्रीया. उद्यापर्यंत राज्याला विरोधी पक्षनेता मिळेल. काँग्रेस कोकणवासीयांच्या पाठीशी आहे. सरकारने लोकांचा आवाज ऐकावा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी कोकणवासीयांच्या आंदोलनाला दिली भेट.
-
Maharashtra Monsoon Session 2023 Live | किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओवर देवेंद्र फडणवीस यांचं भाष्य
सभागृहात किरीट सोमय्याच्या व्हिडिओवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?. आज विधिमंडळाच्या सभागृहात या कथित व्हिडिओचे पडसाद उमटले. अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी सभागृहात हा विषय लावून धरला. वाचा सविस्तर….
-
Maharashtra Monsoon Session 2023 Live | महाराष्ट्रद्रोही सोमय्याच्या व्हिडिओचा पेनड्राइव्ह माझ्याकडे – अंबादास दानवे
किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओ विषयावर विधिमंडळ सभागृहात चर्चा सुरु आहे. पाहा LIVE
-
-
Maharashtra Monsoon Session 2023 Live | फोडाफोडीच्या राजकारणाला जनता वैतागली आहे – जितेंद्र आव्हाड
“विरोधी पक्ष एकत्र जमायचे आणि जनभावनेचा सन्मान व्हायचा. फोडाफोडीच्या राजकारणाला जनता वैतागली आहे” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. “पवार साहेबांनी आपली भूमिका कृतीतून दाखवली आहे. विरोधी पक्षाच्या बैठकीला गेले. प्रत्येक गोष्ट तोंडाने बोलायची नसते. ओरिजनल पक्ष पवार साहेबांचा आहे. ते मनधरणी का करत आहेत, हे मला माहीत नाही” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
-
विरोधी पक्षांच्या बैठकीला शरद पवारांची उपस्थिती
विरोधी पक्षांच्या बैठकीत शरद पवार उपस्थित आहेत. या बैठकीतले फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केलेत आणि या बैठकीची माहिती दिली आहे.
शरद पवार यांची फेसबुक पोस्ट
आज बेंगळूरू येथे विरोध पक्षांच्या बैठकीसाठी उपस्थित राहिलो . यावेळी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सिपीआय नेते सीताराम येचुरी, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे नेते खा. डेरेक ओ ब्रायन आणि विविध विरोधी पक्षांच्या मान्यवरांसोबत भेटीगाठी झाल्या. यावेळी उपस्थित सर्व नेत्यांकडून एकत्र लढू आणि जिंकू असा निर्धार करण्यात आला.
-
‘एकत्र लढू आणि जिंकू’, काय म्हटलय शरद पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये?
आज बंगळुरुमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची मोठी बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित आहेत. त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.
-
Maharashtra Monsoon Session 2023 Live | कामकाजाच LIVE प्रक्षेपण पाहा
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विधानसभेत सुरु असलेल कामकाज LIVE पाहा.
-
किरीट सोमय्या यांच्या बाबतीत खालच्या पातळीच राजकारण – शिवसेना
“किरीट सोमय्या यांच्याबाबत कुठल्याही महिलेने कुठलीही तक्रार केलेली नाहीये आणि त्यामुळे हे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण सुरू असल्याचा आमच्या थेट आरोप आहे. कुठल्या महिलेचा त्यावर काही आक्षेप नाहीये. कुठली तक्रार प्राप्त नाहीये. केवळ आणि केवळ त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान आहे” असं शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.
-
Maharashtra Monsoon Session 2023 Live | महाराष्ट्र विधानसभेच कामकाज LIVE पाहा
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विधानसभेत सुरु असलेल कामकाज LIVE पाहा.
-
Kirit Somaiya : किरीट सोमेय्या यांच्या विरोधात आंदोलन
शिवसेना ठाकरे गटाचं किरीट सोमेय्या यांच्या विरोधात नाशिकमध्ये आंदोलन
पंचवटी करंजावर शिवसैनिकांनी केलं आंदोलन
किरीट सोमेय्यांच्या फोटोला मारल्या लाथा
सोमेय्यांच्या कथित व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिक आक्रमक
-
Maharashtra Monsoon Session 2023 Live | किरीट सोमय्याची चौकशी ईडी, सीबीआय करणार का? भास्कर जाधव यांचा सवाल
किरीट सोमय्या यांनी माझी चौकशी करा, असं देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं आहे. किरीट सोमय्या सातत्याने ईडी, सीबीआय चौकशीची मागणी करत होते. याच किरीट सोमय्यांच्या मागणीप्रमाणे तुम्ही त्यांची चौकशी ईडी, सीबीआयकडे देणार का? असा माझा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे, असं ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
-
Maharashtra Monsoon Session 2023 Live | किरीट सोमय्या म्हणतायत, तर होऊं दे चौकशी
‘किरीट सोमय्या स्वत:च म्हणत असतील, तर तशी चौकशी करा’, असं ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी म्हटलं आहे. ‘प्रत्येकाच एक खासगी जीवन असतं. कोण कसं वागाव हे प्रत्येकाचा भाग आहे’ असं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे. स्वतहून ते म्हणतायत, तर होऊं दे चौकशी.
-
Maharashtra Monsoon Session 2023 Live | जितेंद्र आव्हाड सरकारविरोधात घोषणाबाजीत आघाडीवर
विधानभवानच्या पाऱ्यांवर विरोधकांच आंदोलन सुरु आहे. शेतकरी उपाशी, मंत्री तुपाशी अशी घोषणाबाजी विरोधकांकडून केली जात आहे. ठाकरे गटाचे अंबादास दानवे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधकांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. ‘खोक्यावर खोके, माजले बोके’ अशा घोषणा दिल्या आहेत.
-
Maharashtra Monsoon Session 2023 Live | ‘जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका’
किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओवर ‘जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका’ असं सूचक टि्वट संजय राऊत यांनी केलं आहे.
आमच्यावर आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. ते सांगायचे:” जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका” नेमके तसेच घडत आहे. यापुढे देखील बरेच काही घडणार आहे.. जे जे होईल ते पाहत राहावे.. जय महाराष्ट्र!@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra @AUThackeray…
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 18, 2023
Published On - Jul 18,2023 10:35 AM