Maharashtra Monsoon Session 2023 Live : जीवितहानी टाळण्यासाठी कुटुंबाचं पूनर्वसन करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

| Updated on: Jul 21, 2023 | 6:46 PM

Maharashtra Monsoon Session 2023 Live Updates : राज्याच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा मुद्दा आणि मणिपूरच्या घटनेचे पडसाद उटले आहेत. मणिपूरच्या घटनेवरून महिला आमदार आक्रमक झाल्या आहेत.

Maharashtra Monsoon Session 2023 Live : जीवितहानी टाळण्यासाठी कुटुंबाचं पूनर्वसन करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Monsoon Session 2023 Live Updates Image Credit source: tv9 marathi

मुंबई | 21 जुलै 2023 : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या एका गटाने भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहे. राज्य विधानसभेच्या अधिवेशनात पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा चमत्कारीक संघर्ष पाहायला मिळणार आहे. आज अधिवेशनात मणिपूर येथील व्हायरल व्हिडीओचे पडसाद उमटले आहेत. महिला आमदारांनी आक्रमक होत या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Jul 2023 04:40 PM (IST)

    मुंबई पालिका आयुक्त इक्बाल चहल हिंदमाता परिसरात

    मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल हे हिंदमाता परिसरात पाहणीसाठी आले आहे. मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले आहे. काही भागात गुडघाभर पाणी साचले आहे. अंधेरी, दादर, सायन, माटुंगासह अंधेरी आणि इतर भागात पाणी साचले. मुंबईतील धोकादायक 415 इमारतींना नोटीस बजावण्यात आली आहे.

  • 21 Jul 2023 04:21 PM (IST)

    मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने दाणादाण

    चेंबूरमध्ये मुसळधार पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. नागरिकांना काही ठिकाणी गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे. तर इतर उपनगरांनाही कोसळधारेचा सामना करावा लागला आहे. काही रेल्वे स्टेशनवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा ठप्प आहे तर काही ठिकाणी रेल्वे सेवेची गती मंदावली आहे. पुढील पाच दिवस रत्नागिरीत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

  • 21 Jul 2023 04:07 PM (IST)

    कुर्ला स्थानकात साचले पाणी

    कुर्ला स्थानकात पाणी साचल्याने वडाळा-मानखूर्द रेल्वेसेवला याचा फटका बसला आहे. कुर्ला रेल्वे स्टेशनवर पाणी साचल्याचा परिणाम रेल्वेवर झाला आहे. वडाळा स्टेशनवर सध्या प्रवाशांची गर्दी झाली आहे. डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. पाण्याचा निचारा करण्यात आला आहे. पण अजून रेल्वे सुरु करण्यात आलेली नाही. एक तासाहून अधिक वेळेपासून पनवेल स्टेशनकडे रेल्वे गेली नाही.

  • 21 Jul 2023 04:03 PM (IST)

    धोक्याच्या ठिकाणच्या कुटुंबांचं करणार पूनर्वसन

    जीवितहानी टाळण्यासाठी तिथे राहणाऱ्या कुटुंबाचं पूनर्वसन करणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. त्यासाठी जागा हेरण्यात आल्या आहेत. तिथल्या लोकांचं स्थलांतर करण्यात येणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले. इर्शाळवाडीत एनडीआरएफएचे युद्धपातळीवर बचावकार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विरोधकांनी राजकारण दूर सारुन सहकार्य केल्याचे शिंदे यांनी निवेदनात सांगितले. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचा बळी गेला आहे.

  • 21 Jul 2023 02:53 PM (IST)

    अंधेरी, दादर, सायन, माटूंगा परिसरात मुसळधार पाऊस

    मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अंधेरी, दादर, सायन, माटूंगा परिसरात पावसाचा वेग वाढलेला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे आणि व्यावसायीकांचे हाल होत आहे. मुंबईला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहिर केला आहे. अंधेरी सब वे देखाल पाण्याखाली गेल्याची माहिती आहे.

  • 21 Jul 2023 02:39 PM (IST)

    मुंबईतील असल्फा मेट्रो स्टेशनखाली पाणी साचलं

    मुंबईतील असल्फा मेट्रो स्टेशनखाली पाणी साचल्यामुळे प्रवाश्यांचे हाल होत आहेत. चारकमान्यांना ऑफिस गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अनेक रस्ते जलमय झाले असल्याने लोकांना गुढगभर पाण्यातून वाट काढावी लागते. नागरिकांनी समुद्रकिनाऱ्याजवळ न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

  • 21 Jul 2023 02:25 PM (IST)

    मुंबईच्या समुद्राला हाय टाईडचा इशारा

    मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. 45 ते 55 किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. विरारच्या काही भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी देखील होत आहे. मरिन ड्राइव्ह परिसरात उंच लाटा पाहायला मिळत आहे.

  • 21 Jul 2023 02:15 PM (IST)

    मुंबईत समुद्राला उधान, मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

    मुसळधार पावसामुळे समुद्राला उधान आले आहे. मुंबईकरांचे पावसामुळे हाल होत आहेत. समुद्राची पातळी वाढल्यामुळे उधान आले आहे. मुंबईला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या काही वेळात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

  • 21 Jul 2023 01:55 PM (IST)

    मणिपूरातील हिंसाचारामुळे भारताची जगात बदनामी होत आहे – आदित्य ठाकरे

    मणिपूरातील हिंसाचारामुळे भारताची जगात बदनामी होत आहे, मणिपुरमधील हिंसाचारावरून आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मणिपूरमधील सरकार बरखास्त झालं पाहिजे, त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे आणि तिथे राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

  • 21 Jul 2023 01:48 PM (IST)

    मुंबईच्या डोंगराळ भागात हजारो कुटुंबांचा जीव टांगणीला, मुंबईही धोक्यावर उभी – प्रविण दरेकर

    इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला. ही आपत्ती ग्रामीण भागात येत असताना मुंबईही अशा प्रकारच्या धोक्यावर उभी आहे. डोंगराळ भागात हजारो कुटुंबाचा जीव टांगणीला आहे, असे आमदार प्रविण दरेकरांनी नमूद केले.

    मुंबईतील डोंगरावरच्या ज्या वस्त्या आहेत, तेथे पावसात दरड कोसळण्याचा धोका आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर काय संरक्षण देता येईल हे सरकारने ठरवावे, अशी मागणीही त्यांनी केली.

  • 21 Jul 2023 01:40 PM (IST)

    राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस सुरूवात

    विधानभवन येथील समिती कक्षात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस सुरुवात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्री बैठकीस उपस्थित आहेत.

  • 21 Jul 2023 01:30 PM (IST)

    अनध‍िकृत शाळांबाबत एसआयटी मार्फत चौकशी करा – आशिष शेलार यांची मागणी

    अनध‍िकृत शाळांची संख्या पाहता याबाबत कोणते रॅकेट आहे की, काय असा प्रश्न पडतो. त्यामुळे या प्रकरणी एसआयटी नियुक्त‍ करुन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा आमदार ॲड आश‍िष शेलार यांनी आज विधानसभेत केली.

  • 21 Jul 2023 01:26 PM (IST)

    मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यालयावर आदित्य ठाकरेंचा आक्षेप

    मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना महापालिकेत दिलेल्या कार्यालयावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. पालकमंत्री महापालिकेत कशासाठी? त्यांचा महापालिकेशी संबंध काय? त्यांनी कार्यालय तात्काळ रिकामं करावं अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

    येत्या 24 तासात महापालिकेतील कार्यालय रिकामं केलं नाही तर मुंबईकर आपला राग दाखवतील, असा इशाराही त्यांनी दिला.

  • 21 Jul 2023 12:59 PM (IST)

    भाजप महिलांचा अपमान करतंय, आमदार प्रणिती शिंदे संतप्त

    मणिपूरच्या मुद्द्यावर आम्हाला विधानसभेत बोलू दिलं नाही. आमचे माईक बंद करण्यात आले. सरकार महिलांचा अपमान करत आहे. भाजप महिलांचा अपमान करत आहे. एवढी गंभीर घटना घडून सरकार दखल घेत नाही, अशी टीका काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

  • 21 Jul 2023 12:40 PM (IST)

    शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून एकनाथ खडसे आक्रमक, विधान परिषदेत मांडला मुद्दा

    शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे चांगलेच आक्रमक झाले. शेतकऱ्यांची परिस्थिती अजूनही सुधारली नाही. शेतकऱ्यांसाठी हे सरकार काही करत नाही. हे सरकार अपयशी ठरलं आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.

  • 21 Jul 2023 12:39 PM (IST)

    विधान परिषदेत भाई जगताप आणि प्रवीण दरेकर यांच्यात जुंपली, अरे तुरेवर

    विधान परिषदेत काँग्रेस आमदार भाई जगताप आणि भाजपचे प्रवीण दरेकर यांच्यात खडाजंगी झाली. दोघांमध्ये इतका वाद झाला की दोघांनीही एकमेकांना अरेतुरे करण्यास सुरुवात केली. दोघांनीही एकमेकांना तुला काय करायचंय? असा सवाल करत एकेरी उल्लेख केला. मंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत असताना भाई जगतापमध्येच बोलू लागले. त्यावर दरेकरांनी जगताप यांना हरकत घेतली. त्यावरून दोघांमध्ये खडाजंगी झाली.

  • 21 Jul 2023 12:31 PM (IST)

    मणिपूर सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी; जितेंद्र आव्हाड यांची टीका

    आज सभागृहात महिला आमदारांना बोलू दिल गेलं नाही. मणिपूर मुद्द्यावर महिलांचा आवाज दाबला जात आहे. हुकूमशाही लादली जात आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मणिपूर सरकार असफल झालं आहे. तरी केंद्र सरकार काहीच करत नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली.

  • 21 Jul 2023 12:23 PM (IST)

    भाजपला प्रचंड अहंकार; रोहित पवार यांची खोचक टीका

    भाजपला प्रचंड अहंकार झालेला आहे आणि या अहंकारापोटी ते कुठलीही विधान करत आहेत. मणिपूरमध्ये एवढी दुर्दैवी घटना घडली, भयंकर घटना घडली आणि यांचं अशा पद्धतीने ट्विट सुरू आहे. अतुल भातखळकर स्वतःला काय समजतात? हा भाजपच्या नेत्यांना अहंकार आहे आणि जनता त्यांचा अहंकार चिरडल्याशिवाय राहणार नाही, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

  • 21 Jul 2023 12:05 PM (IST)

    मणिपूरच्या घटनेवर आम्हाला विधानसभेत बोलू दिलं नाही; वर्षा गायकवाड यांचा आरोप

    मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेतही या घटनेचे पडसाद उमटले आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही विधानसभेत बोलायला उभं राहिलो. पण आम्हाला बोलू दिलं गेलं नाही, असा आरोप काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

  • 21 Jul 2023 12:03 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांसोबत संवाद

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी विरोधकांशी विधिमंडळात संवाद साधला. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर काँग्रेसच्या इतर आमदारांशी संवाद साधताना फडणवीस दिसले.

  • 21 Jul 2023 11:58 AM (IST)

    पंतप्रधान 79 दिवसानंतर मणिपूरच्या घटनेवर भाष्य करतात हे दुर्देवी; यशोमती ठाकूर यांचा संताप

    मणिपूरच्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. भविष्यातही अशा दुर्देवी घटनांचा आम्ही विरोध करतच राहू. भारता सारख्या देशात अशा पद्धतीने महिलांचा अपमान केला जातो आणि पंतप्रधान 79 दिवसानंतर त्यावर भाष्य करतात हे दुर्देवी आहे, असं काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Published On - Jul 21,2023 11:53 AM

Follow us
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार.
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.