Maharashtra Breaking News LIVE : देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा

| Updated on: Jul 05, 2024 | 9:40 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 5 जुलै 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा

राज्याच्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही, याचा निर्णय आज होणार आहे. विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शुक्रवारी (5 जुलै) शेवटचा दिवस आहे. विधानपरिषदेच्या रिंगणात उतरलेल्या 12 पैकी एका उमेदवाराने माघार घेतली, तरच ही निवडणूक बिनविरोध होईल. तर दुसरीकडे राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Jul 2024 09:38 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची घेतली भेट

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांंमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. अर्धा तासाच्या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस संघ मुख्यालयातून बाहेर पडले.

  • 05 Jul 2024 09:31 PM (IST)

    दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबा देवाच्या मुख्य मूर्तीचे दर्शन 5 दिवसांसाठी बंद राहणार

    कोल्हापूर : दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबा देवाच्या मुख्य मूर्तीचे दर्शन 5 दिवसांसाठी बंद राहणार.  रविवार 7 जुलै ते गुरुवार 11 जुलै या कालावधीत श्रीक्षेत्र जोतिबाच्या मुख्यमूर्तीचे दर्शन बंद राहणार आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने जोतिबाच्या मुख्यमूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. संवर्धन प्रक्रिया कालावधीत भाविकांना कलश दर्शन आणि उत्सव मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. संवर्धन प्रक्रियेच्या कालावधीत जोतिबा देवस्थानचे मंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे.

  • 05 Jul 2024 08:35 PM (IST)

    नागपूर मेट्रोची सेवा एक तासांपासून एका लाईनवर बंद

    नागपूर मेट्रोची सेवा एक तासांपासून एका लाईनवर बंद आहे. खापरी ते ऑटो मॅटिव्ह लाईनची सेवा बंद आहे. अप लाईन पूर्ववत सुरू झाली. मात्र डाऊन लाईन अजूनही बंद आहे. अप लाईन वरून अप आणि डाऊन दोन्ही गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली. डाऊन लाईन थोड्या वेळात सुरू होणार, अशी मेट्रो प्रशासनाची माहिती आहे.

  • 05 Jul 2024 05:04 PM (IST)

    NEET UG पेपर लीक प्रकरण, केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

    NEET UG पेपर लीक प्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. NEET परीक्षा रद्द करणे योग्य होणार नाही. जर परीक्षा रद्द केली तर हा होतकरू विद्यार्थ्यांचा विश्वासघात ठरेल. मोठ्या प्रमाणात परीक्षेत अनियमितता झाल्याचा कोणताही पुरावा नाही असे केंद्र सरकारने यात म्हटले आहे.

  • 05 Jul 2024 04:40 PM (IST)

    शाळेत शिक्षक नाहीत, पालकांनी घेतला मोठा निर्णय

    शिक्षकांची नियुक्ति होईपर्यंत विद्यार्थी शाळेत पाठवणार नाही असा निर्णय गोंदिया जिल्ह्यातील वडेगाव जिल्हा परीस्ध प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याच्या पालकांनी घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थीवीना ही शाळा भरली. प्रशासनाने लवकर निर्णय न घेतल्यास शाळेतून दाखला काढण्याचा इशाराही पालकांनी दिला आहे.

  • 05 Jul 2024 04:25 PM (IST)

    पक्षाने आदेश दिला, वसंत मोरेंचे कार्यालय फोडण्याचा निर्णय स्थगित

    लोकसभा निवडणुकीआधी मोरेंच्या खात्यात शून्य रुपये असताना निवडणुकीनंतर 40 लाखांची गाडी कशी आली ? असा सवाल वंचितने केला आहे. आमचा पक्ष संविधानावर चालतो. त्यामुळे पक्षाने आदेश दिल्यामुळे वसंत मोरे यांचे कार्यालय फोडण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित करत आहोत. मात्र, वसंत मोरे यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत असे वंचितने म्हटले आहे.

  • 05 Jul 2024 04:11 PM (IST)

    अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी यांना धक्काबुक्की

    जळगावमध्ये अतिक्रमण निर्मूलन विभागाने फळ गल्ली, मसाला गल्ली, छत्रपती शिवाजी नगर, महात्मा गांधी मार्केट परिसरात मोहिम राबवित 13 लोटगाड्या जप्त केल्या. मात्र, अतिक्रमण काढण्याची कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांनीच धक्काबुक्की केली.

  • 05 Jul 2024 04:01 PM (IST)

    टीम इंडियातील मुंबईच्या ४ खेळाडूंचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

    भारतीय संघातील मुंबईचे खेळाडू रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे आणि सुर्यकुमार यादव यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्त सत्कार करण्यात आला.

  • 05 Jul 2024 03:58 PM (IST)

    अतिक्रमण काढण्याची कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

    जळगावत अतिक्रमण काढण्याची कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ व्हायरल. अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल. अतिक्रमण काढण्याचे कारवाई करत असताना महापालिकेचे कर्मचारी अतिक्रमणधारक यांच्यात वादावादी. अतिक्रमण निर्मूलन विभागाने फळ गल्ली, मसाला गल्ली, छत्रपती शिवाजी नगर, महात्मा गांधी मार्केट परिसरात मोहिम राबवित 13 लोटगाड्या केल्या जप्त.

  • 05 Jul 2024 03:56 PM (IST)

    महापालिकेसमोर पालक आक्रमक; मनपा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

    छत्रपती संभाजी नगरमध्ये आज महापालिका कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर महापालिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेची फीसबाबत करण्याच्या प्रश्नावरून आंदोलन सुरू केलय. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे आई वडील या आंदोलनात सहभागी होऊन पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आहे. हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फलक घेऊन निषेध व्यक्त करण्यात येत आहे. छत्रपती संभाजी नगर महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत सी.बी.एस.इ शिक्षण सुरू केले होते आणि हे शिक्षण मोफत असताना देखील विद्यार्थ्यांकडून मासिक शुल्क आकारण्यात येत होते हे मासिक शुल्क रद्द करण्यात यावे अशी प्रमुख मागणी यावेळी या पालकांनी केली आहे.

  • 05 Jul 2024 03:32 PM (IST)

    महिलांचा गावातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांचा मोर्चा

    जळगावच्या नंदगाव गावातील सरपंच महिलेसह 100 ते 150 महिलांचा गावातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा. गावातील सट्टा, जुगार तसेच अवैध दारू बंद करण्याच्या मागणीसाठी नंदगावातील महिला झाल्या आक्रमक.

  • 05 Jul 2024 03:05 PM (IST)

    राजधानी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातील पुतळे बदलण्याची मागणी

    राजधानी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातील पुतळे बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. कोल्हापूरकरांच्या मागणीने पुन्हा एकदा महाराष्ट्र सदन चर्चेत आले आहे. शाहू महाराजांच्या पुतळ्यावर कोल्हापूरकरांचा आक्षेप आहे. महाराजांच्या ऐतिहासिक वर्णनाप्रमाणे पुतळा नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.

  • 05 Jul 2024 02:56 PM (IST)

    Maharashtra News : राजधानी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातील पुतळे बदला

    कोल्हापूरकरांच्या मागणीने पुन्हा एकदा महाराष्ट्र सदन चर्चेत… शाहू महाराजांच्या पुतळ्यावर कोल्हापूरकरांचा आक्षेप… महाराजांच्या ऐतिहासिक वर्णनाप्रमाणे पुतळा नसल्याची तक्रार… पुतळे बदलले नाहीत तर कोल्हापूरकर दिल्लीत पुतळा उभा करतील, कोल्हापूरकरांच्या इशाऱ्याने राज्य सरकार समोर पेच… नव्या महाराष्ट्र सदनात अनेक महापुरुषांचे पुतळे

  • 05 Jul 2024 02:47 PM (IST)

    Maharashtra News : अजित पवारांनी कवितेचं वाचन करताच पिकला हशा

    श्रेय ज्यांचे त्यास द्यावे एवढं लक्षात ठेवा… अजित पवारांनी कवितेचं वाचन करताच पिकला हशा, ‘ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी…’

  • 05 Jul 2024 02:40 PM (IST)

    Maharashtra News : नोएडामधील लॉजिक्स मॉलमध्ये भीषण आग

    नोएडामधील लॉजिक्स मॉलमध्ये भीषण आग… शॉर्ट सक्रिटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती…

  • 05 Jul 2024 02:37 PM (IST)

    Maharashtra News : जळगाव जिल्ह्यातील 19 सायकलिस्टचं सायकलवारीने पंढरपूरकडे प्रस्थान

    जळगाव जिल्ह्यातील 19 सायकलिस्टचं सायकलवारीने पंढरपूरकडे प्रस्थान… यंदाच्या सायकलवारीत 14 वर्षाचा भुसावळ येथील सायकलिस्ट मुलगा सुद्धा झाला आहे सहभागी… जळगाव शहरातील १० जामनेर मधून ५ चोपडा व भुसावळ प्रतेकी २ असे १९ साइकिलिस्ट सहभागी… जळगांव ते पंढरपूर ४८५ किमी अंतर पार करून सायकलिस्ट घेणार पांडुरंगाचे दर्शन

  • 05 Jul 2024 02:20 PM (IST)

    Maharashtra News : पनवेल आणि सीएसटी लोकल सेवा पावसामुळे दहा मिनिटे उशिरा

    खारघर रेल्वे स्टेशन लगत असलेल्या बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रवाशांची आणि वाहन चालकांची कोंडी… पनवेल आणि सीएसटी लोकल सेवा पावसामुळे दहा मिनिटे उशिरा…

  • 05 Jul 2024 02:04 PM (IST)

    Maharashtra News : चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी 200 आणि शिक्षक 2

    चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातल्या विसापूर येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी 200 आणि शिक्षक 2… शाळेतील मूलभूत सुविधा वाढीसाठी 200 विद्यार्थी थेट पोहोचले जिल्हा परिषदेत… मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या गाडी पुढे केले आंदोलन… शाळेतील सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन…

  • 05 Jul 2024 01:44 PM (IST)

    नाशिकच्या गंजमाळ परिसरात हैराण करणारी घटना

    घरात घुसून १८ वर्षीय तरुणाची हत्या. हत्या झाल्याचे शेजारी झोपलेल्या भावालाही कळले नाही भरवस्तीत घटना घडल्याने एकच खळबळ

  • 05 Jul 2024 01:29 PM (IST)

    पुण्यात धोकादायक स्टिरॉइडची विक्री

    कमी काळात चांगली बॉडी व्हावी या हव्यासापोटी अनेक तरुण हे शरीराला हानिकारक असलेले स्टिरॉइड घेत असतात. पुण्यात एका जिम कोचने चक्क स्टिरॉइडची विक्री केल्याचे समोर आले आहे.

  • 05 Jul 2024 01:16 PM (IST)

    भाजपकडून राजू शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू

    हरिभाऊ बागडे यांचे राजू शिंदे यांना फोन. अतुल सावे यांनीही राजू शिंदे यांना संपर्क साधल्याची माहिती. भाजप न सोडण्याच्या केल्या सूचना. विधिमंडळातून हरिभाऊ बागडे यांचे राजू शिंदे यांना फोन

  • 05 Jul 2024 01:05 PM (IST)

    डॉ प्रशांत बोकारे यांनी पदभार स्वीकारला

    काल नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी यांचं राज्यपाल यांनी निलंबन केल्यानंतर आज नागपूर विद्यापीठचे प्रभारी कुलगुरू म्हणून डॉ प्रशांत बोकारे यांनी पदभार स्वीकारला.

  • 05 Jul 2024 12:57 PM (IST)

    सोलापुरात विद्यार्थ्यांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

    सोलापुरात विद्यार्थ्यांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असूून एकाच रिक्षात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कोंबत असल्याची घटना उघड झाली आहे.  सोलापुरातील परिवहन विभागाकडून बेकायदेशीर वाहतुकीकडे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि बसेस मध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक होत असल्याची घटना समोर. आरटीओ कार्यालयाकडून बेकायदेशीर विद्यार्थी वाहतुकीवर कारवाई होणार का याकडे लक्ष लागले आहे.

  • 05 Jul 2024 12:49 PM (IST)

    अहमदनगर –  कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलनाला सुरवात

    अहमदनगर –  कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी जन आक्रोश आंदोलनाला सुरवात.  खासदार निलेश लंके यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला असून निलेश लंकेना पोलिसांनी गेटवर अडवलं आहे.  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात .

  • 05 Jul 2024 12:36 PM (IST)

    नवी दिल्ली – हाथरस मधील दुर्घटनेबाबत सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

    नवी दिल्ली – हाथरस मधील दुर्घटनेबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार . निवृत्त न्यायाधीशाच्यामार्फत घटनेची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल.  मुख्य सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार

  • 05 Jul 2024 12:29 PM (IST)

    मोठी जबाबदारी आली की मूड बदलावा लागतो, अजित पवार यांचा जयंत पाटील यांना टोला

    जयंत पाटील यांनी नऊ वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड केला आहे, जयंत पाटील तुमचं त्यासाठी अभिनंदन. कुणाच्या हाताखाली काम करत असताना सर्व ढकलावे लागतं.  मोठी जबाबदारी आली की मूड बदलावा लागतो, असा टोला अजित पवार यांनी जयंत पाटील यांना लगावला.

    मी दहाव्यांदा अर्थ संकल्प मांडला.  मी एक बघितलं महाविकास आघाडी कडून अर्थसंकल्प मांडला की महायुती आरोप करायचे आणि आता महायुतीकडून मांडला तर महाविकास आघाडी आरोप करत आहे. मी दोन्ही बाजूने अर्थसंकल्प मांडला हे खरं आहे, असं अजित पवार म्हणाले.

  • 05 Jul 2024 12:25 PM (IST)

    विरोधकांनी केलेल्या सूचनांची नोंद घेतली आहे – अजित पवार

    अर्थसंकल्प पूर्णपणे गोपनीय असतो, तो फुटला असं म्हणणं चुकीच आहे. विरोधकांनी केलेल्या सूचनांची नोंद घेतली आहे. अर्तसंकल्पातीव योजनांवर दुरूस्तीबाबात विभागाला सूचना दिल्या आहेत. अर्थसंकल्पावरील चर्चेला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात उत्तर दिलं.

  • 05 Jul 2024 12:19 PM (IST)

    दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि हैदराबाद येथे ईडीची धाड

    दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि हैदराबाद येथे ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे.  दिल्ली जल बोर्डाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केस प्रकरणी ही धाड टाकण्यात आली असून ४१ लाखांची रोकड जप्त करण्यात आली.  गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र आणि तांत्रिक पुरावे जप्त केल्याचा ईडीचा दावा

  • 05 Jul 2024 12:13 PM (IST)

    Maharashtra News : उद्धव ठाकरे संभाजीनगरात देणार भाजपाला धक्का

    भाजपचे सहा ते आठ नगरसेवक उद्धव ठाकरे गटाच्या वाटेवर. माजी उपमहापौर राजू शिंदे यांचे सहा ते आठ नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार. रविवारी होणाऱ्या शिवसंकल्प मेळाव्यात करणार प्रवेश. राजू शिंदे यांच्यासह सहा ते आठ जण उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करणार प्रवेश. भाजपसह अतुल सावे यांनाही मोठा धक्का

  • 05 Jul 2024 12:09 PM (IST)

    पुणे – वाघोलीत डॉक्टराने तरुणावर कोयत्याने हल्ला केला

    वाघोलीत डॉक्टराने तरुणावर कोयत्याने हल्ला केला. डॉक्टरांकडून तरुणाने व्याजाने घेतलेले पैसे वेळेत परत न दिल्याने डॉक्टर आणि गुंडांनी मिळून तरुणावर हल्ला केला .  जीवन रक्षक हॉस्पिटल चा डॉक्टर विवेक गुप्ता आणि त्याच्या इतर दोन साथीदार गुंड मिळून फिर्यादी प्रितेश बाफना यांच्यावर केला हल्ला.या हल्ला प्रकरणी पुण्यातील वाघोली येथील लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखलल करण्यात आला आहे,

  • 05 Jul 2024 11:58 AM (IST)

    Maharashtra News : ताज हॉटेल्सकडून टीम इंडियाचा जल्लोषात स्वागत

    ताज हॉटेल्सकडून टीम इंडियाचा जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्यांच्यासाठी एक विशेष केक तयार करण्यात आला आणि आज टीम इंडिया याच हॉटेलमध्ये आराम करणार असल्याचा समजतंय. दुपारी दोन नंतर टीम इंडिया विधान भवनात दाखल होईल. जिथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल.

  • 05 Jul 2024 11:40 AM (IST)

    Maharashtra News : जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात वाढ

    जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात तीन दिवसांत 3 हजार रुपयांची वाढ. चांदीच्या दराने पुन्हा 90 हजारांचा आकडा पार केला असून दर 92 हजार रुपयांवर पोहोचले आहे. सोने दरात झाली 400 रुपयांची वाढ झाली असून सोन्याचे दर 72 हजार 700 रुपये प्रति तोळा एवढे झाले आहेत.

  • 05 Jul 2024 11:20 AM (IST)

    Maharashtra News : 77 हेक्टर वरील अतिक्रमण काढले

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा वन विभागाच्या अडावद परिमंडळात वन जमिनीवरील 77 हेक्टर वरील अतिक्रमण काढले. सातपुडा पर्वत रांगमधील वन क्षेत्रात तब्बल 77 हेक्टर वन जमिनीवर अज्ञात व्यक्तींनी अनधिकृतपणे शेती करत केले होते अतिक्रमण. चोपडा तालुक्यातील अडावद वनपरीमंडळात पोलीस, वन आणि महसूल विभागाची संयुक्तिक अतिक्रमण हटाव मोहीम.

  • 05 Jul 2024 11:00 AM (IST)

    खासदार निलेश लंके आक्रमक

    कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. 12 जुलै पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. तरीही आंदोलन करण्यात येणार आहे.

  • 05 Jul 2024 10:50 AM (IST)

    राज्यभर मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली

    6 जुलै पासून ते 13 जुलैपर्येंत राज्यभर मराठा आरक्षण शांतताजनजागृती रॅली काढणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मराठा समाजाला विनंती आहे वारंवार रस्त्याववर एकत्र याव लागेल. 13 तारखेला आमच्या व्याख्येप्रमाणे संगेसोयरे यावर सरकार शंभर टक्के निर्णय घेईल. हैद्राबाद गॅझेट लागू होईल. तर सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा पण जीआर लागू होईल. मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली राज्यभर टप्याटप्याने घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

  • 05 Jul 2024 10:40 AM (IST)

    “त्या” अल्पवयीन तरुणाने प्रस्तुत केला ३०० शब्दांचा निबंध

    पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी अपडेट समोर येत आहे. “त्या” अल्पवयीन तरुणाने ३०० शब्दांचा निबंध प्रस्तुत केला आहे. अल्पवयीन तरुणाने बाल न्याय मंडळापुढे निबंध सादर केला. अपघात प्रकरणी आरोपी असलेल्या त्या तरुणाला बाल न्याय मंडळाने निबंध लिहण्याची शिक्षा सुनावली होती.

  • 05 Jul 2024 10:30 AM (IST)

    जितेंद्र आव्हाडांना थेट इशारा

    यापुढे,जितेंद्र आव्हाडांनी संभाजी भिडे गुरुजींवर टीका केल्यास सहन करणार नाही, असा इशारा शिवप्रतिष्ठान संघटनेने दिला आहे.

  • 05 Jul 2024 10:20 AM (IST)

    वसंत मोरेंचा वंचित पदाधिकाऱ्यांवर हल्लाबोल

    वंचित पक्षातील अनेक लोकांनी गेली अनेक वर्ष काम केलं नाही बाळासाहेबांना अपेक्षित असा पक्ष ते उभा करू शकले नाहीत. शिवसेनेचे काम करणार पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे ते म्हणाले. माझं ऑफिस फोडण्याऐवजी ही ताकद पक्षासाठी लावली असती तर ताकद अजून वाढली असती, असा टोला त्यांनी लगावला.

  • 05 Jul 2024 10:10 AM (IST)

    भाजपसह मोदींवर राऊतांचा हल्लाबोल

    भाजपने गुजरातची चाटुगिरी करु नये. मुंबईला कमी दाखविण्याचा प्रयत्न सुरु आहे, जिथे विजय असतो, तिथेच मोदी जातात असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

  • 05 Jul 2024 10:00 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांवर कोणाचा वरदहस्त

    सोलापूर जिल्ह्यात भीमा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप शिवसेना उपनेते शरद कोळींनी काल अवैध वाळू उपसा करणारे ट्रक, ट्रॅक्टर पकडून दिले. मोहोळ तालुक्यातील बेगमपूर-घोडेश्वर येथे अवैध वाळू उपसा करणारी वाहने पकडून तलाठ्याकडे दिल्याचा दावा त्यांनी केला. जिल्ह्यात वाळू माफियांवर कोणाचा वरदहस्त आहे, असा सवाल त्यांनी केला.

  • 05 Jul 2024 09:57 AM (IST)

    Marathi News: जेवणात विष टाकले, 28 जणांना विषबाधा

    गडचिरोली-बारशाच्या कार्यक्रमात मांसाहारी जेवणात विष टाकल्याने 28 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या रोपीनगट्टा भागात घडली. रोपीनगट्टा येथील सुरगु मुरा टेकाम यांच्या नातणीच्या नामकरणाच्या कार्यक्रम होता. त्यात जेवणात कोणी अज्ञात व्यक्तींनी विष टाकल्याचे प्रकार समोर आला.

  • 05 Jul 2024 09:41 AM (IST)

    Marathi News: कोल्हापुरात पावसाचा जोर

    गेल्या आठ दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने चांगला जोर धरला आहे. विशेषतः चंदगड तालुक्यातील पश्चिम घाट माथ्यावर मुसळधार पाऊस कोसळतोय. परिणामी चंदगड तालुक्यात असणाऱ्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी घटप्रभा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे.

  • 05 Jul 2024 09:25 AM (IST)

    Marathi News: भिवंडीत भाजी मार्केटमध्ये पाणी शिरले

    भिवंडीत रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात दोन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. भाजी मार्केट, बाजारपेठ, तीन बत्ती या भागात शिरले पाणी आहे.

  • 05 Jul 2024 09:05 AM (IST)

    Marathi News: नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांत झपाट्याने वाढ

    नाशिक शहरात डेंग्यूच्या रुग्णांत झपाट्याने वाढ झाली आहे. केंद्रीय पथक नाशिकमध्ये असतानाच एका डेंग्यू बधितांचा मृत्यू झाल्याचा अहवाल मनपाला प्राप्त झाला आहे. जून महिन्यात तब्बल 161 जणांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद झाली आहे.

  • 05 Jul 2024 08:39 AM (IST)

    Maharashtra News : विधानभवनात आज विधानसभा आणि विधान परिषदेविषयी महत्त्वाची बैठक

    Maharashtra News : आज विधानभवनात विधानसभा आणि विधान परिषदेविषयी महत्त्वाची बैठक होणार आहे. सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत ही बैठक असेल अशी माहिती देण्यात आली आहे. तर दुपारी दोन वाजता विधानभवनात मुख्यमंत्री यांच्या समिती कक्षात राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे.

  • 05 Jul 2024 08:36 AM (IST)

    Maharashtra News : काँग्रेस नेते राहुल गांधी हाथरसला रवाना

    Maharashtra News : उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या भोलेबाबांच्या सत्संगावेळी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमुळे तब्बल 121 जणांचा मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी हाथरसला रवाना झाले आहेत. राहुल गांधी हे आज मृतांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

  • 05 Jul 2024 08:32 AM (IST)

    Maharashtra News : कोकणात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

    Maharashtra News : कोकणात अनेक ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुढील दोन दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

  • 05 Jul 2024 08:30 AM (IST)

    Maharashtra News : पुणे महापालिकेकडून भिडे वाड्याच्या अंतिम आराखड्याला मंजुरी

    Maharashtra News : पुणे महानगरपालिकेकडून भिडे वाड्याच्या अंतिम आराखड्याला अखेर मंजुरी देण्यात आली आहे.

  • 05 Jul 2024 08:29 AM (IST)

    Maharashtra News : संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज वाल्हेकडे रवाना होणार

    Maharashtra News : संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज वाल्हेकडे रवाना होणार आहे. कालचा जेजुरीचा मुक्काम उरकून पालखी वाल्हकडे रवाना होणार आहे.

Published On - Jul 05,2024 8:24 AM

Follow us
अजित दादांच्या पत्नीनं लाटल्या वारक-यांसाठी चपात्या, बघा व्हिडीओ
अजित दादांच्या पत्नीनं लाटल्या वारक-यांसाठी चपात्या, बघा व्हिडीओ.
ठाकरेंचा लाडकी बहीणवरून निशाणा, खोतकरांच्या त्या व्हिडीओचा दिला दाखला
ठाकरेंचा लाडकी बहीणवरून निशाणा, खोतकरांच्या त्या व्हिडीओचा दिला दाखला.
आपले 7-8 मुख्यमंत्री होऊ द्या, त्यात मुस्लिम..,जरांगेंचा सरकारला इशारा
आपले 7-8 मुख्यमंत्री होऊ द्या, त्यात मुस्लिम..,जरांगेंचा सरकारला इशारा.
विधानसभा-लोकसभेत पाठिंबा देणार, आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे म्हणाले.
विधानसभा-लोकसभेत पाठिंबा देणार, आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे म्हणाले..
'लाडकी बहीण'वरून उद्धव ठाकरेंचा पहिल्यांदाच बोलले, घरातील बहीण-भावात..
'लाडकी बहीण'वरून उद्धव ठाकरेंचा पहिल्यांदाच बोलले, घरातील बहीण-भावात...
कोकणरेल्वेचा खोळंबा; रूळावर पाणी,एक्स्प्रेस अडकल्या, प्रवाशांची पायपीट
कोकणरेल्वेचा खोळंबा; रूळावर पाणी,एक्स्प्रेस अडकल्या, प्रवाशांची पायपीट.
पनवेलच्या पडघे गावाला पुराचा वेढा, साचलं गुडघाभर पाणी अन् वाहनं गेली..
पनवेलच्या पडघे गावाला पुराचा वेढा, साचलं गुडघाभर पाणी अन् वाहनं गेली...
मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, वडेट्टीवार काय म्हणाले?
मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, वडेट्टीवार काय म्हणाले?.
मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावची वाहतूक पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?
मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावची वाहतूक पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?.
राज्यात मध्यरात्रीपासूनच संततधार, तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात मध्यरात्रीपासूनच संततधार, तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?.