Ajit Pawar | ‘सडण्याची आणि रडण्याची वेळ अजित पवारांवर आली असावी’, ‘या’ नेत्याने वापरले जिव्हारी लागणारे शब्द

Ajit Pawar | अजित पवार यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यावेळी अजित पवार यांनी निधी वाटपाच्या मुद्यावरुन तक्रार केली असं राजकीय वर्तुळात बोलल जातय. शिंदे गटाला जास्त निधी मिळतोय, त्यात समानता नाही असं अजित पवार गटाच म्हणण आहे. आता त्याचवरुन अजित पवारांवर अत्यंत बोचरी टीका करण्यात आलीय.

Ajit Pawar | 'सडण्याची आणि रडण्याची वेळ अजित पवारांवर आली असावी', 'या' नेत्याने वापरले जिव्हारी लागणारे शब्द
Ajit PawarImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 13, 2023 | 12:55 PM

मुंबई (गजानन उमाटे) : “सरकारची भूमिका उदासीन आहे.. obc च्या मतांवर निवडून यायचे आणि त्यांचे प्रश्न सोडवायचे नाही अशीच सरकारची भूमिका आहे. शिंदे सरकारने obc चे कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत. obc विखुरलेला आहे, तो एक होऊ शकत नाही, असे विचार करून सरकार obc बद्दल काहीही करत नाही” अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. “अजित दादा कधी खुश राहिले? ते नेहमीच नाराज असतात. मनाप्रमाणे झालं, तर खूश. मनाविरुद्ध झाले, तर नाराज. हम करे सो कायदा, आम्ही तसे वागू अशी त्यांची भूमिका आहे. तीन पक्षांच्या सरकारमध्ये त्यांना वाटतं निधी मिळत नाही, अरे तिजोरीची चावी तुमच्याकडे आहे, तरी निधीसाठी का रडता? आता तुमची धमक दाखवा? असं आव्हान विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांना दिलं.

“महाविकास आघाडीमध्ये धाक दाखवून सर्व तिजोरी साफ करत होता. तीच धमक आता दादांनी दाखवावी. निधी मिळत नाही, म्हणून रडण्यापेक्षा दुसऱ्याला रडवण्याची हिंमत आहे का? निधी मिळत नाही असे सांगून रडण्यापेक्षा दुसऱ्याना रडवण्याची हिंमत आहे का? हे दादांनी आता दाखवावे. संजय राऊत म्हणतात त्या प्रमाणे ते दिल्लीचे चरणदास झाले आहेत. आता ते दादागिरी दाखवू शकत नाहीत” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

‘आता असं सांगू नका की तक्रार करता करता ते तिथे रडले सुद्धा’

“दिल्लीत त्यांनी तक्रार केली. आता असं सांगू नका की तक्रार करता करता ते तिथे रडले सुद्धा. तक्रारी पुरताच दादांना मर्यादित ठेवा, आता रडण्याची स्थिती अजित पवारांवर आली असेल, कारण भारतीय जनता पक्षमध्ये जाणाऱ्यांना रडवून रडवून सोडतात. त्यामुळे सडण्याची आणि रडण्याची वेळ अजित पवारांवर आली असावी” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

‘अजित पवारांना भाजपच्या तिकिटावरच लढावं लागेल’

“पुढच्या वेळेस अजित पवारांना भाजपच्या तिकिटावरच लढावं लागेल असं मला एकंदरीत दिसते आहे. कमळावर लढल्याशिवाय त्यांना पर्याय नाही.. मी पूर्णपणे खात्रीने सांगू शकतो अजित पवार गटाला कमळाबाईचा आशीर्वाद असेच होणार” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

Non Stop LIVE Update
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?.
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'.
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?.
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'.
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास.
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल.
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?.
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव.
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं.