सुप्रीम कोर्टाची विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर जाहीर नाराजी, राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया

सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढच्या दोन आठवड्यात काय कारवाई केली, याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशावर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

सुप्रीम कोर्टाची विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर जाहीर नाराजी, राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Sep 18, 2023 | 5:48 PM

मुंबई | 18 सप्टेंबर 2023 : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिला होता. पण विधानसभा अध्यक्षांनी आतापर्यंत या निर्णयावर अंतिम निर्णय घेतलेला नाही. सुप्रीम कोर्टाने आजच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले. कोर्टाने राहुल नार्वेकर यांना एका आठवड्यात सुनावणी घेऊन कोर्टात दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानंतर राहुल नार्वेकर यांना पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

“माझ्यापर्यंत अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. मी सुप्रीम कोर्टात झालेली सुनावणी आणि आदेशाबद्दल संपूर्ण माहिती घेईन. त्यानंतर पुढची कारवाई काय असेल, याबाबत निर्णय घेईन”, अशी पहिली प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.

‘मी तर असं ऐकलंय की…’

विधानसभा अध्यक्षांकडून कामकाजात दिरंगाई झाली. या विषयी सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली. याबाबत काय सांगाल? असा प्रश्न राहुल नार्वेकर यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “माझ्याकडे याबाबत अशी कोणतीही माहिती आलेली नाही. मी तर असं ऐकलंय की, सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की, अध्यक्ष हे एक संविधानिक पद आहे. त्यामुळे त्या पदासंदर्भात कोर्टात कोणत्याही प्रकारचा उल्लेख होणं अपेक्षित नाही”, अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली.

‘मला कोणत्याही आदेशाची प्रत मिळाली नाही’

दोन आठवड्यात सुनावणी घ्या, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. याबाबत राहुल नार्वेकर यांना विचारलं असता, “माझ्याकडे अशी कोणतीही माहिती नाही. मला आतापर्यंत कोणत्याही आदेशाची प्रत मिळालेली नाही. माझ्याकडे आतापर्यंत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची कोणतीही प्रत आलेली नाही. कोर्टाची प्रत आल्यानंतर मी ती प्रत पूर्णपणे वाचेल, अभ्यास करेन त्यानंतर आपल्याला प्रतिक्रिया देईन”, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

‘दिरंगाई होणार नाही’

“मी याआधीदेखील सगळ्यांना सांगितलं आहे की, कारवाई लवकरात लवकर होईल. कोणत्याही प्रकारे दिरंगाई होणार नाही. पण कोणत्याही प्रकारची घाई होणार नाही, ज्याने कुणावर अन्याय होईल”, अशी भूमिका राहुल नार्वेकर यांनी मांडली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.