Maharashtra Assembly Winter Session 2024 LIVE : एकनाथ शिंदेंचा आमदार मंत्री झाला म्हणून काँग्रेसच सेलिब्रेशन

| Updated on: Dec 18, 2024 | 9:49 AM

Maharashtra Assembly Winter Session 2024 LIVE Updates : महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आजही दिवसभरात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील. राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या तसेच क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Maharashtra Assembly Winter Session 2024 LIVE : एकनाथ शिंदेंचा आमदार मंत्री झाला म्हणून काँग्रेसच सेलिब्रेशन
महत्वाची बातमीImage Credit source: tv9

LIVE NEWS & UPDATES

  • 18 Dec 2024 09:49 AM (IST)

    Maharashtra News: शिंदे, अजित पवारांचे पक्ष राहतील की नाही ही शंका – संजय राऊत

    भविष्यात शिंदे – दादांचे पक्ष राहतील की नाहीत? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. सध्याची परिस्थिती पाहता भविष्यात यांचे पक्ष राहतील का ही शंका… शिंदे, अजित पवारांच्या पक्षाला संघाने बैद्धिकसाठी बोलावलंय… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 18 Dec 2024 09:46 AM (IST)

    Maharashtra News: बीड आणि परभणीच्या घटनांवर फडणवीस सभागृहात निवेदन देणार

    बीड आणि परभणीच्या घटनांवर फडणवीस सभागृहात निवेदन देणार असल्याची माहिती समोर येत आहे…

  • 18 Dec 2024 09:35 AM (IST)

    Maharashtra News: शरद पवार यांची कधी साथ सोडणार नाही – शशिकांत शिंदे

    शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांनी घेतली अजित पवार यांची भेट… शरद पवार यांची कधी साथ सोडणार नाही… उपमुख्यमंत्री झाल्यानं अजित पवारांना शुभेच्छा… अजित पवार यांची तब्येत ठिक नव्हती… असं वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी केलं आहे…

  • 18 Dec 2024 09:19 AM (IST)

    Maharashtra News: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम…

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतरही निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम… उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे निफाड तालुका गारठला…. ओझर HAL येथे 6.3 अंश सेल्सिअस… तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 7.4 अंश सेल्सिअस किमान तापमान… या थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी शेकोट्यांचा घेतला जातो आधार…

  • 18 Dec 2024 09:00 AM (IST)

    निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतरही निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे निफाड तालुका गारठला. ओझर HAL येथे 6.3 अंश सेल्सिअस तापमान. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 7.4 अंश सेल्सिअस किमान तापमान.या थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी शेकोट्या पेटल्या.

  • 18 Dec 2024 08:15 AM (IST)

    भीमा कोरेगाव प्रकरणात आज आयोगासमोर सुनावणी

    प्रकाश आंबेडकर राहणार सुनावणीला हजर. भीमा कोरेगाव इथं झालेल्या दंगलीची चौकशी भीमा कोरेगाव आयोगासमोर होत आहे. या प्रकरणात साक्षही नोंदवण्यात आल्यात. आज प्रकाश आंबेडकर 11 वाजता आयोगात हजर राहणार. त्या नंतर माध्यमांशी साधणार संवाद.

  • 18 Dec 2024 08:14 AM (IST)

    रत्नागिरी- जयगड येथील जिंदाल पोर्टमधील वायू गळती प्रकरण

    जयगड येथील जिंदाल पोर्टमधील वायू गळती प्रकरण. जिल्हा शासकीय रुग्णालय मधून डिस्चार्ज मिळालेली मुलं पुन्हा रुग्णालयात. 31 जणांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू. 29 विद्यार्थी पुन्हा रुग्णालयात, तर 2 प्रौढांवरही उपचार सुरू. पोट दुखणे, जळजळ, डोळ्यांची आग होणे, चक्कर येणे, चालल्यानंतर अशक्तपणा वाटणे असा त्रास होतोय.

  • 18 Dec 2024 08:13 AM (IST)

    राज्य सरकारच्या वयोश्री योजनेचा किती लाख ज्येष्ठांना मिळणार लाभ

    राज्य सरकारच्या वयोश्री योजनेचा ज्येष्ठांना लाभ. राज्यात 13 लाख अर्ज ठरले पात्र. सर्वाधिक अर्ज नागपूर आणि पुणे विभागात. वयोवृद्ध व्यक्तींना वयोश्री योजनेअंतर्गत 3 हजार रुपये प्रतिमहिना दिले जातात. राज्यात सर्वाधिक 69 हजार अर्ज हे पुणे जिल्ह्यातील आहेत

  • 18 Dec 2024 08:11 AM (IST)

    एकनाथ शिंदेंचा आमदार मंत्री झाला म्हणून काँग्रेसच सेलिब्रेशन

    एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर डोंबिवलीत काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बॅनरबाजी. शहरभरात पदाधिकाऱ्यांनी ही बॅनरबाजी करत मिठाई वाटप आणि फटाक्यांची आतषबाजी करत केला जल्लोष. प्रताप सरनाईक यांचा प्रवास डोंबिवलीतून सुरू झाला असून आता ते मंत्री झाल्यामुळे आम्हाला त्यांचा अभिमान असल्याचे सांगत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र विधानसभेच हिवाळी अधिवेशन सुरु असून आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. काल दुसऱ्यादिवशी अनेक महत्त्वाच्या घडामोडी पहायला मिळाल्या. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्याचवेळी छगन भुजबळ यांची नाराजी कायम आहे. त्यांना मंत्रिपद दिलं नाही, म्हणून राज्यतील ओबीसी संघटना आंदोलन करत आहेत. त्याचवेळी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नव्या वर्षात पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याच जाहीर केलं आहे. 25 जानेवारी 2025 पासून अंतरवाली-सराटीत त्यांचं आमरण उपोषण सुरु होणार आहे. आजही राज्य, देश-विदेशात महत्त्वाच्या घडामोडी घडतील, त्या तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Published On - Dec 18,2024 8:09 AM

Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.