Maharashtra Assembly Winter Session 2024 LIVE : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत कोण होते? देवेंद्र फडणवीस यांची धक्कादायक माहिती
Maharashtra Assembly Winter Session 2024 LIVE Updates : महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील. राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या तसेच क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
पाकिस्तानला लागली लॉटरी, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आता विश्वचषकाचे करणार आयोजन
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला एका मोठ्या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. आयसीसीने टी20 विश्वचषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे सोपवले आहे. मात्र, हा विश्वचषक पुरुषांचा नसून महिलांचा असून 2028 मध्ये खेळवला जाईल.
-
अजित दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले परभणी दाखल
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले परभणी दाखल आहेत. संविधानाची विटंबना झालेल्या ठिकाणाची बडोले यांनी पाहणी केली. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.
-
-
नाराज असलेले छगन भुजबळ पुन्हा ऍक्टिव्ह मोडमध्ये
नाराज असलेले छगन भुजबळ पुन्हा ऍक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कांद्यासंदर्भात पत्राद्वारे मागणी केली आहे. राज्यातील कांद्यावरचे 20% निर्यात शुल्क माफ करावे, असं त्यांनी सांगितलं आहे. लाल कांद्याच्या दारात घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याने त्याने 20% निर्यात शुल्क माफ करावे, असं त्यांनी सांगितलं आहे.
-
भाजपचे राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या अध्यक्षपदी निवड
भाजप आमदार राम शिंदे यांची गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. हे पद जुलै २०२२ पासून रिक्त होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर 7 जुलै 2022 पासून परिषदेचे अध्यक्षपद रिक्त होते.
-
महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर- फडणवीस
महाराष्ट्र गुंतवणुकीत पुढे आहे. देशात राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. परंतु आमच्या गुंतवणूकदारांना त्रास देण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
-
-
मुंबईत मेट्रो ३ चे काम अंतिम टप्प्यात
मुंबईत मेट्रो ३ चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आता लवकरच मुंबई मेट्रो ३ सुरु होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
-
निकाल तरी मराठीत द्या
न्यायालयात मराठीचा वापर झाला पाहिजे. कनिष्ठ न्यायालयात मराठीचा वापर सुरू झाला आहे. आता सर्व उच्च न्यायालयांना त्याबाबत विनंती केली आहे. न्यायालयाचे कामकाज मराठीत होत नाही तोपर्यंत निकाल तरी मराठीत द्या, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
-
-
ईव्हीएमविरोधातील याचिका दोन तासात निकाली- फडणवीस
ईव्हीएमविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने दोन तासात याचिका निकाली काढली. न्यायालयाने म्हटले, आधी ईव्हीएमवर कोर्टाने निर्णय दिला होता. त्यांनी सविस्तर निकाल दिला होता. त्यात त्यांनी आधी पूर्वीचा निकाल वाचा आणि नंतर आमच्याकडे या, असे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
-
व्हिव्हीपॅट म्हणजे बॅलेट पेपरच- फडणवीस
देशात २०१२ पर्यंत ईव्हीएम होते. त्यानंतर ईव्हीएम नाही. २०१२ नंतर व्हिव्हीपॅट आहे. व्हिव्हीपॅट म्हणजे बॅलेट पेपरवरचे मतदान आहे. आपण मतदान केल्यावर आपल्याला चिन्ह दिसते. ते चिन्ह बॅलेट बॉक्समध्ये जाते. ईव्हीएमच्या मोजणीत व्हीव्हीपॅटचे मतदानही मोजले जाते, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
-
फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका
मारकडवाडीत काय काय झाले. मला कुणाचे आश्चर्य वाटले नाही. मला फक्त शरद पवार यांचे आश्चर्य वाटले. पवार हे बॅलन्स नेते आहेत. काँग्रेसने अनेक वेळा ईव्हीएमवर बोलले. पवार कधीच बोलले नाही. यावेळी पवार बोलले. म्हणाले, छोटी राज्य काँग्रेसला आणि मोठी राज्य भाजपला…सविस्तर वाचा…
-
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आलं आहे. प्रतिभा पाटील यांच्या 90व्या वाढदिवसाचे औचित्य साधून निवासस्थानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाविषयी अद्ययावत माहिती, प्रतिनिधी नोंदणी, ग्रंथ दालनाची नोंदणी या संकेतस्थळाद्वारे करता येणार येणार आहे. दिल्लीत सुमारे 70 वर्षांनंतर होत असलेल्या साहित्य संमेलनास प्रतिभा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
-
छत्रपती संभाजीनगरात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक
गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानाबाबत छत्रपती संभाजीनगरात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत अमित शहा यांचा प्रतिघात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं आहे. ज्यावेळी राज्यसभेत अमित शहा आंबेडकरांचा अवमान करत होते त्यावेळी भागवत कराड हे चेष्टा उडवत असल्याचा आरोप वंचितच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत भागवत कराड यांच्या कार्यालयावरील पोस्टरवरही जोडे मारले.
-
जनतेनं मोदींच्या नाऱ्याला प्रतिसाद दिला : देवेंद्र फडणवीस
“एक है तो सेफ है, हा नारा मोदींनी दिला. जनतेनं मोदींच्या नाऱ्याला प्रतिसाद दिला. मी 5 ते 6 माणसांचा आभारी आहे, ज्यांनी मला टार्गेट केलं. महाराष्ट्रासाठी गेली 5 वर्ष ही संक्रमणाची होती”, असं देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटलं.
-
बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात CSMT स्टेशनसमोर निषेध आंदोलनाला सुरुवात
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणं ‘फॅशन’झालं आहे, असं विधान अमित शाह यांनी संसदेत केलं होतं. त्याविरोधात हे आंदोलन केलं जात आहे.
-
आमदार रोहित पवार यांचा संतोष देशमुख प्रकरणावरुन मोठा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मोठा आरोप केला आहे. देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मास्टरमाईंड असल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला आहे.
-
मुंबई विद्यापीठात सांताक्रुझ कालिना येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु
KT मुळे विद्यार्थ्यांना 3rd Year मध्ये जाता येत नसल्याने मुंबईत विद्यापीठाच्या कालिना संकुलात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये संधी दिली जाते. मात्र मुंबई विद्यापीठ संधी देत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
-
मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभा सभापतींना लिहले पत्र
संसदेबाहेर धक्काबुक्कीमुळे गुडघ्याला दुखापत झाल्याची तक्रार काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे यांनी राज्यसभा सभापतींना पत्राद्वारे केली आहे.
-
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवार यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे.
-
बोट दुर्घटनेतील अहिरे कुटुंबातील तिघांवर नाशिक येथे अंत्यसंस्कार
गेटवे येथील बोट दुर्घटनेतील अहिरे कुटुंबातील तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. राकेश आहिरे, पत्नी हर्षदा आणि मुलगा निधेश यांचा काल अपघाती मृत्यू झाला होता.
-
भुजबळांना चंद्रकांत पाटील यांचा टोला
प्रत्येकाला असं वाटतंय की मी आजन्म मंत्री असावा मात्र नवीन येणाऱ्यांनी काय करायचं, अशी खदखद शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांनी बोलून दाखवली. छगन भुजबळ यांच्या विषयावरून आमदार चंद्रकांत पाटलांनी टोला लगावला आहे.
-
क्रांती चौकात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे आंदोलन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या विधानाचा निषेधार्थ, छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौकात आंबेडकरी चळवळीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी आंदोलकाकडून अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.
-
मुंबई केंद्रशासित करा, केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवा, आमदाराची अजब मागणी
महाराष्ट्रातील नेते बेळगावला केंद्रशासित करण्याची मागणी सातत्याने करत असतात. या उलट बेळगाव सीमा भागाचा मुंबईवर हक्क आहे. त्यामुळे मुंबईला केंद्रशासित करण्यात यावे. असा प्रस्ताव कर्नाटक शासनाने केंद्र सरकारकडे पाठवावा अशी अजब मागणी अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी आज विधानसभेत बोलताना केली.
-
अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज जालना शहरातील मस्तगड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अमित शहा यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.यावेळी पोलिसांनी 5 ते 6 पदाधिकाऱ्यांना रोखलं असून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
-
पुण्यात काँग्रेसची निदर्शने
परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू व अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. पुणे काँग्रेस त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन सुरू आहे….
-
संसदेत, हिवाळी अधिवेशनात निळे वादळ
संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात संसदेत अभूतपूर्व गोंधळ दिसला. सत्ताधारी आणि विरोधक खासदार एकमेकांना भिडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेल्या विधानानंतर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला. राजधानी दिल्लीतल्या संसद अधिवेशनात आणि महाराष्ट्रातल्या नागपूर अधिवेशनातही निळे वादळ आले आहे.
-
दोन्ही सभागृहातील कामकाज तहकूब
राज्यसभेचे कामकाज दुपारी 2:00 वाजेपर्यंत तहकूब तर लोकसभा ही दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
-
स्पीड बोड चालवणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा
काल अपघाताचा ज्यांनी व्हिडिओ काढला तो प्रत्यक्षदर्शी नाथाराम चौधरी यांच्याकडून माहिती घेत पोलिसांनी स्पीड बोट चालणाऱ्या अधिकाऱ्यावर निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. लवकरच पत्रव्यवहार करून कुलाबा पोलीस तपास करण्यासाठी नेव्हीची स्पीड बोट देखील ताब्यात घेऊन हा अपघात कसा झाला याची देखील चौकशी करणे करणार आहे
-
तुम्हाला बेळगाव हवं असेल तर मुंबई कर्नाटकला द्या – कर्नाटक काँग्रेसच्या आमदाराचे उद्दाम वक्तव्य
तुम्हाला बेळगाव हवं असेल तर मुंबई कर्नाटकला द्या, कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी हे वक्तव्य केलंय. महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादावर बोलताना त्यांनी हे विधान केलं.
-
विधानसभा उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराची निवड होण्याची शक्यता
विधानसभा उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराची निवड होण्याची शक्यता आहे. विधानसभा उपाध्यक्षपदी राजकुमार बडोले किंवा अण्णा बनसोडे यांना संधी देण्यात येऊ शकते.
-
निलकमल बोट दुर्घटनेठिकाणी मुंबई पोलिसांचे पथक रवाना…
निलकमल बोट दुर्घटनेठिकाणी मुंबई पोलिसांचे पथक रवाना झालं आहे. पोर्ट झोन पोलीस उपायुक्त डॉ.सुधाकर पठारे दोन बोटींसह दुर्घटना स्थळी रवाना. बेपत्ता व्यक्तींचा तपास करण्यासाठी, सर्च ऑपरेशन तसेच इतर तपास करण्यासाठी डीसीपी झाले रवाना.
-
नवी दिल्ली – भाजपचे खासदार प्रताप सारंगी आंदोलनादरम्यान जखमी
भाजपचे खासदार प्रताप सारंगी आंदोलनादरम्यान जखमी, डोक्याला झाली दुखापत. काँग्रेस इंडिया गाडीतील खासदार आणि भाजप खासदार एकमेकांना भिडले. राहुल गांधी यांनी धक्का दिला सारंगी यांचा आरोप.
-
आमदार राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापती पदी निवड
आमदार राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापती पदी एकमताने निवड. आमदार श्रीकांत भारतीय , उमा खापरे , शिवाजी गर्जे यांनी प्रस्ताव मांडला . मनीषा कायंदे, अमोल मिटकरी यांनी या प्रस्तावास अनुमोदन दिलं.
-
Maharashtra News: एवढी भीक आम्हाला कधीच लागली नाही – संजय राऊत
दुसऱ्यांकडून बौद्धिक घ्यावीत आणि आपला पक्ष चालवावा, एवढी भीक आम्हाला कधीच लागली नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे कधीच त्या वाटेने गेले नाहीत असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदेंवर टीका केली.
-
Maharashtra News: बीडमधील गोळीबार प्रकरण
तीन आरोपींना पोलिसांनी केली अटक… पुण्यातून लोहगाव परिसरातून केली अटक… आरोपी अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर, ओमकार सवाई यांचा समावेश… चार दिवसांपूर्वी झाला होता गोळीबार… गोळीबारात एक जण गंभीर जखमी
-
Maharashtra News: सोलापुरात शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन
मार्केट यार्डात कांदा घेऊन आलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको… अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ माथाडी कामगारांनी रात्रीपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे… त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा लिलावासाठी उतरवला न गेल्याने शेतकरी आक्रमक… कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पुणे – हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला… शेतकऱ्यांनी रस्त्यावर काटेरी झुडपे टाकत रास्ता रोको केला… जोपर्यंत लिलाव सुरू होणार नाही तोपर्यंत रास्ता रोको सुरूच राहील असा पवित्रा…
-
Maharashtra News: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सभागृहात चर्चा…
विधीमंडळात बीड आणि परभणीच्या घटनेवर चर्चा… परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरही चर्चा… मस्साजोग हत्या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करा… असं वक्तव्य सुनील प्रभू यांनी केलं आहे…
-
विधानपरिषदेच्या सभापतीपदाच्या नावाची आज घोषणा, राम शिंदेंची बिनविरोध निवड
विधानपरिषदेच्या सभापतीपदाच्या नावाची आज घोषणा केली जाणार आहे. राम शिंदे यांनी सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला आहे. विधानपरिषदेच्या सभापतीसाठी एकच अर्ज आल्याने राम शिंदे यांची बिनविरोध निवड होणार आहे.
-
विधीमंडळात बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरुन चर्चा, संदीप क्षीरसागर यांची सरकारवर टीका
विधीमंडळात बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरुन चर्चा सुरु आहे. यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. याप्रकरणाची चौकशी करुन वस्तुस्थिती समोर आली पाहिजे, अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली. बीडमध्ये गुंडगिरी कशामुळे वाढली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बीडमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस पावलं उचलावी लागतील, असेही संदीप क्षीरसागर म्हणाले.
-
सोलापुरात शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन, पुणे – हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला
सोलापुरात शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. मार्केट यार्डात कांदा घेऊन आलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा लिलावासाठी उतरवला न गेल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पुणे – हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला
-
मी पहिल्यांदा रेशीमबागेत आलेलो नाही, संघाचे आणि शिवसेनेचे विचार एकसारखेच- एकनाथ शिंदे
मी पहिल्यांदा रेशीमबागेत आलेलो नाही. रेशीमबागेत आल्यावर प्रेरणा मिळते. संघाची जोडण्याची शिकवण आहे, तोडण्याची नाही. देशाच्या उभारणीत संघाचे मोठे योगदान आहे. संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकसारखेच आहेत, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
-
Mumbai Boat Capsized : गेटवे ऑफ इंडिया पोलिसांकडून शोध मोहीमेला पुन्हा सुरुवात
काल रात्री अंधार असल्याने काही वेळ शोध मोहीम थांबवली होती. आज पहाटे पासून पुन्हा पोलिसांची रेस्क्यू टीम समुद्रात बेपत्ता प्रवाशांचां शोध घेत आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी गेट ऑफ इंडियाच्या किनाऱ्यावरून ही स्पीड बोट घेऊन समुद्रात शोध मोहीम साठी जात आहेत.
-
Nashik Crime : माजी नगरसेवकाच्या मुलावर प्राणघातक हल्ला
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात माजी नगरसेवकाच्या मुलावर प्राणघातक हल्ला. दुपारच्या सुमारास दुकानात जाऊन सागर लोंढेवर धारदार शस्त्राने वार, हल्लेखोरांनी हवेत गोळीबार केल्याची देखील माहिती. माजी नगरसेवक नामदेव लोंढे यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला का करण्यात आला? या संदर्भात सिन्नर पोलिसांचा तपास सुरू.
-
Mumbai Boat Capsized : बोट अपघात प्रकरणी FIR दाखल
मुंबईच्या समुद्रात झालेल्या बोट अपघात प्रकरणी नेव्हीच्या पेट्रोलिंग बोटीवरील अधिकारी आणि संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. नाथाराम चौधरी, श्रवण कुमार, जितू चौधरी हे बुडलेल्या नीलकमल बोटीवर होते. त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
-
परभणीत आंबेडकरी अनुयायी करणार बेमुदत धरणे आंदोलन
शाहीन बागच्या धर्तीवर परभणीत आंबेडकरी अनुयायी करणार बेमुदत धरणे आंदोलन. न्याय मिळत नाही तो पर्यंत सुरू असणार आंदोलन. दोषी पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसच आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे अशी मागणी. विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची प्रमुख मागणी.
-
Eknath Shinde : एकनाथ शिंदे रेशीम बागेतील RSS कार्यालयात दाखल
शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बौद्धिकसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत पक्षाचे अन्य आमदारही आहेत.
मुंबईच्या समुद्रात काल भीषण अपघात झाला. नौदलाची स्पीड बोट एलिफंटाला जाणाऱ्या नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला धडकली. खोल समुद्रात झालेल्या या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघाताप्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. कांदा निर्यातीवर असलेले वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. मंत्री दादा भुसेसह काही आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली. कांदा निर्यात शुल्कामुळे कांदा निर्यातीसाठी अडचण. त्यामुळे कांदा निर्यात शुल्क हटवण्याची मागणी.
Published On - Dec 19,2024 8:07 AM