Maharashtra Assembly Winter Session 2024 LIVE : शरद पवार मस्साजोग गावात दाखल

| Updated on: Dec 21, 2024 | 12:24 PM

Maharashtra Assembly Winter Session 2024 LIVE Updates : महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील. राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या तसेच क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Maharashtra Assembly Winter Session 2024 LIVE : शरद पवार मस्साजोग गावात दाखल
महत्वाची बातमीImage Credit source: tv9

LIVE NEWS & UPDATES

  • 21 Dec 2024 12:20 PM (IST)

    नार्वेकर-फडणवीस यांच्यात भेट

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात संवाद झाला. विधान परिषदेच्या परिसरात दोघांमध्ये भेट झाली.

  • 21 Dec 2024 12:10 PM (IST)

    राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

    राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. आज आणि उद्या मुंबईत घेणार राज्यभरातील OBC नेत्यांची भेट घेणार आहे. ते  OBC नेत्यांची मते जाणून घेणार आहे. नाशिकमध्ये समता परिषदेत कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आता मुंबईत ओबीसी नेत्यांची भेट घेणार आहेत.

  • 21 Dec 2024 12:00 PM (IST)

    एचडी देवेगौडा नाशिक मध्ये

    देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा नाशिक मध्ये दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत.

  • 21 Dec 2024 11:56 AM (IST)

    पवना नदीची शुद्धता राखण्यासाठी पवना माईचा उत्सव साजरा

    पुणे : मावळ तालुक्याला वरदान असलेली पवना नदीची शुद्धता आणि स्वच्छचा टिकावी यासाठी पवना माईचा उत्सव साजरा करण्यात येतो. या दरम्यान जलदिंडी काढण्यात येते. या दिंडीत पवना धरण परिसरातील गावे, माध्यमिक शाळा सहभाग घेतात, पवना धरण या ठिकाणी पवना माईचे जलपूजन करून दिंडीचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर पवना नदीवरील ब्राह्मनोली घाटावर दिंडी चे परिसरातील शाळांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.

    यावेळी विद्यार्थ्यांनी पवनामाईची आरती करून स्वच्छतेच्या घोषणा दिल्या. नदीचे पूजन करण्यात आले. पवना नदीची कृतज्ञता म्हणून नदीत कणकेचे दिवे सोडण्यात आले. आणि पवना नदी स्वच्छताची शपथ घेण्यात आली.

  • 21 Dec 2024 11:43 AM (IST)

    मला कोणत्याही खात्याचं काम करायला आवडेल – गुलाबराव पाटील

    गेल्यावर्षी सुद्धा मी डिसेंबरमध्येच मंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि यावेळी सुद्धा मी डिसेंबर मध्येच मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे मला असं वाटतं डिसेंबर महिना हा माझ्यासाठी लकी महिना आहे. जे मागच्या काळात झालं त्याला गुडबाय आणि जे नवीन काळात येणार आहे त्याचे वेलकम, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

    खातं हे खातं असत. कोणत्याही खात्याचं काम करायला मला आवडेल. दीनदलित बाल शोषित अशा सर्वांची काम माझ्या हाताने होवो. ज्यांनी ज्यांनी मला प्रेम सहकार्य केलं. त्यांची सेवा करण्यासाठी प्रभू मला शक्ती देवो, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

  • 21 Dec 2024 11:39 AM (IST)

    हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात

    कोल्हापूर : मंत्रीपद मिळाल्यानंतर हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर पहिल्यांदाच कोल्हापुरात येणार आहेत. कोल्हापुरात दाखल होताच हे दोन्हीही मंत्री कर्वे निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी जाणार आहेत. अंबाबाई दर्शनानंतर दोघेही महायुतीकडून आयोजित स्वागत मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.

  • 21 Dec 2024 11:33 AM (IST)

    छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, आज घेणार राज्यभरातील OBC नेत्यांची भेट

    राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. आज आणि उद्या छगन भुजबळ मुंबईत राज्यभरातील OBC नेत्यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते OBC नेत्यांची मतं जाणून घेणार आहेत. त्यानंतर ते पुढचा निर्णय घेतील, असे बोललं जात आहे. नाशिकमध्ये समता परिषदेत कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आता मुंबईत ओबीसी नेत्यांची घेणार भेट घेणार आहेत.

  • 21 Dec 2024 11:00 AM (IST)

    आमदार संदीप क्षीरसागर यांची मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी

    वाल्मिक कराडला तात्काळ अटक करून खुनाच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी करा. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. गुन्हा होऊन तेरा दिवस झाले तरीही आरोपी अटकेत नाहीत. आमची आणि ग्रामस्थांची एकच मागणी आहे की आरोपीला तात्काळ अटक करा असं संदीप क्षीरसागर म्हणाले. शरद पवार आज देशमुख कुटुंबीयांची सांत्वन भेट घेण्यासाठी येत आहेत.

  • 21 Dec 2024 10:48 AM (IST)

    चोरीला गेलेल्या 14 दुचाकी हस्तगत

    नंदुरबार जिल्ह्यासह धुळे, जळगाव जिल्ह्यातील चोरीला गेलेल्या 14 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. नंदूरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने चोरीला गेलेल्या 14 दुचाकी जप्त केल्या आहेत. प्रकाशा ते तळोदा दरम्यान चोरीच्या मोटरसायकल विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तिन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या आरोपींकडून आणखी दुचाकी जप्त होण्याची शक्यता आहे.

  • 21 Dec 2024 10:24 AM (IST)

    आज जालना जिल्हा बंदची हाक

    परभणी घटनेच्या निषेधार्थ आज जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सकल आंबेडकर समाज आणि सकल वडार समाजाच्या वतीने ही बंदची हाक देण्यात आली आहे. या आवाहनानंतर जालना कृषी उत्पन्न बाजार समिती देखील बंद राहणार असून शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल आणू नये असा आवाहन देखील करण्यात आलं आहे. आज दुपारी आंबेडकरी समाजाच्या वतीने शहरांमध्ये निदर्शने देखील करण्यात येणार आहेत.

  • 21 Dec 2024 10:23 AM (IST)

    मराठी कुटुंब मारहाण प्रकरण, आणखी दोघांना अटक

    कल्याण योगीधाम अजमेरा सोसायटी मारहाण प्रकरण. मुख्य आरोपी अखिलेश शुक्लासह त्यांचे दोन सहकारी सुमित जाधव आणि दर्शन बोराडे यांना पोलिसांनी काल केली अटक. आज अखिलेश शुक्लाच्या पत्नी गीता शुक्लासह आणखी दोन आरोपीना घेतलें ताब्यात. एकूण सहा आरोपीं पोलिसांच्या ताब्यात असून अजून चार आरोपींचा शोध सुरू आहे. या सर्व आरोपींना आज दुपारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार.

  • 21 Dec 2024 10:21 AM (IST)

    नथुराम गोडसे याचा यथोचित सन्मान करा – सरहदला धमकी

    “दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नथुराम गोडसे याचा यथोचित सन्मान करा”. साहित्य संमेलनाची आयोजक संस्था सरहदला धमक्यांचे फोन. फक्त गोडसेच नाही, तर सावरकर यांचं देखील नाव संमेलनातील ठिकाणांना द्यावं अशी मागणी. जर तसं झालं नाही, तर संघर्ष अटळ असल्याचाही धमकीत उल्लेख.

  • 21 Dec 2024 10:17 AM (IST)

    काहीही करुन BMC निवडणूक जिंकावी लागेल – संजय राऊत

    बीएमसी निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरु झालीय. स्थानिक पातळीवर स्वबळाची मागणी असतेच. महाविकास आघाडी अजूनही आहे. आम्हाला काहीही करुन मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकावी लागेल असं खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आधी सरकार स्थापनेला मग मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब झाला. त्यानंतर अजून खाते वाटप झालेलं नाही. आता पुढील काही तासात मंत्रिमंडळाचे खातेवाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान थंडगार वाऱ्याने एक्स्प्रेस वेवर धुक्याची चादर आहे. मावळ थंडीने गारठला असून लोणावळ्यात पुणे मुंबई एक्स्प्रेस वे धुक्यात हरवला आहे, तर संपूर्ण मावळ तालुक्यात धुक्याची चादर पसरली आहे. सहयाद्रीच्या पर्वत रांगेत घाट माथ्यावरील पट्टा धुक्यात हरवल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. थंडगार वारे आणि आल्हाददायक धुकं यामुळे पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवरील लोणावळ्याचा निसर्ग मनमोहक झालाय. तर दुसरीकडे वाहनचालक गाडी चालवताना या आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटत आहे.

Published On - Dec 21,2024 10:16 AM

Follow us
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.