Maharashtra Band : महाविकास आघाडीचा आक्रमक पवित्रा, येत्या 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद!
उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याला महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून, येत्या 11 ऑक्टोबरला हा बंद पुकारण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय जयंत पाटील यांनी जाहीर केला. हा बंद पक्षाच्या वतीने आहे सरकारच्या वतीने नाही. मात्र महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षासोबतदेखील आम्ही बोलणार आहोत की त्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावं, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.
महत्त्वाचं म्हणजे जयंत पाटील यांच्या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
लखीमपूर घटनेचा निषेध म्हणून पक्ष म्हणून महाविकास आघाडी 11 ऑक्टोबरला बंद करणार आहोत. आज मंत्रिमंडळाने देखील याबाबात खेद व्यक्त केला आणि हुतात्मांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भाजप क्रूरपणे वागून शेतकरी आंदोलन चिरडात आहे. संबंधित आरोपींना अटक देखील झाली नाही. त्यामुळे याचा देखील निषेध आम्ही करणार आहोत, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
शिवसेना आणि काँग्रेसची भूमिका
शेतकऱ्यांचा पाठीशी शिवसेना नेहमी राहिली आहे, त्यामुळे बंदमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर शेतकरी आंदोलन चिरडताना भाजपची मानसिकता दिसून आली, जनरल डायरच्या भूमिकेत भाजप दिसून आली, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
VIDEO : जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
लखीमपूरमध्ये नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशाच्या लखीमपूर खीरीमध्ये राज्यातील मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं, ज्या आंदोलनात 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी राज्यातील विकासकामाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रिय मंत्री अजय मिश्र आले होते. त्यांना विकासकामाचं उद्घाटन केल्यानंतर एका कार्यक्रमासाठी बनवीरपूर गावात जायचं होतं. दरम्यान, इथं मंत्री येणार असल्याने कृषी कायद्याला विरोध करणारे शेतकरी इथं एकत्र झाले, आणि काळे झेंडे घेऊन ते तुकुनिया परिसरात पोहचले. दरम्यान, यावेळी मंत्र्याच्या जाणाऱ्या गाड्यांच्या स्वॉर्डने विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडलं. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा अभय मिश्रने हे कृत्य केल्याचा गंभीर आरोप, घटनास्थळी असेलल्या शेतकऱ्यांनी केला आहे. या दुर्घटनेत 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला, संतापलेल्या शेतकऱ्यांनी 3 गाड्या जाळून टाकल्या, यूपीत हिंसाचार उफाळला, ज्यात आतापर्यंत 8 लोक मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे.
जयंत पाटील, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
११ तारखेला महाराष्ट्र बंद. सगळ्यांना आवाहन करण्यात आले आहे. हुताम्याना श्रद्धांजली वाहिली.
ऑन भानुशाली
माहिती दिली म्हणून पकडू शकत नाही. दुरुपयोग होतो तेव्हा विश्वास उडतोय. शेतकरी विरोधात भाजप वागत आहे. सत्ता असलेल्या देशात शेतकऱ्यांना चिरडले जात आहे. अद्याप आरोपींना अटक केलेलं नाही.
Up चे सरकार मोकळे सोडताय या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार ११ तारखेला बंद. अत्यावश्यक सेवा वगळून बंद पाळला जातोय. पक्षाचा अध्यक्ष म्हणून घोषणा करतोय, पक्ष म्हणून बंद पुकारतोय
एकनाथ शिंदे
लखीमपूरची घटना दुर्दैवी आहे. क्रूरतेची घटना आजपर्यंत कोणीही केलेली नाही. एकत्रच भूमिका घेतली आहे. एकत्र आहोत. माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची नुकसान. महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.
बाळासाहेब थोरात
शेतकरी आंदोलन देशात सुरू आहे त्याला वर्षे होईल. शांततेत आंदोलन सुरू आहे. त्यांना भाजप चिरडत आहे. जनरल डायरची आठवण झाली. निषेध करण्यासाठी एकत्रित येऊन बंद पाळणार आहोत.
ऑन ड्रग्स पार्टी
भाजपच्या नेत्यांचे फोटो, भाजप नेते अग्रेसिव्ह होते. एनसीबी अशी काम करतोय हा धक्का आहे. नामोहरम करण्याचा प्रयत्न आहे. बॉलिवूड निघावं यासाठी हा प्रकार सुरू आहे. कृतीम रीत्या झालंय का हे पाहायला हव.
तिन्ही पक्ष वेगळे लढले. पण निकाल चांगला लागला
संबंधित बातम्या
UP Lakhimpur Kheri new viral video : लखीमपूर खीरीतील थरारक व्हिडीओ, आंदोलकांना जिवंत चिरडलं