Maharashtra Board Result Date 2022: ठरलं! उद्या लागणार बारावीचा निकाल…
बारावी, महाराष्ट्र बोर्ड बारावी रिझल्ट, वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री, अधिकृत वेबसाईट, HSC, 12th, Examination Results, Mahrashtra board, Education Maharashtra, HSC Results 2022
मुंबई: महाराष्ट्र बारावीचा निकाल (Maharashtra HSC Results 2022) उद्या लागणार आहे! जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागणार अशी माहिती मागच्याच आठवड्यात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली होती. त्यानंतर विद्यार्थी आणि पालकवर्ग सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागून होतं. वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार बारावीचा निकाल अगदी वेळेत लागणार आहे. उद्या दुपारी एक वाजता निकाल लागणार.हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board) अधिकृत वेबसाईटवर www.mahahsscboard.in बघायला मिळणार आहे. निकाल पाहण्यासाठी स्वतःचा परीक्षेचा सीट नंबर/ रोल नंबर, आईचं नाव माहिती असणं आवश्यक आहे. लवकरात लवकर या वेबसाईटला भेट द्या आणि आपला रिझल्ट चेक करा.
अनेक अडचणीनंतर राज्यात महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षांचं आयोजन करण्यात आलं. परीक्षा घेऊन झाल्या आणि एक नवीन अडचण समोर उभी राहिली. महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी पेपर चेकिंगवर बहिष्कार टाकला आणि बारावीचा रिझल्ट कसा लागणार आणि कधी लागणार असा प्रश्न सगळ्यांना पडला. खरं तर यासगळ्या प्रकारामुळे बारावीचा रिझल्ट उशिराच लागणार असं सगळ्यांना वाटू लागलं.
पण अखेर आज प्रतीक्षा संपलेली आहे. बारावीचा रिझल्ट दणक्यात आणि सांगितलेल्या वेळेत जाहीर करण्यात आलेला आहे. हा रिझल्ट तुम्हाला महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर मिळू शकतो. उद्या 8 जून 2022 रोजी बारावीचा निकाल दुपारी एक वाजता लागणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर लाईव्ह पाहता येऊ शकणाआहे. चला तर हा निकाल कसा पाहायचा, त्याची सोपी पद्धत लगेचच समजून घेऊयात..
- जेव्हा महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 12वीच्या निकालाची घोषणा करेल, तेव्हा tv9 मराठीच्या वेबसाईटला भेट द्या.
- करिअर (टीव्ही9 मराठी करिअर) विभागात महाराष्ट्र बोर्ड 12वी निकाल 2022 च्या कोणत्याही बातमीवर क्लिक करा
- होम पेजवर महाराष्ट्र बोर्ड 12वी निकालाच्या लिंकवर क्लिक करुनही तुम्ही थेट निकाल पाहू शकाल.
- आपला रोल नंबर आणि इतर माहिती भरा
- यानंतर सबमिटवर क्किक केल्यानंतर निकाल तुमच्या समोर असेल.