Maharashtra Marathi Breaking News Live | ठेवीदारांचे पैसे घेवून पतसंस्थाचालक फरार
Maharashtra Breaking News in Marathi : आज 2 फेब्रुवारी 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
मुंबई, दि.2 फेब्रुवारी 2024 | मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगातर्फे राज्यभर सुरू असलेले सर्वेक्षण शुक्रवारी २ फेब्रुवारी रोजी रात्री २३. ५९ मिनिटांनी संपणार आहे. यामुळे शनिवार ३ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आयोगाकडे पाठवावे लागणार आहे. समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा पुन्हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दहा ते बारा प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला आहे. नाशिक जिल्ह्यातील मांडवड गावातील जवान संदीप भाऊसाहेब मोहिते लेह – लडाख येथे शहीद झाला आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
मंत्री छगन भुजबळांच्या प्रश्नावरुन अजित पवारांनी मीडीयावर नाराजी
नंदुरबार | मंत्री छगन भुजबळांच्या प्रश्नावरुन अजित पवारांनी मीडीयावर नाराजी व्यक्त केली आहे. तथ्यहीन प्रश्न विचारुन लोकामध्ये संभ्रावस्था पसरवू नका ही विनंती आहे. एकंदरीत सगळ्यांनी महाराष्ट्राच वातावरण खराब होईल, असं वक्तव्य कोणी करु नये. महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा यशवंतराव चव्हाणांनी शिकवला आहे. तो सगळ्यांनी जपला पाहीजे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
-
हिमाचल प्रदेशातील सोलनमध्ये कारखान्याला आग
हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील बद्दी औद्योगिक परिसरात शुक्रवारी दुपारी एका सौंदर्यप्रसाधन कारखान्यात भीषण आग लागली, त्यामुळे महिलांसह अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
-
-
हा अंतरिम नसून अंतिम अर्थसंकल्प आहे: ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, हा अंतरिम अर्थसंकल्प नसून हा अर्थसंकल्प अंतिम अर्थसंकल्प आहे. गरिबांसाठी काही नाही. शेतकऱ्यांसाठीही काही नाही. निवडणुका आल्या की 33 टक्के आरक्षणाची चर्चा होते.
-
देशातील मुस्लिमांच्या अस्तित्वाला धोका : असदुद्दीन ओवेसी
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेत बोलताना एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या काळात मुस्लिमांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आज देशातील 17 कोटी मुस्लीम स्वतःला हिटलरच्या काळात ज्यू समजत आहेत.
-
फरार पतसंस्थाचालकाविरोधात कारवाई करणार, मंत्री धनंजय मुंडे याचं ठेवीदारांना आश्वासन
बीड | ठेवीदारांचे पैसे घेवून पतसंस्थाचालक फरार झाला आहे. एक एक रुपया जमा करुन ठेवीदारांनी रक्कम जमा केली होती. मात्र आता पतसंस्थाचालक फरार झाल्याची माहिती मिळताच ठेवीदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आमच्या ठेवी परत मिळाव्यात, यासाठी ठेवीदार आक्रमक झाले आहेत. ठेवी मिळाव्यात यासाठी संतप्त ठेवीदारांनी मंत्री धनंजय यांचा ताफा अडवला. यावेळेस धनंजय मुंडे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिलं.
-
-
एसटी चालकाचा बस वरून नियंत्रण सुटल्याने चार ते पाच मोटारसायकलीला धडक
कल्याण लालचौकी परिसरात एसटी चालकाचा बस वरून नियंत्रण सुटल्याने चार ते पाच मोटारसायकलीला धडक. दोन ते तीन जण जखमी. वाहतूक पोलीस सह स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मोटर सायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
-
डोंबिवलीत भर रस्त्यात महिलेची छेडछाड, रोड रोमियालो स्थानिकांकडून चोप
डोंबिवलीमधील आजदेपाडा परिसरात भररस्त्यात महिलेची छेडछाड करण्याचा प्रकार समोर आला आहे. छेडछाड करणाऱ्या रोड रोमिओला स्थानिक तरुणांनी चोप देत धडा शिकवला आहे. छेडछाड करणारा तरुण सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याची पोलिसांची माहिती आहे. मानपाडा पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे.
-
मंगेश चिवटे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल
जालना : मंगेश चिवटे अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. मंगेश चिवटे हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. 10 तारखेला जरांगे पाटील हे आमरण उपोषण करणार असल्याने मंगेश चिवटे भेटीसाठी आल्याची शक्यता आहे. मंगेश चिवटे यांच्याकडून मात्र सदिच्छा भेटीसाठी आलो असल्याची माहिती देण्यात आली आहे.
-
अजित पवार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज रात्री धुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा बॅनरवर उल्लेख. अजित पवार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी.
-
देवेंद्र फडणवीस यांचा मोठा आरोप
आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेतो अंजली दमानिया घेत नाही. अंजली दमानिया सध्या सुप्रिया ताईच्या अधिक संपर्कात आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
-
छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरमधुन लोकसभा लढवणार
उद्यापासून कोल्हापूर मतदारसंघात अधिकृत दौऱ्याला सुरुवात होणार. स्वराज्य संघटना कोल्हापूरची जागा लढवणार. महाविकास आघाडी संभाजीराजेना पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
-
अभिजीत केंगार मृत्यूप्रकरणी विवेक विचार मंच संघटना आक्रमक
धवलसिंह मोहिते पाटील यांच्याविरोधात विवेक विचार मंच संघटना आक्रमक झालीय. मागासवर्गीय तरुण अभिजीत केंगार मृत्यूप्रकरणी एसआयटी समिती नेमण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर भादवि कलम 304, ऍट्रॉसिटी कलमानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलीय. चोरीच्या उद्देशाने धवलसिंह मोहिते पाटील यांच्या घरात शिरलेल्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाला होता. या प्रकरणात झालेल्या मृत्यूबाबत विवेक विचार मंचाने ही मागणी केलीय.
-
संजय गायवाड यांच्या विरोधात पंढरपुरात आंदोलन
शिंदे गटाचे आमदार संजय गायवाड यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आलं आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारुन दहन आंदोलन करण्यात आलं. आमदार संजय गायकवाड यांनी ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा निषेधार्थ पंढरपुरातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले. यावेळी छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
-
वैभव नाईक यांची नारायण राणेंवर टीका
वैभव नाईक यांनी नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावरून वैभव नाईक यांनी टीका केली आहे. राणे भाजपच्या नावाने जिल्ह्यात दहशत माजवत असून दिपक केसरकर हे भाजपच्या ताटाखालचे मांजर झाल्याची टीका वैभव नाईक यांनी केली आहे.
-
पुणे हॉस्पिटलपासून कर्वे रोडला जोडणारा पूल आजपासून बंद
पुणे शहरातील हा महत्त्वाचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी आजपासून बंद आहे. महानगरपालिकेच्या ऑडिटमध्ये हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचं उघड झालं आहे. आज रात्रीपासून फुल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. शास्त्री रोड, पुणे हॉस्पिटलपासून कर्वे रोडला जोडणारा हा महत्त्वाचा पुल आहे. एक्सपान्शन जॉइंट बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी हा पूल 2 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे.
-
“२०२४ ला पुण्यात वसंत मोरेंचा हातोडा चालणार”
२०२४ ला पुण्यात वसंत मोरेंचा हातोडा चालणार आहे. राज ठाकरे मला नाराज करणार नाहीत. मी पुणे लोकसभा सोडून कुठे निवडणूक लढवणार नाही. पण राज ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.
-
Live Update : अभिनेत्री पूनम पांडे हिचं निधन, कर्करोगामुळे घेतला अखेरचा श्वास
अभिनेत्री पूनम पांडे हिचं निधन झालं आहे. अभिनेत्रीने कर्करोगामुळे अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर येत आहे.
-
Live Update : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यांवर आज सकाळी लेझर शस्त्रक्रिया होणार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यांवर आज सकाळी लेझर शस्त्रक्रिया होणार.. माजीवाडा इथल्या एका प्रख्यात डॉक्टरांकडून होणार शस्त्रक्रिया… मुख्यमंत्री काही वेळात ठाणे इथल्या निवासस्थानाहून निघणार असल्याची माहीती… शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री संध्याकाळी त्यांचा प्रिय नातू रुद्रांश याच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबासोबत ठाण्यात वाढदिवस साजरा करणार.. मुख्यमंत्री यांचे सगळे कार्यक्रम आज राखीव
-
Live Update : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सुप्रीम कोर्टाचा झटका
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सुप्रीम कोर्टाचा झटका.. ईडीने केलेल्या अटकेबाबत दाखल याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार… झारखंड हायकोर्टात दाद मागण्याचे निर्देश… ईडीने केलेल्या अटके विरोधात सोरेन यांनी दाखल केली होती याचिका
-
Live Update : पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची काल रात्री पसरली होती अफवा
पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची काल रात्री पसरली होती अफवा… रात्री साडेबाराच्या दरम्यान घडला प्रकार… पोलिसांनी डॉग स्कॉडच्या माध्यमातून केली तपासणी… काही वेळासाठी प्रवेश बंद करण्यात आला होता… मात्र १ तास तपासणीनंतर हाती काहीच लागलं नाही, त्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला
-
पुना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा
पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा काल रात्री पसरली होती . रात्री साडेबाराच्या दरम्यान घडला प्रकार.
पोलिसांनी डॉग स्कॉडच्या माध्यमातून तपासणी केली, काही वेळासाठी सर्वांना प्रवेश बंद करण्यात आला होता. मात्र १ तास तपासणीनंतर हाती काहीच हाती लागलं नाही. त्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
-
नवी दिल्ली – देवेंद्र फडणवीसांनी घेतली जे.पी. नड्डांची भेट
देवेंद्र फडणवीसांनी जे.पी. नड्डांची भेट घेतली. राज्यसभा उमेदवारीबाबत नड्डा- फडवणीस यांच्यात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती.
-
पिंपरी चिंचवड – मौजमजेसाठी बाईक चोरणाऱ्या एकाला अटक, 12 दुचाकी जप्त
हिंजवडी पोलिसांनी मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या एकाला अटक केली त्याच्याकडून 12 दुचाकी जप्त करण्यात आल्यात. सूर्यकांत आडे असं आरोपीचं नाव आहे. मौज मजा करण्यासाठी पैसे मिळावेत या उद्देशाने तो या दुचाकी चोरत होता. त्याच्याकडून 12 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
-
भाजपासोबत नसणाऱ्यांवर ईडीच्या धाडी – संजय राऊत
जे भाजपासोबत नाहीत, त्यांच्यावर भाजप छापा टाकते. ईडीच्या धाडी त्यांच्यावरच टाकल्या जातात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
-
भ्रष्टाचारीच भाजपाचा चेहरा – संजय राऊत
अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी हे भाजपाचा चेहरा बनले. भ्रष्टाचारीच भाजपाचा चेहरा आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
-
भाजपाकडून मला कोणतीही ऑफर नाही – छगन भुजबळ
पक्षात माझी घुसमट नाही. भाजपाकडून मला कोणतीही ऑफर मिळालेली नाही, अंजली दमानियांच्या दाव्यावर छगन भुजबळांचं स्पष्टीकरण
-
नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुहेरी हत्याकांड
नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुहेरी हत्याकांड घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास आपआपसातील वादातून दोघांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे.
-
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. सलग दोन वर्ष महापालिकेचे आयुक्त महापालिकेचे आयुक्त महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
-
विदर्भात महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात
लोकसभा निवडणूकीसाठी विदर्भात महाविसाक आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. वर्धा लोकसभा मतदार संघावर शरद पवार गटानं दावा केला आहे.
-
भुजबळ भाजपच्या वाटेवर? अंजली दमानिया यांचं ट्विट
भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत का? असे ट्विट अंजली दमानिया यांनी केले आहे. भाजप भुजबळांना मोठा ओबीसी नेता बनवणार असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे.
-
मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिक न्यायालयाने स्विकारली
मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिक न्यायालयाने स्विकारली आहे. पुढच्या आठवड्यात यावर सुनावणी होणार आहे.
-
पुण्यात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई
पुण्यात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास 500 रूपये दंड आकारण्यात येणार आहे.
-
पुण्यात हेल्मेट सक्ती सुरू
पुण्यात नव्याने रूजू झालेले पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सहरात हेल्मेट सक्ती सुरू केली आहे. अमितेश कुमार या आधी नागपूर येथे पोलिस आयुक्त होते.
-
Maharashtra News | जय पवार राजकारणात सक्रिय होणार ?
बारामतीच्या राजकारणात लक्ष घालण्यासाठी अजित पवारांकडून जय पवार यांना ग्रीन सिग्नल?. बारामतीच्या राजकारणात जय पवार सक्रिय व्हायला सुरुवात. काल एका दिवसात बारामतीत 11 राष्ट्रवादी युवा शाखांच केलं उद्घाटन. या दौऱ्याच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटन मजबूत करायला सुरुवात.
-
Maharashtra News | पुण्यातून राज ठाकरे कोणाला संधी देणार?
लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची नाव राज ठाकरेंना कळवली. लोकसभा प्रभारींनी राज ठाकरेंना दिला नावांचा अहवाल. पुण्यातून 5 जण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक. राज ठाकरे कोणाला संधी देणार ?
-
Maharashtra news | मृतावस्थेत आढळला वाघाचा बछडा
यवतमाळ जिल्ह्यात वणीच्या सुकेनगाव शिवारात मृतावस्थेत आढळला वाघाचा बछडा. भूकबळीमुळे मृत्यू झाल्याचा संशय. वाघाचे बछडे पडून असल्याचे दिसताच गावकऱ्यांनी वन विभागाला माहिती दिली. त्यावेळी हे पिल्लू जिवंत होते अशी माहिती. वनविभागाच्या दिरंगाईने बछडा मृत पावल्याची चर्चा.
-
Marathi News | ‘कुठे फेडाल हे पाप’
भुजबळ भाजपच्या वाटेवर? एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार?. अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
-
Marathi News | महारेरचा नोंदणी क्रमांक आवश्यक
प्लॉट पाडून त्याची विक्री करणाऱ्यांना ही महारेरचा नोंदणी क्रमांक आवश्यक झाला आहे. नोंदणी क्रमांक नसताना प्लॉटची सध्या विक्री केली जाते. महारेराने अशी जाहिरात करणाऱ्या राज्यातील ४१ विकसकांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
-
Marathi News | समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा पुन्हा भीषण अपघात
समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा पुन्हा भीषण अपघात झाला. या अपघातात दहा ते बारा प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. वाशीमच्या कारंजा तालुक्यातील कार्ली गावाजवळ लोकेशन 173 वर हा अपघात झाला आहे.
-
Marathi News | मागासवर्ग आयोगाचे सर्वेक्षण आज संपणार
राज्य मागासवर्ग आयोगातर्फे राज्यभर सुरू असलेले सर्वेक्षण शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी रात्री २३. ५९ मिनिटांनी संपणार आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच महानगरपालिका आयुक्तांनी याबाबत सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांना सूचना देण्यात याव्यात असे मागासवर्ग आयोगाने कळविले आहे.
-
Marathi News | नाशिक जिल्ह्यातील जवान शहीद
नाशिक जिल्ह्यातील मांडवड गावातील जवान लेह लडाख येथे शहीद झाला. संदीप भाऊसाहेब मोहिते असे शहीद जवानाचे नाव आहे. ते105 इंजिनियर रेजिमेंटमध्ये हवालदार या पदावर कार्यरत होते.
Published On - Feb 02,2024 7:11 AM