Maharashtra Breaking News in Marathi : मी कालही आणि आजही पवार साहेब यांची विचारधारा घेऊन काम करतोय : निलेश लंके

| Updated on: Mar 15, 2024 | 7:15 AM

Maharashtra Breaking News in Marathi : आज 14 मार्च 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News in Marathi : मी कालही आणि आजही पवार साहेब यांची विचारधारा घेऊन काम करतोय : निलेश लंके

मुंबई | 14 मार्च 2024 : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी जाहीर केली. यामुळे लोकसभा निवडणुकीत आता रंग भरणार आहे. अजित पवार यांनी बारामती मतदार संघात आज सात सभा घेणार आहे. यामुळे बारामतीत सुनेत्रा पवार यांचा प्रचाराचा बार उडणार आहे. रत्नागिरीतील गुहागरमध्ये आज उद्धव ठाकरे यांची संवाद यात्रा येणार आहे.  तर उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. अंबरनाथ शहरात आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भिवंडी लोकसभा भाजपा खासदार कपिल पाटील यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर कपिल पाटील यांचे निवासस्थानी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Mar 2024 07:30 PM (IST)

    मनोज जरांगे यांचं फडणवीसांना आव्हान

    मी वडवणी मधून जाहीर आवाहन करतो, तुम्ही मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तर यांचे 48 पैकी एकही खासदार निवडून येऊ देत नाही, फडवणीस तुला सांगतो तुझा खासदार आणि आमदार राज्यात निवडून येऊ देणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

  • 14 Mar 2024 07:15 PM (IST)

    एकट्या फडवणीसने समाज वेठीस धरला- मनोज जरांगे

    एकट्या फडवणीसने समाज वेठीस धरला आहे, पण तुझी गाठ माझ्याशी आहे. 6 कोटी मराठा तुडवून माझ्याकडे यावे लागेल, माझ्या बद्दलचे काही व्हिडीओ तयार करायचे आणि मला बदनाम करायचे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. हे व्हिडीओ एडिट केलेले असतात. तुम्हाला जे करायचे ते करा, मला जे करायचे ते मी करेल पण तुमच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण मिळवेल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

  • 14 Mar 2024 06:42 PM (IST)

    पवार साहेबांनी शेतकरी, बेरोजगारीवर खूप काम केलंय : निलेश लंके

    पुणे | मी कालही आणि आजही पवार साहेब यांची विचारधारा घेऊन काम करतोय, असं निलेश लंके एका सभेत म्हणाले आहेत. पवार साहेबांनी शेतकरी, बेरोजगारीवर खूप काम केलंय. राजकारणात लाख माणसांची माणसे कमवली आहेत. तसेच लंके आजपर्यंत स्वतःसाठी कधी जगला नाही नेहमी लोकांसाठी जगला, असं लंके म्हणाले. तसेच माझं घर पाऊस आला तर आज ही गळत असतं, पण दुसरा माणूस नीट राहतो याची काळजी असते, असंही लंके यांनी नमूद केलं.

  • 14 Mar 2024 06:23 PM (IST)

    लंकेना लोकसभा लढवण्यासाठी अडीच लाख रुपयांचा चेक कुणाकडून?

    शेवगाव | निलेश लंके यांना लोकसभा लढवण्यासाठी अडीच लाख रुपयांचा चेक देण्यात आला आहे. हरीश जायभाय मित्रमंडळाकडून अडीच लाखांचा चेक देण्यात आला. जयंत पाटील यांनी भर मंचावर नाव घेऊन लंके यांना चेक दिला.

  • 14 Mar 2024 05:52 PM (IST)

    पंजाब: AAP ने लोकसभेसाठी 8 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर

    पंजाबमधील लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. गुरमीत सिंग मीत हैर यांना संगरूर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.

  • 14 Mar 2024 05:35 PM (IST)

    लवकरच जागावाटपावर अंतिम निर्णय होईल- नितीश कुमार

    एनडीएमधील जागावाटप आणि बिहार मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, लवकरच सर्वकाही होईल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बातमी मिळेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप राज्यात 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे. जेडीयूला 16 जागा मिळाल्या आहेत, तर एलजेपीच्या चिराग पासवान गटाला पाच जागा मिळाल्याची माहिती आहे.

  • 14 Mar 2024 05:20 PM (IST)

    पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी भाजपमध्ये

    लोकसभा निवडणुकीपूर्वी पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी प्रनीत कौर यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रनीत कौर या पटियालामधून काँग्रेसच्या खासदार होत्या.

  • 14 Mar 2024 05:09 PM (IST)

    अरविंद केजरीवाल उद्या गुजरातमध्ये लोकसभेच्या प्रचाराला करणार सुरुवात

    आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल उद्या गुजरातमध्ये जाऊन गुजरातच्या लोकसभा प्रचाराची सुरुवात करणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या गुजरात दौऱ्यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही त्यांच्यासोबत जाणार आहेत.

  • 14 Mar 2024 04:58 PM (IST)

    स्मिता वाघ यांना पाच लाखांचा लीड देणार, आमदार मंगेश चव्हाण

    जळगाव : स्मिता वाघ यांच्या उमेदवारीवर तसेच उन्मेष पाटील यांच्या कापण्यात आलेल्या तिकिटावर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाने स्मिता वाघ यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला त्यांच्याविषयी खूप मोठी सहानुभूती होती आणि आहे. उन्मेष पाटील यांनीदेखील स्मिता वाघ यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते देखील पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणार आहेत. आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की जिल्ह्यातून स्मिता वाघ यांना पाच लाखांचा लीड द्यायचा अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

  • 14 Mar 2024 04:47 PM (IST)

    45 प्लस जागा आत्मविश्वासाने जिंकू – चंद्रशेखर बावनकुळे

    नागपूर : भाजपाच्या एकाच जागेवर मित्रपक्ष लढणार आहेत ते म्हणजे बारामती. बाकी जागा आमच्या सिटिंग आहेत त्यामुळे तसा प्रश्नच येत नाही. उर्वरित ज्या जागा आहेत त्या जागांवर शिंदे आणि अजित दादा लढतील. जागा या सन्मानपूर्वक असतील. कोणीही दुखावणार नाही या पद्धतीचे महायुतीचे समीकरण असेल. चांगल्या पद्धतीने महायुतीचे समीकरण तयार करून येणाऱ्या लोकसभेत मोदींच्या नेतृत्वात 45 प्लस जागा आत्मविश्वासाने आम्ही जिंकू असे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

  • 14 Mar 2024 04:22 PM (IST)

    नांदेडसाठी कॉंग्रेसकडून वसंत चव्हाण यांच्या नावाची शिफारस

    नांदेड : कॉंग्रेस पक्षाची लोकसभेची यादी तयार आहे. मी लोकसभेसाठी इच्छुक आहे. पक्षाकडे मी नांदेड लोकसभेची जागा मागितली आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीनेही केंद्राच्या कमिटीकडे माझ्या नावाची शिफारस केली आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी एकमेव इच्छुक उमेदवार आहे अशी माहिती माजी आमदार वसंत चव्हाण यांनी दिली.

  • 14 Mar 2024 04:09 PM (IST)

    इतकी काय घाई झाली होईल ना… उमेदवार यादीवर छगन भुजबळ बिनधास्त बोलले

    नाशिक : देशात त्यांना तीन ते चारशे उमेदवारांची यादी जाहीर करायची आहे. आपल्याला किती करायचे? त्यामुळे ते येत्या दोन-चार दिवसात सर्व स्पष्ट होईल. यात छगन भुजबळ यांचे नाव असेल का हे मला माहित नाही. ज्याचे नाव असेल त्याचे काम करायचे. नाव असले तरी येवल्याचे लोक काय म्हणतात ते त्यांना विचारावे लागेल असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

  • 14 Mar 2024 02:37 PM (IST)

    गोंदिया : आठ गावांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

    गोंदियाच्या आमगाव नगर परिषदचा विषय पेटला असून आठ गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

  • 14 Mar 2024 02:18 PM (IST)

    संजय कोकाटे यांची शिंदे गटाला सोडचिट्टी

    शिवसेना शिंदे गटाचे माढा लोकसभेचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांची पक्षाला सोडचिट्टी दिली आहे.

  • 14 Mar 2024 12:50 PM (IST)

    गद्दारी करून भाडोत्री पक्षानं सरकार पाडलं- उद्धव ठाकरे

    गुहागर- गद्दारी करून भाडोत्री पक्षानं सरकार पाडलं. भ्रष्टाचारी अभय योजना, अशी नवीन योजना मोदींनी काढली आहे. शिवसैनिक आजही माझ्यासोबत आहेत. तुमची लाट आहे आणि मोदींची वाट आहे, असं शिवसैनिक सांगतात. अटलजींचा पक्ष खरा होता. आता भाडोत्री जनता पक्ष झाल आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली.

  • 14 Mar 2024 12:40 PM (IST)

    उद्धव ठाकरेंची राणे कुटुंबावर जोरदार टीका

    गुहागर- “विनायक राऊत खासदार झाले नसते तर कोकणात गुंडगिरी वाढली असती. भाजपचं हिंदुत्व शिवीगाळ करणारं आणि नासलेलं आहे. भाजपची भोकं पडलेली तीनपाटं आम्हाला शिव्या देतात,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी राणे कुटुंबावर टीका केली.

  • 14 Mar 2024 12:30 PM (IST)

    अजित पवारांचा शरद पवार गटाला टोला

    पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा घेणार नाही असं म्हणत होते. बोलून 6 महिने झाले नाहीत, आता पुन्हा त्यांना बोलवत आहेत, अशा शब्दांत अजित पवारांनी शरद पवार गटावर टीका केली आहे. त्याचसोबत बारामतीबाबत अद्याप काही ठरवलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

  • 14 Mar 2024 12:20 PM (IST)

    निलेश लंके स्थानिक राजकारणामुळे नाराज- अजित पवार

    बारामती- “निलेश लंके स्थानिक राजकारणामुळे नाराज आहेत. लंकेंसोबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसह चर्चा करणार आहे. कुठेही चुकीचं काही करू नको, असं निलेश लंकेंना सांगितलं आहे. विरोधकांकडे नगरमध्ये उमेदवार नसल्याने लंकेंना गळ घालत आहेत,” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

  • 14 Mar 2024 12:10 PM (IST)

    80 टक्के जागावाटप पूर्ण- अजित पवार

    बारामती- जागावाटपाबाबत आणखी एक बैठक होणार आहे. सध्या 80 टक्के जागावाटप पूर्ण झालं आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

  • 14 Mar 2024 11:56 AM (IST)

    संपूर्ण देशात यापुढे एकाच वेळी निवडणूक होण्याची शक्यता ? एक देश एक निवडणूक घेण्याबाबतचा अहवाल राष्ट्रपतींना सुपूर्द

    संपूर्ण देशात यापुढे एकाच वेळी निवडणूक होण्याची शक्यता ?

    संपूर्ण देशात यापुढे एकाच वेळी निवडणूक होण्याची शक्यता ? एक देश एक निवडणूक घेण्याबाबतचा अहवाल राष्ट्रपतींना सुपूर्द करण्यात आला आहे.

    एक देश एक निवडणूक घेण्याबाबत राजकीय पक्षांची संमती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक संस्थांसाठी यापुढे एकच मतदार यादी असेल. यापुढचा निर्णय राष्ट्रपती आणि केंद्र सरकार घेणार आहे.

  • 14 Mar 2024 11:50 AM (IST)

    शरद पवारांचा फोटो आणि नाव का वापरता ? सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारलं

    राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह प्रकरणाच्या याचिकेवर सुनावणी सुरू. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने दाखल केली होती याचिका.

    पक्ष वेगळा मग अजित पवार शरद पवार यांचा फोटो का वापरतात ? अभिषेक मनू सिंघवी कोर्टासमोर अजित पवार गटाचे पोस्टर्स दाखवले.

  • 14 Mar 2024 11:36 AM (IST)

    अजित पवार यांचा बारामती ग्रामीण भागाचा दौरा सुरू

    अजित पवार यांचा बारामती ग्रामीण भागाचा दौरा सुरू,  मोरगाव रस्त्यावर अजित पवार यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. जेसीबीच्या माध्यमातून उधळली फुलं.

  • 14 Mar 2024 11:20 AM (IST)

    उद्धव ठाकरे यांचा गुहागर आणि दापोली विधानसभेचा आज दौरा

    उद्धव ठाकरे यांचा गुहागर आणि दापोली विधानसभेचा आज दौरा आहे. उद्धव ठाकरे यांचं अंजनवेल हेलिपॅडवर आगमन झालं असून थोड्याच वेळात ते गुहागरच्या दिशेने रवाना होणार आहेत. आज ते श्रुरांगतळी येथील सभेला संबोधित करतील.

  • 14 Mar 2024 11:10 AM (IST)

    जागावाटपाबाबत महायुतीची आणखी एक बैठक होईल – अजित पवार

    जागावाटपाबाबत महायुतीची आणखी एक बैठक होईल. 80 टक्के जागावाटप झालं, एकवाक्यता झाली, अस अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

  • 14 Mar 2024 11:00 AM (IST)

    गद्दारांना कोटीचा भाव

    गद्दार आमदार आणि खासदाराला 50- 50 कोटी रुपये भाव मिळतो. पण कांद्याला भाव मिळत नसल्याची टीका संजय राऊत यांनी केंद्र सरकारसह राज्य सरकारवर केली.

  • 14 Mar 2024 10:50 AM (IST)

    बेरोजगारी, महागाई देशातील गंभीर प्रश्न

    देशात सध्या बेरोजगारी, महागाई हे गंभीर प्रश्न आहेत. पण त्यावर कोणीच बोलत नसल्याची खंत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. कांद्याच्या दराबाबत कोणीही बोलत नसल्याचे ते म्हणाले.

  • 14 Mar 2024 10:40 AM (IST)

    राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट

    राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना शेतकऱ्यांची चिंता नसल्याची टीका त्यांनी केली. शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याचे ते म्हणाले.

  • 14 Mar 2024 10:30 AM (IST)

    खासदार श्रीकांत शिंदे त्यांची विरोधकांवर टीका

    कल्याण लोकसभा मतदारसंघात विरोधकांना अजून उमेदवार मिळत नाही, मात्र चांगला उमेदवार यावा, निवडणूक झाली पाहिजे असे मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरमध्ये व्यक्त केले.

  • 14 Mar 2024 10:20 AM (IST)

    राहुल गांधी यांची यात्रा देश जोडण्यासाठी

    राहुल गांधी यांची यात्रा देश जोडण्यासाठी त्यांनी या यात्रेतून देशभरात माणसं जोडल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले. चांदवडमधील शेतकरी मेळाव्यात त्यांनी राहुल गांधी हे सर्वांचे नेते असल्याचे मोठे वक्तव्य केले. इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच राहुल गांधी मोठा प्रकाश घेऊन आल्याचा दावा त्यांनी केला.

  • 14 Mar 2024 10:10 AM (IST)

    आमदाराला धक्काबुक्की

    नाशिकमध्ये आमदार जे पी गावित यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला.सभा स्थळी जाणाऱ्या आमदार गावित यांना आडवल्याने गोंधळ उडाला.पोलीस आणि राहुल गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांनी जी पी गावित यांना धक्काबुक्की केल्याचे समोर येत आहे.

  • 14 Mar 2024 10:01 AM (IST)

    राहुल गांधी यांची यात्रा पालघरमध्ये

    राहुल गांधी यांची यात्रा आज रात्री नाशिक त्रंबकेश्वर येथून पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे सायंकाळी 5 वाजता पोहोचणार आहे. रात्री येथे कॉर्नर सभा होणार आहे.

  • 14 Mar 2024 09:57 AM (IST)

    बनावट कागदपत्रांद्वारे प्लॉट विकणाऱ्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई

    नागपूर पोलिसांनी एका टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधारासोबत 18 जणांना आरोपी बनविण्यात आले आहे.  प्रवीण मोरेश्वर सहारे हा या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शहरातील मोकळे भूखंड शोधून या टोळीने अनेकांना फसवल्याचं समोर आलं. एवढेच नाही तर खरेदी विक्री करण्यासाठी किंवा कर्ज घेण्यासाठी यांनी डमी खातेदार देखील उभे केले असल्याचा तपासात पुढे आलंय. या टोळीवर कारवाई केल्यानंतर आता अनेक बाबी समोर येणार आहे.

  • 14 Mar 2024 09:45 AM (IST)

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर भाजपचा दावा

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर भाजपने दावा केला आहे.  मतदार संघ भाजपलाच सुटणार असल्याचं भाजपकडून म्हणण्यात येत आहे. दिल्ली पार्लमेंटरी बोर्ड या संदर्भातला निर्णय येत्या दोन दिवसात घेईल. मेरिटनुसार आणि सर्वेनुसार भाजपचाच उमेदवार देण्यात येईल. महायुतीचे घटक पक्ष आम्हाला नक्की मदत करतील.  रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सर्वे भाजपच्याच बाजूने आहे.  रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात बूथनिहाय भाजप आघाडीवर आहे, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.

  • 14 Mar 2024 09:30 AM (IST)

    नितीश कुमार सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार

    नितीश कुमार सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.  तब्बल 18 मंत्री आज शपथ घेणार आहेत. नितीशकुमार एनडीएमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच हा शपथविधी होतो आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शपथविधी होणार आहे.

  • 14 Mar 2024 09:17 AM (IST)

    लोकसभा निवडणुकीची आचरसंहिता कधी लागणार?; अजित पवार म्हणाले…

    पंतप्रधान ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन करतायेत. दोन चार दिवसात आचारसंहिता लागणार आहे. आपला भारत देश बदलतोय. राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र असतील सगळे काम करतायेत. माझ बालपण हे आमराईत गेलं आहे.  आम्ही इकडे क्रिकेट खेळायचो, असं अजित पवार म्हणाले.

  • 14 Mar 2024 08:59 AM (IST)

    National News | CAA कायद्याबद्दल अमित शाह काय म्हणाले?

    देशात CAA कायदा लागू केला गेला तो कधीच मागे घेतला जाणार नाही, देशात भारतीय नागरिकत्व देणं हा अधिकार आहे आणि त्याबाबत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही असं अमित शाह म्हणाले.

  • 14 Mar 2024 08:46 AM (IST)

    Maharashtra News | अजित पवारांचे मोठं विधान

    आज किंवा उद्या आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. आचारसंहितेच्या काळात काही नियम पाळावे लागतात. आपल्याला माहिती आहे की विधानसभा असेल लोकसभा असेल. बारामती काशी बदलत गेली विकास कसा होत गेला. एमआयडीसीला जागा कमी पडायला लागली. मी सातत्याने कामगार आणि उद्योगपती यांच्यात समन्वय साधलाय.

  • 14 Mar 2024 08:14 AM (IST)

    Maharashtra News | राहुल गांधी यांचा उद्धव ठाकरेंना फोन

    मुंबईतील सभेला येण्यासाठी राहुल गांधी यांचा उद्धव ठाकरेंना फोन. सभेला येऊन मार्गदर्शन करण्याची विनंती. 48 मतदारसंघासाठी मविआची यादी योग्यवेळी जाहीर करणार. निलेश लंके पवार गटात येत असतील तर स्वागत. संपूर्ण महाराष्ट्रात राहुल गांधी यांचं जोरदार स्वागत, असं संजय राऊत म्हणाले.

  • 14 Mar 2024 08:11 AM (IST)

    Maharashtra News | डोंबिवली रेल्वे स्थानकात गुजराती भाषेत तिकीट ?

    8 मार्चला 2024 चे गुजराती भाषेतील डोंबिवली ते घाटकोपर दरम्यानचे तिकीट समाजमाध्यमांवर वायरल होत असून याबाबत प्रवाशांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यंत्रात बिघाड झाल्याने अशी तिकीट प्राप्त झाल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने करत आहे.

  • 14 Mar 2024 07:56 AM (IST)

    maharashtra news | माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील रुग्णालयात

    देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना रुग्णालयात दाखल केले आहे. पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले आहे. प्रतिभाताई पाटील यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.

  • 14 Mar 2024 07:43 AM (IST)

    maharashtra news | रत्नागिरी आज दोन दिग्गज

    रत्नागिरीमध्ये आज एकाच दिवशी दोन राजकीय दिग्गज येणार आहे. गुहागरात उद्धव ठाकरे यांची संवाद यात्रा तर उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस आज रत्नागिरी दौरा आहे. पोलिस वसाहतीच्या  नवीन इमारतीचे भुमिपुजन आणि पोलिस विभागाला वाहनांचे वाटप कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहे.

  • 14 Mar 2024 07:28 AM (IST)

    maharashtra news | अंबरनाथ शहरात आज पाणीपुरवठा बंद

    अंबरनाथ शहरात आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र बदलापूरमधील पाईपलाईनच दुरुस्ती काम हाती घेतले आहे. यामुळे पुढील दोन दिवस पाणी पुरवठा बंद तर काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. एमआयडीसी भागातील पाणी पुरवठा सुरळीत राहणार आहे.

  • 14 Mar 2024 07:15 AM (IST)

    maharashtra news | मुलीचे अपहरण करणारा एकजण ताब्यात

    नवी मुंबई एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुनीत कॉर्नरमधील एकता नगर झोपडपट्टीतील एका तीन वर्षीय मुलीचे दोघांनी मोटार सायकल वरून अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी शोध पथक तयार केलें. आजूबाजूला असलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि काही तांत्रिक मदतीने साह्याने एका आरोपीला ताब्यात घेतले.

Published On - Mar 14,2024 7:13 AM

Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.