मुंबई | 14 जानेवारी 2024 : आज रविवार आहे. जरी सुट्टीचा दिवस असला तरी काही महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठाचा आज 30 वा नामांतर दिन आहे. दरवर्षी 14 जानेवारीला नामांतर दिन साजरा केला जातो. विद्यापीठ गेटसमोरील स्मारकाला तसेच या लढ्यातील शहीदांना वंदन करण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायी येणार आहेत. तसंच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर आहेत. हर मंदिर स्वच्छ अभियानाचा बावनकुळेंच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा विरोधात नागपूर पोलिसांनी धडक मोहीम राबवली आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
बीड | महाराष्ट्रातील मराठा एकजूट झाल्यामुळे आरक्षण लढाई 80 टक्के जिंकली आहे. मराठा समाज लढला परंतु मराठ्यांना आरक्षण दिले गेले नाही. सरकारने नेहमी फसवणूक केली, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. ते बीडमध्ये बोलत होते.
“मराठ्यांनी आरक्षण शोधले आणि लढा उभा केला. आज पर्यंत 54 लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे. मराठ्यांचे लेकरे मोठे होण्यासाठी हा लढा शेवटचा आहे. आपल्याला सरसगट मराठ्यांना आरक्षण पाहिजे. सरकारच नाही कोणीही आडवे आले तरी आता आरक्षण कोणी रोकू शकत नाही, आणि मुंबई जायचे आहे”असा ठाम निर्धार जरांगे पाटील यांनी केला.
मराठ्यांनी मराठ्यांना आरक्षण दिले आणि व्यसन सोडून दिले तर मराठा प्रगत जात होईल. 20 जानेवारीला मुबई जायची तयारी ठेवा. ते येवल्याचे उगाच बडबड करतो, भाजे खाऊन टाकलेले कागद खात आहे. परिस्थितीने मराठ्यांना घेरले होते, पण मराठ्यांनी वेढा तोडला आहे. चारही बाजूने मुंबईत घुसायचे आहे. महिलांनी अंतरवाली येथे जे मुले मुबंई जात आहेत त्यांना वाट लावायला या. गावातील सर्व माणसांनी मुबंईकडे चला. मुंबईकडे चला हे सांगण्यासाठी आलो आहे.
जळगाव | सध्या राज्यासह देशात राम मंदिराचीच चर्चा पाहायला मिळेतय. अशात सत्ताधारी-विरोधकांमध्ये राम मंदिर मुद्द्यावरुन चांगलंच राजकारण पेटलंय. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला चिमटा काढला आहे.
ठरामाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आम्हाला करायचं नाही. राम हा सर्वांचा आहे.प्रभू रामचंद्र हे सर्वांचे आहेत, आम्ही पण घरोघरी झेंडे वाटत आहोत. आम्ही पण तिघे भाऊ राम मंदिरासाठी जेल मध्ये गेलो होतो”, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता भाजप पदाधिकाऱ्यांसमोरच भाजपला चिमटा काढला.
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांचं शिवसेनेत स्वागत केलं. यानंतर शिंदे यांनी बोलताना त्यांचं अभिनंदन केलं. तसेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेताना धाडस करावं लागतं, मी डॉक्टर नसताना दीड वर्षांपूर्वी असंच ऑपरेशन केलं होतं, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच या पक्ष प्रवेशावरुन शिंदे म्हणाले की हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है.
मुंबई : कॉंग्रेस पार्टीचे सर्वात कठीण काळात मी सोबत होतो, 1968 ची कॉंग्रेस आणि 2004 ची मी कॉंग्रेसमध्ये आलो या दोन्ही कॉंग्रेसमध्ये फार फरक आहे. कॉंग्रेस आणि उद्धव ठकारे यांनी मेरीट आणि योग्यता यांना महत्व दिले असते तर मी आज येथे नसतो. एकनाथ शिंदे यांना वेगळं निर्णय घ्यावा लागला नसता.
मुंबई : मी कॉंग्रेस सोडेन असे कधीच वाटले नव्हते. माझ्या कुटुंबाचे कॉंग्रेस सोबत असलेले 55 वर्षाचे जुने नाते संपवीत आहे. माझे राजकारण मीच विकासाचे राजकारण राहिले आहे. माझी विचारधारा सामान्य लोकांची सेवा करणे हेच आहे. जमिनीवरचे नेते आहे.
मिलिंद देवरा हे शिवसेनेमध्ये आल्यानंतर शिवसेनेची ताकद वाढणारच आहे. खऱ्या अर्थाने जो काही अन्याय त्यांच्यावरती काँग्रेसमध्ये होत होता. त्याला आता वाचा फुटलेली आहे. त्यांनी स्वतः ते आता प्रसार माध्यमांसमोर येतील आणि आपली आप भीती सांगतील पण आम्ही ज्या पद्धतीने विकासाची काम करत आहोत त्या विकासाला भाळून ते सुद्धा आमच्या पक्षांमध्ये येत आहेत. याचा आम्हाला आनंद आहे, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
जळगाव : आमचे राजकीय आयुष्य पणाला लावलं होत. आयुष्याचा सट्टा लावला होता आणि जर निकाल आमच्या बाजूने लागला नसता तर काय झालं असतं? काय केलं असत आम्ही लोकांनी? पक्षातून बाहेर पडल्यावर आमच्या आईला, बायकोला आणि मुलांना सुद्धा गद्दार म्हणून लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. मी तर त्यावेळी जायला तयार नव्हतो. पण हे ambulance मधून आले आणि घेवून गेले अशी जोरदार फटकेबाजी महायुतीच्या मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.
मुंबई : कॉंग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यासह माजी नगरसेविका अनिता यादव, सुशीबेन शहा, हंसा मारू आणि माजी नगरसेविक सुनील नरसाळे, प्रमोद मांद्रेकर, गजेंद्र लष्करी, रामबच्चन मुराई, रमेश यादव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेते प्रवेश केला.
नंदुरबार : काँग्रेसचे माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावर मंत्री अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे अनेक आजी माजी आमदार, खासदार, आणि पदाधिकारी संपर्कात आहेत. राष्ट्रवादी सोबतच भाजप आणि शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर विकासाच्या विचार करून प्रवेश होणार आहेत. येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये अनेक धक्के बसताना दिसतील असे वक्तव्य मंत्री अनिल पाटील यांनी केलं.
हिंगोली : राष्ट्रवादीचे वसमत विधानसभा आमदार राजू नवघरे यांनी अजितदादा गट की शरद पवार गट याबाबत अद्याप आपली भूमिका जाहीर केली नव्हती. मात्र हिंगोली येथील महायुती मेळाव्याला ते हजर राहिले आहेत. त्यामुळे वसमत विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार हे अजित पवार गटातच असल्याचे हे स्पष्ट झाले आहे.
औरंगाबाद : मी असा पालकमंत्री आहे की, मी कार्यकत्यांना मोठं केलं. त्यामुळे कार्यकर्ते माझ्या पाठीशी आहे. उबाटा गटाला जागा नाही दाखवली तर मग काय गोष्ट राहिली. चंद्रकात खैरे आमचा विरोधक होऊ शकत नाही. खैरे यांनी २० वर्षात केलेलं काम दाखवलं तर त्याला ५१ रुपयांच बक्षीस आहे अशी टीका मंत्री संदीपान भुमरे यांनी केली.
खासदारकीच्या मोहापायी त्यांनी काँग्रेस सोडण्याचा केला दावा. मात्र त्यांना सध्याच्या ठिकाणाहूनही तिकीट मिळणार नाही असेही केले भाकीत, असं विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया दिली आहे. तिकीट मिळाल्यास काँग्रेस आणि भाजप त्यांना निवडून येऊ देणार नाही अशीही केली भविष्यवाणी केली आहे.
ज्यांनी (चंद्रकांत खैरे) वीस वर्ष खासदार पद भूषावल त्यांनी शहराची वाट लावली. ते आले तर त्यांना आता विचारलं पाहजे. त्यांनी (चंद्रकांत खैरे) काम केलं अस दाखवलं तर ते म्हणतील ते बक्षीस देईल. त्यांनी जती-जातीत भांडण लावली. 22 तारखेला दिवाळी साजरी करायचं आहे. आपल्याला तालुका निहाय मेलाव्या घेणार आहे.वरती एक झाले खालचे कार्यकर्ते एक झाले पाहिजे यासाठी काम करणार असल्याचंं मंत्री संदीपान भुमरे यांनी म्हटलं आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांची ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काही लोकं सकाळी नऊ-दहा वाजता उठणार, वाकडी मान करणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलणार, अरे तुला गल्लीत तरी कोण विचारतं का ? कुणाचे रेशन कार्ड तरी काढून दिले का?, फक्त टीव्हीवर चमकोगिरी करणार आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील गोष्टी करणार असं दादा भुसे म्हणाले.
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी थोड्याच वेळात मणिपूर येथील इंफाळ विळानतळावर दाखल होणार आहेत. येथून ते ‘भारत न्याय जोडो यात्रा’ सुरू करणार आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत ‘भारत न्याय जोडो यात्रा’ सुरू होणार आहे.
मिलिंद देवरा यांना माझ्या शुभेच्छा, भाजप आता काँग्रेसमय झालं आहे, भाजपमध्ये टॅलेंट नाहीय का ? भाजपमध्ये नेते नाहीत का ? असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
अयोध्येत येणाऱ्या निमत्रितांसाठी विशेष लाडूचा प्रसाद बनवला जात आहे. ४५ हजार किलो लाडूचा प्रसाद बनवण्याचे काम सुरु आहे. एकूण १३ लाख ५० हजार लाडू तयार होणार आहेत.
पक्षाचे विविध पदाधिकारी महायुतीच्या मेळाव्याला. उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम आमदार शेखर निकम, उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची उपस्थिती.
छत्रपती संभाजीनगरमध्ये नारायण राणे यांच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. क्रांती चौकात काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. काँग्रेसचे अनेक पदाधिकारी सहभागी आहेत.
बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांनी सत्तेच्या स्फूर्तीसाठी सर्व सोडणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी बेइमानी केली विश्वासघात केला त्यांना आमच्यावरती टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
ही अंतिम लढाई आहे. मराठ्यांचे नशीब बळकट आहे आता नोंदी सापडत आहे. ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. मुबई चला, घरी राहू नका
क्रांती चौकात काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जातंय. काँग्रेसचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
अयोध्येतील बाजारपेठ रामभक्तांसाठी सजली आहे. बाजारपेठेत नवीन मंदिराच्या प्रतिकृती विक्रीसाठी दाखल झाली आहे. नागर शैलीमध्ये बांधलेल्या मंदिराची प्रतिकृती आपल्या घरी असावी या भावनेने मंदिराला मागणी वाढली आहे. आवक कमी आहे आणि मागणी जास्त असल्याचं व्यापारी सांगतात.
पानिपतमधील राष्ट्रीय स्मारकाला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भेट दिली. सदाशिवराव भाऊ पेशवे आणि विश्वासराव यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. पानिपतमध्ये आज मराठा शौर्य दिन साजरा होतोय.
संपूर्ण अयोध्येत धुक्याची चादर पाहायला मिळतेय. उत्तर भारतातील थंडीचा कडका वाढला आहे. राम मंदिर सोहळ्याची तारीख जवळ येत असल्याने अधोध्यात उत्साहचं वातावरण आहे. आज योगी आदित्यनाथ पुन्हा आढावा घेणार आहे. व्यापाऱ्यांनी दुकानांवर चित्र रेखाटली आहेत. रस्ते चकचक धुवून स्वच्छ केले जातायेत.
लोकसभेच्या अनुषंगाने अमरावतीमध्ये आज होणाऱ्या महायुतीच्या बैठकीला बच्चू कडू जाणार नाहीत. बैठकीचे मला निमंत्रण पण मी मुद्दाम जाणार नाही, अशी भूमिका कडू यांनी जाहीर केली. सध्या आमची भूमिका ही तटस्थ आहे. आमच्या दोन नगरपंचायत आहे, तिथे निधी उपलब्ध झाला नाही. विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत काय निर्णय घेणार आहे याबाबत बैठक घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मिलिंद देवरा यांनी काँग्रसेचा राजीनामा दिल्यानंतर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे अमच्याकडे येत आहेत, त्यांचे स्वागत आहे.. आम्ही सर्वांना सोबत घेऊनच पुढे जाऊ.. असा मोठा कारवा आहे पुढे हा कारवा मोठा होत जाईल.. पुढेही अनेक नेते महायुतीकडे येतील.. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार सारख्यांचा नेतृत्व आमच्याकडे आहे.. तिघांच्या नेतृत्वात महाराष्ट्र एक नंबर वर जात आहे.. म्हणून बरीच लोक आमच्याकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे त्या म्हणाल्या.
आजपासून सुरु होणाऱ्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले आहेत. त्यामुळेच यात्रेपासून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी ED, CBI, IT यासारख्या केंद्रीय संस्थांची भिती दाखवून आमच्या काही सहकाऱ्यांना आपल्यासोबत घेत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. काँग्रेस फुटणार अशा आवया उठवणारे भाजप आणि त्यांचे फुटीर सहकारी दोनवेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतायेत. पण तो यशस्वी होणार नाही. या यात्रेची समाप्ती मुंबईतच होणार असून यात्रेच्या समाप्ती सोबतच असंवैधानिक भाजप, शिंदे, अजित पवार सरकारचाही शेवटही होणार आहे.
काँग्रेसचे निष्ठावंत मिलिंद देवरा यांनी अखेर हात सोडला. दक्षिण मुंबईतील तरुण आणि जाणता उमेदवार गेल्याने काँग्रेसला हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. मुरली देवरा यांच्यापासून काँग्रेसशी हे कुटुंब जोडल्या गेले होते. देवरा यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय दुर्दैवी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसच्या न्याय यात्रेच्या नमनालाच घडाभर तेल ओतल्या गेले. गेल्या 55 वर्षांपासून काँग्रेसचे निष्ठावंत असलेल्या देवरा कुटुंबियांची खप्पामर्जी ओढावली. दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नसल्याने मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. कोण आहेत मिलिंद देवरा?
एकनाथ शिंदे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढा आणि मग आमच्यासमोर उभे राहा, असे खुले आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिले. स्वतःचा पक्ष काढून मग उड्या मारा, असे ते म्हणाले. कुणी काकाचा पक्ष चोरतोय, तर कुणी बापाचा पक्ष चोरतोय असा टोला त्यांनी हाणला.
सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेचा आज दुसरा दिवस… सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील अक्षता सोहळ्याचा मुख्य विधी आज पार पडणार… आज हिरे हब्बू वाड्यातून सिद्धेश्वर मंदिरापर्यंत देवाची वाजत गाजत मिरवणूक निघते… शेकडो सिद्धेश्वर भक्त देवासाठी बाशिंग घेऊन हिरे अबू वाड्यामध्ये दाखल झालेत.
अहमदनगरला महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा… मेळाव्याची महायुतीकडू जोरदार तयारी, नगरच्या बंधन लॉन येथे मेळाव्याचे आयोजन… पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप खासदार सुजय विखे नगरच्या महायुतीच्या मेळाव्याच्या केंद्रस्थानी… तर या महायुतीच्या मेळाव्याला अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके येणार का याकडे सर्वांचे लक्ष
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात 1 तास पुरुषांना असणार प्रवेश बंदी… मकरसंक्रांती निमित्त सोमवारी पुरुषांसाठी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत एक तास मंदीर प्रवेश बंद असणार… स्थानिक महिला व बाहेरून येणाऱ्या महिला भाविक देवीसोबत ओवसन्यासाठी येतात म्हणून हा निर्णय मंदीर संस्थानने घेतला…
पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर सामूहिक रामरक्षा पठण आणि रामनाम जप… रामरक्षा देशासाठी एक सकाळ रामासाठी.. चला रामरक्षा म्हणू या … रामरक्षा पठणाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित… रामरक्षा पठणाला मोठ्या संख्येने पुणेकर उपस्थित
उत्तर भारतात दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम… राजधानी दिल्लीमध्ये दृश्यमानता पोहोचली शून्यावर… जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी… दाट धुक्यांमुळे रेल्वे आणि विमानाच्या उड्डानांवर मोठा परिणाम…
लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण मुंबईतील बड्या नेत्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
जळगावमध्ये आज महायुतीचा मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्यात मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील हे मेळाव्याला उपस्थित राहतील.
राज्यात थंडीची लाट कायम असताना मुंबईत मात्र सरासरी तापमाणात वाढ झाली आहे. तापमानात वाढ झाल्याने मुंबईकरांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
19 जानेवारीनंतर राज्यात थंडीची लाट येणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. 19 ते 25 जानेवारी दरम्यान थंडीची लाट असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रेल्वे रूळाच्या आणि सिग्नलच्या दुरूस्तीसाठी मुंबई लोकलच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक घेतला जात आहे.
आगामी लोकसभेच्या निवडणूकीत मनसे लोकसभेच्या 12 ते 15 जागा लढवणार असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी नाशिकमध्ये महायुतीची समन्वय बैठक होणार आहे. पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि तिन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना एकत्रित कामकाजाचे धडे दिले जाणार आहेत. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांशी समन्वय करून महायुतीचे एकत्रित कार्यक्रम आखण्याचं नियोजन आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर आहेत. हर मंदिर स्वच्छ अभियानाचा चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. यावेळी खासदार प्रकाश जावडेकरही उपस्थित राहणार आहेत. शिवाजीनगर परिसरातील रोकडोबा आणि राम मंदिरात अभियानाला सुरुवात करणार आहेत.
नागपुरात नायलॉन मांजा विरोधात पोलिसांची धडक मोहीम राबण्यात आली आहे. 46 जणांना घेतलं ताब्यात तर 9 लाखाचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. गेल्या आठवडा भरापासून पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू आहे. तरीही अवैध मांजा विक्री सुरूच आहे. आता पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. नायलॉन मांजा मिळून आल्यास आता थेट जेलची हवा खावी लागणार असल्याची पोलिसांनी तंबी दिली आहे. सामाजिक संस्था ही उतरल्या जनजागृती साठी मैदानात उतरल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठाचा आज 30 वा नामांतर दिन आहे. या निमित्त विद्यापीठ गेटसमोरील स्माकराला तसेच या लढ्यातील शहीदांना वंदन करण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायी येणार आहे. नामांतर दिनानिमित्त विद्यापीठ परिसरात मोठी तयारी करण्यात आली आहे. तब्बल 17 वर्ष संघर्ष करून मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरण करण्यात आलं होतं. दरवर्षी हा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 14 जानेवारी 1994 रोजी विद्यापीठचं नामांतर झालं होतं.