Maharashtra Marathi Breaking News Live : इथून पुढे फक्त माझंच ऐका बाकी कुणाचं ऐकायच नाही- अजित पवार

| Updated on: Dec 24, 2023 | 5:04 PM

Maharashtra Breaking News Live Updates : आज 23 डिसेंबर... महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील.... राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी.... तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील

Maharashtra Marathi Breaking News Live : इथून पुढे फक्त माझंच ऐका बाकी कुणाचं ऐकायच नाही- अजित पवार

मुंबई | 23 डिसेंबर 2023 : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम रविवारी संपणार आहे. त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये आज शेवटची सभा होणार आहे. या सभेत जरांगे पाटील आंदोलनाची कोणती पुढील दिशा ठरवणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सकाळीच पुणे दौरा सुरु केला. यावेळी महात्मा फुले वाड्यात असणाऱ्या चेंबरमुळे अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. चेंबर काढण्याच्या आयुक्तांना त्यांनी सूचना दिल्या. त्याजागी सलग फरशी बसवण्याचे आदेश दिले. भिडे वाड्याचं लवकरच राष्ट्रीय स्मारक केले जाणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक अजित पवार घेणार आहेत. राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा  ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Dec 2023 05:02 PM (IST)

    20 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण – जरांगे पाटील

    मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आता मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत. यासाठी त्यानी 20 जानेवारीची तारीख निश्चित केली आहे. बीडच्या सभेत त्यांनी ही घोषणा केली आहे.

  • 23 Dec 2023 04:41 PM (IST)

    आरक्षण द्या नाही तर सरकारला जड जाईल- जरांगे पाटील

    मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. छगन भुजबळ यांचं ऐकून आरक्षण नाकारू नका, अन्यथा सरकारला जड जाईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

  • 23 Dec 2023 04:38 PM (IST)

    तू थांब जरा, एकदा आरक्षण मिळू दे, मग दाखवतो तुला- जरांगे पाटील

    मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे. एकदा आरक्षण मिळालं की नंतर काय ते दाखवतो असं सांगितलं आहे.

  • 23 Dec 2023 04:29 PM (IST)

    मनोज जरांगे पाटलांचं छगन भुजबळांवर पुन्हा एकदा टीकास्त्र

    मनोज जरांगे पाटलांची सभा बीडमध्ये होत आहे. या सभेतही मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडलं. सभेतील गर्दी पाहून छगन भुजबळ अस्वस्थ झाले असतील, अशी टीका केली.

  • 23 Dec 2023 04:22 PM (IST)

    बिहारमधील अराहमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

    सिनेट सभेला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना बिहारमधील अराहमध्ये समोर आली आहे. विद्यार्थी गेट तोडून विद्यापीठात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते, त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. लाठीचार्जमध्ये विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

  • 23 Dec 2023 04:11 PM (IST)

    सीएम योगी बिजनौरमध्ये विकास भारत संकल्प यात्रेत सहभागी

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बिजनौरमध्ये विकास भारत संकल्प यात्रेत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री म्हणाले की, बिजनौरमध्ये मेडिकल कॉलेज होईल, असा कधी विचार केला होता का? बिजनौरमध्ये सरकारी तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये काम सुरू आहे.

  • 23 Dec 2023 03:57 PM (IST)

    शनी शिंगणापूर येथील कर्मचारी संपावर जाणार, कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

    अहमदनगर : शनी शिंगणापूर येथील कर्मचाऱ्यांना मागील फरकासह सातवा वेतन लागू करण्यात यावा. तसेच अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेनुसार हुद्दा पदनिश्चित करावी यासह अन्य मागण्यासाठी 400 कर्मचारी संपावर जाणार आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी मध्यस्थी करावी यासाठी त्यांच्या घरावर मुक्काम करणार असल्याचा पवित्रा शिंगणापूर येथील शैनेश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

  • 23 Dec 2023 03:50 PM (IST)

    मोदी सरकारच्या संकल्प रथापुढे शेतकऱ्यांनी कांदा ओतला, केला निषेध

    अहमदनगर : मोदी सरकारच्या संकल्प रथापुढे शेतकऱ्यांनी कांदा ओतून निषेध केलाय. संकल्प रथाला गावात नो एन्ट्री करण्यात आलीय. कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील शेतकऱ्यांनी संकल्प रथापुढे कांदे ओतून केला सरकारचा निषेध केला. भाजप पदाधिकारी असलेल्या शेतकऱ्याने देखील सरकारला घरचा आहेर दिला.

  • 23 Dec 2023 03:41 PM (IST)

    मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी, सर्वोच्च न्यायालयाने क्युरिटी petition स्वीकारली

    नवी दिल्ली : लातूर येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा होत असतानाच मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा संदर्भात क्युरिटी petition स्वीकारली आहे. येत्या 24 जानेवारीला या संदर्भात निकाल देण्यात येईल.

  • 23 Dec 2023 03:37 PM (IST)

    मंत्री उदय सामंत यांची मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांना हात जोडून विनंती

    पुणे : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज आणि ओबीसींच्या आरक्षणावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. यावर आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे. दोघांनाही समाजात तेढ निर्माण होणार नाही अशी वक्तव्य करू नये अशी हात जोडून विनंती करतो म्हणाले. ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं.

  • 23 Dec 2023 03:24 PM (IST)

    370 कलम रद्द करण्यासाठी घटना दुरुस्ती होते मग मराठा आरक्षणसाठी का नाही? मुस्लिम महिलेचा सवाल

    बीड : जरांगे पाटील यांच्या सभेला मुस्लिम महिलेने उपस्थिती लावली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्याचबरोबर मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे अशी माझी मागणी आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटना दुरुस्ती करावी. जर काश्मीरमध्ये 370 कलम रद्द करण्यासाठी घटना दुरुस्ती होते मग मराठा आरक्षणसाठी का नाही होऊ शकत? असा सवाल या महिलेने केला.

  • 23 Dec 2023 03:17 PM (IST)

    मोठी बातमी : तिहेरी हत्या कांड प्रकरणी आरोपींना हरियाणा मधून अटक

    ठाणे : ठाणे गुन्हे शाखेने तिहेरी हत्या कांड प्रकरणी आरोपींना हरियाणा मधून अवघ्या 48 तासाच्या आत अटक केली. आठ वर्षांपूर्वी आरोपीला सोडून भावासोबत पळून गेल्याचा राग मनात ठेऊन आरोपीने कट रचला. क्रिकेट बॅटने मारून पत्नी आणि दोन मुलाची हत्या केली होती. अमित धर्मवीर बांगडी असे आरोपीचे नाव असून सीसीटीव्ही आणि बातमीदाराच्या मदतीने पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

  • 23 Dec 2023 03:06 PM (IST)

    मराठा आरक्षणाबाबत भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे मोठे विधान

    सोलापूर : 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाबाबत निर्णय होणे शक्य नाही. कारण, अहवाल आता प्राप्त झाला आहे. आरक्षण दिल्यानंतर ते रद्द होऊ नये यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्वांनी संयम राखावे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि आरक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

  • 23 Dec 2023 02:57 PM (IST)

    भाजपचे मिशन लोकसभा, २०१९ पेक्षा ठेवले मोठे टार्गेट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश

    नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाना निर्देश दिले आहेत. २०१९ ला भाजपचे ३०३ खासदार निवडून आले होते. मात्र, २०२४ ला ३०३ पेक्षा जास्त खासदार भाजपचे निवडून यायला हवेत, असे निर्देश मोदी यांनी दिलेत. भाजपच्या राष्ट्रीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

  • 23 Dec 2023 02:07 PM (IST)

    सलग आलेल्या सुट्ट्यामुळे पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर वाहनांच्या रांगा

    सलग आलेल्या सुट्ट्यामुळे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबई एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दी झाली आहे. अनेक मुंबईकर पर्यटक घराबाहेर निघाले आहेत. त्यामुळे उर्से टोल नाक्यावर देखील वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. टोल नाक्यावर लागलेल्या रांगा कमी करण्यासाठी टोल कर्मचारी यांची मात्र दमछाक होताना दिसून येत आहे.

  • 23 Dec 2023 02:05 PM (IST)

    शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत कुस्ती स्पर्धेचे आयोजन

    शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत आज कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बारामती तालुका कुस्ती संघातर्फे स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. अजित पवार यांचे पुतण्या योगेंद्र पवार यांच्याकडून कुस्ती स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. कुस्ती होत असणाऱ्या ठिकाणी शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील पोस्टर्स लावण्यात आले आहे. पवार कुटुंबातील अनेक सदस्य आजच्या कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत.

  • 23 Dec 2023 02:03 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांच्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार

    बीड : मनोज जरांगे पाटील यांच्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. मनोज जरांगे पाटील व्यासपीठावर दाखल होताच त्यांच्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार. मनोज जरांगे यांचे बीड मध्ये जंगी स्वागत करण्यात येत आहे. बीडमध्ये आज त्यांची सभा होत आहे.

  • 23 Dec 2023 02:01 PM (IST)

    लातूर एमआयडीसी भागातल्या फर्निचरच्या शो-रूमला आग

    लातूर- एमआयडीसी भागातल्या फर्निचरच्या शो-रूमला आग लागली आहे. वेल्डिंगचे काम सुरू असताना ही लागली आग. आगीत लाखो रुपयांचे फर्निचर जळून खाक झाले आहे. गाद्या, कपाटे देखील जळून खाक झाले. अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

  • 23 Dec 2023 12:59 PM (IST)

    सुषमा अंधारे बिन पुराव्याचे आरोप करतात- देवयानी फरांदे

    ही बोलण्याची पद्धत म्हणजे लोकशाहीला पायदळी तुडवण्याची पद्धत. सुषमा अंधारे बिन पुराव्याचे आरोप करतात. चुका करून सुद्धा अशा वागतात की देशाचा कायदा त्यांना लागू नाही. हक्कभंगाचा प्रस्ताव मी आणला आहे, असे देवयानी फरांदे यांनी म्हटले आहे.

  • 23 Dec 2023 12:30 PM (IST)

    जरांगेंनाही माहीत आहे की आरक्षण शिंदेच देणार- संजय शिरसाट

    जरांगेंनाही माहीत आहे की आरक्षण शिंदेच देणार, अधिवेशनात स्पष्टपणे भूमिका मांडली आहे, ओबीसींबद्दलही मांडलीये, सर्व समाजाला याची कल्पना आहे., सभा प्रचंड होईल पण त्यांच्या सभेला कधीही परवानगी नाकारली नाही, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

  • 23 Dec 2023 12:18 PM (IST)

    सुषमा अंधारे यांचा निलम गोऱ्हेंवर निशाणा

    मी माफी मागणार नाही मला तुरुंगवास भोगाव लागला तरी चालेल. निलम गोऱ्हेंनी हक्कभंग हा बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान होताना का आणला नाही. निलम गोऱ्हे यांना सभापतीपद हे शिवसेनेनं दिलं आहे.

  • 23 Dec 2023 12:09 PM (IST)

    बीडमधील सभेवेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर 200 जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार

    मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी 200 जेसीबी सभास्थळी दाखल झालेत. 200 जेसीबीच्या माध्यमातून जरांगे पाटलांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. जरांगे यांची ईशारा सभा आज बीड येथे पार पडतेय

  • 23 Dec 2023 11:52 AM (IST)

    शरद पवार यांची 30 डिसेंबरला पुण्यात जाहीर सभा

    शरद पवार यांची 30 डिसेंबरला पुण्यात जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली आहे.  डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ होणार ही जाहीर सभा होईल. लवकरच पवारांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरु होणार असून ते पुण्यातून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करणार आहेत.

  • 23 Dec 2023 11:44 AM (IST)

    एकाकी पडल्यामुळे जितेंद्र आव्हाड भ्रमिष्टावस्थेत – हसन मुश्रीफ

    जितेंद्र आव्हाड यांना पक्षात कोणीही विचारत नाही. एकाकी पडल्यामुळे ते भ्रमिष्ट अवस्थेत आहे,अशा शब्दात हसन मुश्रीफ यांनी हल्लाबोल केला आहे.

  • 23 Dec 2023 11:36 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये भव्य रॅली, थोड्याच वेळात होणार आगमन

    बीड – सभेपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची भव्य रॅली होणार असून थोड्याच वेळात ते बीडमध्ये पोहोचतील. 200 जेसीबीमधून जरांगे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

  • 23 Dec 2023 11:25 AM (IST)

    धमकी प्रकरणानंतर खा. हेमंत पाटील यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला

    नांदेड – खासदार हेमंत पाटील यांच्या घराबाहेरचा पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. परदेशातून धमकीचा फोन आल्यानंतर त्यांच्या घराबाहेर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच हेमंत पाटील यांच्या सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे.

  • 23 Dec 2023 11:11 AM (IST)

    शरद पवारांचा आणखी एक नातू राजकारणात करणार पदार्पण ?

    शरद पवारांचा आणखी एक नातू राजकारणात पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार हे राजकारण एन्ट्री करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांना लवकरच मोठी जबाबदारी मिळू शकते.

  • 23 Dec 2023 11:06 AM (IST)

    शब्द देताना काळजी घेतली पाहिजे – बच्चू कडू यांचा सरकारला सल्ला

    शब्द देताना काळजी घेतली पाहिजे. पूर्ण होतील असेच शब्द द्यावेत, असा सल्ला बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ते बोलत होते.

  • 23 Dec 2023 11:04 AM (IST)

    बीड: व्यापार बंद ठेवून जरांगे यांना पाठिंबा

    मनोज जरांगे पाटील यांची आज बीडमध्ये सभा आहे. या सभेनिमित्त बीडच्या व्यापाऱ्यांनी व्यापार बंद ठेवून पाटील यांना पाठिंबा दिला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण शहरात पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

  • 23 Dec 2023 10:57 AM (IST)

    Live Update : सुषमा अंधारे यांचं निलम गोऱ्हे यांना संस्कृतमध्ये पत्र

    सुषमा अंधारे यांचं निलम गोऱ्हे यांना संस्कृतमध्ये पत्र… हक्कभंगाची कारवाईच्या निर्देशानंतर सुषमा अंधारे यांचा खुलासा… नकळतपणे आपण नाव घेतल्याची दिली कबूली.. मुख्यमंत्री जर द्रौपदी मुर्मू यांचा पंतप्रधान असा उल्लेख करू शकतात तर मी उल्लेख केला तर काय चुकलं… असा प्रश्न विचारला आहे.

  • 23 Dec 2023 10:43 AM (IST)

    Live Update : बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा – संजय राऊत

    बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा. EVM वापरा मात्र, VVPT चा 100 टक्के वापर करा. संजय राऊत यांचं भाजपला आव्हान

  • 23 Dec 2023 10:23 AM (IST)

    Live Update : भुजबळ खालच्या विचारांच्या दर्जाचे – मनोज जरांगे

    मराठ्यांना आता कळलं आहे. सरकारला आता भुजबळांचं ऐकायचं आहे. मराठ्यांविषयी एवढं विष पेरलं आहे.. हे मराठ्यांना माहिती नव्हतं. पण आता माहिती झालं आहे… आता नादी नको लागू… शाहाणा हो… असं देखील जरांगे पाटील म्हणाले.

  • 23 Dec 2023 10:19 AM (IST)

    Live Update : सरकारच्या हातात अजून 2 दिवस त्यांनी निर्णय घ्यावा – जरांगे पाटील

    ’24 डिसेंबर शेवटची तारीख आहे. सरकारच्या हातात आणखी 2 दिवस आहेत. त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा. आता सरकारला वेळ देणार नाही. मराठ्यांनी किती दिवस वाट पाहायची. सरकारने आम्हाला वेड्यात काढलं आहे. ‘ असं देखील जरांगे पाटील म्हणाले..

  • 23 Dec 2023 10:16 AM (IST)

    Live Update : सरकार अजून किती दिवस चर्चा करणार?- जरांगे पाटील

    सभेत सगळी माहिती देणार. सभेत सगळे विषय मांडणार. सरकार अजून किती दिवस चर्चा करणार? सरकारने फोन केला आहे. बोलणं सुरु आहे. असं वक्तव्य नुकताच जरांगे पाटील यांनी केलं आहे.

  • 23 Dec 2023 10:11 AM (IST)

    Live Update : बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची ईशारा सभा पार पडतेय

    बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची ईशारा सभा पार पडतेय… या ईशारा सभेपूर्वी मुस्लिम समाज मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या रॅली दरम्यान बीड मधील बार्शी नाक्यावर हा जाहीर पाठिंबा देण्यात येणार आहे

  • 23 Dec 2023 09:58 AM (IST)

    संस्कृत भाषेत सुषमा अंधारे यांनी दिले उत्तर

    ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विधान परिषद सभापतींना संस्कृत भाषेत उत्तर पाठवले आहे. सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंगाची कारवाई केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी सभापतींना हे लेखी उत्तर दिले आहे. प्रिय लोकशाही तुझ्याबद्दल कायमचं मनात आदर आहे आणि तुझं अस्तित्व टिकाऊ म्हणूनच ही अविरत लढाई सुरु असल्याचा उल्लेख करत सुषमा अंधारे यांनी हे उत्तर दिले.

  • 23 Dec 2023 09:50 AM (IST)

    मनोज जरांगे यांच्या सभेसाठी मोठी तयारी

    मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज बीडमध्ये इशारा सभा होत आहे. 100 एकर परिसरात ही सभा पार पडणार असून सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. याठिकाणी किल्ल्याची प्रतिकृती असलेले भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे.या सभेला येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी 3 टन खिचडी, 4 लाख पाणी बॉटल आणण्यात आलेत. 24 डिसेंबर रोजी आरक्षणाचे अल्टिमेटम संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज सरकारला काय इशारा देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

  • 23 Dec 2023 09:45 AM (IST)

    अमरावतीत आरोग्य विभाग सज्ज

    कोरोनाचा नवा व्हेरिएंट देशात वाढल्याने अमरावतीत आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय इर्विन मध्ये 15 खटांचा सुसज्ज राखीव वार्ड तयार करण्यात आला आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट पार्श्वभूमीवर टेस्टिंगही वाढवण्यात आल्या आहेत. ओमायक्रोनच्या जेएन-1 सब या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रना अलर्ट मोडवर आहे.

  • 23 Dec 2023 09:40 AM (IST)

    बच्चू कडू, मनोज जरांगे यांच्या भेटीला

    प्रहारचे नेते बच्चू कडू हे बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. या भेटीसाठी आमदार बच्चू कडू हे बीडमध्ये दाखल झाले आहेत. आईच्या जातीवरुन प्रमाणपत्र देण्यावरुन वाद समोर आला आहे. त्यावर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. जरांगे यांच्या भूमिकेमुळे इतर समाजाचं भलं होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

  • 23 Dec 2023 09:35 AM (IST)

    पोलिसावर जीवघेणा हल्ला

    पुण्यात निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. कोंढवा येथे राहणारे वजीर हुसेन शेख यांना जबरी मारहाण करण्यात आली. वानवडीतील संविधान चौकात ही घटना घडली. रात्री 8.30 च्या सुमारास अज्ञातांनी अमानुष मारहाण केली. त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

  • 23 Dec 2023 09:30 AM (IST)

    नो लीकर झोनमध्ये मद्य विक्री

    नवी मुबंईतील खारघर नो लीकर झोन आहे. तरीही या नो लीकर झोनमध्ये लपून छपून दारू विकली जात आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत आहे.खारघर पोलीस कारवाई करणार का असा प्रश्न सध्या खारघरमध्ये राहणारे नागरिक उपस्थित करत आहेत.

  • 23 Dec 2023 09:25 AM (IST)

    ठाकरे गटाचे नाशिकमध्ये शक्तीप्रदर्शन

    उद्धव ठाकरे गटाचे नाशिकमध्ये 23 जानेवारी रोजी महाशिबीर होणार आहे. नाशिकमध्ये ठाकरे गट शक्तीप्रदर्शन करणार आहे. त्यासाठी नेत्यांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तयारी सुरु केली आहे. आगामी निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाने मोठी तयारी सुरु केली आहे.

  • 23 Dec 2023 09:20 AM (IST)

    प्रहार संघटना आक्रमक

    नाफेडच्या कांदा खरेदी प्रश्नी प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. पिंपळगाव बसवंत येथील नाफेडच्या कार्यालयावर प्रहार संघटनेने धडक मोर्चा दिला. नाफेडच्या व्यवस्थापक निखिल पाडदे यांना घेराव घालत धरले धारेवर धरले. केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी 38 रुपये किलो या भावाने खरेदीचे आश्वासन दिले होते. पण निम्म्याने 18 ते 19 रुपये किलो बाजार भावाने कांदा खरेदी केल्याने प्रहारने हे आंदोलन केले.

  • 23 Dec 2023 09:15 AM (IST)

    वादावर पडला पडदा

    गडचिरोली जिल्ह्यातील नवरगाव येथील महापुरुषाचा फलक काढल्यामुळे एका समाजाने गाव सोडण्याचा निर्णय घेतला होता. प्रशासनाने मध्यस्तरी करून त्यांना गावात परत आणले. चामोशी तालुक्यातील नवरगाव या ठिकाणी महापुरुषाचा फलक लावण्यात आला होता. ग्रामपंचायत ठराव ना घेतल्यामुळे व अतिक्रमण जमिनीवर नाम फलक ठेवल्यामुळे हा फलक काढण्यात आल्याची माहिती प्रशासन दिली.जिल्हाधिकारी स्वतः या नागरिकांसोबत मध्यस्थी करून परत आणण्याचे प्रयत्न केले.

  • 23 Dec 2023 09:05 AM (IST)

    वंदे भारत ‘मुळे लोकलच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेवर सध्या सीएसएमटी-शिर्डी, सीएसएमटी- सोलापूर व सीएसएमटी – मडगाव अशा तीन वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. तर, नव्या वर्षात मुंबई- जालना ‘वंदे भारत’ त’ सुरू होत आहे. या गाडीसाठी रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. त्यासाठी १३ रेल्वेगाड्या आणि ७ लोकलच्या वेळा बदलण्याचे नियोजन आहे. परिणामी मुंबईकरांचा प्रवास आणखी विलंबाने होण्याची चिन्हे आहेत.

  • 23 Dec 2023 09:01 AM (IST)

    लग्नसराईत सोने-चांदीची भरारी

    या वर्षाच्या शेवटच्या सत्रात सोने-चांदी दिलासा देण्याची शक्यता फारशी दिसत नाही. सोने-चांदी पुन्हा महाग झाले आहे. ऐन लग्नसराईत सोने-चांदीने उचल खाल्ली आहे. ग्राहकांना सराफा बाजारात जाताना जादा रक्कम सोबत ठेवावी लागेल. सोने-चांदी पुन्हा उच्चांकाकडे सरकले आहे. काय आहेत भाव?

  • 23 Dec 2023 08:51 AM (IST)

    Maharashtra News : सरकारला कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या गोष्टीच कराव्या लागतात- अजित पवार

    सरकारला कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या गोष्टीच कराव्या लागतात अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे असंही ते म्हणाले. तसेच टिकणारं मराठा आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असंही अजित पवार म्हणाले.

  • 23 Dec 2023 08:45 AM (IST)

    Maharashtra News : बीडमधील शाळा आज बंद ठेवण्याचे आदेश

    बीडमधील शाळा आज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. मनोज जरांगे यांची आज इशारा सभा बीड मध्ये होणार आहे. लाखोंच्या संख्येने लोकं या सभेत सामिल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर बीड येथील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर शाळा बंदचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबीत करा अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

  • 23 Dec 2023 08:41 AM (IST)

    Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या सभेसाठी बीडमध्ये बॅनरबाजी

    बीडमध्ये आज मनोज जरांगे यांची इशारा सभा होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. बीडमध्ये सर्वत्र बॅनर लावण्यात आले आहे. सभेत सामिल होणाऱ्या मराठा बांधवांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. ही सभा शांततेत पार पडणार असल्याचं पोलिस अधिक्षकांनी सांगितलं

  • 23 Dec 2023 08:33 AM (IST)

    Corona Update : कोरोना रूग्णांमध्ये चौपट वाढ

    राज्यात गेल्या महिना भरात कोरोना रूग्णांमध्ये चौपट वाढ झाली आहे. नव्या 102 रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या 53 इतकी आहे.

  • 23 Dec 2023 08:30 AM (IST)

    Maharashtra News : शरद पवार आणि राहूल गांधी यांच्यात दिल्लीत चर्चा

    आगामी लोकसभा निवडणूकीसाठी शरद पवार आणि राहूल गांधी यांच्यात जागा वाटपाबद्दल चर्चा होत आहे. जागावाटपाबद्दल अंतिम निर्णय दिल्लीत लवकरच होणार आहे. शरद पवारांसोबतच उद्धव ठाकरे देखील अंतिम बैठकीला हजर राहाणार आहे.

  • 23 Dec 2023 08:21 AM (IST)

    Maharashtra News : अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार असल्याचं बावनकुळे यांनीचं सांगितलं- चिखलीकर

    अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार असल्याचं बावनकुळे यांनीचं सांगितलं असा दावा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे. भाजपचा दुपट्टा घालण्यास कुणी तयार असेल तर त्याचे स्वागतचं आहे असं असं बावनकुळे म्हणाले होते. त्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांनी हा दावा केला आहे.

  • 23 Dec 2023 08:17 AM (IST)

    Maharashtra News : नांदेडमध्ये 7 जानेवारीला ओबीसी मेळावा

    Maharashtra News : 7 जानेवारीला नांदेडमध्ये ओबीसी मेळावा होणार आहे. हा मेळावा छगण भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल. ओबीसी संघटनांनी यासाठी आढावा बैठक घेतली आहे.

  • 23 Dec 2023 08:10 AM (IST)

    Maharashtra News : राज्यात हुडहुडी वाढणार

    राज्यात थंडीती तिव्रता वाढणार. येत्या 48 तासात गारठा वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार झाल्यानं थंडी वाढणार असल्याचे सांगितल्या जात आहे.

  • 23 Dec 2023 07:59 AM (IST)

    Marathi news | एसटीत मशीनवर असलेला क्यूआर कोड

    राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सर्व बसमध्ये आता प्रवाशांना एसटीचे तिकीट ऑनलाइन देता येणार आहे. त्यामुळे सुट्या पैशांची कटकट सुटणार आहे. वाहकाकडील मशीनवर असलेला क्यूआर कोड स्कॅन करायचा आणि आपले तिकीट घ्यायचे आहे. प्रवासी आणि एसटीला याचा फायदा होणार आहे. सुट्या पैशांची कटकट सुटणार आहे.

  • 23 Dec 2023 07:47 AM (IST)

    Marathi news | अनेक नागरिकांची फसवणूक करणाऱ्यास अटक

    पुण्याच्या शिरूर तालुक्यातील कारेगाव परिसरातील शंभर पेक्षा जास्त नागरिकांची फसवणूक करुन पलायन केलेल्या सोनारास अटक करण्यात आले. त्याच्याकडून 55 लाख रुपयांचे 91 तोळे सोन्याचे दागीने जप्त करण्यात आले आहे.

  • 23 Dec 2023 07:35 AM (IST)

    Marathi news | कोकणात व्हेल माशाची ऍकोस्टिक स्टडी होणार

    रत्नागिरी कोकणातल्या समुद्रात व्हेल माशाची ऍकोस्टिक स्टडी होणार आहे. वाईल्ड लाईफ इन्स्ट्युट्युट ऑफ इंडियाऍकोस्टिक स्टडी करणार आहे. जानेवारी – फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान अभ्यासाला सुरूवात होणार आहे. व्हेल माशाचा वावर, त्याचा आवाजासह विविध गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे.

  • 23 Dec 2023 07:22 AM (IST)

    Marathi news | अजित पवारांनी घेतली पालिका आयुक्तांची शाळा

    पुणे येथील महात्मा फुले वाड्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सकाळी पाहणी केली. यावेळी अजित पवारांनी चेंबरमुळे नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना फटकारले. चेंबर काढण्याचे आदेश आयुक्तांना दिले.

Published On - Dec 23,2023 7:19 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.