Maharashtra Marathi Breaking News Live : जरांगे पाटील मुंबईत येणार, अजित पवार म्हणाले यायचं असेल तर…

| Updated on: Dec 25, 2023 | 7:13 AM

Maharashtra Breaking News Live Updates : आज 24 डिसेंबर... महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील.... राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी.... तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील

Maharashtra  Marathi Breaking News Live : जरांगे पाटील मुंबईत येणार, अजित पवार म्हणाले यायचं असेल तर...

मुंबई | 24 डिसेंबर 2023 : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभर महानाट्य दाखवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या अंतर्गत ३६ जिल्ह्यांमध्ये महानाट्याचे प्रयोग करण्यासाठी ४० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आमदार सुनील केदार यांचा वैद्यकीय मुक्कम वाढणार आहे. त्यांच्या ईसीजीमध्ये बदल दिसून आल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदीर आता 22 तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. नाताळ व नववर्ष सुट्टी निमित्त गर्दीच्या अनुषंगाने मंदिर संस्थानचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील २० जानेवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहे. राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा  ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Dec 2023 05:00 PM (IST)

    जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बोरघाटाजवळ मोठी वाहतूक कोंडी

    जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बोरघाटातील अंडा पॉईंट रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. विकेंड आणि क्रिसमस मूळ मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. पुणे-मुंबई दुर्गती मार्ग आणि जुन्या महामार्गावरून वाहतूक पुण्याच्या दिशेने सोडण्यात आली असली तरी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत आहे.

  • 24 Dec 2023 04:50 PM (IST)

    भाजपमध्ये वैयक्तिक इच्छा आणि मत याला महत्त्व नाही- मुरलीधर मोहोळ

    भाजपमध्ये वैयक्तिक इच्छा आणि मत याला महत्त्व नाही. संघटनेच्या स्तरावर काय निर्णय होतो याला महत्त्व आहे. त्यामुळे कोण इच्छुक आहे आणि कोणी नाही याला अर्थ नाही, असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ यांच्या नावाच्या चर्चेवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

  • 24 Dec 2023 04:40 PM (IST)

    चुनाभट्टीजवळील आझाद गल्ली मध्ये गोळीबार, 10 पेक्षा जास्त राऊंड

    चुनाभट्टी येथील आझाद गल्ली मध्ये साडे तीनच्या सुमारास गोळीबार झाला आहे. यात 10 पेक्षा जास्त राऊंड झाल्याची माहिती समजत आहे. यात तीन ते चार जणांना गोळी लागली असून त्यांना जवळील सायन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे.

  • 24 Dec 2023 04:30 PM (IST)

    सांदन व्हॅली पाहण्यासाठी मुलीचा पाय घसरून मृत्यू

    व्हॅली पाहण्यासाठी आलेल्या पर्यटक मुलीचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला आहे. आज सकाळी 11 चा सुमारास घडली दुर्दैवी घटना घडली. ऐश्वर्या खानविलकर या 24 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. मुंबई येथील तरुणींचा समूह पर्यटनासाठी गेला होता.

  • 24 Dec 2023 04:20 PM (IST)

    अजित पवारांनी पंतप्रधान पदावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची उडवली खिल्ली

    मी तुम्हाला शब्द देतो मी जे काही करेन जो काही निर्णय घेईल तो तुमच्या हिताचा आहे. मी उपमुख्यमंत्री झाल्यापासून अनेक मुख्यमंत्र्यांना भेटलो. आज पंतप्रधान मोदीं एवढा मोठा नेता देशात नाही. आज मोदी जागतिक नेते आहेत, तुम्ही खर्गेंना आणि मोदींना एकत्रित उभ करा आणि मला सांगा पंतप्रधान म्हणून तुम्ही कोणाला मतदान देणार, असं म्हणत अजित पवार यांनी पंतप्रधान पदावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची खिल्ली उडवली आहे.

  • 24 Dec 2023 04:09 PM (IST)

    इथून पुढे फक्त माझच ऐका बाकी कुणाचं ऐकायच नाही- अजित पवार

    आता इथून पुढे फक्त माझच ऐका बाकी कुणाचं ऐकायच नाही. बाकीच्यांचं बरेच दिवस झालं तुम्ही ऐकले. आपण बऱ्याच जणांनी त्यांचं ऐकलं आता माझं ऐकलं. आम्ही वरिष्ठांना अनेकदा सांगितलं की आजपर्यंत आम्ही तुम्ही म्हणाल तसं वागलो तुम्ही सांगाल ती कामे केली असं म्हणत अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

  • 24 Dec 2023 03:53 PM (IST)

    जरांगे पाटील मुंबईत येणार, अजित पवार म्हणाले यायचं असेल तर…

    बारामती : मराठा समाजाला वाटतं आम्हाला आरक्षण मिळावं. धनगर समाजाला वाटतं आरक्षण मिळावं. ओबीसी समाजाला वाटतं की आरक्षण द्या. पण, आमच्या आरक्षणाला धक्का लागू देऊ नका. प्रत्येकाची मत, प्रत्येकाची विचार आहेत. प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. आता काहींनी वेगळी प्रकारची भूमिका मांडली आहे. ते म्हणतात की आम्ही मुंबईला जाणार. आम्ही थांबायला तयार नाही. यायचं असेल तर या. आपलं सरकार सगळ्या बाबतीत प्रयत्न करत आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

  • 24 Dec 2023 03:46 PM (IST)

    मराठा आरक्षणासाठी वेळ पडली तर एक दिवसाचे अधिवेशन घेवू – गुलाबराव पाटील

    जळगाव : मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असलेले आमचे पहिलं सरकार आहे. मराठा आरक्षणासाठी वेळ पडली तर आम्ही पुन्हा एक दिवसाचे अधिवेशन घेऊ. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे म्हणूनच आतापर्यंत कुणबी नोंदी शोधण्याचा काम असेल, शिंदे समिती नियुक्त करण्याचे काम असेल या सर्व गोष्टी या सरकारच्या माध्यमातून पार पडल्या आहेत असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

  • 24 Dec 2023 03:25 PM (IST)

    आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा मोठा निर्णय, 31 डिसेंबरपर्यंत मंदिर 22 तास खुले राहणार

    धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिर देवस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. 24 ते 27 डिसेंबर या 4 दिवसाच्या काळात व्हीआयपी दर्शन पास बंद करण्याचा निर्णय मंदिर देवस्थानने घेतला आहे. नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टया असल्याने गर्दी होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच, 31 डिसेंबरपर्यंत तुळजाभवानी मातेचे मंदीर रात्री 1 ते 11 असे 22 तास खुले राहणार

  • 24 Dec 2023 03:17 PM (IST)

    बारामतीच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न असेल – अजित पवार

    बारामती : ग्रामपंचायत निवडणुका झाल्या त्याचा रिझल्ट पाहिला. भाजप पहिला आणि दुसऱ्या क्रमांकावर आपला राष्ट्रवादी पक्ष आला. तिसऱ्या नंबरवर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आली. बाकीचे पक्ष मागे राहिले. बारामतीच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न असेल.

  • 24 Dec 2023 03:15 PM (IST)

    महिला धोरणात नवीन बदल काय? अजित पवार म्हणाले

    बारामती : राज्यात महिला धोरण आणले. फार बारकाईने हे धोरण आणले. आधी मुलाचे नाव वडिलाचे नाव आणि आडनाव असे येत होते आता नवीन बदल केला. आता मुलाचे नाव मग आईचे नाव, त्यानंतर वडिलाचे नाव आणि नंतर आडनाव असा बदल केला.

  • 24 Dec 2023 03:10 PM (IST)

    पीएचडीच्या फेलोशिप परीक्षेमध्ये गोंधळ, परीक्षा रद्द करा, संभाजी ब्रिगेडची मागणी

    पीएचडी मुलांच्या फेलोशिप संदर्भात राज्य सरकारच्यावतीने आज परीक्षा घेण्यात आली. सारथी, महाजोती आणि बार्टीच्या प्रत्येकी 200 मुलांच्या जागेसाठी ही परीक्षा घेण्यात आली. मात्र, 2019 मध्ये जी परीक्षा घेण्यात आली त्यावेळी जी प्रश्नपत्रिका होती तीच प्रश्नपत्रिका 24 डिसेंबर 2023 रोजी वापरण्यात आली. यावर आक्षेप घेत ही परीक्षा रद्द कारवाई अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

  • 24 Dec 2023 03:07 PM (IST)

    जेजुरीच्या खंडोबाच्या गडावर 1 लाख भाविक दाखल

    पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीय. नाताळची सुट्टी त्याचबरोबर शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टी यामुळे जेजुरीच्या गडावर मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत. सकाळपासून एक लाखाहून अधिक भाविकांनी जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेतल्याची माहिती देवस्थान संस्थानने दिली.

  • 24 Dec 2023 03:00 PM (IST)

    पुणे बंगलोर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

    सातारा : नाताळच्या सलग सुट्ट्यांमुळे पुणे बंगलोर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, पणजी, गोवा, कोल्हापूर याठिकाणी मुंबईसह मोठ्या उपनगरातील अनेक जण सुट्ट्यामध्ये पर्यटन करण्यासाठी खाजगी वाहनातून प्रवास करत आहेत. त्यामुळे गेल्या दोन तीन दिवसापासून पुणे बंगलोर महामार्गावर गर्दी वाढलेली पाहायला मिळत आहे.

  • 24 Dec 2023 01:58 PM (IST)

    शनिशिंगणापूर येथे शनी देवस्थानचे कर्मचारी संपावर ठाम

    चौथी बैठक निष्पक ठरल्याने उद्या 25 डिसेंबर पासून विविध मागण्यांसाठी देवस्थानाचे कर्मचारी संपावर जाणार. त्यामुळे मंदिर व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे.

  • 24 Dec 2023 01:46 PM (IST)

    महाज्योतीच्या पीएच डी फेलोशिप परीक्षेत मोठा गोंधळ

    बार्टी आणि महाज्योतीच्या पीएच डी फेलोशिप मिळण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मोठा गोंधळ झालाय. २०१९ सालच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेटच्या परीक्षेत आलेलं प्रश्न आजच्या प्रश्नपत्रिकेत.

  • 24 Dec 2023 01:34 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील रूग्णालयात दाखल

    मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर मधील गॅलेक्सि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे. आता त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. जरांगे पाटील यांना खोकला, थकवा आणि कंबर दुखीचा त्रास होत आहे.

  • 24 Dec 2023 01:11 PM (IST)

    सुनील केदार यांची आमदारकी रद्द

    आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आलीये. हा अत्यंत मोठा झटका म्हणावा लागणार आहे.

  • 24 Dec 2023 01:09 PM (IST)

    द्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी फिरवली पाठ

    गारगोटी उपजिल्हा रुग्णालय लोकार्पण सोहळ्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची पाठ. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार होता लोकार्पण सोहळा.

  • 24 Dec 2023 01:03 PM (IST)

    नागपूरात काँग्रेसची महत्वाची बैठक

    नागपुरात होणाऱ्या 28 तारखेच्या काँग्रेस रैलीच्या नियोजनासाठी नागपूर जिल्हा काँग्रेसची बैठक सुरू. आमदार आणि शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेसची बैठक. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी यांच्या सह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

  • 24 Dec 2023 11:55 AM (IST)

    Manoj Jarange : माझ्यात अल्कोहोल असेल तर जिवंत समाधी घेईल- जरांगे पाटील

    मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. माझ्यात अल्कोहोल असेल तर जिवंत समाधी घेईल. भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे यांनी आव्हान दिलं आहे. जास्त घेतल्यामुळे जरांगे दुहेरी भुमिका घेत आहेत असं छगण भुजबळ म्हणाले होते.

  • 24 Dec 2023 11:51 AM (IST)

    Sanjay Raut : मनोज जरांगेंवर मुंबईत येण्याची वेळ सरकारणं आणू नये- संजय राऊत

    राज्याच्या राजधानीत उपोषण केलं तर राज्याला ते जड जाईल. मनोज जरांगेंवर मुंबईत येण्याची वेळ सरकारणं आणू नये असं संजय राऊत म्हणाले.

  • 24 Dec 2023 11:46 AM (IST)

    Manoj Jarange : मराठा समाज कोणाचाही सुपडा साफ करू शकतो- जरांगे पाटील

    आगामी निवडणूकांवरून मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे. मराठा समाज कोणाचाही सुपडा साफ करू शकतो असं जरांगे म्हणाले. 20 तारखेला 10 लाख गाड्या मुंबईच्या दिशेनं निघणार असंही ते म्हणाले.

  • 24 Dec 2023 11:39 AM (IST)

    Maratha Reservation : इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू- मुख्यमंत्री शिंदे

    मराठा आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मराठा समाज मागास सिद्ध करण्याचं काम मागासवर्ग आयोग करतोय असंही ते म्हणाले.

  • 24 Dec 2023 11:34 AM (IST)

    Sanjay Raut : मकाऊच्या व्हिडीओशी बडगुजरांचा संबंध नाही- संजय राऊत

    मकाऊच्या व्हिडीओशी बडगुजरांचा संबंध नाही असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे. मकाऊचा व्हिडीओ मला बडगुजरांनी दिला नाही असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. हा व्हिडीओ आमच्यापर्यंत कसा पोहोचला ते भाजप आणि संघाच्या लोकांना माहिती आहे असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

  • 24 Dec 2023 11:26 AM (IST)

    Maharashtra News : नाताळ सुट्ट्यांनिमित्त पंढरपूरात भाविकांची गर्दी

    नाताळ आणि नविन वर्षानिमित्त शाळांना सुट्ट्या असल्यानं अनेकांनी देवदर्शनासाठी गर्दी केली आहे. पंढरपूरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. परिसरातील धर्मशाळा आणि लॉज हाऊसफुल झाले आहे.

  • 24 Dec 2023 11:21 AM (IST)

    Breaking News : जम्मू-काश्मिरमध्ये निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्त्या

    जम्मू-काश्मिरमध्ये निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. जम्मू काश्मिरच्या बारामुल्लामध्ये ही घटना घडली आहे.

  • 24 Dec 2023 10:58 AM (IST)

    चोरट्यांचा धुमाकूळ

    सांगलीमधील मिरज शहरातील सराफ कट्टा रस्त्यावरील आर के ज्वेलर्स फोडून चोरट्यांनी चार तोळे सोने आणि सात किलो चांदी असा साडे पाच लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. मध्यरात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी राहुल कदम यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • 24 Dec 2023 10:50 AM (IST)

    मॅरेथॉनमध्ये दिव्यांगाचा उत्स्फुर्त सहभाग

    सांगली शहरामध्ये राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा झाली. राधेय सेवा फाऊंडेशनकडून या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 45 दिव्यांग बांधवानी सहभागी होत 2 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली. यामध्ये व्हील चेअर वरील ,मूकबधिर, कर्णबधीर, मतिमंद, अस्थिव्यंग दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. सांगली शहरातील नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावरून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. या स्पर्धेसाठी राज्यातील विविध भागातून तसेच परराज्यातून तीन हजारहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.

  • 24 Dec 2023 10:45 AM (IST)

    पिण्याची पाईपलाईन फुटली

    कांदिवली लिंक रोडवर पिण्याच्या पाईपलाईन फुटली आहे.सध्या मुंबईत पाणीकपात आहे, लोक पिण्याच्या पाण्याची चिंता करत आहेत. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून पाणी गळतीची समस्याही वाढली आहे. कांदिवली पश्चिम लिंक रोडवर रस्त्याचे काम सुरू झाले असून या कामामुळे पिण्याच्या पाईपलाईन फुटल्या आहेत,जिथून शेकडो लिटर पाणी वाहून जात आहे, मात्र बीएमसी लक्ष देत नसल्याचे चित्र आहे.

  • 24 Dec 2023 10:40 AM (IST)

    निवडणुकीचं रणशिंग नाशिकमधून फुंकणार

    २३ जानेवारी २०२४ रोजी नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. निवडणुकीचं रणशिंग नाशिकमधून फुंकणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. सत्य-असत्याची ही लढाई पंचवटीतून सुरु होणार असल्याचे ते म्हणाले. मकाऊचा व्हिडिओ सुधाकर बडगुजर यांनी दिला नाही. त्यांचा या व्हिडिओशी संबंध नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. गृहमंत्र्यांच्या स्वाक्षरीशिवाय बॉम्बस्फोटातील आरोपीला कोणी सोडत का, असा प्रतिसवाल करत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

  • 24 Dec 2023 10:35 AM (IST)

    आयकर विभागाचा नवीन पायंडा

    आयकर विभागाने यावेळी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी, तीन महिने अगोदरच आयटीआर अर्ज दिले आहेत. त्यामुळे करदात्यांना आता रिटर्न भरण्यासाठी 7 महिन्यांचा वेळ मिळणार आहे. हा नवीन पायंडा पडला आहे. त्याचा करदात्यांना मोठा फायदा होईल. या आयटीआर फॉर्ममध्ये करदात्यांना रोखीत घेतलेली रक्कम आणि बँकिंगसंबंधीची माहिती द्यावी लागणार आहे. नवीन आयकर रिटर्न फॉर्म त्या करदात्यांसाठी आहे, ज्यांचे उत्पन्न 50 लाख रुपयांच्या आत आहे. या फॉर्मध्ये योग्य आणि संबंधित माहिती भरणे आवश्यक आहे.

  • 24 Dec 2023 10:30 AM (IST)

    टाटा समूहाच्या शेअरचा बंपर रिटर्न

    ट्रेंट लिमिटेडचा शेअर 1 जानेवारी 1999 रोजी 9.57 रुपयांवर शेअर बाजारात व्यापार करत होता. तेव्हापासून या शेअरची घौडदौड सुरुच आहे. टाटा समूहातील या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आतापर्यंत गुंतवणूकदारांना 30000 टक्क्यांचा बंपर रिटर्न दिला आहे.

  • 24 Dec 2023 10:25 AM (IST)

    सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

    सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाविषयीची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेतल्याने आणि त्यावर 24 तारखेला सुनावणी असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले. यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने याविषयी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करण्यासाठी यापूर्वीच्या त्रुटी दूर करण्यात येतील, असे ते म्हणाले.

  • 24 Dec 2023 10:20 AM (IST)

    ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन

    नवीन वर्षात, २३ जानेवारी रोजी नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा मेळावा होईल.या मेळाव्यासाठी जागानिश्चिती आणि पुर्वतयारीसाठी ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते आज नाशकात दाखल झाले आहेत. खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत आज नाशिकमध्ये येणार आहेत. दरम्यान खासदार संजय राऊत हे काल रात्रीच शहरात दाखल झाले आहेत. शिवसेनेत फुट पडल्यानंतर ठाकरे गटाला ऊर्जा मिळण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे ठरणार आहे.

  • 24 Dec 2023 10:15 AM (IST)

    डॉक्टरांचे सामुहिक सुट्टी आंदोलन

    जे.जे. रुग्णालयातील त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. महेंद्र कुरा हे मानसिक छळ तसेच धमकी देत असल्याचे आरोप निवासी डॉक्टरांनी केला आहे. त्वचारोग विभागातील निवासी डॉक्टर जे जे रुग्णालयात सामुहिक सुट्टी आंदोलन सुरु केले आहे. डॉक्टर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार आहेत.

  • 24 Dec 2023 10:10 AM (IST)

    बोरघाटात वाहतूक संथ गतीने

    मुंबई पुणे एक्सप्रेससह जुन्या मार्गांवरील बोरघाटात वाहतूक संथ गतीने सुरू आहे. काल वाहतूक पोलिसांनी जड वाहतूक बंद केली होती, मात्र आज पुन्हा एक्सप्रेस वे वर जड वाहतूक दिसून आली. मुंबई पुणे एक्सप्रेस वे ला खालापूर टोल नाका ते अमृताजन ब्रिज तसेच खंडाळा लोणावळा एक्सिट पर्यंत वाहन संथ गतीने सुरू आहे.मुंबई पुणे जुन्या मार्गांवरून बोरघाटात पुण्याकडे जाताना खोपोली ते खंडाळा पर्यंत 12 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. विकएंड तसेच नाताळ च्या सलग सुट्ट्यामुळे मुंबईतुन बाहेर पडणाऱ्या पर्यटकांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने वाढ झाल्याने सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडी झाली आहे. 24 तासापेक्षा जास्त एक्स्प्रेस वेवर वाहनांची संख्या प्रथमच पहायला मिळाली.

  • 24 Dec 2023 10:05 AM (IST)

    शरद पवार अमरावती दौऱ्यावर

    शरद पवार या 27 आणि 28 तारखेला अमरावती दौऱ्यावर येणार आहेत. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाला शरद पवार हजेरी लावणार आहेत.या दोन दिवसीय अमरावती दौऱ्यात शरद पवार जिल्ह्यातील महत्वाच्या भेटीगाठी घेणार असल्याचे समजते. अमरावती दौऱ्यात शरद पवार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.

  • 24 Dec 2023 10:01 AM (IST)

    Live Update : शरद पवार 27 आणि 28 तारखेला अमरावतीच्या दौऱ्यावर

    शरद पवार 27 आणि 28 तारखेला अमरावतीच्या दौऱ्यावर… पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाला शरद पवार हजेरी लावणार… या दोन दिवसीय अमरावती दौऱ्यात शरद पवार जिल्ह्यातील महत्वाच्या भेटीगाठी घेणार… अमरावती दौऱ्यात शरद पवार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार

  • 24 Dec 2023 10:00 AM (IST)

    सोने-चांदीत झाली मोठी वाढ

    सोन्याने या आठवड्यात मोठी झेप घेतली तर चांदीने मोठा पल्ला गाठला. एका आठवड्यात मौल्यवान धातूंनी कमाल दाखवली. गेल्या आठवड्याच्या शेवटीच किंमती वाढल्या होत्या. या आठवड्यात सोने-चांदीने माघार घेतलीच नाही. दरवाढीला ब्रेक दिला नाही. किंमतीत मजल-दरमजल वाढ होत गेली.

  • 24 Dec 2023 09:32 AM (IST)

    Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई सेंटरच्या बेलासीक रोडची पहाणी करत

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई सेंटरच्या बेलासीक रोडची पहाणी करत आहेत. रस्त्याच्या कडेला असलेले फुटपाथ आणि डिव्हायडरच्या रंगरंगोटीच्या कामाची देखील पहाणी करत आहेत. शिवाय काम व्यवस्थित करण्याच्या कर्मचाऱ्यांना दिल्या सूचना दिल्या आहेत.

  • 24 Dec 2023 09:19 AM (IST)

    Live Update : नाताळ सण आणि सुट्टीमुळे किनारपट्टीवर गर्दी

    पर्यटक मोठया संख्येने किनारपट्टी वर दाखल झाले आहेत. रत्नागिरीमध्ये पर्यटकांची गर्दी जमली आहे.

  • 24 Dec 2023 09:07 AM (IST)

    Live Update : 23 जानेवारी रोजी नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन

    23 जानेवारी रोजी नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी जागानिश्चिती आणि पुर्वतयारीसाठी ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते आज नाशकात दाखल होणार आहेत. खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत आज नाशिकमध्ये येणार आहेत.

  • 24 Dec 2023 08:57 AM (IST)

    काँग्रेस आमदाराच्या ड्रायव्हरला अटक

    काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांच्या वाहन चालकाला अमरावती पोलिसांनी अटक केली आहे. आमदार बळवंत वानखडे यांची गाडी मजूर नेणाऱ्या ट्रॅक्टरला धडकली होती. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता तर सहा जण जखमी झालेत. भावाच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळताच दुसऱ्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे. बळवंत वानखडे यांच्या वाहन चालकावर गुन्हा नोंदवून चालकास पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सद्या दर्यापूर पोलीस करताहेत.

  • 24 Dec 2023 08:45 AM (IST)

    आठ वर्षांपर्यंतच्या मुलांना राजीव गांधी प्राणी संग्रहालयात माेफत प्रवेश मिळणार

    आठ वर्षांपर्यंतच्या मुलांना राजीव गांधी प्राणी संग्रहालयात माेफत प्रवेश मिळणार आहे. पुणे महापालिकेचा नाताळानिमित्त निर्णय घेतला आहे.  २३ डिसेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान ८ वर्षांखालील लहान मुलांना नि:शुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. प्राणी संग्रहालय नि:शुल्क पाहण्याकरिता नोंदणी पीएमसी केअर ॲप आणि संकेतस्थळावरून ऑनलाइन केल्यानंतर मोफत प्रवेश दिला जाणार आहे. महापालिकेचे उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी ही माहिती दिलीय.

  • 24 Dec 2023 08:30 AM (IST)

    डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना अटल संस्कृती गौरव पुरस्कार जाहीर

    डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना अटल संस्कृती गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. वाजपेयी यांच्या जयंतीदिनी म्हणजे २५ डिसेंबरला हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

  • 24 Dec 2023 08:15 AM (IST)

    सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पेपर फुटीबाबत गुन्हा दाखल

    सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पेपर फुटीबाबत गुन्हा दाखल झाला आहे. चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुनील श्यामराव धनवडे यांनी याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  त्यानुसार परीक्षेला बसलेल्या संबंधित विद्यार्थी अथवा परीक्षा प्रक्रियेत सहभागी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय.  शुक्रवारी चिखली येथील महाविद्यालयात पेपर सुरु असताना प्रश्न पत्रिका सोशल मीडियात व्हायरल झाली होती.

  • 24 Dec 2023 07:58 AM (IST)

    Marathi News | तुळजाभवानी मातेचे मंदिर 22 तास खुले

    महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर 22 तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. नाताळ व नववर्ष सुट्टी निमित्त गर्दीच्या अनुषंगाने मंदिर संस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला. सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 7 ते 9 या वेळेत मंदिरात अभिषेक पुजा होणार आहे. अभिषेक काळात मंदिरात सशुल्क व्हीआयपी दर्शन बंद असणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

  • 24 Dec 2023 07:44 AM (IST)

    Marathi News | पश्चिम रेल्वेने फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी अभियान

    मुंबईत पश्चिम रेल्वेने फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी आणि योग्य-वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी ‘मेरा टिकट मेरा ईमान’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. सर्व स्तरांतील स्पर्धकांनी प्रवासाबाबत छोटे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकायचे आहे. तसेच सर्वाधिक लाइक्सच्या आधारवर पश्चिम रेल्वेकडून तीन विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे.

  • 24 Dec 2023 07:31 AM (IST)

    Marathi News | शालेय पोषण आहारात अंड्यांवरील अनुदान वाढणार

    शालेय पोषण आहारात दिल्या जाणाऱ्या अंड्यांचे दर नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटीच्या (एनएसीसी) दरानुसार निश्चित करण्याच्या निर्णय घेतला आहे. यामुळे अंड्यांवरील अनुदान दीड ते दोन रुपयांनी वाढणार आहे. शालेय पोषण आहारात पूरक आहार म्हणून दर आठवड्यातून एकदा अंडे दिले जात आहे. त्यासाठी राज्य सरकारने प्रतिअंडे पाच रुपये इतका दर निश्चित केला होता. त्यानुसार एनएसीसीच्या बदलत्या दरानुसार अंड्यांची किंमत ठरेल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

  • 24 Dec 2023 07:13 AM (IST)

    Marathi News | अयोध्या विमानतळ प्रवाशांसाठी सहा जानेवारीपासून होणार सुरू

    उत्तर प्रदेशातील अयोध्येत रामजन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भगवान श्री रामाच्या मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशविदेशातून हजारो लोक येणार आहेत. त्यासाठी येत्या ६ जानेवारीपासून अयोध्येचा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात येणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीच अयोध्येहून काही विमान कंपन्यांकडून दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, जयपूर आदी आदी महत्त्वाच्या मार्गांवर विमान सेवा सुरू करण्यात येईल.

Published On - Dec 24,2023 7:12 AM

Follow us
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.