Maharashtra Marathi Breaking News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी-फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष यांची भेट

| Updated on: Jan 26, 2024 | 7:14 AM

Maharashtra Breaking News in Marathi: आज 25 जानेवारी 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Marathi Breaking News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी-फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष यांची भेट

मुंबई | 25 जानेवारी 2024 |  मराठा आरक्षण आंदोलनाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मुंबईच्या दिशेने प्रवासाचा आज सहावा दिवस आहे. काल त्यांच्या वाहनांचा ताफा पुण्यापर्यंत पोहोचला होता. तिथे मनोज जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. उद्या म्हणजे 26 जानेवारीला मनोज जरांगे पाटील आपल्या हजारो समर्थकांसह मुंबईत दाखल होतील. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांची काल ईडीने चौकशी केली. तब्बल 12 तास त्यांची चौकशी चालली. रोहित पवार यांना आता पुढील तारीख देण्यात आली आहे. दरम्यान आजपासून हैदराबादमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Jan 2024 07:40 PM (IST)

    इंडिया आघाडी मोडण्यास अधीर रंजन चौधरी जबाबदार: टीएमसी खासदार शंतनू

    बंगालमधील इंडिया आघाडी बिघडवण्यास अधीर रंजन चौधरी आणि दीपा दासमुन्शी जबाबदार असल्याचे टीएमसी खासदार शंतनू सेन यांचे म्हणणे आहे. ते भाजपचे एजंट म्हणून काम करत आहेत. टीएमसीच्या विरोधात काम करण्यासाठी सीपीआयएमसोबत युती केली आहे.

  • 25 Jan 2024 07:25 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी-फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष यांची भेट

    जयपूर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत जयपूरमधील जंतरमंतरला भेट दिली. पीएम मोदींनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी हस्तांदोलन केले आणि नंतर हस्तांदोलनही केले. काही वेळाने दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक होणार आहे

  • 25 Jan 2024 07:11 PM (IST)

    इंडिया आघाडीत लोक स्वतःची काळजी घेत आहेत: देवेंद्र फडणवीस

    मुंबई | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इंडिया आघाडीत लोक स्वतःची काळजी घेत आहेत. समन्वय नाही. हे फार काळ टिकणार नाही, असे आम्ही आधीच सांगत होतो. प्रादेशिक पक्षांची पहिली लढाई काँग्रेसशी आहे आणि ते काँग्रेससोबत बसून इंडिया आघाडी कशी करणार आणि आता तेच दिसून येत आहे.

  • 25 Jan 2024 06:42 PM (IST)

    मुंबईत 6 पैकी 4 जागा ठाकरे गट लढवणार, सूत्रांची माहिती

    मुंबई | राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. मविआ अर्थात महाविकास आघाडीची मुंबईतील आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेली बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघाचा जागेवाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यानुसार 6 पैकी 4 जागा या ठाकरे गटाला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर कांग्रेस 2 जागा लढवणार असल्याचंही सूत्रांकडून समजलं आहे.

  • 25 Jan 2024 06:36 PM (IST)

    अजित दादांनी मुख्यमंत्री व्हावं – दिलीप वळसे पाटील

    जुन्नर | अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे. अजित दादांनी एकदा राज्याचं मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करावं. मग कामातील बदल तुम्हा सर्वांना नक्की जाणवेल, असं ते जुन्नरमध्ये म्हणाले. तसेच वळसे पाटील यांनी यावेळेस अजित पवार यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचून दाखवला.

    दिलीप वळसे पाटील यांच्या भाषणातील मुद्दे

    – शेतकर्यांचे प्रश्न गंभीर आहे

    – दुधाचे भाव उतरले सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका अजित पवार यांच्या माध्यमातून केली.

    – सहकार कायद्यात मोठा बदल करून नवीन सहकार कायदा काढून कर्ज वाटप करण्याचे काम केलं.

    – मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ही आमची भावना आहे. त्याअनुषंगाने सरकारचा प्रयत्न राहणार आहे.

    – शाहू, फुले, आंबेडकर हेच शेवट पर्यंत आदर्श राहणार आहेत. मात्र राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात. तसाच निर्णय अजित दादांनी घेतला.

    – पतसंस्थांमधील एक लाखांच्या ठेवींना संरक्षण देण्याचा निर्णय, राज्य सरकार लवकरचं घेईल. अजित दादांच्या साक्षीने हा शब्द देतो.

    – इथून पुढं वल्लभ बेनके बरोबर अतुल बेनके यांच्या मागे उभे राहा.

  • 25 Jan 2024 06:14 PM (IST)

    संपूर्ण राजधानी मध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात

    नवी दिल्ली | राजधानी नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. संपूर्ण राजधानी आणि आसपासच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे उद्या कर्तव्यपथावर चित्ररथाचे होणार संचलन होणार आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाचाही संचालनामध्ये सहभाग असणार आहे.

  • 25 Jan 2024 05:54 PM (IST)

    अभिजित पाटील यांच्या समर्थनार्थ कारखान्याचे सभासद, कामगार एकवटले

    सोलापूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि खा. शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांच्या समर्थनार्थ साखर कारखान्याच्या सभासद आणि कामगार एकवटले होते. बॅंकेविरोधात आंदोलकांनी बॅंकेच्या कारवाईच्या पत्राची होळी करत निषेध आंदोलन केले. ही कारवाई तातडीने मागे घ्यावी अन्यथा या कारवाईच्या विरोधात संचालक मंडळासह शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला.

  • 25 Jan 2024 05:44 PM (IST)

    मुंबई जाम होणार नाही, लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, आमदार संजय गायकवाड

    बुलढाणा : सरसकट आरक्षणाला अनेकांनी विरोध केला आहे. मुळात ही मागणी चुकीची आहे. मागासवर्गीय आयोगाचा निर्णय आल्यावर फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलवले जाईल. त्यावेळी मुख्यमंत्री आणि सभागृह निर्णय घेऊ. आंदोलकांनी सकारात्मक निर्णय घ्यावा. मुंबई जाम होणार नाही, लोकांना त्रास होणार नाही. संयम ठेऊन सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे असे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

  • 25 Jan 2024 05:29 PM (IST)

    मुलांना चाॅकलेट देतो तसं सरकार… मराठा कार्यकर्त्यांची टीका

    मुंबई : संभाजी नगरमधील गंगापूर गावातून अक्षय गातपाटील हे आपल्या दोन चिमुरड्यांसहीत आझाद मैदानात दाखल झालेत. आपल्या दोन्ही लहान मुलांसहीत ते आंदोलनासाठी दाखल झालेत. आम्ही आमच्या मुलांना चाॅकलेट देतो तसं सरकार आम्हाला चाॅकलेट देतेय अशी टिका त्यांनी सरकारवर केली आहे.

  • 25 Jan 2024 05:25 PM (IST)

    रोहित पवार यांनी आझाद मैदानात पाठवल्या दोन लाख पाण्याच्या बाटल्या

    मुंबई : मुंबईच्या आझाद मैदानात एनसीपीचे आमदार रोहित पवार यांनी मराठा आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. रोहित पवार यांनी दोन लाख पाण्याच्या बाटल्या येथे पाठवल्या आहेत. या बाटल्या म्हणजे मराठ्यांचा शस्त्रसाठा आहे. हवी ती मदत रोहित पवार करणार असा पवित्र एनसीपी कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

  • 25 Jan 2024 05:14 PM (IST)

    गजानन मारणे यांच्या पत्नी जयश्री मारणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

    पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार कायदा, सुव्यवस्था काटेकोरपणे राबवण्यासाठी काम करतात. गजानन मारणे यांच्या पत्नी जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे, त्या स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, पार्थ पवार तिकडे गेल्यावर त्यांची ही भेट झाली आहे. गजानन मारणे यांची निर्दोष सुटका झाली आहे त्यामुळे एखाद्या गुंडाला भेटले असं म्हणणं चुकीचे आहे. विरोधक जाणून बुजून अशा चुकीच्या बातम्या पसरवत आहेत असा आरोप अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी केला.

  • 25 Jan 2024 05:08 PM (IST)

    मराठा समाजाला जे पाहिजे ते देण्यासाठी सरकार सकारात्मक, उद्योगमंत्री उद्या सामंत

    रत्नागिरी : सरकार जर काही करत नसेल तर मी समजू शकतो. सरकारने आरक्षण देणार नाही म्हणून सांगितलं असतं तर मोर्चा समजू शकलो असतो. मनोज जरांगे समजूतदार आहेत. मनोज जरांगे यांना मराठा समाजासाठी जे पाहिजे आहेत त्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे शिंदे सरकारच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ शकतो असे उद्योगमंत्री उद्या सामंत यांनी म्हटले आहे.

  • 25 Jan 2024 04:57 PM (IST)

    Maratha Andolan | मागासवर्गीय आयोगाकडून पाहणी

    मराठा समाजास आरक्षण देणार असल्याची भूमिका पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. इतर समाजाला धक्का न लावता आरक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात आरक्षणासाठी 40 हजार लोक तीन शिप्टमध्ये काम करत आहेत. तसेच कुणबी नोंदी सापडल्यावर ते प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे.

  • 25 Jan 2024 04:48 PM (IST)

    Maratha Andolan | मागासवर्गीय आयोगाकडून पाहणी

    मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. या कामाच्या पाहणीसाठी मागासवर्ग आयोग मैदानात उतरला. कर्मचारी कसे सर्वेक्षण करीत आहेत याची पाहणी आयोगाकडून करण्यात आली. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ गोविंद काळे यांनी ही पाहणी केली.

  • 25 Jan 2024 04:31 PM (IST)

    Maratha Andolan | अजित पवार यांना काळे झेंडे दाखवले

    उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला मराठा समाजाने काळे झेंडे दाखवत निषेध केला. अजित पवार हे पुण्यातील जुन्नर विधानसभेचा दौऱ्यावर आहे. यावेळी अहमदनगर-कल्याण महामार्गावरील आळे फाटा परिसरात हे आंदोलन करण्यात आले.

  • 25 Jan 2024 04:12 PM (IST)

    Maratha Andolan | मराठा आंदोलकांमुळे वाहतूक वळवली

    मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील खालापूर फाट्यावर मोठ्या संख्येने मराठा बांधव जमले आहे. खालापूर फाटा वाहतूक पोलीस आणि खालापूर पोलीस यांचा देखील चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसेच पुण्याकडे जाणाऱ्या जुन्या एक्सप्रेस हायवे च्या गाड्या बंद करण्यात आलेला आहे. पर्यायी मार्ग मुंबई -पुणे एक्सप्रेस हायवे वाहतूक वळवण्यात आली आहे.

  • 25 Jan 2024 02:36 PM (IST)

    जरांगे पाटील मुंबईत येण्यावर ठाम

    मनोर जरांगे पाटील यांची शिष्टमंडळासोबतची झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. जरांगे पाटील हे मुंबईत येण्यावर ठाम आहे. आझाद मैदानावर आंदोलन पोलिसांनी नाकारले आहे.

  • 25 Jan 2024 02:21 PM (IST)

    मराठा आरक्षण सर्वेक्षनाचे काम पाहणीसाठी मागासवर्ग आयोग मैदानात

    धाराशिव – मराठा आरक्षण सर्वेक्षनाचे काम पाहणीसाठी मागासवर्ग आयोग मैदानात उतरला आहे. कर्मचारी कसे सर्वेक्षण करीत आहेत याची पाहणी केली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सदस्य डॉ गोविंद काळे व जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे हे सर्वेक्षन पाहणीसाठी घरी गेले. मराठा व इतर कुटुंबाच्या घरी जाऊन सर्वेक्षणाची घेतली माहिती. नागरिक, प्रगणक (नोंदी घेणारे कर्मचारी) यांच्याशी केली चर्चा. धाराशिव जिल्ह्यातील 15 टक्के कुटुंबाचे झाले आहे सर्वेक्षण. मराठा सर्वेक्षण, कुणबी प्रमाणपत्र वाटप व आकडेवारी याच्यावर घेतली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक.

  • 25 Jan 2024 01:43 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर विश्वास ठेवावा – हसन मुश्रीफ

    मराठा समाजासाठी सरकारने अनेक पाउलं उचलली आहेत. कुणबी नोंदी दिवसरात्र काम करून शोधून काढल्या आहेत. 8 दिवसांत सर्व्हेक्षण करून योग्य निर्णय घेतला जाणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर विश्वास ठेवावा असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

  • 25 Jan 2024 01:31 PM (IST)

    आझाद मैदानात स्टेजच्या बांधकामास थोड्याच वेळात सुरूवात

    मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांग पाटील यांची पदयात्रा मुंबईत पोहचणार आहे. त्यासाठी आझाद मैदानात स्टेज बांधण्याचे काम सुरु होणार आहे. नारळं फोडून बांधकाम सुरुवात होणार आहे.

  • 25 Jan 2024 01:13 PM (IST)

    फसवा फसवी कराल तर मराठा आंदोलन तीव्र होईल – प्रकाश आंबडेकर

    सरकारने जर फसवा फसवी केली तर मराठा आंदोलन आणखी तीव्र होईल असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

  • 25 Jan 2024 12:54 PM (IST)

    नागपूर – अंगणवाडी सेविकांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन

    नागपूरातील अंगणवाडी सेविकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन केलं. या आंदोलनाद्वारे अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी गेल्या ५२ दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचं नागपूरात आंदोलन सुरु आहे. 26 हजार रूपये वेतन लागू करा. तसेच ग्रॅच्युअटी , पेन्शन लागू करा या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे.

  • 25 Jan 2024 12:41 PM (IST)

    लढला तरी मराठा जिंकतो आणि शांत बसला तरी मराठाच जिंकतो – मनोज जरांगे पाटील

    लढला तरी मराठा जिंकतो आणि शांत बसला तरी मराठाच जिंकतो . मराठाच जिंकतो हे सिद्ध करायचं आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही.

  • 25 Jan 2024 12:39 PM (IST)

    शांत रहा, शांततेत खूप ताकद असते – मनोज जरांगे पाटील

    शांततेत आंदोलन करून इतिहास घडवायचा आहे. सरकारने दडपण आणलं तरी शांत रहायचं. शांततेत खूप ताकद असते असे मनोज जरांगे म्हणाले.

  • 25 Jan 2024 12:33 PM (IST)

    मुंबईत शांततेत जायचं – मनोज जरांगे पाटील

    आपल्या मोर्चामुळे कोणाला त्रास होता कामा नये, मुंबईत शांततेत जायचं , शिस्त मोडायची नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी बजावलं.

  • 25 Jan 2024 12:15 PM (IST)

    राजधानी नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाची तयारी अंतिम टप्प्यात

    राजधानी नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. संपूर्ण राजधानी मध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सालाबादप्रमाणे, उद्या कर्तव्यपथावर चित्ररथाचे संचलन होणार असून महाराष्ट्राच्या चित्ररथाचाही संचालनामध्ये सहभाग असेल.

  • 25 Jan 2024 12:11 PM (IST)

    मुंबईत मविआची जागावाटपाबाबत महत्वाची बैठक सुरू

    मुंबईत महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत महत्वाची बैठक सुरू झाली आहे. विनायक राऊत, संजय राऊत, नाना पटोले, चव्हाण या बैठकील उपस्थित आहेत.

  • 25 Jan 2024 11:45 AM (IST)

    मुंबई-नागपूर आठ तासांत गाठण्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा

    मुंबई-नागपूर थेट प्रवास केवळ आठ तासांत करण्यासाठी वाहनचालक, प्रवाशांना जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबई-नागपूर प्रवास अतिवेगवान व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील भरवीर – इगतपुरीदरम्यानचा तिसरा टप्पा फेब्रुवारी अखेरीस पूर्ण होणार आहे. मात्र, इगतपुरी-आमणे, ठाणे हा शेवटचा टप्पा पूर्ण होण्यासाठी जुलै 2014 उजाडणार आहे.

  • 25 Jan 2024 11:33 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी लोणावळ्यात सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलं

    लोणावळा : मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी लोणावळ्यात सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलं आहे. एका बंद खोलीमध्ये ही चर्चा होणार आहे. सरकारच्या या शिष्टमंडळामध्ये जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील दरे गावात असून जरांगे पाटील यांच्या संपूर्ण आंदोलनाबाबत माहिती घेत आहेत. गरज पडल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः जरांगे पाटील यांच्याशी वीसीद्वारे संवाद साधणार आहेत.

  • 25 Jan 2024 11:24 AM (IST)

    सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पुन्हा एकदा कांद्याची मोठी आवक

    सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पुन्हा एकदा कांद्याची मोठी आवक आहे. आवक वाढल्याने 200 रुपयांनी कांद्याचे दर घसरले आहेत. आज सोलापूरच्या बाजारात जवळपास 1500 गाड्या आल्या आहेत. बुधवारी बाजार समिती बंद राहिल्याने तसेच उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बाजाराला सुट्टी असल्याने आवक वाढली आहे. आवक वाढल्याने दर 200 रुपये प्रती क्विंटलने घसरलं आहे. मंगळवारी कांद्याला 1200 ते 1400 रुपये प्रती किलो इतका भाव होता, आज मात्र कांद्याला 800 ते 1200 रुपये इतका भाव आहे.

  • 25 Jan 2024 11:00 AM (IST)

    संदीप राऊत यांना ईडीची नोटीस

    शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना ईडीची नोटीस आली आहे. संदीप राऊत यांना खिचडी घोटाळा प्रकरणी तपासासाठी 30 जानेवारी रोजी ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. खिचडी घोटाळ्यात ५ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. 30 जानेवारीला सकाळी दहा वाजता संदीप राऊत हेडी कार्यालयामध्ये हजर राहतील.

  • 25 Jan 2024 10:54 AM (IST)

    शेतकऱ्यांनी कोथिंबीर रस्त्यावर फेकली

    सोलापुरात कोथिंबीर उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. कोथिंबीरीला भाव नसल्याने आक्रमक शेतकऱ्यांनी कोथिंबीर रस्त्यावर फेकली. कष्टाने पिकवलेली कोथिंबीर कवडीमोल दराने विकली जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

  • 25 Jan 2024 10:40 AM (IST)

    आता घ्या कॅशलेस उपचार

    अंतरिम बजेट सादर होण्यापूर्वीच आरोग्य विम्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. देशातील कोट्यावधी आरोग्य विमा पॉलिसीधारकांना मोठी भेट मिळाली आहे. त्यांना कॅशलेस विमा दावा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे नेटवर्कमध्ये नसलेल्या ठिकाणी पण त्यांना कॅशलेसची सुविधा मिळणार आहे.

  • 25 Jan 2024 10:30 AM (IST)

    सोने वधारले तर चांदीत घसरण

    सोने-चांदीच्या किंमतीत बदल झाला आहे. सोन्याची किंमत वधारली आहे. तर चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. सोने -चांदीच्या किंमतीत सातत्याने घसरण सुरु आहे. त्याला सोन्याने ब्रेक लावला. तर चांदीत नरमाई कायम आहे.

  • 25 Jan 2024 10:20 AM (IST)

    रक्त घ्या पण पाणी द्या

    सांगली जिल्ह्यातील जत तालुका दुष्काळी तालुका आहे. आजपर्यंत टँकर आणि चारा टंचाई वर अब्जावधी रुपये खर्च झाले. सन 1988 पासून जतला म्हैसाळचे पाणी द्यावे यासाठी संघर्ष सुरु आहे. पण 2024 उजाडले तरी पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तीन पिढ्या मातीत गेल्या पण शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचू शकले नाही. अनेक संघटनांनी आंदोलन केले. तसेच श्री. संत बागडेबाबा मानव मित्र संघटना समितीच्या तुकाराम बाबा महाराज यांच्या माध्यमातून पाण्यासाठीचा लढा सुरुच आहे. त्यामुळे जत पुर्व भागातील 65 गावांना म्हैसाळचे पाणी द्या अन्यथा म्हैसाळच्या पाण्यासाठी” रक्त घ्या पण पाणी द्या अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती तुकाराम बाबा महाराज यांनी दिली.

  • 25 Jan 2024 10:20 AM (IST)

    राम मंदिरात रेकॉर्डब्रेक दान

    अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरात दानाचा पण एक विक्रम झाला आहे. अवघ्या दोन दिवसांत 3.17 कोटी रुपयांचे दान आले आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर दोन दिवसांत ही रक्कम जमा झाली आहे. तर महर्षि वाल्मिकी विमानतळावर दोन दिवसांत 123 विमानांचे उड्डाण झाले आहे. या दोन दिवसांत 8 लाखांहून अधिक भक्तांनी दर्शन घेतले. तर प्रत्येक वर्षी 10 कोटी भाविकभक्त येण्याची शक्यता आहे.

  • 25 Jan 2024 10:10 AM (IST)

    १५० गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये होणार लोकसभेचं मतदान

    राज्यातील १५० गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये लोकसभेचं मतदान होणार आहे. शहरी भागांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निर्णयामुळे मतदारांना मतदानासाठी तासन तास रांगेत उभं राहण्याची गरज पडणार नाही. गृहनिर्माण सोसायटीच्या परिसरातील नागरिकांनाही सोसायटीमध्ये मतदानाला जावं लागेल,पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबत माहिती दिली.

  • 25 Jan 2024 10:02 AM (IST)

    जे घाबरट होते, ते तुमच्या कळपात- संजय राऊत

    संदीप राऊत यांना दिलेली नोटीस हस्यास्पद असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली. अजित पवार हे तर सरकारच्या मांडीवर आहे. जे घाबरट होते, तुमच्या कळपात शिरले अशी टीका राऊत यांनी ईडीच्या कारवाईवरुन केली.

  • 25 Jan 2024 10:00 AM (IST)

    विरोधी पक्षातल्यांना नोटीस देण्याचं भाजपचं तंत्र- संजय राऊत

    काल रोहित पवार तर आज किशोरी पेडणेकरांना ईडी चौकशीला बोलावण्यात आले आहे. विरोधी पक्षातल्यांना नोटीस देण्याचं भाजपचं तंत्र असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

  • 25 Jan 2024 09:54 AM (IST)

    नाशिक जिल्ह्याच्या निफाडमध्ये पारा घसरला

    नाशिक जिल्ह्याच्या निफाडमध्ये पारा घसरला. 4.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली.

  • 25 Jan 2024 09:41 AM (IST)

    जळगावात थंडीची लाट , पारा 9 अंशावर

    जळगावात थंडीची लाट असल्याने पारा कमालीचा खाली उतरला आहे. तापमानची नोंद 9 अंश करण्यात आली आहे. नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घेतला आहे.

  • 25 Jan 2024 09:15 AM (IST)

    कोकणात अवकाळी पावसाची शक्यता

    राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. कोकणात अवकाळी पासवाटी शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तापमाणात मोठी घट झाली आहे.

  • 25 Jan 2024 09:12 AM (IST)

    पुण्यातून अयोध्येसाठी 15 विशेष रेल्वेगाड्या जाणार

    अयोध्येचे राम मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले झाल्यानंतर भक्तांचा अयोध्येला जाण्याचा ओघ वाढत आहे. त्या निमित्त्याने पुण्यातून अयोध्येसाठी 15 विशेष रेल्वेगाड्या जाणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

  • 25 Jan 2024 09:07 AM (IST)

    प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर जय्यत तयारी सुरू

    उद्या प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर जय्यत तयारी सुरू

  • 25 Jan 2024 08:44 AM (IST)

    Pune news | पार्थ पवारांनी घेतली गुंड गजा मारणेची भेट

    गुंड गजा मारणेची पार्थ पवारांनी घेतली भेट. गजा मारणेची पुण्यात भेट घेतल्याची माहिती. गजा मारणे हा मारणे टोळीचा प्रमुख. मारणेवर सहा पेक्षा जास्त गुन्हे दाखल. या भेटीवेळी शहराध्यक्ष दीपक मानकरही उपस्थित. भेटीचे नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यात.

  • 25 Jan 2024 08:09 AM (IST)

    Pune news | अजित पवार अमोल कोल्हेच्या होमग्राऊंडवर

    उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमोल कोल्हेच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात. आधी दिले पाडण्याचे चॅलेंज आता थेट होमग्राऊंडवर. अजित पवार आज शिरूर लोकसभेतील जुन्नर मतदारसंघात. शरद पवारांनंतर आता अजित पवार जुन्नर मतदारसंघात. अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन करणार.

  • 25 Jan 2024 08:01 AM (IST)

    Nashik news | नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातील मतदार संख्या निश्चित.

    नाशिक पश्चिम मतदार संघात सर्वाधिक 4,38,375 मतदार. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदार संघात सर्वात कमी 2,70,196, मतदार. जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या 47,57,193 अनिवासी भारतीय 56, तृतीयपंथी 114, तर दिव्यांग मतदारांची संख्या 19,287

  • 25 Jan 2024 07:59 AM (IST)

    Pune news | पुण्यातील काँग्रेसच्या बैठकीत पुन्हा एकदा धुसफूस समोर

    लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे काम शिस्तीत करा. पक्षाच्या विरोधात जे काम करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. या शब्दात काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी घेतली काँग्रेस पदाधिकार्‍यांची शाळा.

Published On - Jan 25,2024 7:57 AM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.