LIVE | राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलल्या, कोरोनामुळे निर्णय
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलल्या, कोरोनामुळे निर्णय
बारामती : सहकारी संस्थांच्या निवडणुकीला पुन्हा कोरोनाची आडकाठी
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलल्या
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सहकार विभागाचा निर्णय
कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांची तारीख पे तारीख
-
सिंधुदुर्गमधील आंबोली परीसरात मुसळधार पाऊस
सिंधुदुर्ग: आंबोली परीसरात मुसळधार पाऊस.
-गेल्या अर्ध्या तासापासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
-गेले काही दिवस उकाड्या पासून हैरान झालेल्या आंबोलीकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा.
-मुसळधार पाऊसामुळे हवेत आलाय गारवा.
-
-
भिवंडी शहरातील शास्त्री नगर येथील कारखान्यास भीषण आग
भिवंडी शहरातील शास्त्री नगर येथील प्लास्टिकचे मणी बनविणाऱ्या कारखान्यास भीषण आग
घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल
कोणतीही जीवितहानी नाही .परंतु एक मजली इमारती मध्ये प्लस्टिक मणी बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केमिकलचा साठा
या आगीत यंत्रसामुग्री ,कच्चा आणि तयार माल जाळून खाक झाला आहे.
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीच्या अनुषंगाने नियोजनाबाबत महत्त्वाची बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुंबई महापालिका अधिकारी आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांची बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेत आहेत बैठक
-
पारदर्शक कारभार महाराष्ट्राला देण्याचा माझा प्रयत्न – दिलीप वळसे पाटील
दिलीप वळसे पाटील –
गृहविभागात रोज नवीन नवीन गोष्टी घडत असतात
तिन्ही पक्ष एकत्र निर्णय घेत असतात त्यामुळे मला वाटत नाही काही अडचण येईल
मी आजच कार्यभार स्वीकारला आहे येत्या काही दिवसात सचिव अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे
कोण काय आरोप करत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे
पारदर्शक कारभार महाराष्ट्राला देण्याचा माझा प्रयत्न आहे
-
-
हाय कोर्टाच्या निकालाल सुप्रीम कोर्टात आव्हान देणार – दिलीप वळसे पाटील
दिलीप वळसे पाटील –
दैनंदिन दिवसामध्ये छोट्या-मोठ्या गुन्हाचे प्रश्न विचारले जातात
त्यासाठी मी एक स्वतंत्र व्यवस्था करणार आहे
काल जो कोर्टाने निर्णय दिला त्यामध्ये सर्व यंत्रणांना राज्य सरकारचे सहकार्य राहील
कालच्या निकालाल सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे
-
हे एक अवघड आणि चॅलेंजिंग काम आहे – दिलीप वळसे पाटील
दिलीप वळसे पाटील –
गृहमंत्री पदाचा चार्ज घेतल्यानंतर आज मी पहिल्यांदा तुम्हाला भेटलो
मी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना धन्यवाद देतो
हे एक अवघड आणि चॅलेंजिंग काम आहे
कोरोनामुळे सर्व पोलीस रस्त्यावर फिल्डवर आहे
कोरोनाच्या काळात जी बंधन घातली आहे त्याची अंमलबजावणी करणे ही सुद्धा जबाबदारी पोलिसांवर आहे
-
शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाला मुरबाड शाळेने दाखवली केराची टोपली, फी न दिल्याने ऑनलाईन शिक्षण बंद
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशाला मुरबाड मधील विसडम या शाळेने दाखवली केराची टोपली
विसडम शाळेचा मनमानी कारभार फी न दिलेल्या मुलांच ऑनलाईन शिक्षण केल बंद
संतप्त पालकांनी शाळेत मुख्याध्यपकांना घातला घेराव
-
बारामतीतील दुकाने अचानक बंद, व्यापारी महासंघाकडून प्रशासकीय कृतीबद्दल तीव्र नाराजी
बारामती –
बारामतीतील दुकाने अचानक बंद
प्रशासनाकडून केली गेली दुकाने बंद
व्यापारी महासंघाकडून प्रशासकीय कृतीबद्दल तीव्र नाराजी
कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय बंद केल्याने अनेकांचे नुकसान
-
कळंबोलीमधील सर्व दुकानदार, व्यापारी अचानक केलेल्या बंदमुळे रस्त्यावर
पनवेल –
कळंबोलीमधील सर्व दुकानदार, व्यापारी अचानक केलेल्या बंदमुळे रस्त्यावरव्यापारी असोशिएशन आंदोलनाच्या पवित्र्यातसर्व व्यापारी दुकानदारांचा पनवेल मनपा कळंबोली वॉर्ड ऑफिस समोर ठिय्या50 ते 60 व्यापारी नव्या लॉकडाऊनच्या निर्णयावर नाराजआम्ही जगायचे कसे ? असा व्यापाऱ्यांनि उपस्थित केला सवालडी मार्ट मध्ये हजारोंच्या संख्येने गर्दी चालते मग आमच्या दुकानांची का नाही ? असा खोचक सवाल केला उपस्थित -
कांद्यानंतर आता कलिंगडचे दर घसरले
– कांद्यानंतर आता कलिंगडचे दर घसरले
– उत्पादन खर्च तर दूर वाहतुक व मजुरी खर्च निघणे मुश्किल झाल्याने टरबूज फेकले शेतकऱ्याने रस्त्याच्या कडेला
– फेकलेल्या टरबुजावर गाईंनी मारला मनसोक्त ताव
– निफाड तालुक्यातील मरळगोई येथील घटना
-
जबाबदारी मोठी आहे ती पार पाडायला आवडेल – दिलीप वळसे पाटील
दिलीप वळसे पाटील –
-जबाबदारी मोठी आहे ती पार पाडायला आवडेल
– आज चार्ज घेणार
– पवार साहेबांचं आशीर्वाद घ्यायला आलो होतो
-त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली,मार्गदर्शन घेतले
-
यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे आज वैद्यकीय सेवा ठप्प
यवतमाळ –
यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे आज वैद्यकीय सेवा ठप्प
डॉ. प्रभाकर मते चाकू हल्ला प्रकरणी, आज डॉक्टरांचा बंद
हल्लेखोरावर कठोर कारवाईची मागणी
रुग्णाची गैरसोय होण्याची शक्यता
काल डॉ मते वर केला होता चाकूहल्ला
-
आठ दिवसात तिसरा राजीनामा होणार – चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील –
– संघटना वाढवणं महत्वाचं आहे,
– स्लिपर सेलचे लोकं देशात आहे, जे कोरेगाव भीमाच्या दंगलीत समोर आले,
– वैचारिक संघर्ष करण्याची गरज आहे
– 2024 मध्ये आम्हाला स्वतःच्या ताकतीवर सरकार स्थापन करू
– लॉकडाऊनवरून सरकारने शुद्ध फसवणूक केलीय
– देवेंद्र फडणवीस यांच्याशी शनिवार आणि रविवारच्या लॉकडाऊनबद्दल चर्चा झाली होती, मात्र प्रत्यक्षात पूर्ण लॉकडाऊनचे नोटिफिकेशन काढलं
– ही फसवणूक जनता खपवून घेणार नाही
– एवढ्या आठ दिवसात तिसरा राजीनामा होणार
– तुमच्या कर्माने तुम्ही मरणार आहात
-
11 एप्रिलच्या परीक्षेसंदर्भात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी घेतला पोल, 65 टक्के विद्यार्थी म्हणतायेत परीक्षा पुढे ढकला
11 एप्रिलच्या परीक्षेसंदर्भात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी घेतला पोल,
65 टक्के विद्यार्थी म्हणतायेत परीक्षा पुढे ढकला
एकाच आठवड्यात पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा कोरोनानं मृत्यू
अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लक्षणं जाणवायला सुरुवात,
विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण,
11 एप्रिलची राज्यसेवा गट ब च्याही परीक्षेवरून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
35 टक्के विद्यार्थी म्हणतात परीक्षा पुढे ढकलू नका ,
-
पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेची सौम्य लाट राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज
नागपूर –
विदर्भवासीयांना आज आणि उद्या म्हणजे मंगळवार आणि बुधवारी पुन्हा एकदा उन्हाळ्याचे चटके सहन करावे लागणार.
पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेची सौम्य लाट राहणार असल्याचा अंदाज, नागपूर वेध शाळेने व्यक्त केला.
विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमान 41 ते 43 अंशा पर्यंत जाण्याचा अंदाज
तापमानात आता सतत वाढ व्हायला झाली सुरवात
-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या सराव परिक्षेकडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ
पुणे –
– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या सराव परिक्षेकडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ,
– सोमवारी 1 लाख 10 हजार 17 विद्यार्थ्यांनी ती देणे अपेक्षित होते. मात्र, केवळ 68 हजार 470 जणांनीच परीक्षा दिल्याचे समोर आले,
– जवळपास 41 हजार 547 विद्यार्थ्यांनी सराव परीक्षेकडे फिरवली पाठ,
-प्रथम सत्राच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेतली जात आहे.
– पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तिन्ही जिल्ह्यांमधील सुमारे साडेसहा लाख विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची परीक्षा 10 एप्रिलपासून घेतली जाणार आहे,
– ऑनलाइन परीक्षा देण्यापूर्वी विविध विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवस परीक्षेच्या सरावाची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
-
शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुन्हा एकदा स्थगित
कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुन्हा एकदा स्थगित
वाढत्या कोरोना प्रादुर्भाव च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाचे निर्णय
रात्री उशिरा याबाबतच पत्रक केलं जारी
6 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान होणार होत्या परीक्षा
गेल्या वर्षा भरात तिसऱ्यांदा परीक्षा झाल्या स्थगित
विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आणि संभ्रम
-
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा’, भाजप आमदाराची मागणी
– ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा’
– भाजप नेते आमदार कृष्णा खोपडे यांची मागणी
– ‘दीड वर्षात तीन मंत्र्यांवर गंभीर आरोप’
– नैतीत जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी द्यावा राजीनामा
– १०० कोटींच्या वसूली प्रकरणात राजीनाम्याची मागणी
-
वैजापूर तालुक्यातील लाखनी गावात वाळू तस्कर आणि गावकऱ्यांमध्ये राडा
औरंगाबाद –
वैजापूर तालुक्यातील लाखनी गावात वाळू तस्कर आणि गावकऱ्यांत राडा
वाळू तस्करांनी गावकऱ्यांना मारहाण केल्याचा ग्रामस्थांचा दावा
मारहाणीत दोन ते तीन गावकरी जखमी
वाळू तस्कराकडून लाखनी गावाच्या हद्दीत सुरू होता बेकायदेशीर वाळू उपसा
हजारो ब्रासची सुरू होती बेकायदेशीर तस्करी
पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने सपशेल केलं होतं दुर्लक्ष
गावकऱ्यांनी वाळू उपसा रोखल्यानंतर झाला राडा
तीन जखमी गावकऱ्यांना रुग्णालयात दाखल
-
महामार्गाच्या शेजारी झाडं न लावणाऱ्या कंत्राटदाराचे बिलं रोखा, नितीन गडकरी यांचे आदेश
नागपूर –
– महामार्गाच्या शेजारी झाडं न लावणाऱ्या कंत्राटदाराचे बिलं रोखा
– केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश
– महामार्गाच्या कामात झाडं लावण्याचा कंत्राटदाराच्या करारात समावेश
– झाडं लावण्याच्या कामाचे इ टॅग आणि शुटिंग करण्याचेही आदेश
– झाडं लावणं टाळाटाळ करणारे कंत्राटदार गडकरींच्या रडारवर
-
पालघरमध्ये ट्रक आणि स्कुटीचा अपघात, तीनजण गंभीर जखमी
पालघर
ट्रक आणि स्कुटीचा अपघात, तीनजण गंभीर जखमी
बोईसर चिल्हार रोडवर गुंदले येथे ट्रक आणि स्कुटीचा अपघात,
अधिकारी पेट्रोल पंप समोर घडली घटना
अपघातात तीन जण गंभीर जखमी,जखमींना उपचारा साठी रुग्णालयात केले दाखल,
-
उस्मानाबादेत आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नातेवाईकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस निरीक्षकासह 2 पोलीस कर्मचारी जखमी
उस्मानाबाद –
पोलीस कोठडीत एका आरोपीची प्रकृती खलावल्याने रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू
नातेवाईकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस निरीक्षकासह 2 पोलीस कर्मचारी जखमी
वाशी तालुक्यातील पारा येथील रमज्या लाला काळे याची प्रकृती खालावल्याने सोलापूर येथे उपचार नेल्यानंतर त्याचा मृत्यू
मृतदेह वाशी पोलीस ठाण्यात आल्यावर नातेवाईकांनी केला पोलिसांवर हल्ला , हल्ल्यात पोलीस निरीक्षण उस्मान शेख , पोलीस कर्मचारी परशुराम पवार , भागवत झोंबडे जखमी
जखमींवर उपचार सुरू तर जमावाला पांगवण्यासाठी 7 अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या
स्तिथी तणावाची मात्र नियंत्रणात
-
अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर फक्त सुरूवात आहे… – गिरीश महाजन
अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीवर निशाना साधन काही सूचक ट्वीट केले आहेत –
राज्यातील वसुलीबाज ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाच्या दणक्याने राजीनामा द्यावा लागला आहे. ही तर अजून सुरूवात असून पुढे अजून बरेच गैरव्यवहारांची प्रकरणे येणार..
आगे आगे देखो…होता है क्या? #टार्गेट१००करोड #AnilDeshmukh @AnilDeshmukhNCP
— Girish Mahajan (@girishdmahajan) April 6, 2021
मात्र निगरगट्ठ ठाकरे सरकारने त्यांची पाठराखण केल्याने अनिल देशमुखांना अभय मिळाले होते. अनिल देशमुख यांचा राजीनामा हा प्रचंड नाचक्की झाल्यानंतरचा आणि कोर्टाच्या निर्देशानंतरचा आहे. यामुळे राज्य सरकारच्या गैरकारभाराचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.
— Girish Mahajan (@girishdmahajan) April 6, 2021
मात्र जे काही समोर आलेय ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे आहे. अजून बरेच काही समोर येणार आहे. या सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर फक्त सुरूवात आहे… #MahaVasooliAghadi
— Girish Mahajan (@girishdmahajan) April 6, 2021
Published On - Apr 06,2021 6:52 PM