महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
हिगोली : वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, सेनगाव तालुक्यातील वाघजाळी शिवारातील घटना, लक्ष्मण तांबिले असं मृत शेतकऱ्याच नाव, ते जनावरांची वैरण झाकण्यासाठी गेले होते.
हिंगोली : जिल्हाच्या काही भागात अवकाळी पावसाला सुरुवात, काही दिवसांच्या ढगाळ वतावरणा नंतर आज विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात, अचानक आलेल्या पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची उडाली तारांबळ
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज लिलवाती रुग्णालयात छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांना टेनिस खेळताना हाताबरोबर पाठीही दुखापत झाली होती. त्यामुळे पाठीच्या मसल टिशू मध्ये रक्त जमा झालं होतं. त्यामुळे होणारा दबाव कमी करण्यासाठी हॅमेटोमा ड्रेनेजची छोटी शस्त्रक्रिया केली. डॉ. जलील पारकर यांच्या सूचनेनुसार आज सकाळी त्यांना दाखल करण्यात आले आणि आज दुपारी तीन वाजता त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. डॉ. विनोद अग्रवाल आणि डॉ आनंद उत्तुरे यांनी ही शस्त्रक्रिया केली आणि डॉ जलील पारकर देखील शस्त्रक्रियेवेळी उपस्थित होते. शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे बरे आहेत आणि ते रुग्णालयाच्या त्यांच्या रुममध्ये आराम करीत आहेत. त्यांना एक ते दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल. शस्त्रक्रियेवेळी राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, मुलगी उर्वशी आणि सून मिताली हे रुग्णालयात उपस्थित होते.
अकोला : शासकीय रुग्णालयात कोरोनाचा उपचार घेणाऱ्या रुग्णाचा संशयास्पद मृत्यू
रुग्णालयात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली
दरम्यान, मृत्यूचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही
कोतवाली पोलिस पुढील तपास करीत आहे
मृत झालेल्या माणसाचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्याला आज सुटी देण्यात येणार होती
त्या पूर्वी या तरुणाने सलाईनच्या नळीने गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती
या माणसाला कॅन्सरदेखील असल्याचं बोललं जात आहे
सध्या पोलिस पंचनामा करीत आहे
रायगड : रेवदंडा इथे धावत्या कारला आग, सुदैवाने कोणीही जखमी नाही
अलिबागजवळ रेवदंडा इथं पारनाक्यावर घडली घटना
कारमध्ये आग लागल्याचे लक्षात येताच कारचालकाने गाडी थांबवली आणि तो गाडीतून उतरला
थोड्याच वेळात गाडीत आगीचा भडका उडाला.
आगीत अर्धीपेक्षा जास्त कार जळून खाक
नागरिकांनीच पाणी टाकून आग विझवली
वाशिम : जिल्ह्याच्या रिसोड शहरासह तालुक्यातील अनेक गावांत अवकाळी पावसाला सुरुवात
या पावसामुळे जिल्ह्यातील उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा
मात्र जिल्ह्यातील उन्हाळी भुईमूग, सोयाबीन तसेच इतर पिकांचं नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
रायगड : मुबंई-पुणे जुन्या हायवेवर बोरघाटात ट्रकचा अपघात, तीन जण अडकले
चालकाला जखमी अवस्थेत बाहेर काढले
शिग्रोबांच्या खिडींत डोगंराळ भागाला उतारावर ट्रकचा अपघात
आय आर बी यत्रंणा, बोरघाट वाहतूक पोलीस, देवदुत यत्रंणा, खोपोली पोलीस, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी
जखमी चालकाला व अन्य दोन प्रवाशांचे म्रुतदेह काढले बाहेर
खोपोलीकडे याणारा मार्ग काही काळासाठी बंद
पंढरपूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात सचिन वाझें सारख्या पोलीस अधिकार्याचे कृत्य हे आतंकवादी आणि नक्षलवादी कृत्यासारखे आहे. हा हजारो कोटी रुपयांचा विषय असल्याची शक्यता आहे, असे म्हणत या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. तसेच ज्या काय घटना घडत आहेत त्यामुळे सरकारचे तोंड काळे झाले आहे. ठाकरे सरकारने आता राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केलीय. पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडेंच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
रत्नागिरी- कोकणाची लाईफलाईन असलेल्या मुंबई गोवा महामार्गावर शुकशुकाट
वळणावळणाच्या घाटात वाहनांची तुरळक वर्दळ
मुंबई गोवा महामार्गावरील विकेंड लाॅकडाऊनची दृष्ये ड्रोनच्या माध्ममातून
मुंबई गोवा महामार्गावर धावतायत अत्यावश्यक सेवांच्या गाड्या
मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर लाॅक डाऊनचा मोठा परिणाम
मुंबईच्या एलटीटी स्टेशनला ट्रेनने प्रवास करण्यासाठी लांबचा लांब रांगा
– पोलिसांकडून नागरिकांना सोशल डिस्टेंसचं पालन करण्याचं आवाहन
– काही तरुण विनातिकीटचं पोहोचले एलटीटी स्थानकात
– एक तासापूर्वी गाडीत सोडण्याच्या नागरीकांना सुचना
– संध्याकाळच्या गाडीसाठीही आत्तापासूनच गर्दी
– टर्मिनसच्या बाहेर मोठी रांग
सोशल डिस्टन्सिंग पूर्णपणे फज्जा
–
“राज्यात कोरोनाची स्थिती भीषण आहे, त्यामुळेच मी तीन आठवड्यांच्या कडक लॅाकडाऊनची मागणी केलीय. आज याच विषयावर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावलीय. झूम द्वारे होणाऱ्या या बैठकीत सर्व पक्षाशी चर्चा होणार आहे” अशी माहिती मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय.
– आज पुण्यात बैठक, मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली, त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल.
– प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेवून चालणार नाही..
– आज बारामतीत बैठक घेवून इंजेक्शन, बेड, लसीकरण, रुग्णवाहिका याचा आढावा घेतला..
– बारामतीत होत असलेली वाढ रोखण्यासाठी काही निर्बंध लादण्याबद्दल पोलिस यंत्रणेला सुचना दिल्या आहेत..
– रेमडीसीव्हर : राज्य शासनाच्या एकाही हॉस्पिटलमध्ये इजेंक्शन कमी पडत नाही.. खासगी रुग्णालयांमध्ये तुटवडा आहे.. त्यामागे काही कारणे आहेत.. त्याबद्दलही चर्चा झाली.. जिल्ह्यात याबद्दल कशा पद्धतीने उपाययोजना राबवायच्या याबद्दल पुण्यातील बैठकीत निर्णय घेणार आहोत..
– आज मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांच्या उद्यापासून दुकाने उघडण्याच्या भूमिकेबद्दल चर्चा करुन त्याबद्दल आज रात्री किंवा उद्या निर्णय जाहिर केला जाईल..
पुणे नगर महामार्ग लागत वाघोली कटके वाडी येथील एका गोडाऊनला भीषण आग लागली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ बाहेर निघत असल्याने आग विझण्यास अडथळे निर्माण होत आहेत तर आग कशाने लागली याचे कारण काय याबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळू शकली नाही वाघोली येथील PMRDA अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे
जालना जिल्हा आणि ग्रामीण भागात अत्यावश्क सेवा वगळता, दोन दिवस असणाऱ्या लॉकडाऊनचा परिणाम पहिला दिवशी चांगला बघायला मिळाला. रस्त्यावर शुकशुकाट होता तर व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेऊन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसुन आले. आजपर्यंत कोरणामुळे जिल्ह्यात 560 जणांनी आपला जीव गमावलाय.
मीरा भाईंदर :- मीरा भाईंदरमध्ये वीकेंड लॉक डाऊनला मोठा प्रतिसाद मिळत असताना पाहायला मिळत आहे. शुक्रवार च्या रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉक डाऊन असल्याने रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. भाईंदर, मीरा रोड तसेच काशीमिरा परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहे..यांच्या आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रमेश शर्मा यांनी
चंद्रशेखर बावनकुळे
– विदर्भ आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाकडे सरकारचं लक्ष नाही
– अजित पवार, जयंत पाटील पंढरपूर येथे मोठ्या सभा घेतात
– अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करा
– आरोग्य व्यवस्थेबाबत जागरुक झाले, नाही तर आम्ही १० हजार लोकांचा मोर्चा काढू
औरंगाबाद शहरातल्या गुलमंडीवर कडकडीत लॉकडाऊन
औरंगाबाद शहरातल्या सर्वात मोठ्या बाजारपेठेत शुकशुकाट
गुलमंडीवरली सर्वच दुकाने कडकडीत बंद
जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता सर्वच व्यवहार ठप्प
नागरिकांचा लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद
दोन दिवस सुरू राहणार औरंगाबाद शहरातील कडक लॉक डाऊन
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार विद्या प्रतिष्ठानमध्ये दाखल..
– अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसमवेत होणार बैठक..
– कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर होतेय बैठक..
– कोरोनासंदर्भातील उपाययोजना आणि अडचणीबाबत होणार बैठकीत चर्चा
मुक्ताईनगर विकेंड लॉकडाऊन ग्रामीण भागात
जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे यातच मुक्ताईनगर च्या ग्रामीण भागात कु-हा काकोडा परिसरात विकेंड लॉकडाऊन परिस्थितीचा आढावा
ग्रामीण भागातही पोलिस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे
विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे
ग्रामीण भागात ठिकठिकाणी पोलिस उभे असून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांंना उट बशा व त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे
व्यापारी वर्गांच्या स्वताहून दुकाने बंद ग्रामीण भागात कडेकोट बंदोबस्त
नाशिक – रुग्णाला बनावट रेमडेसिव्हर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात रेमडेसिव्हर इंजेक्शन चा तुटवडा
याच गोष्टीचा गैरफायदा घेत विकण्यात येत आहे बनावट रेमडेसिव्हर
रेमडेसिव्हर इंजेक्शन चा काळाबाजार सुरू असल्याच्या अनेक तक्रारी
बनावट रेमडेसिव्हर इंजेक्शन चा काळाबाजार होत असल्याची धक्कादायक बाब उघड
सोलापुर- नियम मोडणाऱ्यावर पोलिसांची कारवाई सुरू
– विनाकारण फिरणाऱ्या लोकांची वाहने पोलिसांकडून केली जात आहेत जप्त
– शहराच्या विविध भागात पोलिसांची कारवाई सुरू
– विकेंडलॉकडाऊन ला रात्री 8 पासून सुरुवात
– पेट्रोलपंप, किराणा दुकान सुरू
– वैद्यकीय सेवा, हॉस्पिटल्स, आणि मेडिकल सुरू
मुंबईची लाईफलाईन रेल्वेत पिक अवरमध्ये गर्दी ओसरली, 50 टक्के गर्दी कमी…
– रेल्वेत सोशल डिस्टेंसिंगचं पालन करत प्रवास सुरू…
– लाॅकडाऊनला सर्वसामान्यांचा तीव्र विरोध…
– केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्माचारीच करत आहेत प्रवास…
पुणे – विकेंड लॉकडाऊन या कालावधीत नेमकं काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार त्याबाबत तपशीलवार माहिती…
– नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी वावरणे –
– सोमवार ते शुक्रवार – कोविड निर्देशांचे पालन करून जास्तीत जास्त पाच जणांनी एकत्र फिरण्यास परवानगी (सकाळी सात ते सायंकाळी सहा)
– विकेंड लॉकडाऊन – अत्यावश्यक कारण, अत्यावश्यक सेवा याशिवाय नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध
– फक्त अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापना कर्मचारी
– सोमवार ते शुक्रवार – ओळखपत्रासह संचार करण्यास परवानगी
– विकेंड लॉकडाऊन – ओळखपत्रासह संचार करण्यास परवानगी
– संचारबंदीमधून हॉस्पिटल, मेडिकल शॉप्स, इन्शुरन्स कार्यालय, औषध विक्रेते व कंपन्या, वैद्यकीय सेवेशी संबंधित घटक वगळण्यात आले आहेत.
मुंबईच्या कुर्ला स्टेशन परिसरात कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी
– रस्ता ओसाड, दुकाने बंद, पोलिसांची पेट्रोलिंग सुरू…
– शुक्रवारी आठ ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत कडक लाॅकडाऊन…
– अत्यावश्यक सेवा वगळता सगळी वाहतूक बंद…
– बसेसही रिकाम्या धावताना पाहायला मिळत आहेत…
– रिक्षाच्याही लांबच्या लाॅब रांगा लागल्यायत…टॅक्सीही जागीच थांबल्यायत…
– स्टेशन परिसरात ९० टक्के वर्दळ कमी.
नवी मुंबई
कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-या 286 जणांकडून 1 लक्ष 12 हजार दंड वसूली
महापालिका क्षेत्रात कोव्हीड काळात 1 कोटी 78 लक्षहून अधिक दंडात्मक वसूली
सामाजिक आरोग्याला धोका पोहचविणाऱ्यांन विरोधात दंडात्मक कारवाई
प्रत्येक वॉर्डमध्ये नियुक्त पोलीसांसह दक्षता पथकांव्यतिरिक्त 155 कर्मचा-यांची 31 विशेष दक्षता पथके तैनात
नागरिकांमध्ये मास्क वापराचे गांभीर्य यावे याकरिता विविध माध्यमांतून जनजागृती
मिशन ब्रेक द चेन ची अंमलबजावणी करताना बेड्स सह रुग्णालयीन सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ
औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातल्या इंदापूर गावात निवडणुकीच्या कारणावरून अविराज निकम या तरुणाच्या घरावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास 10 ते 15 जणांच्या टोळक्याने एकत्र येत अर्वाच्च शिवीगाळ करत हा हल्ला करण्यात आला यावेळी घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली सोबतच घराच्या खिडक्याही फोडण्यात आल्या आणि घरावर तुफान दगडफेक करण्यात आली या घटनेनंतर खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मुंबईत विकेंड लॉकडाऊन, वांद्र्यात रस्त्यांवर शुकशुकाट
महाराष्ट्र: मुंबई के बांद्रा में वीकेंड लॉकडाउन के दौरान सड़कें सुनसान दिखीं। #COVID19
महाराष्ट्र सरकार ने शुक्रवार रात 8 बजे से सोमवार सुबह 7 बजे तक वीकेंड लॉकडाउन लागू किया है। pic.twitter.com/I5U09MQO0A
— ANI_HindiNews (@AHindinews) April 10, 2021
नागपूरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटवर पोलीसांची कारवाई
– सेक्स रॅकेटमध्ये भोजपुरी अभिनेत्री आणि मॅाडेल सापडल्याची माहिती
– एसएसबीचा नागपूरातील हॅाटेल कृष्णा वर छापा
– हायप्रोफाईल दलाल जेरबंद, एक दलाल फरार
– लॅाकडाऊनमुळे कामं बंद असल्याने वेशाव्यवसाय करत असल्याची माहिती
पुणे
– लॉकडाऊनमध्ये शहरातील वनविभागाच्या टेकड्या वनोद्याने अशी ठिकाणे या नियमानुसार बंद राहणार आहेत,
– शुक्रवार संध्याकाळपासून ते सोमवारी सकाळ पर्यंत शहराच्या टेकड्या, गड, वनउद्याने बंद असणार आहे.
– जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार ते शुक्रवार संध्याकाळ ते सकाळपर्यंत संचारबंदी आहे.
– या वेळेत वन विभागात फिरता येणार नाही.
– सोमवारी संचारबंदी संपल्यावर दहा वाजेपर्यंत उद्याने व्यायामासाठी सुरू राहणार आहेत,
– उपवनसंरक्षक राहुल पाटील यांची माहीती
नागपूर जिल्ह्यातील वाडीच्या वेल ट्रीट कोवीड हॅास्पिटलमधील अग्नितांडव
– आगीत चार जणांचा मृत्यू, 20 जणांची सुटका
– कोवीड रुग्णांसह 50 रुग्ण घेत होते उपचार
– तिसऱ्या आणि चौथ्या माळ्यावर आयसीयू मध्ये लागली आग
– ३० बेडची क्षमता असलेल्या रुग्णालयात ५० रुग्णांवर उपचार
– इलेक्ट्रीक आणि फायर ॲाडीटवर निर्माण झाले प्रश्न
राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसासह काही भागांत गारपीटही होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Nagpur Corona Hospital Fire : नागपुरातील कोरोना रुग्णालयाला आग
पालकमंत्री नितीन राऊत यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी
या घटनेच्या चौकशीचे आदेश , संबंधित विभागामार्फत केली जाणार चौकशी
चौकशी नंतर दोषींवर कारवाई केली जाईल
इलेक्ट्रिक कनेक्शन व्यवस्थित होते की नाही याची सुद्धा चौकशी करण्यात येईल
रुग्णांना आगीत होरपळावं लागलं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे
3 जणांचा या घटनेत मृत्यू झाला. एका रुग्णांचा आधीच मृत्यू झाला तर 2 दोघांचा दुसरीकडे शिफ्ट करताना मृत्यू झाला
नागपुरातील वेल ट्रीट या कोरोना रुग्ण असलेल्या रुग्णालयाला आग
रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार
आग लागल्यानंतर मोठा गोंधळ
रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आलं.
या आगीत 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
काहीजण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात, मुंबईत लसीचा ठणठणाट आहे व पंतप्रधानांनी ‘लस उत्सव’ साजरा करण्याचे फर्मान सोडले. पंतप्रधानांचा ‘लस उत्सव’ साजरा करण्यासाठी तरी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिल्लीत जाऊन एक कोटी लसींचे पार्सल घेऊन यावे. राजकीय भांडणे आहेत, पण त्या भांडणात आपल्याच लोकांचे जीव का घ्यायचे? महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेने कधीतरी आजच्या विरोधी पक्षालाही सत्तेवर बसवलेच होते. तेवढे तरी इमान राखा. ‘लस’ जनतेसाठी आहे. फालतूच्या राजकारणासाठी नाही. जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत ‘गांडू’च म्हणावे लागेल.
रडतखडत कसेबसे 17 लाख डोस आले. महाराष्ट्राची लोकसंख्या व कोरोना संक्रमणाची तीव्रता सगळय़ात जास्त असताना केंद्राने हे असे पक्षपाती वागणे माणुसकीला धरून नाही. महाराष्ट्रात माणसे राहात नाहीत असे केंद्राला वाटते काय? महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ घडवता येत नसल्याने लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून लोकांत असंतोष भडकवायचा असे तर कारस्थान कोणाच्या डोक्यात शिजत नसावे ना?