LIVE | रत्नागिरीत जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेर, घरावर आणि लग्न मांडवावर कोसळले झाड

| Updated on: Apr 11, 2021 | 11:24 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | रत्नागिरीत जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेर, घरावर आणि लग्न मांडवावर कोसळले झाड
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Apr 2021 09:16 PM (IST)

    रत्नागिरीत जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेर, घरावर आणि लग्न मांडवावर कोसळले झाड

    रत्नागिरी : खेड तालुक्यातील पोसरे गावी जोरदार वादळासह पावसाची हजेरी, वादळात अनेकांच्या घरांचं नुकसान, तर घरावर आणि लग्न मांडवावर कोसळले झाड

  • 11 Apr 2021 08:27 PM (IST)

    इचलकरंजीत वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं

    इचलकरंजी : शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, शहरातील सखल भागांमध्ये घुसले पावसाचे पाणी, काही घरांमध्ये पावसाचे पाणी, गांधी विकास नगरमधील काही घरांमध्ये पाणी, पारीख कॉलनी परिसरात गटारीचे पाणी घरामध्ये घुसले, नागरिकांचे मोठे हाल, शहरातील विकली मार्केट, कुडचे मळा, शाहू पुतळा परिसरामध्ये पाणीच पाणी

  • 11 Apr 2021 08:13 PM (IST)

    भगीरथ भारत भालके यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पावसात सभा !

    भगीरथ भारत भालके यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पावसात सभा ! याबाबतचा व्हिडीओ जयंत पाटील यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर शेअर केला आहे.

  • 11 Apr 2021 06:10 PM (IST)

     छत्तीसगढ, बीजापूर येथील नक्षल हल्याच्या पार्श्वभूमीवर अलर्ट, नक्षलवाद्यांच्या हालचालींवर पोलिसांचा वॅाच 

     छत्तीसगढ, बीजापूर येथील नक्षल हल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस अलर्ट
    – गडचीरोली, गोंदियाच्या नक्षल भागात पोलिसांकडून कॉंबिंग ॲापरेशन
    – सीमाभागात नक्षलवाद्यांच्या हालचालींवर पोलिसांचा वॅाच
    – इंटेलिजेन्समार्फत नक्षलवाद्यांच्या हालचालींवर नजर
    – नक्षलवाद्यांचा सामना करण्यास पोलीस सज्ज
    – गोंदिया, गडचिरोलीतील पोलीस ठाणे अलर्टवर
    – डीआयजी संदीप पाटील यांची ‘टीव्ही  9 मराठी’ला माहिती
  • 11 Apr 2021 06:09 PM (IST)

    नव्या स्ट्रेनबाबत उपाययोजनेची जास्त आवश्यकता, डॉ. अविनाश सुपेचं बैठकीत मत

    नव्या स्ट्रेनबाबत उपाययोजनेची जास्त आवश्यकता आहे. वेळ दवडून चालणार नाही. नव्या स्ट्रेनमुळे कोरोनाची लस घेतल्यानंतरही लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकर उपाययोजना करणं गरजेचं आहे, असं मत ज्येष्ठ डॉक्टर अविनाश सुपे यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत मांडलं आहे.

  • 11 Apr 2021 05:23 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यात उन्हाच्या झळा वाढल्या, दोन दिवसांत चौघांचा मृत्यू

    नाशिक : उन्हाच्या झळांमुळे  चक्कर येऊन पडल्याने 2 दिवसात चौघांचा मृत्यू

    इंदिरानगर, उपनगर, श्रमीकनगर आणि देवळाली गावात घडली घटना

    वाढत्या उन्हामुळे चक्कर येऊन मृत्यू झाल्याचा अंदाज

    शहराचं तापमान 40.3 पर्यंत पोहोचलं

  • 11 Apr 2021 05:19 PM (IST)

    अनिल देशमुखांच्या 2 सचिवांची 5 तासांपासून चौकशी सुरुच

    महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 2 सचिवांची सीबीआय चौकशी अजूनही शुरुच

    संजीव पालांडे आणि एस. कुंदन यांची सीबीआयकडून चौकशी

    मुंबईत DRDO गेस्ट हाऊस मध्ये मागील 5 तासांपेक्षा तासांपासून चौकशी

    100 कोटी वसुली आरोप प्रकरणात सुरु आहे चौकशी

  • 11 Apr 2021 03:52 PM (IST)

    गडचिरोलीमध्ये पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक, जखमी नक्षलवाद्यावर पोलिसांकडून उपचार

    गडचिरोली : खोब्रामेंढा चकमकीत जखमी झालेल्या एका नक्षलवाद्यावर पोलीस विभागाकडून उपचार सुरू करण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील खोब्रामेंढा चकमकीत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस विभागाला यश आले होते. या चकमकीत एक नक्षलवादी जखमी झाल्याने जखमी नक्षलवाद्याला सोडून नक्षलवादी दलम जंगलात पसार झाले. या नक्षलवाद्याला पायाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर नक्षलवाद्याला पोलीस विभागाने अटक करून जखमी असल्यामुळे उपचार सुरु केले आहेत. किशोर कावडो असे या नक्षलवाद्याचे नाव आहे.

  • 11 Apr 2021 03:45 PM (IST)

    वाशीतील रिअल टेकपार्क इमारतीच्या 14 वा मजल्यावर आग

    वाशीतील रिअल टेकपार्क इमारतीच्या 14 वा मजल्यावर आग

    घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल

    आगीमुळे धुराचे मोठ्या प्रमाणात लोट

    धुरामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं अवघड

    शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज

  • 11 Apr 2021 02:30 PM (IST)

    आर्थिक अडचणीला कंटाळून दुकानदाराची विष घेऊन आत्महत्या

    उस्मानाबाद – आर्थिक अडचणीला कंटाळून सांजा या गावातील नव्हावी ( कटिंग ) दुकानदाराची विष घेऊन आत्महत्या

    आमची दुकाने बंद आहेत , सरकारचा चुकीचा निर्णय आहे , माझ्या लहान लेकरांचे मी 5 हजार रुपयात कसे भागवायचे असा आत्महत्या करण्यापूर्वी चिट्ठीत उल्लेख

    मनोज दगडू झेंडे असे आत्महत्या केलेल्या कटिंग दुकानदाराचे नाव , विष घेऊन केली आत्महत्या

    उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करताना मृत्यू

    त्यांच्या पश्चत 2 मुले व एक मुलगी पत्नी असा परिवार

  • 11 Apr 2021 01:34 PM (IST)

    लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला १ कोटींचा टप्पा

    देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर असून आज राज्याने त्यात विक्रमी नोंद केली असून आतापर्यंत सुमारे १ कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत १ कोटी ३८ हजार ४२१ जणांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत या आकडेवारीत अजून वाढ होईल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. या विक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.

  • 11 Apr 2021 12:50 PM (IST)

    राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके याना मनसेचा पाठिंबा

    पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणूक – राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके याना मनसेचा पाठिंबा, पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणूकीत मनसे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी उतरणार मैदानात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव दिलीप धोत्रे यांची माहिती

  • 11 Apr 2021 11:56 AM (IST)

    कल्याण मध्ये रिक्षा चालकावर धडक कारवाई

    कल्याण डोंबिवलीत आज पासून सर्व रिक्षा चालकांना आर टी पी सी आर चा निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य करण्यात आला आहे. रिक्षात दोन पेक्षा जास्त प्रवाशी बसवता येणार नाही. हा नियम असताना कल्याण मध्ये अनेक रिक्षा चालकांनी नियमांचे उल्लंघन केले. कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी या रिक्षा चालकांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत 12 रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सिनियत पाई नारायण बनकर यांनी केली आहे.

  • 11 Apr 2021 11:27 AM (IST)

    सचिन वाज़ेचा साथीदार एपीआई रियाज़ काज़ीला अटक

    सचिन वाज़ेचा साथीदार एपीआई रियाज़ काज़ीला अटक

    रियाज काजी ह्याची अनेक वेळ एनआईए अधिकार्यानीं केली होती चौकशी

  • 11 Apr 2021 11:26 AM (IST)

    परमबीर सिंहनी केलेल्या आरोप प्रकरणात सीबीआई तर्फे दोन लोकांना पाठविन्यात आला आहे समन्स

    परमबीर सिंहनी केलेल्या आरोप प्रकरणात सीबीआई तर्फे दोन लोकांना पाठविन्यात आला आहे समन्स

    है दोन्ही पूर्व ग्रहमंत्री अनिल देशमुखचे पी.ए. कुंदन आणि पलांडे आहेत

    सीबीआई आज दोघांचे जबाब नोंदविनार

    परमबीर सिंह हयांच्या प्रमाणे एसीपी संजय पाटिल आणि डिसीपी राजू पाटिल दोघांनी पलांडेच नाव घेतला होता

    ह्या दोघांच्या महितीं प्रमाणे पलांडे म्हणाला होता कि मंत्री महोदय ह्याची अपेक्षा होती कि प्रत्येक बार आणि पब कडूंन 2 ते 3 लाख रुपए वसूली केली जावी

  • 11 Apr 2021 10:16 AM (IST)

    भाजपचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण वरखंडे यांचे कोरोनाने निधन

    पालघर – भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण वरखंडे  यांचे गुजरात वापी येथे कोरोनाने निधन.

    कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर  4 एप्रिल रोजी वापी येथे करण्यात आले होते उपचारासाठी दाखल.

    गेल्या 8 दिवसापासून वरखंडे कोरोनाशी झुंज देत होते,

  • 11 Apr 2021 09:55 AM (IST)

    यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाचा विमा कंपनीला दणका

    यवतमाळ – यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाचा विमा कंपनीला दणका नांदगावच्या 40 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चा आदेश , पावसाच्या काल्पनिक नोंदीवर ठरवली होती भरपाई,

  • 11 Apr 2021 08:59 AM (IST)

    हिंगोली-वाशिम रोडवर ट्रकने घेतला अचानक पेट

    हिंगोली -वाशिम रोडवर ट्रकने घेतला अचानक पेट

    वाशिमकडून हिंगोली च्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने तालुक्यातील गोरेगाव टी पॉईंटवर घेतला पेट आगीचा भडका मोठ्या प्रमाणात

    आगीचे कारण मात्र अस्पष्ट

  • 11 Apr 2021 08:39 AM (IST)

    नाशिकमध्ये कोव्हिड केअर सेंटरची उभारणी

    नाशिक – मेट भुजबळ नॉलेज सिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, समता परिषद व मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने कोव्हिड केअर सेंटरची उभारणी

    स्व.मीनाताई ठाकरे स्टेडियम मध्ये १८० ऑक्सिजन व १०५ सीसीसी बेडची व्यवस्था

    प्रशासनाच्या मदतीला भुजबळ नॉलेज सिटी आणि समता परिषद मैदानात

    शहरात कोरोनाच्या भीषण परिस्थीती मध्ये खाजगी संस्था आल्या पुढे

  • 11 Apr 2021 08:12 AM (IST)

    पुण्यात रात्रीपासूनच ढगाळ वातावरण, पुढील 4 दिवसांत जोरदार पावसाचा इशारा

    पुण्यात रात्रीपासूनच ढगाळ वातावरण

    तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी

    पुढील चार दिवसांत पुण्यात जोरदार पावसाचा वेधशाळेचा इशारा

  • 11 Apr 2021 08:11 AM (IST)

    वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू…

    सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील पिवळी वाघिन भक्तीने एक आठवड्यापूर्वी दोन बछड्यांना जन्म दिला होता. परंतु नकळत भक्ती वाघिणीचा पाय स्वतःच्या बछड्यावर पडल्याने बछड्याचा मृत्यू झाला, बछड्याच्या शरीरात रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला असल्याचे समजते.

  • 11 Apr 2021 06:49 AM (IST)

    खामगावच्या आठवडी बाजारातील दुकानांना आग, आगीत 10 दुकाने जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान

    बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात असलेल्या आठवडी बाजार परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास भीषण आग
    दोन तासच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
    घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी
    दुकानांमधील  साहित्य जळून खाक
    व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
    आग कशामुळे लागली याची अद्याप माहिती नाही
    खामगाव पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले होते…
  • 11 Apr 2021 06:42 AM (IST)

    आरोपांना सडेतोड उत्तरं देणं गरजेचं, अन्यथा विरोधी पक्षाचा खोटेपणा खरा वाटू लागेल : सामना

    अनिल देशमुख प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने ‘सीबीआय’साठी दरवाजे उघडले. देशमुखांसारखी फुसक्या आरोपांची प्रकरणे देशात अनेक राज्यांत घडतात, पण तेथे सीबीआय पोहोचत नाही. प्रामाणिकपणाची अपेक्षा यापुढे कुणाकडून ठेवायची, हा प्रश्न आहे. आसामातील एका मतदान केंद्रावर 90 मतदारांची नोंद असताना तेथे 171 मतदान झाले व त्यास कुणी आक्षेप घेतला नाही! हे कसे रोखणार? असा सवाल शिवसेनेने सामना मुखपत्राच्या रोखठोक सदरातून केला आहे.

    गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विरोधी पक्ष सरकारची प्रतिमा बिघडविण्याची एकही संधी सोडत नाही. या सगळय़ा आरोपांना सडेतोड उत्तरे देणे गरजेचे आहे, नाही तर विरोधी पक्षाचा खोटेपणा रोज रोज ऐकून लोकांना एक दिवस खरा वाटू लागेल, असा सल्ला सामनातून देण्यात आला आहे.

Published On - Apr 11,2021 9:16 PM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.