महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
रत्नागिरी : खेड तालुक्यातील पोसरे गावी जोरदार वादळासह पावसाची हजेरी, वादळात अनेकांच्या घरांचं नुकसान, तर घरावर आणि लग्न मांडवावर कोसळले झाड
इचलकरंजी : शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, शहरातील सखल भागांमध्ये घुसले पावसाचे पाणी, काही घरांमध्ये पावसाचे पाणी, गांधी विकास नगरमधील काही घरांमध्ये पाणी, पारीख कॉलनी परिसरात गटारीचे पाणी घरामध्ये घुसले, नागरिकांचे मोठे हाल, शहरातील विकली मार्केट, कुडचे मळा, शाहू पुतळा परिसरामध्ये पाणीच पाणी
भगीरथ भारत भालके यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पावसात सभा ! याबाबतचा व्हिडीओ जयंत पाटील यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर शेअर केला आहे.
नव्या स्ट्रेनबाबत उपाययोजनेची जास्त आवश्यकता आहे. वेळ दवडून चालणार नाही. नव्या स्ट्रेनमुळे कोरोनाची लस घेतल्यानंतरही लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकर उपाययोजना करणं गरजेचं आहे, असं मत ज्येष्ठ डॉक्टर अविनाश सुपे यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत मांडलं आहे.
नाशिक : उन्हाच्या झळांमुळे चक्कर येऊन पडल्याने 2 दिवसात चौघांचा मृत्यू
इंदिरानगर, उपनगर, श्रमीकनगर आणि देवळाली गावात घडली घटना
वाढत्या उन्हामुळे चक्कर येऊन मृत्यू झाल्याचा अंदाज
शहराचं तापमान 40.3 पर्यंत पोहोचलं
महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 2 सचिवांची सीबीआय चौकशी अजूनही शुरुच
संजीव पालांडे आणि एस. कुंदन यांची सीबीआयकडून चौकशी
मुंबईत DRDO गेस्ट हाऊस मध्ये मागील 5 तासांपेक्षा तासांपासून चौकशी
100 कोटी वसुली आरोप प्रकरणात सुरु आहे चौकशी
गडचिरोली : खोब्रामेंढा चकमकीत जखमी झालेल्या एका नक्षलवाद्यावर पोलीस विभागाकडून उपचार सुरू करण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील खोब्रामेंढा चकमकीत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस विभागाला यश आले होते. या चकमकीत एक नक्षलवादी जखमी झाल्याने जखमी नक्षलवाद्याला सोडून नक्षलवादी दलम जंगलात पसार झाले. या नक्षलवाद्याला पायाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर नक्षलवाद्याला पोलीस विभागाने अटक करून जखमी असल्यामुळे उपचार सुरु केले आहेत. किशोर कावडो असे या नक्षलवाद्याचे नाव आहे.
वाशीतील रिअल टेकपार्क इमारतीच्या 14 वा मजल्यावर आग
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल
आगीमुळे धुराचे मोठ्या प्रमाणात लोट
धुरामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं अवघड
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज
उस्मानाबाद – आर्थिक अडचणीला कंटाळून सांजा या गावातील नव्हावी ( कटिंग ) दुकानदाराची विष घेऊन आत्महत्या
आमची दुकाने बंद आहेत , सरकारचा चुकीचा निर्णय आहे , माझ्या लहान लेकरांचे मी 5 हजार रुपयात कसे भागवायचे असा आत्महत्या करण्यापूर्वी चिट्ठीत उल्लेख
मनोज दगडू झेंडे असे आत्महत्या केलेल्या कटिंग दुकानदाराचे नाव , विष घेऊन केली आत्महत्या
उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करताना मृत्यू
त्यांच्या पश्चत 2 मुले व एक मुलगी पत्नी असा परिवार
देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर असून आज राज्याने त्यात विक्रमी नोंद केली असून आतापर्यंत सुमारे १ कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत १ कोटी ३८ हजार ४२१ जणांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत या आकडेवारीत अजून वाढ होईल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. या विक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.
पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणूक – राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके याना मनसेचा पाठिंबा, पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणूकीत मनसे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी उतरणार मैदानात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव दिलीप धोत्रे यांची माहिती
कल्याण डोंबिवलीत आज पासून सर्व रिक्षा चालकांना आर टी पी सी आर चा निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य करण्यात आला आहे. रिक्षात दोन पेक्षा जास्त प्रवाशी बसवता येणार नाही. हा नियम असताना कल्याण मध्ये अनेक रिक्षा चालकांनी नियमांचे उल्लंघन केले. कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी या रिक्षा चालकांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत 12 रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सिनियत पाई नारायण बनकर यांनी केली आहे.
सचिन वाज़ेचा साथीदार एपीआई रियाज़ काज़ीला अटक
रियाज काजी ह्याची अनेक वेळ एनआईए अधिकार्यानीं केली होती चौकशी
परमबीर सिंहनी केलेल्या आरोप प्रकरणात सीबीआई तर्फे दोन लोकांना पाठविन्यात आला आहे समन्स
है दोन्ही पूर्व ग्रहमंत्री अनिल देशमुखचे पी.ए. कुंदन आणि पलांडे आहेत
सीबीआई आज दोघांचे जबाब नोंदविनार
परमबीर सिंह हयांच्या प्रमाणे एसीपी संजय पाटिल आणि डिसीपी राजू पाटिल दोघांनी पलांडेच नाव घेतला होता
ह्या दोघांच्या महितीं प्रमाणे पलांडे म्हणाला होता कि मंत्री महोदय ह्याची अपेक्षा होती कि प्रत्येक बार आणि पब कडूंन 2 ते 3 लाख रुपए वसूली केली जावी
पालघर – भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण वरखंडे यांचे गुजरात वापी येथे कोरोनाने निधन.
कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर 4 एप्रिल रोजी वापी येथे करण्यात आले होते उपचारासाठी दाखल.
गेल्या 8 दिवसापासून वरखंडे कोरोनाशी झुंज देत होते,
यवतमाळ – यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाचा विमा कंपनीला दणका
नांदगावच्या 40 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चा आदेश ,
पावसाच्या काल्पनिक नोंदीवर ठरवली होती भरपाई,
हिंगोली -वाशिम रोडवर ट्रकने घेतला अचानक पेट
वाशिमकडून हिंगोली च्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने तालुक्यातील गोरेगाव टी पॉईंटवर घेतला पेट आगीचा भडका मोठ्या प्रमाणात
आगीचे कारण मात्र अस्पष्ट
नाशिक – मेट भुजबळ नॉलेज सिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, समता परिषद व मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने कोव्हिड केअर सेंटरची उभारणी
स्व.मीनाताई ठाकरे स्टेडियम मध्ये १८० ऑक्सिजन व १०५ सीसीसी बेडची व्यवस्था
प्रशासनाच्या मदतीला भुजबळ नॉलेज सिटी आणि समता परिषद मैदानात
शहरात कोरोनाच्या भीषण परिस्थीती मध्ये खाजगी संस्था आल्या पुढे
पुण्यात रात्रीपासूनच ढगाळ वातावरण
तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी
पुढील चार दिवसांत पुण्यात जोरदार पावसाचा वेधशाळेचा इशारा
सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील पिवळी वाघिन भक्तीने एक आठवड्यापूर्वी दोन बछड्यांना जन्म दिला होता. परंतु नकळत भक्ती वाघिणीचा पाय स्वतःच्या बछड्यावर पडल्याने बछड्याचा मृत्यू झाला, बछड्याच्या शरीरात रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला असल्याचे समजते.
अनिल देशमुख प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने ‘सीबीआय’साठी दरवाजे उघडले. देशमुखांसारखी फुसक्या आरोपांची प्रकरणे देशात अनेक राज्यांत घडतात, पण तेथे सीबीआय पोहोचत नाही. प्रामाणिकपणाची अपेक्षा यापुढे कुणाकडून ठेवायची, हा प्रश्न आहे. आसामातील एका मतदान केंद्रावर 90 मतदारांची नोंद असताना तेथे 171 मतदान झाले व त्यास कुणी आक्षेप घेतला नाही! हे कसे रोखणार? असा सवाल शिवसेनेने सामना मुखपत्राच्या रोखठोक सदरातून केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विरोधी पक्ष सरकारची प्रतिमा बिघडविण्याची एकही संधी सोडत नाही. या सगळय़ा आरोपांना सडेतोड उत्तरे देणे गरजेचे आहे, नाही तर विरोधी पक्षाचा खोटेपणा रोज रोज ऐकून लोकांना एक दिवस खरा वाटू लागेल, असा सल्ला सामनातून देण्यात आला आहे.