LIVE | अमरावती : धारणीत जीर्ण इमारत कोसळली

| Updated on: Apr 15, 2021 | 11:28 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | अमरावती : धारणीत जीर्ण इमारत कोसळली
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Apr 2021 08:22 PM (IST)

    अमरावती : धारणीत जीर्ण इमारत कोसळली

    अमरावती : धारणीमध्ये मुख्य मार्गावरील चर्च समोरील फारुख शेख यांची जीर्ण दुमजली इमारत अचानक कोसळली, ही घटना संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, कोसळलेल्या जीर्ण इमारतीला बघण्यासाठी धारणी करांची मोठी गर्दी

  • 15 Apr 2021 06:44 PM (IST)

    पवार साहेबांनी शेवटी भगीरथ भालकेंना उमेदवारी दिली, आता त्यांना निवडून द्या- अजित पवार

    उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरपुरात बोलता आहेत. महाविकास आघाडी उमेदवाराच्या समर्थनात आयोजित सभेत ते बोलत आहेत.  भारत भालके आपल्याला सोडून गेले. राजूबापू पाटील आपल्याला सोडून गेले.  पवार साहेबांनी शेवटी भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. मी आतापर्यंत कोणत्याच मतदारसंघाला एवढा वेळ दिलेला नाही. या काळात मी आनेकांच्या भेटी घेतल्या. जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्ता भरणे यांनी सुद्धा या भागातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

  • 15 Apr 2021 06:11 PM (IST)

    ही शिवसेना आता बाळासाहेबांची नाही, देवेंद्र फडणवीस यांची सकडून टीका

    बेळगावातून देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. ते शिवसेनेवर सडकून टीका करत आहेत. ही शिवसेना बाळासाहेबांची नाही. संजय राऊत हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसला मदत करण्यासाठी आले आहेत. ही बाळासाहेबांची शिवसेना उरली नाहीये. काँग्रेससोबत राहून शिवसेनेने अजान स्पर्धा घेतली. आम्ही माहाराष्ट्राला सांगितलं की महाराष्ट्रात अजान नाही तर शिवगान स्पर्धा होईल. ही स्पर्धा छत्रपती उदयनराजे यांच्यासोबत घेतली. महाराष्ट्रामध्ये शिवसेना उर्दूमध्ये कँलेंडर छापत आहे. यामध्ये बाळासाहेबांचं नाव जनाब असं लिहलं जातंय. महाराष्ट्रात शिवसेना आता टिपू सुलतान जयंती साजरी करत आहे. म्हणूनच जी काँग्रेस टिपू सुलतान यांची जयंती साजरी करते त्यांना  निवडून देण्याकरिता शिवसेनेचे नेते बेळगावता आले.

    महाराष्ट्र एकीकरण समितीला समोर ठेवून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली जात आहे. छत्रपतींना माणनाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून टिपू सुलतान की जय म्हणणाऱ्यांच्या गळ्यात हार टाकत असाल, तर मराठी खांदा तुम्हाला पाठिंबा देणार नाही. आम्ही जात पात धर्म मानत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजप मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे. माझा सवाल संजय राऊत ना आहे, मराठी मणुसला मुंबईत बेड नाही मरतो आहे त्याची चिंता का करीत नाही ,? त्यांचे प्रेम बेगडी आहे.

    सध्या गजात कोरोना महामारी आहे. देशात सर्वात कमी मृत्यूदर आहे. मोदींनी सर्वांचा विचार केला. गरिबांपर्यंत अन्न पोहोचलं पाहिजं याचा मोदींनी विचार केला. मोदींनी मोठे आर्थिक पॅकेज देऊन त्यांनी सर्वांना आधार दिला. आज जगातले केवळ पाच दिवस फक्त कोरोनावर लस तयार करु शकले. यामध्ये भारत आहे.

  • 15 Apr 2021 04:58 PM (IST)

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बेळगावात दाखल, बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी दाखल

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बेळगावात दाखल

    बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी दाखल

    भाजप उमेदवार मंगला अंगडी यांचा करणार प्रचार

    हिंडीलगा येथे देवेंद्र फडणवीस जाहीर सभेला करणार मार्गदर्शन

    आज सायंकाळी 7 वाजता प्रचार संपणार

    17 तारखेला मतदान

    भाजप, काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समिती अशी होत आहे तिरंगी लढत

    शुभम शेळके हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार

  • 15 Apr 2021 03:18 PM (IST)

    मुंबईत मोफत शिवभोजन थाळीला सुरुवात, मर्यादा वाढवण्याची मागणी

    मुंबईत मोफत शिवभोजन थाळीला सुरवात… – मुंबईच्या एन वार्ड परिसरात मोफत शिवभोजन थाळी सुरू… – शिवभोजन थाळीचा लाभ घेण्यासाठी गरजूंची मोठी रांग… – सरकारच्या आदेशानुसार दिवसाला केवळ २०० मोफत थाळीची सध्या तरी व्यवस्था… – सेना नगरसेवक परमेश्वर कदम यांचं छगन भुजबळांना पत्र… – मोफत शिवभोजन थाळी लाॅकडाऊन संपेपर्यंत अमर्याद करावी, २०० हून जास्त करावी, अशी कळकळीची विनंती… – २०० थाळ्यांची मर्यादा संपल्यानंतर लोकांना पुन्हा परत जावं लागतंय, त्यामुळे ही मर्यादा वाढवण्याची मागणी… – शिवभोजन थाळीत सकस आहाराचा समावेश… – आढावा घेतलाय आमचे प्रतिनीधि गिरीश गायकवाड यांनी… – फीड ओबी

  • 15 Apr 2021 02:09 PM (IST)

    डोंबिवली आयडीबीआय बँकेच्या 30 खातेदारांचे पैसे गहाळ

    डोंबिवली आयडीबीआय बँक खातेदारांचे पैसे गहाळ

    एकूण ३० खातेदारांच्या खात्यातून काढले गेले पैसे

    50 ते 60 खातेदारांचे पैसे गहाळ झाल्याचे ग्राहकांच्या आरोप

    गुढीपाडवा आणि आज या दोन दिवसात घडला हा प्रकार

    डोंबिवली पोलिसांनी ऑनलाईन चिटिंगचा सुरु केला तपास

  • 15 Apr 2021 01:09 PM (IST)

    अमरावतीत रेमडिसेव्हिर इंजेक्शनचा तुटवडा, मेडिकलसमोर मोठ्या रांगा

    अमरावती : रेमडिसेव्हिर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते आहे. आज इंजेक्शनसाठी सकाळ पासुनच कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील मेडिकल समोर मोठ्या रांगा

  • 15 Apr 2021 01:07 PM (IST)

    शरद पवारांना ब्रीच कँडीमधून डिस्चार्ज

    राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेबांना आज ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज,

    राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची माहिती

    ११ एप्रिल रोजी आदरणीय शरद पवार यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. १२ एप्रिल रोजी त्यांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवस हॉस्पिटलमध्ये विश्रांती घेतल्यानंतर आज शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची तब्येत बरी आहे. देशभरातील जनतेने, चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या शिवाय दिलेल्या पाठिंब्याबद्दल नवाब मलिक यांनी सर्वांचे आभार मानले आहेत

  • 15 Apr 2021 01:05 PM (IST)

    छोट्या व्यावसायिकांनाही आर्थिक मदत द्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

    शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, मुंबईचे डबेवाले आणि छोट्या व्यावसायिकांनाही आर्थिक मदत द्या! प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले

    काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र.

  • 15 Apr 2021 11:45 AM (IST)

    बुलडाण्यातील तलाठ्याचा तहसील कार्यालयात गळफास, परिसरात खळबळ

    बुलडाणा नांदुरा तहसील कार्यालयातील घटना, तलाठ्याने घेतला गळफास, 45 वर्षीय अनिल अंभोरे यानी घेतला गळफास, पोलीस पंचनामा सुरू, आत्महत्येचे कारण आस्पष्ट, मात्र तहसील कार्यालयात खळबळ

  • 15 Apr 2021 11:17 AM (IST)

    पालघर साधू हत्याकांडाची वर्षपूर्ती, भाजपकडून घटनास्थळी जाऊन दिवा लावत श्रद्धांजली अर्पण करणार

    नाशिक – उद्या पालघर साधू हत्याकांडाची वर्षपूर्ती

    पालघरमध्ये घटनास्थळी जाऊन दिवा लावणार आणि श्रद्धांजली अर्पण करणार

    भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले याची घोषणा

    प्रत्येकाने आपल्या घराबाहेर दिवा लावून श्रद्धांजली द्यावी – तुषार भोसले

    नाकर्त्या सरकारने तपास केला नाहीच, पण आरोपीना पाठीशी घातले

    तुषार भोसले यांचा राज्य सरकारवर घणाघात

  • 15 Apr 2021 10:47 AM (IST)

    नांदेडमध्ये मनसेचे जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांचे निधन

    नांदेड –

    मनसेचे जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांचे निधन

    हैद्राबाद इथे उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

    प्रदीर्घ काळ शिवसेनेचे होते जिल्हाप्रमुख

    काही महिन्यांपूर्वीच मनसेत केला होता प्रवेश

  • 15 Apr 2021 10:22 AM (IST)

    शहापूरमधील कुरिअर ऑफिसला आग, 7 लाखापर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज

    शहापूर

    शहापूर मधील गोठेघर बीजांकुर हॉस्पिटल जवळ असलेले ATK कुरियर ऑफिसला रात्री अचानक आग आगीत पूर्ण ऑफिस जळून खाक, शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

    आतमध्ये असलेली 4 ते 5 लाख रुपयाची रोख कॅश व लॅपटॉप, कॉम्प्युटर सह इतर सामान जळाले असून अंदाजे 7 लाखापर्यंत झाले नुकसान

    Amazon चे पार्सल या ऑफिस मधून डिलिव्हरी व्हायचे सकाळी कर्मचारी ऑफिस मध्ये गेले असताना ऑफिस मधून बाहेर धूर येतांना दिसले त्यांनी बांबूच्या साह्याने ऑफिसचे सेंटर वर केले असता आतमध्ये आग लागल्याचे दिसले त्या नंतर त्यांनी आरडाओरड करून स्थानिक टँकर बोलावून पाणी मारून आग विझवण्यात आली.

  • 15 Apr 2021 09:30 AM (IST)

    संचारबंदीच्या काळात 1 महिना मोफत शिवभोजन थाळी सरकारचा निर्णय

    सांगली –

    संचारबंदीच्या काळात 1 महिना मोफत शिवभोजन थाळी सरकारचा निर्णय

    शिवभोजनचा 90 हजार लोकांना होणार लाभ

    जिह्यात 22 केंद्रातून रोज 3 हजार थाळी चे वितरण

    गोरगरीब गरजूंना शिवभोजन थाळी चा मोटा आधार

    मनपा क्षेत्रात 8 ठिकाणी आणि तालुक्यातील ग्रामीण भागात 14 ठिकाणी शिवभोजन थाळी चा लाभ

    रोज दुपारी 12 ते 3 या वेळेत शिवभोजन केंद्र सुरू

  • 15 Apr 2021 09:29 AM (IST)

    संचारबंदीच्या पार्श्वभूमी वर राज्य सरकारने कष्टकरी वर्गाला 1500 रुपये ची मदत करण्याची घोषणा

    सांगली-

    चाळीस हजार लोकांना मिळणार 1500 चा लाभ

    मोलकरणीची नोंदच नसलेने मदती पासून वंचित राहण्याची शक्यता

    संचारबंदीच्या पार्श्वभूमी वर राज्य सरकारने कष्टकरी वर्गाला 1500 रुपये ची मदत करण्याची घोषणा

    मात्र मोलकरीण म्हणून काम करत असलेल्या महिलांची नोंदणी च नसलेने 8 हजार महिला वंचित राहानयेचा धोका

    सरकारने अडचणी च्या काळात सर्व मोलकरीण महिलांना मदत करावी असे आवाहन कामगार नेते शंकर पुजारी यांनी केले

  • 15 Apr 2021 09:06 AM (IST)

    पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ

    पिंपरी चिंचवड

    -पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ

    -पुण्याहून मुंबई कडे जाणाऱ्या लेन वर खाजगी आणि मालवाहतूक वाहनांची वर्दळ

    -संचारबंदी असतानासुद्धा वाहनांची मोठी गर्दी

  • 15 Apr 2021 08:33 AM (IST)

    पुणे-नाशिक महामार्गावर मोशी टोल नाक्यावर वाहनांची मोठी वर्दळ

    पिंपरी-चिंचवड –

    – पुणे-नाशिक महामार्गावर मोशी टोल नाक्यावर वाहनांची मोठी वर्दळ

    – या महामार्गालगत दोन एमआयडीसी असल्यामुळे वाहनांची वर्दळ सुरु

    – खाजगी उद्योगाना नियम व अटी घालून उद्योग सुरु करण्याची परवानगी

    – शहरात काल रात्री 8 वाजल्यापासून सुरु आहे संचारबंदी

  • 15 Apr 2021 08:32 AM (IST)

    नांदेडमध्ये कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने पत्नीची मुलासह आत्महत्या

    नांदेड –

    कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने पत्नीची मुलासह आत्महत्या

    लोहा शहरातील दुर्दैवी घटना

    40 वर्षीय शंकर गंदमचा उपचारा दरम्यान ग्रामीण रुग्णालयात झाला मृत्यू

    पत्नीला हे कळताच तीन वर्षाच्या मुलाला घेऊन तिने तलावात उडी मारून केली आत्महत्या

    दोन मुलींना घरी ठेऊन पत्नीने केले हे कृत्य

    तेलंगणातील हे कुटुंब उदरनिर्वाहासाठी आले होते लोहा शहरात

    लोहा पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास केलाय सुरु

  • 15 Apr 2021 07:34 AM (IST)

    नागपूरच्या कॅाटन मार्केट भाजी मंडीत मोठी गर्दी

    – नागपूरच्या कॅाटन मार्केट भाजी मंडीत मोठी गर्दी

    – हजारोंच्या संख्येंनं व्यापारी भाजी खरेदीसाठी

    – मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

    – बरेच लोक वावरतात विनामास्क

    – अत्यावश्यक सेवा म्हणून भाजी मंडी सुरु, पण गर्दीनं वाढवली चिंता

  • 15 Apr 2021 06:30 AM (IST)

    डॉ. राजू मुरुडकर आता न्यायालयीन कोठडीत

    डॉ. राजू मुरुडकर आता न्यायालयीन कोठडीत रवानगी

    दीड कोटींच्या व्हेंटीलेटर खरेदीचा ठेका मिळवून देण्याच्या बदल्यामध्ये पाच लाखांची लाच स्वीकारताना रांगेहाथ पकडलेल्या ठाणे महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरु डकर याची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

  • 15 Apr 2021 06:30 AM (IST)

    विरार, विक्रमगडसह काही भागांत मंगळवारी मध्यरात्री पाऊस

    विरार

    जिल्ह्यात विरार, विक्रमगडसह काही भागांत मंगळवारी मध्यरात्री पाऊस

    या पावसाचा सुखद अनुभव घेणार तोच यादरम्यान दोन-तीन वेळा ‘बत्तीगुल’ झाल्याने विरारवासीय घामाघूम झाले

    दुसरीकडे एप्रिल महिन्याला सुरुवात होताच उष्णतेतही दिवसेंदिवस वाढ होत आहे.

  • 15 Apr 2021 06:28 AM (IST)

    1 जूनपासून सोन्याचे दागिने आणि इतर वस्तूंसाठी हॉलमार्क बंधनकारक

    नवी दिल्ली :

    येत्या १ जून २०२१ पासून सोन्याचे दागिने आणि इतर वस्तूंसाठी हॉलमार्क बंधनकारक होणार असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे

    हॉलमार्क हे सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र असून सध्या ते ऐच्छिक आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये केंद्र सरकारने एक घोषणा करून १५ जानेवारी २०२१ पासून हॉलमार्क बंधनकारक करण्यात येईल, असे म्हटले होते

  • 15 Apr 2021 06:23 AM (IST)

    राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा

    राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा

    पुण्यातील वेल्हे तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पावसाने झोडपून काढले

    तालुक्यातील किल्ले राजगड, तोरणा परिसरात पावसाचा जोर अधिक होता

Published On - Apr 15,2021 8:22 PM

Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.