LIVE | रायगड : 20 हजारांची लाच घेतल्या प्रकरणी सुधागडचा दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात

| Updated on: Apr 17, 2021 | 12:11 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | रायगड : 20 हजारांची लाच घेतल्या प्रकरणी सुधागडचा दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Apr 2021 09:26 PM (IST)

    रायगड : 20 हजारांची लाच घेतल्या प्रकरणी सुधागडचा दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात

    रायगड : सुधागडचा दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात.

    फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनसाठी स्वीकारली 20 हजारांची लाच.

    दुय्यम निबंधक जितेंद्र वाईकर सह त्याच्या 3 साथीदारांवर गुन्हा दाखल.

    फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी 20 हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणी रायगडच्या सुधागड येथील दुय्यम निबंधक जितेंद्र वाईकर याला अटक करण्यात आली आहे. तक्रारदार यांच्या मुलाच्या नावे असलेल्या पाली येथील फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करायचे होते.

    या कामासाठी त्याने 24 हजारांची लाच मागितली होती. त्यात 20 हजारांवर तडजोड झाली. ही रक्कम आपल्या हस्तकाकरवी वाईकर याने स्वीकारली आणि रायगड एसीबीच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात अडकला.

    याप्रकरणी पोलिसांनी जितेंद्र वाईकरसह त्याच्या 3 साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे .

  • 16 Apr 2021 09:15 PM (IST)

    नाशिकमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 5 मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू

    नाशिक : वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 5 मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू, यामध्ये एका तरुणाचा देखील समावेश, वालदेवी धरणावर 9 जण गेले होते वाढदिवस साजरा करायला, 5 मुली आणि 1 मुलगा बुडाला, धरणाजवळ सेल्फी काढण्याच्या नादात तोल गेल्याची प्राथमिक माहिती, ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरू

  • 16 Apr 2021 04:13 PM (IST)

    पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हल्ला सुरुच, आणखी एक नवं ट्विट

    भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे या दोन्ही भाऊबहिणींमध्ये सध्या ट्विटरवॉर सुरु आहे. कोरोना काळात सर्वसामान्यांना आणि रुग्णांना मदत करण्यावरुन दोघांमध्ये हा ट्विटरवॉर सुरु आहे. याच अनुषंगाने पंकजा यांनी ट्विट केलंय. या ट्विटमध्ये पंकजा यांनी शेअर केलेल्या फोटोत त्या पीपीई कीट परिधान करुन कोव्हिड सेंटरमधील रुग्णांची भेट घेण्यासाठी गेल्याचे दिसत आहे.

    पंकजा मुंडे यांचं नव्या ट्विटमध्ये काय?

    पंकजा मुंडे यांनी नव्या ट्विटमघध्ये ‘पेशन्ट जागे, खासदार जाग्या, डॉक्टर जागे, आरोग्य सेवक जागे, मग.. ‘, असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

  • 16 Apr 2021 03:09 PM (IST)

    कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना कोरोनाची लागण

  • 16 Apr 2021 02:31 PM (IST)

    उस्मानाबाद कोरोना रुग्णाच्या मृत्यूचे आकडे लपवण्याचा खेळ फसला

    उस्मानाबाद – कोरोना रुग्णाच्या मृत्यूचे आकडे लपवण्याचा खेळ फसला

    मृत्यूनंतर तपासणीत कोरोनाबाधीत रुग्ण निगेटिव्ह व अवघ्या अर्ध्या तासात पुन्हा पॉझिटिव्ह

    नातेवाईकांनी आक्षेप घेताच अवघ्या अर्ध्या तासात पुन्हा मयत पॉझिटिव्ह

    जिल्हा शासकीय रुग्णालयातील केस पेपर टीव्ही 9 च्या हाती

    जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले चौकशीचे आदेश

  • 16 Apr 2021 02:30 PM (IST)

    आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या जिल्ह्यात लसींचा तुटवडा

    आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या जिल्ह्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला असून, कोव्हिड 19 लसीचा साठा संपला असुन औषधी व लस साहित्य भांडार मध्ये कोविशील्डची एकही लस सध्या शिल्लक नाही तर कोव्हॅक्सिनच्या फक्त शंभरच लसी शिल्लक आहे. तर लसीकरण केंद्रावर आज असलेला साठा संपल्यास उद्यापासून जिल्ह्यातील सर्व कोव्हिड लसीकरण बंद पडणार असल्याची शक्यता आहे.

  • 16 Apr 2021 02:06 PM (IST)

    पन्हाळा तालुक्यातील गोठे इंथल कुंभी नदी पात्रात नवरा, बायको आणि मुलाची आत्महत्या

    कोल्हापूर –

    पन्हाळा तालुक्यातील गोठे इंथल कुंभी नदी पात्रात नवरा, बायको आणि मुलाची आत्महत्या

    मृत व्यक्तींची नावे दिपक पाटील, वैशाली पाटील आणि विघ्नेश पाटील

    घटनास्थळी येवून कळे पोलीस ठाण्याने केला पंचनामा

    नातेवाईकांनी केला घटनास्थळी आक्रोश

    जीवनात झालो अपयशी, माझ्या मुलगीला आणि वडीलांना सांभाळ असे चिठ्ठीत लिहिले सापडलं

  • 16 Apr 2021 01:52 PM (IST)

    टीव्ही-9 च्या बातमीचा इम्पॅक्ट, जिल्हा सीमेवरील चेकपोस्टवर अखेर आरोग्य पथकं तैनात

    सिंधुदुर्ग –

    टीव्ही-9 च्या बातमीचा इम्पॅक्ट, जिल्हा सीमेवरील चेकपोस्टवर अखेर आरोग्य पथकं तैनात, चाकरमानी आणि जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची नोंद करुन थर्मल गण आणि ऑक्सिमीटर द्वारे तपासणी करुन दिला जातोय जिल्ह्यात प्रवेश, खारेपाटण आणि फोंडाघाट चेकपोस्टवर आजपासून आरोग्य पथकांची नियुक्ती

  • 16 Apr 2021 01:50 PM (IST)

    औरंगाबादेत आमदार प्रशांत बंब आणि पोलिसांची बाचाबाची

    औरंगाबाद –

    आमदार प्रशांत बंब आणि पोलिसांची बाचाबाची

    औरंगाबाद शहरातील महात्मा फुले चौकात बाचाबाची

    संचारबंदीत नातेवाईकांची गाडी अडवल्यामुळे झाली बाचाबाची

    प्रशांत बंब यांचा नातेवाईकांची पोलिसांनी अडवली होती गाडी

    नातेवाईकांची गाडी अडवल्यामुळे प्रशांत बंब यांची पोलिसांशी बाचाबाची

  • 16 Apr 2021 01:36 PM (IST)

    एनसीबीकडून हायटेक ड्रग्स बनवण्याची फॅक्टरी उद्धवस्त

    एनसीबी ने केली हायटेक ड्रग्स बनवण्याची फॅक्टरी उद्धवस्त

    नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो होणे घरातच हायड्रोफोनिक वीड बनवणाऱ्याची टोळी केली उद्धवस्त

    भारतामध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारे ड्रग्स तयार जात होते…

    हायड्रोफोनिक वीड बनवण्यासाठी लागणारी बियाणे अमेरिकेच्या ॲम्स्टरडॅम मधून आणली जात होती

    हा ड्रग्स बनवण्यासाठीचा सर्व सेटअप डोंबिवलीतील पलावा सिटी या ठिकाणी करण्यात आला होता…

    या प्रकरणात दोन नागरिकांना अटक करण्यात आली होती

    एका नायजेरियन नागरिकाचा यात समावेश असून त्याला सुद्धा अटक करण्यात आली आहे…

    एनसीबी ने 1 किलो हायड्रोफोनिक विड जप्त केलं आहे ज्याची किंमत 80 लाख रु आहे….

    याचं वैशिष्ट्य म्हणजे हे अशा प्रकारचे ड्रेस बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या मातीचा वापर न करता आधुनिक पद्धतीने बनवण्यात येत होते…

    भारतात पहिल्यांदाच अशाप्रकारच ड्रग्स बनवण्याच रॅकेट समोर आल आहे…

  • 16 Apr 2021 01:33 PM (IST)

    औरंगाबाद आमदार प्रशांत बंब आणि पोलिसांची बाचाबाची

    औरंगाबाद :-

    आमदार प्रशांत बंब आणि पोलिसांची बाचाबाची

    औरंगाबाद शहरातील महात्मा फुले चौकात बाचाबाची

    संचारबंदीत नातेवाईकांची गाडी अडवल्यामुळे झाली बाचाबाची

    प्रशांत बंब यांचा नातेवाईकांची पोलिसांनी अडवली होती गाडी

    नातेवाईकांची गाडी अडवल्यामुळे प्रशांत बंब यांची पोलिसांशी बाचाबाची

  • 16 Apr 2021 01:01 PM (IST)

    जिथे लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे, तिथं राजकारण नको, धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना उत्तर

    धनंजय मुंडेंनी दिलं पंकजा मुंडेंना उत्तर

    मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांना पत्र लिहण्यापुर्वी पुर्ण माहिती घेवून पंतप्रधांनांना एखादे पत्र पाठवावे आणि लसीसाठी आग्रह धरावा

    धनंजय मुंडेचा ट्विटरद्वारे हल्लाबोल

    पंकजा मुंडेंनी लिहलं होतं मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना पत्र

    राजकारण इतरत्र करा पण जिथे लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे तीथं नको

  • 16 Apr 2021 12:45 PM (IST)

    नागपुरात हाहाःकार, रुग्ण वाढल्याने ॲाक्सीजनचा मोठा तुटवडा

    – नागपूरात हाहाःकार, रुग्ण वाढल्याने ॲाक्सीजनचा मोठा तुटवडा

    – नागपूरात आत्ता ३० ते ४० मेट्रिक टन ॲाक्सीजनची नितांत गरज

    – जिल्ह्यात रोज ३० ते ४० मेट्रिक टन ॲक्सीजनचा तुटवडा

    – प्रत्येक हॅास्पीटलला २५ ते ३० टक्के ॲाक्सीजनचा तुटवडा

    – ॲाक्सीजन अभावी गंभीर रुग्णांचा जीव जाण्याची वेळ

    – नागपूर जिल्ह्यात रोज १८० मेट्रिक टन ॲाक्सीजनची गरज

    – सध्या जिल्ह्यात १५० मेट्रिक टन ॲाक्सीजनचा पुरवठा

    – मध्यप्रदेश आणि छत्तीसगडवरील ॲाक्सीजन आणण्याचा प्रयत्न

    – ॲाक्सीजन मिळावा म्हणून अधिकाऱ्यांची धावपळ

  • 16 Apr 2021 12:18 PM (IST)

    ऐन कोरोना काळात गूड न्यूज! यावर्षी चांंगला पाऊसकाळ, सामान्य मॉन्सूनचा हवामान विभागाचा पहिला अंदाज

    कोरोना संकटाच्या काळात आनंदाची बातमी आहे. यावर्षी पाऊसकाळ चांगला रहाणार असून मॉन्सून सामान्य असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. 98 टक्के पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान आपल्याकडे मॉन्सूनचा पाऊस पडतो. गेल्या तीन वर्षापासून तो सामान्य आहे. येणारा पावसाळाही त्याला अपवाद नसेल. 96 ते 104 टक्क्याच्या दरम्यानचा पाऊस सामान्य मॉन्सून म्हणून गणला जातो. काही दिवसापुर्वी स्कायमेट ह्या दुसऱ्या हवामान संस्थेनेही मॉन्सून सामान्य असेल म्हणून जाहीर केलं आहे. त्यानंतर आता सरकारच्या हवामान विभागानेही प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही गूड न्यूज दिली आहे.

  • 16 Apr 2021 10:59 AM (IST)

    औरंगाबादेत चोरी केलेले रेमडेसिव्हीर इंजेक्शन विकणारी टोळी गजाआड

    औरंगाबाद …

    घाटी रुग्णालयातून चोरी केलेले रेमडेसिव्हीर इंजेक्शन विकणारी टोळी गजाआड..

    चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यासह दोन मेडिकल चालक गजाआड.

    अनिल बोहते असं कर्मचाऱ्याचे नाव तर मंदार भालेराव, अभिजित तौर अशी दोन मेडिकल चालकांची नावे.

    दोन दिवसांपूर्वी घाटी रुग्णालयातून झाली होती 30 ते 35 इंजेक्शनची चोरी

    प्रत्येकी 15 हजार रुपयात विकायचे रेमडेसीविर इंजेक्शन..

    विना प्रिस्क्रिप्शन विना पावतीचे इंजेक्शन देत चढ्या भावाने विक्री करून सुरू होता काळा बाजार

    पुंडलीक नगर पोलिसांनी सापळा रचून केली तिघांना अटक…

  • 16 Apr 2021 10:35 AM (IST)

    बारामतीत सात ठिकाणी शिवभोजन थाळी, दररोज 850 थाळ्या दिल्या जाणार पार्सल

    बारामती : बारामतीत सात ठिकाणी शिवभोजन थाळीची सोय.. – शिवभोजन थाळी मिळणार पार्सल.. – दररोज ८५० शिवभोजन थाळ्या दिल्या जाणार पार्सल.. – बारामती शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी शिवभोजन थाळीची सुविधा.. – तहसीलदार विजय पाटील यांची माहिती..

  • 16 Apr 2021 10:35 AM (IST)

    एमआयडीसीमध्ये काम करणारे अनेक कामगार कोल्हापुरात अडकले, गर्दीमुळे रेल्वे प्रशासनाकडून नकार

    कोल्हापूर

    एमआयडीसी मध्ये काम करणारे अनेक कामगार कोल्हापुरात अडकले

    झारखंड युपी बिहार ला जाण्यासाठी कोल्हापूरातून आठवड्याला एकच रेल्वे

    आज पहाटे चार वाजता सुटली धनबाद एक्सप्रेस

    मात्र गर्दीमुळे अनेक कामगारांना रेल्वे प्रशासन रोखलं

    तिकिटाचे पैसे घेऊन प्रवेश न दिल्याने कामगार संतप्त

    कामगारांना पुन्हा आठवडाभर करावी लागणार प्रतीक्षा

  • 16 Apr 2021 10:33 AM (IST)

    चंद्रपुरातील कोळसा खाण परिसरात मोठा अपघात, चार जण गंभीर जखमी

    चंद्रपूर:– राजुरा तालुक्यातील कोळसा खाण परिसरात मोठा अपघात, हजेरी कार्यालयात घुसला अनियंत्रित अजस्त्र डंपर, गोवरी येथील या खाण कार्यालयात होते कामगार आणि अधिकारी, प्राथमिक माहितीनुसार 2 अधिकारी 2 कामगार गंभीर जखमी, जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी प्रशासनाची धावपळ, डंपर घटनास्थळावरून हटविण्यासाठी सुरू झाली कारवाई, अपघाताचा वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड व्यवस्थापनाच्या वतीने प्राथमिक तपास सुरू

  • 16 Apr 2021 10:18 AM (IST)

    बारामतीत सात ठिकाणी शिवभोजन थाळीची सोय

    बारामती :

    – बारामतीत सात ठिकाणी शिवभोजन थाळीची सोय – शिवभोजन थाळी मिळणार पार्सल – दररोज ८५० शिवभोजन थाळ्या दिल्या जाणार पार्सल – बारामती शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी शिवभोजन थाळीची सुविधा – तहसीलदार विजय पाटील यांची माहिती

  • 16 Apr 2021 09:30 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये दाखल

    बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये दाखल..

    अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसोबत कोरोनासंदर्भात होणार चर्चा..

    वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर उपाययोजनांबाबत होतेय बैठक..

    बारामतीतील बैठकीनंतर पुण्यातही होणार बैठक..

  • 16 Apr 2021 08:06 AM (IST)

    पुण्यात कोरोना काळात जैव वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण वाढले

    पुणे

    कोरोना काळात जैव वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण वाढले

    दिवसाला सरासरी सहा हजार किलोपेक्षा अधिक कोरोनाचा कचरा होतो निर्माण

    तर, अन्य वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण आठ हजार किलोपेक्षा अधिक

    हा जैविक कचरा इनसिनीरेटरमध्ये जातोय जाळला

    मास्कचा वापर वाढल्याने हा कचराही मोठ्या प्रमाणावर जमा होत असून शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट

  • 16 Apr 2021 08:05 AM (IST)

    परप्रांतीयांची नाशिकरोड रेल्वे स्थानकावर गर्दी

    नाशिक – परप्रांतीयांची नाशिकरोड रेल्वे स्थानकावर गर्दी

    नाईक परप्रांतीय आपल्या गावाकडे रवाना

    लॉक डाऊन आणखी वाढण्याची भीतीने वाढली गर्दी

    30 एप्रिल पर्यंत मुंबई ते दानापूर विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था

  • 16 Apr 2021 07:39 AM (IST)

    सोलापुरात 34 हजार बांधकाम, 18 हजार घरेलू कामगारांना मदतीचा लाभ मिळणार

    सोलापूर –

    34 हजार बांधकाम 18 हजार घरेलू कामगारांना मदतीचा लाभ मिळणार

    संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध घालताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातावर पोट असलेल्या घटकांना प्रत्येकी 1500 रुपयांची केली आहे मदत जाहीर

    या संदर्भातला आदेश आल्यानंतर वाटपाची दिशा आणि निकष स्पष्ट होणार असल्याची कामगार आयुक्त निलेश यलगुंडे यांची माहिती

  • 16 Apr 2021 07:10 AM (IST)

    नाशकात चक्कर आल्याने काल 9 जण दगावले

    नाशिक –

    चक्कर आल्याने शहरात काल 9 जण दगावले

    दोन दिवसांपूर्वी देखील एकाच दिवसात चक्कर आल्याने 4 जणांचा मृत्यू

    नाशिकमधल्या नव्या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात देखील आश्चर्य

    चक्कर येणे, मळमळ होणे यासह कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष नको

    शहरातील तज्ञ डॉक्टरांचा नागरिकांना सल्ला

  • 16 Apr 2021 06:59 AM (IST)

    नाशकातील करन्सी नोट प्रेस आणि सिक्युरिटी प्रेस राहणार 30 एप्रिलपर्यंत बंद

    नाशिक –

    करन्सी नोट प्रेस आणि सिक्युरिटी प्रेस राहणार 30 एप्रिलपर्यंत बंद

    लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर नोट प्रेस चा निर्णय

    प्रेसच्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या विभागातील कर्मचारी शिफ्ट नुसार येणार

    दोन्ही मिळून 3000 च्या वर कर्मचारी

    सध्या 10 ते 500 रुपयांच्या 1100 दशलक्ष नोटा उपलब्ध

    त्यामुळे देशात चलनाचा तुटवडा नाही

  • 16 Apr 2021 06:41 AM (IST)

    प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळींचं वाटप होणार

    प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळींचं वाटप करायला केंद्र सरकारची परवानगी,

    6,442 मेट्रिक टन डाळींचे वाटप होणार

    प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंर्गत शिल्लक राहिलेल्या डाळींचं वाटप करायला केंद्र सरकारनं आज परवानगी दिली आहे

    त्यानुसार शिल्लक डाळीचं लाभार्थींना लवकरच वाटप केलं जाईल, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली

  • 16 Apr 2021 06:39 AM (IST)

    काँग्रेसचे उमेदवार अजित मंगराज यांचा मृत्यू, ओदिशा निवडणूक रद्द

    ओडिशाच्या पीपली विधानसभा निवडणुकीची पोटनिवडणूकही उद्या होणार होती

    पण या निवडणुकीतले काँग्रेसचे उमेदवार अजित मंगराज यांचा काल मृत्यू झाला

    त्यामुळे या ठिकाणची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेताला आहे

    निवडणुकीसंदर्भात नवी अधिसूचना आयोग जाहीर करणार आहे

  • 16 Apr 2021 06:27 AM (IST)

    भारतीय हवाई दलाने भविष्यासाठी दीर्घकालीन योजना आणि धोरण तयार करावं, संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचे निर्देश

    भारतीय हवाई दलानं भविष्यातील आव्हानांना तोंड देण्याच्या दृष्टीनं आपली क्षमता वाढविण्यासाठी दीर्घकालीन योजना आणि धोरण तयार करावं असे निर्देश संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले

Published On - Apr 16,2021 9:26 PM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.