LIVE | शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागरे यांचा अपघात, गाडी थेट रस्त्याच्या खाली ओढ्यात

| Updated on: Apr 19, 2021 | 10:08 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागरे यांचा अपघात, गाडी थेट रस्त्याच्या खाली ओढ्यात
Breaking News
Follow us on

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Apr 2021 06:59 PM (IST)

    शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागरे यांचा अपघात, गाडी थेट रस्त्याच्या खाली ओढ्यात

    अहमदनगर :

    शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागरे यांचा अपघात, गाडी थेट रस्त्याच्या खाली ओढ्यात गेली

    अहमदनगरहून शेवगावकडे येत असताना माका या गावानजीक अपघात

    तहसीलदार अर्चना पागिरे ह्या सुरक्षित असून त्यांना किरकोळ जखमी

    उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले

    स्वतःलाच गाडी चालवित होत्या, नजरचुकीने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहिती

  • 19 Apr 2021 05:54 PM (IST)

    भाजपचे शिष्टमंडळ राजभवनावर, मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत राज्यपालांकडे तक्रार

    भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला

    भाजप आमदार अतुल भातखळकर आणि भाजपचे नेते राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवनवर दाखल

    राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची राज्यपालांकडे तक्रार करणार

  • 19 Apr 2021 04:29 PM (IST)

    औरंगाबादमधील कन्नड परिसरात धावत्या ट्रकला आग, रस्त्यावर भयानक चित्र

    औरंगाबाद :

    औरंगाबादमधील कन्नड परिसरात धावत्या ट्रकला आग

    चाळीसगाव रोडवरील घटना

    ट्रकच्या इंजीनमध्ये आग लागल्याने चालक कक्षाने धरला पेट

    मुख्य मार्गावरच जळत राहिला ट्रक

    कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही, मोठ्या प्रमाणात नुकसान

    आगीने केले रौद्ररूप धारण, रस्त्यावर भयानक चित्र

  • 19 Apr 2021 03:24 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्याविरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार

    राज्याच्या दोन्ही सभागृहाचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्याविरोधात विलेपार्ले पोलीस स्थानकात तक्रार, राष्ट्रवादीच्या लीगल सेलचे पदाधिकारी नितीन माने यांनी दिली तक्रार, सरकारी कामात व्यत्यय आणणे तसेच पोलीस अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली

  • 19 Apr 2021 03:20 PM (IST)

    NIA चे नवे आयजी आणि SP मनसुख हिरेन यांच्या घरी दाखल

    ठाणे

    NIA चे नवे आयजी ज्ञानेद्र वर्मा आणि SP विक्रम खलाटे मनसुख हिरेन यांच्या घरी पोहोचले…

    NIA ची वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम ठाण्यातील हिरेन यांच्या विकास पाम सोसायटीत दाखल…

    हिरेन यांच्या कुटुंबियांशी NIA चे वरिष्ठ अधिकारी पुन्हा संवाद साधणार..

     

  • 19 Apr 2021 02:47 PM (IST)

    जालन्यात पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या पडला विहिरीत

    जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील अंभोडा या गावात पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या विहिरीत पडला.

    उन्हाळ्याची चाहूल लागल्याने जंगली जनावरे पाण्याच्या शोधात फिरत असतात असे प्रकार घडत आहेत.

    सध्या या बिबट्याला काढण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत

  • 19 Apr 2021 02:12 PM (IST)

    औरंगाबादेत रेमडेसीव्हीर इंजेक्शनसाठी आता कंट्रोलरुम

    औरंगाबाद –

    औरंगाबादेत रेमडेसीव्हीर इंजेक्शनसाठी आता कंट्रोलरुम

    कंट्रोल रूमच्या माध्यमातून केला जाणार रेमडेसिव्हीरचा पुरवठा

    औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा निर्णय

    रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी जारी केले हेल्पलाईन नंबर

    सरकारी रुग्णालयासह खाजगी रुग्णालयाला केला जाणार इंजेक्शनचा पुरवठा

    थेट रुग्णाला किंवा नातेवाईकांना इंजेक्शनचा पुरवठा नाही

    फक्त रुग्णालयातून मागणी आल्यानंतरच होणार इंजेक्शनचा पुरवठा

  • 19 Apr 2021 02:11 PM (IST)

    हापूस म्हणून इतर आंबा विक्री केल्यास कारवाई, मुंबईतील कृषी उत्पन्न समितीचे परिपत्रक

    सांगली – हापूस म्हणून इतर आंबा विक्री केल्यास कारवाई,

    मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने परिपत्रक काढून परराज्यांतील आंबा हापूस म्हणून विक्री करता येणार नाही, असे जाहीर

    सांगलीच्या फळ मार्केट मध्ये ही अंमलबजावणी करने गरजेचे आहे

  • 19 Apr 2021 01:59 PM (IST)

    गोकुळ निवडणुकीचा फैसला 26 एप्रिलला

    कोल्हापूर

    गोकुळ निवडणुकीचा फैसला 26 एप्रिलला

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक स्थगिती करण्याची सुप्रीम कोर्टात केली होती मागणी

    दूध संस्थेने दाखल केली होती याचिका

    याचिकेवर राज्य सरकारला म्हणणे सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

    पुढील सुनावणी होणार २६ एप्रिलला होणार

  • 19 Apr 2021 11:52 AM (IST)

    आजपासून ते 25 एप्रिलपर्यंत लासलगाव कांदा आणि धान्य लिलाव राहणार बंद

    लासलगाव –

    – आजपासून ते 25 एप्रिलपर्यंत कांदा आणि धान्य लिलाव राहणार बंद

    – लासलगाव बाजार समितीतील व्यापारी असोसिएशनचा मोठा निर्णय

    – कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने घेतला निर्णय

    – व्यापारी ,हमाल-मापारी व कर्मचारी तसेच नातेवाईक कोरोना बाधित होत असल्याने लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय

    – या निर्णयाला शेतकऱ्यांनी ही दिला प्रतिसाद

    – त्यामुळे कांदा आणि धान्यची आवक न झाल्याने बाजार समिती आवारात शुकशुकाट

    – कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प

    – कोरोना साखळी तुटण्यासाठी अंशतः होण्याचा विश्वास

  • 19 Apr 2021 11:51 AM (IST)

    औरंगाबादेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची मोठी बैठक सुरु

    औरंगाबाद –

    औरंगाबादेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची मोठी बैठक सुरु

    प्रशासकीय अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची बैठक सुरू

    बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व आमदार आणि खासदार उपस्थित

    ऑक्सिजनचा पुरवठा, रेमडेसिव्हीरचा साठा आणि रुग्णांचा मृत्य यावर चर्चा सुरू

    बैठकीला सुनील केंद्रेकर, इम्तियाज जलील, अतुल सावे, अंबादास दानवे यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधी उपस्थित

  • 19 Apr 2021 11:50 AM (IST)

    वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार, नालासोपाऱ्यातील महत्वाचे भाजीमार्केट बंद

    वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार, नालासोपाऱ्यातील महत्वाचे भाजीमार्केट बंद

    25 वर्षांपासून नालासोपारा ब्रिजखाली भरणारे भाजीमार्केट बंद करण्यात आले आहे

    पण त्याच भाजीमार्केटमध्ये कामाच्या शोधात असणाऱ्या नाका कामगारांची गर्दी कायम आहे

    वसई-विरार महापालिका क्षेत्रात कोरोनाने आपले उग्र रुप धारण केले आहे

    काल दिवसभरात 908 रुगणाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, 9 जणांचा मृत्यू झाला

    संचारबंदी सुरु आहे, मात्र रस्त्यावरील रहदारी, अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांची गर्दी कायम आहे

    नालासोपारा कोरोनाचे हॉटस्पॉट केंद आहे, अशावेळी कोरोनाचा साखळी तुटणार कशी हा प्रश्न आहे

     

  • 19 Apr 2021 11:44 AM (IST)

    नागपूरसह विदर्भात दोन दिवसांपासून रेमडेसिव्हीरचा तुटवडा, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपचं ठिय्या आंदोलन

    – नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपचं ठिय्या आंदोलन सुरु

    – आंदोलना शेजारी पोलीस दाखल

    – शांततेत सुरु आहे आंदोलन

    – नागपूरसह विदर्भात दोन दिवसांपासून रेमडेसवीर नाही

    – नागपुरात नव्याने भर्ती झालेल्या रुग्णांना मिळत नाही रेमडेसवीर इंजेक्शन

    – भाजप सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात आंदोलन

    – रेमडेसवीर इंजेक्शन अभावी जात आहेत रुग्णांचा जीव

    – भाजप आ. गिरीश व्यास, आ. प्रविण दटके सहभागी

  • 19 Apr 2021 11:31 AM (IST)

    मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाकडून कुटुंबातील नातेवाईंकावर हल्ला, दोघांचा मृत्यू

    यवतमाळ- यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील कारला देव येथे मानसिक संतुलन बिघडलेल्या
    तरुणाने कुटूंब आणि नातेवाईकावर कुऱ्हाडीने केला हल्ला
    मध्यरात्री दरम्यानची घटना

    या हल्ल्यात कुटूंबातील 2 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी असल्याची माहिती

    पोलिसांनी आरोपी गोकुळ विलास राठोड याला घेतले ताब्यात

    वसंता जेठा राठोड , नेरचंद शामा आडे या दोघांचा मृत्यू तर
    यशोदा गणेश जाधव , गणेश आनंदा जाधव ,सुनीता राठोड ( आई) अश्विनी विकास राठोड (बहीण)
    संजय जेठा राठोड काका हे गंभीर जखमी झाले आहेत
    या घटनेने परिसरात खळबळ

  • 19 Apr 2021 11:30 AM (IST)

    यवतमाळात मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाचा कुटुंबावर कुऱ्हाडीने हल्ला

    यवतमाळ –

    यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील कारला देव येथे मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाने कुटूंब आणि नातेवाईकावर कुऱ्हाडीने केला हल्ला

    मध्यरात्री दरम्यानची घटना

    या हल्ल्यात कुटूंबातील 2 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी असल्याची माहिती

    पोलिसांनी आरोपी गोकुळ विलास राठोड याला घेतले ताब्यात

    वसंता जेठा राठोड , नेरचंद शामा आडे या दोघांचा मृत्यू तर यशोदा गणेश जाधव , गणेश आनंदा जाधव ,सुनीता राठोड ( आई) अश्विनी विकास राठोड (बहीण) संजय जेठा राठोड काका हे गंभीर जखमी झाले आहेत

    या घटनेने परिसरात खळबळ

  • 19 Apr 2021 10:59 AM (IST)

    नागपुरात मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार उघड, मयत रुग्णाच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी

    नाशिक –

    नामांकित हॉस्पिटलमध्ये मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार उघड

    मयत रुग्णाच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी

    शहरातील स्पंदन हॉस्पिटल विरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल

    कल्याणी शिंदे ही महिला मयत झाल्यानंतर तिचे दागिने गेले चोरीला

    तब्बल अडीच टोळ्यांचे मंगळसूत्र हॉस्पिटलच्या स्टाफ ने चिरल्याचा मुलाचा आरोप

    पोलिसांकडून हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

    खाजगी रुग्णालयातील प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ

  • 19 Apr 2021 10:57 AM (IST)

    नागपूरसह विदर्भात दोन दिवसांपासून रेमडेसव्हीर नाही

    – नागपूरसह विदर्भात दोन दिवसांपासून रेमडेसव्हीर नाही

    – नागपुरात नव्याने भर्ती झालेल्या रुग्णांना मिळत नाही रेमडेसवीर इंजेक्शन

    – भाजप आमदार देणार नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

    – भाजप सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात देणार निवेदन

    – रेमडेसवीर इंजेक्शन अभावी जात आहेत रुग्णांचा जीव

    – थोड्याच वेळात भाजप आमदार देणार निवेदन

  • 19 Apr 2021 10:57 AM (IST)

    नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपचं ठिय्या आंदोलन सुरु

    – नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपचं ठिय्या आंदोलन सुरु

    – आंदोलना शेजारी पोलीस दाखल

    – शांततेत सुरु आहे आंदोलन

    – नागपूरसह विदर्भात दोन दिवसांपासून रेमडेसवीर नाही

    – नागपुरात नव्याने भर्ती झालेल्या रुग्णांना मिळत नाही रेमडेसवीर इंजेक्शन

    – भाजप सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात आंदोलन

    – रेमडेसवीर इंजेक्शन अभावी जात आहेत रुग्णांचा जीव

    – भाजप आ. गिरीश व्यास, आ. प्रविण दटके सहभागी

  • 19 Apr 2021 10:21 AM (IST)

    रेल्वेच्या पॉईंटमने वाचवले चिमुकल्याचे प्राण, वांगणी रेल्वे स्थानकातील घटना

    रेल्वेच्या पॉइंटमने वाचवले चिमुकल्याचे प्राण

    वांगणी रेल्वे स्थानकात शनिवारी संध्याकाळी घडला प्रकार

    मुलाला वाचवतानाचा सर्व थरार झाला सीसीटीव्ही कॅमेरा कैद

    भरधाव एक्स्प्रेसखाली जाण्यापासून अवघ्या काही सेकंदाच्या फरकाने वाचला मुलगा

    मयूर शेळके असं लहान मुलाला वाचवणाऱ्या पॉईंटमनचं नाव

  • 19 Apr 2021 10:17 AM (IST)

    मनमाड रेल्वेच्या कारखान्यातील कामगारांचे काम बंद आंदोलन

    मनमाड : रेल्वेच्या कारखान्यातील कामगारांनी सुरू केले काम बंद आंदोलन…

    कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कारखान्यात दोन शिप्ट मध्ये काम सुरू होते मात्र आता पुन्हा एक शिप्ट सुरू करून सर्व सुमारे 900 कामगारांना कामावर बोलविण्यात येत आहे..कोरोना वाढलेला असतांना आमचा जीव धोक्यात घालण्यात येत असल्याचा आरोप करत कामगारांनी सुरू केला संप

  • 19 Apr 2021 10:15 AM (IST)

    परीक्षेशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं मुल्यमापन करणं अशक्य, बोर्डाच्या माजी अध्यक्षांच मतं

    पुणे – परीक्षेशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं मुल्यमापन करणं अशक्य,

    – महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाच्या माजी अध्यक्षांच मतं,

    – सीबीएसई विद्यार्थ्यांची देशातील एकूण संख्या आहे 19 लाख तर एकट्या महाराष्ट्रातील एसएससीची विद्यार्थी संख्या आहे 16 लाख,

    – त्यामुळे परीक्षेविना विद्यार्थ्यांना पास करणं अशक्य कारण महाराष्ट्रात अजूनही बोर्डाची मुल्यमापन पद्धत ठरलेली नाही,

    – विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन परीक्षा घेणं उचित शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांच मतं,

    – राज्य सरकार सीबीएसई पँटर्न राज्यात राबवणार का ?….

  • 19 Apr 2021 10:02 AM (IST)

    देवेंद्र फडणवीसांवर गुन्हा दाखल करून अटक करा, रुपाली चाकणकरांची गृहमंत्र्यांकडे मागणी

    – देवेंद्र फडणवीसांवर गुन्हा दाखल करून अटक करा,

    – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांची राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मागणी,

    – सरकारी कामात अडथळा आणून त्रास दिल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी,

    – रुपाली चाकणकरांनी घेतला आक्रमक पवित्रा,

    – रेमडेसीवीरवरून राजकारण चांगलंच तापलं

  • 19 Apr 2021 09:36 AM (IST)

    रत्नागिरीकरांची चिंता वाढली, सक्रिय रुग्णांमध्ये 45 वर्षाखालील रुग्णांची संख्या अधिक

    रत्नागिरी –

    रत्नागिरीकरांची चिंता वाढली

    सक्रिय रुग्णांमध्ये 45 वर्षाखालील रुग्णांची संख्या अधिक

    बाधित रुग्णांचा दर 24 तासात 2 टक्यांनी वाढला

    रत्नागिरी जिल्ह्यात 2145 सक्रिय रुग्ण

  • 19 Apr 2021 09:34 AM (IST)

    साताऱ्यात एसटी स्टॅण्ड परिसरातील शेतकरी भाजी मंडईत विक्रीस बसलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी हटकले

    सातारा :

    एसटी स्टॅण्ड परिसरातील शेतकरी भाजी मंडईत विक्रीस बसलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी हटकले

    रयतक्रांती संघटनेच्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

    शेतकरयांना भाजी विकुन देत नसल्याच्या निषेधार्थ रयतक्रांतीच्या कार्यकर्त्यानी काकडी रस्त्यावर ओतुन केले आंदोलन

    शेतकरयांना मंडईत बसुन न दिल्यास तीव्र आंदोलनाचा रयत क्रांती संघटनेने दिला इशारा

  • 19 Apr 2021 09:32 AM (IST)

    सोलापूर पालिकेने राबवली स्मशानभूमीत सफाई मोहीम

    सोलापूर –

    पालिकेने राबवली स्मशानभूमीत सफाई मोहीम

    कोरोना बाधित रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याने स्मशानभूमीत पडत आहे राख आणि कचर्‍याचा खच

    स्मशानभूमी स्वच्छ राहावी म्हणून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला पुढाकार

    मोदी स्मशान भूमी बरोबर रुपाभवानी स्मशानभूमी परिसरात केली स्वच्छता

  • 19 Apr 2021 08:33 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यात पिकाची मळणी सुरु असताना मळणी यंत्राने पेट घेतला

    औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा या गावात मक्का या पिकाची मळणी सुरू असताना अचानक मळणी यंत्राने पेट घेतला, यावेळी लागलेल्या आगीत मळणी यंत्रासहित ट्रॅक्टर आणि मका पिकाच्या पूर्ण ढिगाने पेट घेतला यात शेतकऱ्यांची पूर्ण मका जाळून खाक झाली आहे. या घटनेत मळणी यंत्र चालकासह शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

  • 19 Apr 2021 06:45 AM (IST)

    कराडमध्ये बांधकाम सुरु असलेल्या पुलावरुन मोटरसायकल खाली पडुन दोघांचा मृत्यू, एक जखमी

    कराड

    बांधकाम सुरु असलेल्या पुलावरुन मोटरसायकल खाली पडुन दोघांचा मृत्यू, एक जखमी

    कराड चांदोली रोडवर उंडाळे जवळची घटना

    मृत व जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील भेंडवडी तालुका हातकणंगले येथील

    जानु भैरु झोरे, कोंडीबा भागोजी पाटने, राहणार सर्व भेंडवडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर अशी मृतांची नावे

    जखमी दगडू बिरू झोरे यावर कराड मधील रुग्णालयात उपचार सुरू

    कराड मलकापूर रोडवरील पुलाचे बांधकाम चालु असल्याने या रोडवरील वाहतूक आहे बंद

    मोटर सायकल स्वार बांधकाम सुरु असलेल्या पुलावरुन रात्री ट्रिपल सीट जात होते

    कराड पोलिसाकडुन तपास सुरु

  • 19 Apr 2021 06:23 AM (IST)

    सांगली राष्ट्रवादीचे नेते कमलाकर पाटील यांचे करोनाने निधन

    सांगली

    सांगली राष्ट्रवादीचे नेते कमलाकर पाटील यांचे करोनाने निधन

    सेवासदन हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा स्वास

    सांगली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष होते

  • 19 Apr 2021 06:22 AM (IST)

    अकोला MIDC नंबर 2 मधीलइलेक्ट्रॉनिक कंपनीतीच्या गोडाऊनला आग

    अकोला MIDC नंबर 2 मधील महावीर इलेक्ट्रॉनिक कंपनीतील गौडाऊनमधील इलेक्ट्रीक स्क्युअर पार्टच्या लाकडी बॉक्सला रात्रीच्या सुमारास अच्यानक आग लागली,ही आग विझविण्यासाठी अग्निशमन चे एक बंब लागला असून,या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नसून,यात स्पेयर पार्ट चे नुकसान झाले आहे,

  • 19 Apr 2021 06:21 AM (IST)

    उल्ल्हासनगरमधील समाजसेवक सागर उटवालकडून दररोज बाराशे ते पंधराशे लोकांना मोफत जेवण

    उल्ल्हासनगरमधील समाजसेवक सागर उटवाल यांनी लॉकडाऊन मुळे हाल होणाऱ्या गरिबांच्या समस्या जाणून मोफत जेवण वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलाय. रोज परिसरातील जवळपास बाराशे ते पंधराशे लोकांना सागर उटवाल हे भोजनाची व्यवस्था करत असून त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. याआधी देखील सागर उटवाल यांनी जेवण वाटपाचा कार्यक्रम सलग अडीच महिने सुरू ठेवला होता.