महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
कोल्हापूर
हसन मुश्रीफ –
महाविकास आघाडी ही लोकांच्या कल्याणासाठी सत्तेत आलेली पवित्र आघाडी आहे
महाविकास आघाडीची सत्ता खाली पाडण्यात भाजप काहीच यशस्वी होणार नाहीत
कोरोना महामारी जगाला नवीन होती त्यावेळी देखील उद्धव ठाकरे यांनी यशस्वीपणे कारभार केला
उद्धव ठाकरे महाराष्ट्राची काळजी करण्यासाठीच मुख्यमंत्री झालेत, शाह यांनी महाराष्ट्राची काळजी करू नये
राजेंद्र शिंगणे शरद पवारांच्या भेटीला
ऑक्सिजनबाबत चर्चा करणार
केंद्राकडे पवारांनी विनंती करुन तोडगा काढण्याबाबत चर्चा करणार
मुबंई पुणे एक्सप्रेस वे वरती भीषण अपघात
अपघातात मदतीसाठी धावून गेलेल्या दोघांचा जागीच मृत्यू तर एक जखमी
पनवेल जवळची घटना
स्विफ्ट कारला कंटेनरने मागून धडक देऊन झालेल्या अपघातात मदती साठी धावून गेल्या मर्सिडीज कारला टेम्पोची भीषण धडक
पनवेल येथील सुशांत मोहिते आणि प्रथमेश बहिरा या दोन मदतकर्त्यांचा दुर्दैवी मृत्यू
पनवेल नगरसेवक तेजस कांडपिले जख्मी
सोलापूर –
कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा सुरुच
महानगरपालिकेकडे 990 लस शिल्लक
आज लस पुरवठा शक्य नसल्याने शहरातील लसीकरण केंद्र तूर्त बंद राहणार
काही केंद्रावर उपलब्ध तेवढे लसीकरण केले जाणार
आतापर्यंत शहरातील 90 हजार जणांचे झाले आहे लसीकरण
नाशिक –
शहरात कोव्हीशिल्डचा तुटवडा
शहरातील लसीकरण बंद पडण्याच्या मार्गावर
महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर अवघे 2642 डोस शिल्लक
अडीच लाख नागरिकांना आतापर्यंत डोस
80 टक्के नागरिकांकडून कोव्हीशिल्ड ला पसंती
मात्र शहरात आता कोव्हीशिल्ड चा तुटवडा
नाशिक –
सातपूरनंतर आता म्हसरुळ परिसरात जनता कर्फ्यु
नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने निर्णय
मनपाच्या शाळेत सुरू करणार कोव्हिडं सेंटर
सामाजिक संस्थांतर्फे अन्न वाटप तर डॉक्टर असोसिएशन तर्फे वैद्यकीय सेवा
नागरिकांनी प्रतिसाद देण्याचं आवाहन
विरार –
विरार पूर्व डी-मार्ट जवळील भाजीमार्केटमध्ये भाजीविक्रेते आणि ग्राहकांची तुडुंब गर्दी
सोशल डिस्टन्स चा पूर्णपणे फज्जा, अनेकांच्या तोंडाला मास्क नाही, जेस्ट नागरिक ही मोठ्याप्रमाणात भाजीमार्केट मध्ये भाजी खरेदी साठी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसई विरार महापालिकेने आजपासून नवी नियमावली सुरू केली आहे
मेडिकल वगळता सर्व अत्यावश्यक सेवा ह्या सकाळी 7 ते 11 पर्यंतच चालू राहणार आहेत.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने नियम पाळा असे अहवान केल्या जात आहे. पण बेजबाबदार नागरिकांकडून मात्र पूर्णपायली होत आहे. यामुळे कोरोनाचा साखळी तोडणार कशी असा प्रश्न आहे
– नागपुरातील तांडापेठेत भर चौकात तरुणीचा खुन
– वस्तीत दबंगगीरी करणाऱ्या पिंकी शर्मा तरुणीचा खुन
– अवैध धंदे करणाऱ्यांना पिंकी धमक्या देत होती
– सोमवारी दुपारी वाद झाल्याने दोन आरोपीने केली हत्या
– पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल
– पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरु
रत्नागिरी –
गाड्या जाळण्याचे प्रकार आता ग्रामीण भागात
चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हणे येथे रात्री 2 गाड्या जाळल्या
मार्गताम्हणे येथील अजित साळवी यांच्या मालकीच्या 2 गाड्या अनोळखी इसमांनी जाळल्या
चिपळूण पोलीस घटनास्थळी परिसरात घबराटीचे वातावरण
कोल्हापूर
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस
पंधरा दिवसात केवळ 36 उमेदवारांनीच अर्ज घेतले माघार
अजूनही ही 205 उमेदवार रिंगणात
अर्ज माघारीसाठी दोन्ही गटाच्या नेत्यांना करावे लागणार इच्छुकांची चांगलीच मनधरणी
माघारीसाठी आज झुंबर उडण्याची शक्यता
सत्ताधारी आणि विरोधी आघाडीच्या पॅनलच्या उमेदवारांची घोषणा ही आज होणार
माजी खासदार धनंजय महाडिक करणार सत्ताधारी गटाच्या पॅनल ची घोषणा
तर पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री व समस्त करणार विरोधी गटाच्या पॅनल ची घोषणा
नासाचे इनजेन्युइटी हेलिकॉप्टर सोमवारी मंगळावरील विरल वातावरणात यशस्वीरीत्या झेपावले
कुठल्याही परग्रहावर हेलिकॉप्टरचे हे पहिले नियंत्रित उड्डाण होते
ही एक मोठी कामगिरी मानली जात असून या कामगिरीला ‘राइट बंधू क्षण’ असे संबोधण्यात आले आहे
पुणे :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पाच एकरांमध्ये बांबू पार्कची उभारणी करण्यात येणार
‘गॅरेट मोशन टेक्नॉलॉजी’ या कंपनीने सामाजिक उत्तरदायित्वाच्या निधीअंतर्गत ६८ लाख ८५ हजारांचा निधी त्यासाठी उपलब्ध करून दिला
मनमाड : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला तोंड देत असतानाच मनमाडकरांसमोर पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून पालखेड कालव्याचे आवर्तन देण्यात आले
नवी दिल्ली –
सोन्याच्या आयातीत गेल्या वर्षात 22.58 टक्के वाढ, मागणी वाढल्याचा परिणाम
चांदीची आयात घटली; व्यापारातील तोटा वाढण्याची शक्यता
सोन्याची आयात वाढल्याने देशाच्या आयात-निर्यात व्यापारातील तोटा अजून वाढण्याची शक्यता आहे.
इचलकरंजी –
– शहरातील स्वामी मळा परिसरातील घटना चार वर्षाच्या मुलाचा हौदात पडून मृत्यू
– स्वामी मळा परिसरातील गणेश सचिन व्हंन्डकर वय वर्षे 4 या विद्यार्थ्याचा हौदात पडून मृत्यू
– गणेश मित्रान बरोबर दारात खेळत होता आई-वडिलांनी शोधाशोध केली असता शेजारी हौदात पडल्याचे दिसून आला
– घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे रुग्णालयाबाहेर आई-वडिलांचा आक्रोश होता