LIVE | राज्य सरकारच्या निषेधार्थ पत्रकारांचा आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
विरार विजय वल्लभ दुर्घटना प्रकरणात आरोपींच्या 2 दिवसाची पोलीस कोठडीत वाढ
विरार विजय वल्लभ दुर्घटना प्रकरणात आरोपींच्या 2 दिवसाची पोलीस कोठडीत वाढ
25 एप्रिल ला हॉस्पिटल मॅनेजमेंट च्या 2 डॉक्टर ला केले आहे अटक
डॉ दिलीप शहा आणि डॉ शैलेश पाठक असे अटक केलेल्या आरोपीचे नाव
-
राज्य सरकारच्या निषेधार्थ पत्रकारांचे आंदोलन
मुंबई – गेल्या वर्षी टाळेबंदी सुरू झाल्यानंतर आणि आताचाी टाळेबंदी जाहीर होण्याच्या आधीपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करणाऱ्या पत्रकार आणि पत्रकारितेतर कर्मचाऱयांना लोकलमधून कार्यालयीन कामासाठी फिरण्याची मुभा मिळावी, यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघासह विविध पत्रकार संघटना राज्य सरकारसोबत पत्रव्यवहार करीत आहेत. मात्र राज्य शासन पत्रकारांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहात नाही. पत्रकारांच्या मागण्यांवर चर्चा सुरू असल्याचे सांगून राज्य सरकार वेळ काढू धोरण अवलंबित आहे. शासनाची ही भूमिका निषेधार्ह असून उध्या मंगळवार दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवन परिसरात पत्रकारांचे विविध मागण्यांसाठाचे आंदोलन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून होणार आहे. या आंदोलनात सर्व पत्रकार संघटना आणि पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाने केले आहे.
-
-
कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस
जोरदार गारपिटीसह मुसळधार पावसाची हजेरी
कागल तालुक्यात जोरदार गारपीट
चंदगड आणि भुदरगड तालुक्यातील काही ठिकाणी गारपिट
सेनापती कापशी गावातील रस्ते गारपिटीमुळे पांढरेशुभ्र
अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित
-
मध्य रेल्वेच्या सुमारे 10 प्रवाशी गाड्या 10 मे पर्यंत रद्द
मध्य रेल्वेच्या सुमारे 10 प्रवाशी गाड्या उद्यापासून 10 मे पर्यंत रद्द
* रद्द करण्यात आलेल्या गाड्यामध्ये मनमाड -मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, जालना – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, अजनी- मुंबई हमसफर/ दुरंतो एक्स्प्रेस, नागपूर – पुणे, दादर -शिर्डी साईनगर एक्स्प्रेस अन्य गाड्यांचा समावेश
* गाड्या तोट्यात चालत असल्याने रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धी पत्रक
विशेष गाड्या रद्द खालील विशेष रेल्वेगाड्या कमी प्रतिसादामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. 1).ट्रेन क्रमांक 02109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मनमाड विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द 2) ट्रेन क्रमांक 02110 मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द 3).ट्रेन क्रमांक 02113 पुणे -नागपूर विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द 4).ट्रेन क्रमांक 02114 नागपूर -पुणे विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 09.05.2021 पर्यंत रद्द 5).ट्रेन क्रमांक 02189 मुंबई -नागपूर विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द 6)ट्रेन क्रमांक 02190 नागपूर -मुंबई विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द 7) ट्रेन क्रमांक 02111 मुंबई -अमरावती विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द 8) ट्रेन क्रमांक 02112 अमरावती मुंबई विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द 9) ट्रेन क्रमांक 02271 मुंबई -जालना विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द 10) ट्रेन क्रमांक 02272 जालना -मुंबई विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द
-
परमबीर सिंग यांनी हजोरो कोटींचा भ्रष्टाचार केला, अकोल्याच्या पोलीस अधिकाऱ्याचे गंभीर आरोप
अकोल्याचे पोलीस अधिकाऱ्याने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. पोलीस अधिकाऱ्याने पोलीस महासंचालक संजय पांडे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्या रकमेची वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक केली. परमबीर सिंग यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या व्यवसायात त्या पैशांची गुंतवणूक केली, असा आरोप पत्रात करण्यात आलं आहे. संबंधित वृत्त पीटीआयच्या हवाल्याने समोर आलं आहे
-
-
सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने चंद्रपूरला झोडपले
चंद्रपूर : सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने चंद्रपूरला झोडपले, दुपारपासून ढगाळ वातावरण, प्रचंड मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, चंद्रपूरकर असह्य उकाड्याने होते त्रस्त, गेले 2 दिवस जिल्ह्यातील अधिक तापमानाची होती नोंद, बरसत्या जलधारांनी वातावरण केले आल्हाददायक, शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडीत
-
कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील दत्त साखर कारखान्यातील तीन कामगारांचा मृत्यू
कोल्हापूर
कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील दत्त साखर कारखान्यातील तीन कामगारांचा मृत्यू
पाणी शुद्धीकरण टँकमध्ये पडून तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती
टँकमध्ये पडलेल्या एकाला वाचवण्यासाठी गेलेले दोन कामगारांचा देखील मृत्यू
-
सोलापूर शहरात जोरदार पावसाला सुरुवात, उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा
सोलापूर
सोलापूर शहरात जोरदार पावसाला सुरुवात
सकाळपासून जाणवत होता उकाडा
उकाड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना पावसामुळे दिलासा
-
महाडमध्ये अनधिकृत देशी दारू विक्रीवर पोलिसांचा छापा, 7 लाखाच्या मुद्दे मालासह दोन आरोपींना अटक
रायगड: महाडमध्ये अनधिकृत देशी दारू विक्रीवर पोलिसांचा छापा, ७ लाखाचा मुद्दे मालासह दोन आरोपींना अटक करण्यात आलीय. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर टाळेबंदी सुरु असताना मद्य विक्रीला बंदी असताना घर आणि गाडीमध्ये देशी आणि विदेशी दारुचा साठा करून विक्री करणाऱ्या दोन भावांवर महाड शहर पोलिसांनी छापा टाकुन कारवाई केली आहे. महाड शहरातील जुनापोस्ट परीसरात हि कारवाई केली असुन यामध्ये बियरचा एक बॉक्स, विदेशी दारुचे चार बॉक्स आणि देशी दारुचे 70 बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहेत.
-
फक्त दोन रुपयांसाठी अंध भिकाऱ्यावर धारदार शस्त्राने कॅन्टीन चालकाकडून हल्ला
आठ रुपयांचा समोसा दहा रुपयाला का देतो फक्त इतकेच विचारले असता कॅन्टीन चालकाने अंध भिका:यावर धारदार शस्त्रने वार केला आहे. ही घटना अंबरनाथ स्थानकात घडली आहे. कल्याण जीआरपीने गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे.
-
यवतमाळमध्ये वाघाची अमानुषपणे हत्या ,पायाचे पंजेही तोडून नेले
यवतमाळ- मुकुटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वन कक्ष क्र 30 मध्ये वाघाच्या गुहे जवळ आग लावून वाघाला ठार मारले. भाल्याने वार करून ठार केल्याची माहिती वाघाच्या गळ्यात तारेचा फास अडकल्याने शिकारी साठी वाघाला ठार केल्याचा संशय आहे. शिवाय दोन समोरचे पंजे देखील तोडून नेले आहेत. 4 वर्षीय वाघाची अमानुषपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
-
संचारबंदी उल्लंघन प्रकरणी आमदार संजय शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल
औरंगाबाद :-
संचारबंदी उल्लंघन प्रकरणी आमदार संजय शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल
एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आमदार संजय शिरसाठ यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल
संचारबंदी लागू असतानाही संजय शिरसाठ यांनी पाणी पुरवठा योजनेचं केलं होतं उद्घाटन
उद्घाटनासाठी जमवले होते जवळपास 50 लोक
कडक लॉकडाऊन आणि संचारबंदी उल्लंघन प्रकरणी अखेर गुन्हा दाखल
-
कल्याणच्या आंबिवली इराणी वस्तीत धक्कादायक प्रकार, दोन गटात तुंबळ हाणामारी
कल्याण :
आंबिवली इराणी वस्तीत धक्कादायक प्रकार
दोन गटात तुंबळ हाणामारी
पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन दोन गट आपसा भिडले
तीन ते चार जण जखमी
कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी सुरु केला तपास
-
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका सहा महिने पुढे ढकलल्या
पुणे :
– राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका सहा महिने पुढे ढकलल्या,
– वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता राज्य सरकारने घेतला निर्णय,
– 25 एप्रिल ते 23 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या सगळ्या निवडणूका केल्या स्थगित,
– संचालक मंडळाला आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना मिळणार सहा महिने मुदतवाढ,
– राज्यातील 277 बाजार समितीच्या निवडणुका गेल्या पुढे ….
-
जून महिन्यात MBBS च्या परीक्षा होणार, मंत्री अमित देशमुख यांची घोषणा
जून महिन्यात MBBS च्या परीक्षा होणार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून या परीक्षा सुरु होतील
-
लाॅकडाऊनमुळे मुंबईच्या व्यापाऱ्यांना 24 हजार कोटींचं नुकसान, पॅकेज जाहीर करण्याची मागणी
लाॅकडाऊनमुळे मुंबईच्या व्यापाऱ्यांना २४ हजार कोटींचं नुकसान – नुकसान जास्त असल्याने व्यापाऱ्यांना नाहक त्रास – लाॅकडाऊन काळात सरकारने कोणतंच पकेज जाहीर केलं नाही, ते त्वरीत करावं अशी एफारटीडब्ल्यूचे अध्यक्ष विरेन शाह यांची मागणी
-
लसीकरणाबाबत राज्याला दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री घेतील : गृहराज्यमंत्री
सातारा: लसीकरणाबाबत राज्याला दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेतील.
आ.गोपीचंद पडळकरांना टिका करण्याशिवाय दुसरे काम नाही…
आरोग्य सुविधेबाबत हे लोक कधीही मदत करत नाहीत….
पडळकरांच्या टीकेला उत्तर देण्यात अर्थ नाही
गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई
-
काँग्रेस म्हणून स्पष्ट भूमिका लस मोफत दिली पाहिजे : बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरातांचा प्रसारमाध्यमांशी संवाद– काँग्रेस म्हणून भूमिका स्पष्ट, लस मोफत दिली पाहिजे – श्रेयाची लढाई योग्य नाही – निर्णय मुख्यमंत्री यांनी जाहीर करावा – चर्चा सुरू आहे, मग श्रेयासाठी जाहीर करण योग्य नाही – काळजी घ्यावी लागणार आहे, ऑनलाईन नोंदणी तरी गर्दी होत आहे, 18 वर्षावरील नागरिकांना लस देणार आहोत गर्दी वाढेल, याबाबत काही धोरण आखव लागेल, शिस्तीबाबत धोरण – दोन दिवसात चर्चा होईल, मुख्यमंत्री सतर्क आहेत आता 18 वर्षावरील नागरिकांना लस देत आहोत गर्दी वाढण्याची शक्यता आहे त्यावर काहीतरी धोरण असल पाहिजे नागरिकांनी पण त्या धोरणाप्रमाणे तस लसीकरण करुन घ्यायला हव दोन दिवसात या सगळ्या गोष्टींची चर्चा होईल सगळ निश्चित केल जाईल भाजपाच हे म्हणन योग्य नाही लसीचा पुरवठा झाला नाही उलट सातत्याने पंतप्रधांनानकडे राज्याने लस मागितली कोविडच संकट फार वाढत आहे लस ही मोफत दिली पाहिजे हा आमचा आग्रह आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितल त्यांनी निर्णय जाहीर करावा अस आमचा अग्रह आहे पण आता श्रेय वाद आहे -
सोलापूर रेल्वेचा आयसोलेशन कोच धूळखात पडून, गेल्या 15 दिवसापासून रेल्वे स्थानकावर
सोलापूर- रेल्वेचा आयसोलेशन कोच धूळखात पडून
आयसोलेशन कोच गेल्या 15 दिवसापासून रेल्वे स्थानकावर
जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन यांच्याकडून आयसोलेशन सुरू करण्याबाबत निर्णय न झाल्याने आयसोलेशन कोच थांबूनच
कोच मध्ये रुग्णसेवा देण्यासाठी डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी कोण देणार याबाबत झाला नाही निर्णय
शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे आरोग्य सुविधाच्या कमतरतेमुळे वैद्यकीय यंत्रणेवर येत आहे प्रचंड ताण
हा ताण कमी करण्यासाठी मध्य सोलापूर विभागाने पुढाकार घेत आयसोलेशन कोच उभे करण्याचे केले होते नियोजन
गेल्यावर्षीही झाला नाही रेल्वे आयसोलेशन कोचचा वापर
-
व्हॅाटसअॅप ग्रुप सदस्यांच्या अवैध कृतीसाठी ॲडमीन जबाबदार नाही, मुंबई हायकोर्टाचा निर्णय
मुंबई : व्हॅाटसअॅप ग्रुप सदस्यांच्या अवैध कृतीसाठी ॲडमीन जबाबदार नाही
– मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचा महत्वपूर्ण निर्णय
– सदस्यांच्या बेकायदेशीर कृतीसाठी ॲडमीनला जवाबदार धरण्याची कायद्यात तरतूद नाही असा महत्वपूर्ण निर्वाळा.
– गोंदिया जिल्ह्यातील किशोर तारोने यांच्या WhatsApp ग्रुप मधील महिलेविरुद्ध मानहानीजनक मेसेज वर दाखल झालेल्या तक्रारी सूनवनी करताना कोर्टाचा निर्णय
वादग्रस्त FIR आणि खटला रद्द, न्यायमूर्ती झेड इ हक आणि अमित बोरकर खंडपीठाचा निर्णय.
-
NIA कडून अंधेरी आणि कांदिवलीत छापेमारी, लाल रंगाची गाडी जप्त
मुंबई : NIA कडून अंधेरी आणि कांदिवलीत छापेमारी,
पोलीस अधिकारी सुनील माने यांच्या जुन्या क्राईम ब्राँच युनिट 11 वर छापेमारी
तसेच सुनील माने यांची एक लाल गाडी जप्त
एनआईए ने बोरिवाली के साई नगर इलाके से पुलिस निरीक्षक सुनील माने की एक लाल गाड़ी भी की जब्त की।
-
शेतीच्या खरीप हंगामासाठी हार्डवेअरचे दुकानं सुरु करा, भाजप नेत्याची मागणी
नागपूर : शेतीच्या खरीप हंगामासाठी हार्डवेअरचे दुकानं सुरु करा
– ‘शेतीची मशागत आणि पेरणी अवजार खरेदीसाठी हार्डवेअर दुकानांची गरज’
– ‘लॅाकडाऊनमध्ये ग्रामीण भागातील हार्डवेअरच्या दुकानांना उघडण्याची परवानगी द्या’
– भाजप नेते आणि बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांची मागणी
– ‘शेतीचे अवजार न मिळाल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम खोळंबण्याची शक्यता’
-
नाशिकच्या त्या रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकची आज दुरुस्ती, गळती झालेल्या ऑक्सिजन टॅंकचे सर्व भाग बदलणार
नाशिक – झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकची आज दुरुस्ती
पुण्यातील टायो निप्पोन सनसो इंडिया प्रा.कंपनीचे प्रतिनिधी करणार दुरुस्ती
ड्युरा आणि जम्बो सिलेंडर मधून केला जाणार ऑक्सिजन पुरवठा
गळती झालेल्या ऑक्सिजन टॅंक चे सर्व भाग बदलणार
आजपासून ऑक्सिजन टॅंक च्या दुरुस्तीला होणार सुरुवात
-
…तर कोरोनाच्या त्सुनामीत देशाला गटांगळय़ा खाण्याची वेळ आली नसती, शिवसेनेचा टोला
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मधून कोरोनाची दुसरी लाट, त्याविरुद्ध केंद्र व राज्य सरकारे लढा देण्याचा पूर्ण प्रयत्न करीत असल्याबाबत ग्वाही दिली. ही लढाई सुरू आहे हे खरेच, पण ती सुरू होण्यापूर्वी केंद्राने काही गोष्टींची पूर्वखबरदारी, पूर्वतयारी केली असती तर? तज्ञांनी खूप आधी दिलेला इशारा गांभीर्याने घेतला असता आणि आता येईल ती ‘त्सुनामी’च असेल ही दुसऱ्या लाटेची ‘मन की बात’ वेळीच समजून घेतली असती तर आज कोरोनाच्या त्सुनामीत देशाला गटांगळय़ा खाण्याची वेळ आली नसती, असा सणसणीत टोला शिवसेनेनं केंद्र सरकारला लगावला आहे.
Published On - Apr 26,2021 10:15 PM