Maharashtra News LIVE Update | राज्य सरकारकडून आयटी क्षेत्रासाठी राजीव गांधी यांच्या नावाच्या नव्या पुरस्काराची घोषणा
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
राज्य सरकारकडून आयटी क्षेत्रासाठी राजीव गांधी यांच्या नावाच्या नव्या पुरस्काराची घोषणा
राज्य सरकारकडून नव्या पुरस्काराची घोषणा केली आहे. आयटी क्षेत्रासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचं नाव राजीव गांधी असं देण्यात आलं आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांना हा पुरस्कार दिला जाणार आहे
-
राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार, मुंबई आणि ठाण्यातील निर्णय महापालिका घेणार
राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार, मुंबई आणि ठाण्यातील निर्णय महापालिका घेणार, राज्य सरकारकडून परिपत्रक जारी
-
-
मुंबईत टप्याटप्याने सगळं सुरु करु : अस्लम शेख
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची प्रतिक्रिया :
– मुंबईत टप्याटप्याने सगळं सुरु करु,
– हॉटेलची वेळ रात्री दहा वाजेपर्यंत करण्यावर बैठकीत चर्चा
– शिथिलतेबाबत येत्या आठवड्याच निर्णय होण्याची शक्यता
-
कोर्टाने सीईटी रद्द केल्याच्या निर्णयावरून पालक-विद्यार्थी आक्रमक
पुणे :
– कोर्टाने सीईटी रद्द केल्याच्या निर्णयावरून पालक-विद्यार्थी आक्रमक,
– जर सीईटी घ्यायची नव्हती तर सीईटी परीक्षा जाहीर का केली ? पालकांचा सवाल,
– शिक्षणमंत्री विद्यार्थ्यांच्या भविषयबाबत गांभीर्य नाहीय,
– आम्ही सीईटीसाठी पुस्तकं आणि क्लासेस लावलीय त्याचं काय ?
– सीईटी घ्यायला पाहिजे होती, विद्यार्थ्यांची मागणी,
– आम्ही आता मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन घ्यायचे का , विद्यार्थी पालकांचा सवाल
-
ओबीसी समाजाची जनगणना करावी, त्याशिवाय आम्ही निवडणूक होऊ देणार नाही : प्रकाश शेंडगे
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची प्रतिक्रिया:
ओबीसी समाजाची जनगणना करावी
त्याशिवाय आम्ही निवडणुका होऊ देणार नाही
आज मुख्यमंत्र्यांसोबत ओबीसी प्रश्नावर चर्चा झाली
ओबीसी जनगणना केंद्र सरकारने दोन वेळा नाकारली आहे
राज्य सरकारने ही जनगणना करावी अशी आम्ही मागणी केली आहे
ओबीसी महामंडळला निधी मिळाला नाही, दोन वर्षात निधी द्यावा अशी मागणी केली आहे
१८०० कोटींची शिष्यवृत्ती थांबली आहे ती देण्यात यावी अशी मागणी केली
५० तात्काळ देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे
-
-
सह्याद्री अतिथिगृहातील बैठक संपली, ओबीसी समाजाच्या मांगण्यावर चर्चा
मुंबई : सह्याद्री अतिथिगृहातील बैठक संपली आहे. या बैठकीत ओबीसी संदर्भातील मांगण्यावर चर्चा झाली. या बैठकीला ओबीसी नेते प्रकाश शेंडगे हे देखील उपस्थित होते. तसेच राज्य सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री नवाब मलिक हे या बैठकीला उपस्थित होते. प्रकाश शेंडगे यांच्यासह शिष्टमंडळ या बैठकीला उपस्थित होते.
-
रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतराच्या मुद्द्यावरून युवा सेना आक्रमक
पुणे :
– रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतराच्या मुद्द्यावरून युवा सेना आक्रमक,
– युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट,
– रानडे इन्स्टिट्यूटच्या मोक्याच्या जागेवर शॉपिंग सेंटर बांधण्याचा डाव,
– आमचा या निर्णयाला विरोध असून कुलगुरूंनी हा निर्णय मागे घ्यावा, युवासेनेची मागणी.
-
बालाजी तांबे यांच्या निधनानंतर राज्यपालांकडून शोक व्यक्त
आयुर्वेद व योग प्रचार प्रसारासाठी आयुष्य वेचणारे आयुर्वेदाचार्य श्री बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. श्री. तांबे यांनी लिखाण तसेच व्याख्यानांच्या माध्यमातून निरामय जीवन जगण्यासाठी लोकांना अखेरपर्यंत मार्गदर्शन केले. योगाप्रमाणेच आयुर्वेदाचे व श्रीमत भगवद्गीतेचे ज्ञान संपूर्ण जगापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. ईश्वर त्यांना आपल्या श्रीचरणांजवळ स्थान देवो व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो ही प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.
-
राज्यात 11 वी प्रवेशसाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द
राज्यात 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी (प्रवेश परीक्षा ) रद्द
मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निकाल
10 वी पास झालेल्या विद्यार्याना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी होणार होती CET परीक्षा
मात्र हायकोर्टाने सर्व बाजू एकल्यानंतर प्रवेश परीक्षा केली रद्द
-
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन
– आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन,
– वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
– पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते,
– लोणावळ्याजवळील कार्ला येथील ‘आत्मसंतूलन व्हिलेज’ या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदाबद्दल जनजागृती केली,
– तांबे यांनी ‘गर्भसंस्कार’ या पुस्तकाचे लेखन केले. त्याच्या लाखोप्रती वाचकांनी घेतल्या. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले.
-
कोल्हापुरात अडीच महिन्यापूर्वीच आढळला डेल्टा प्लसचा रुग्ण, अहवाल मात्र प्राप्त झाला 8 ऑगस्टला
कोल्हापूर
कोल्हापुरात अडीच महिन्यापूर्वीच आढळला डेल्टा प्लसचा रुग्ण
रुग्णाचा अहवाल मात्र प्राप्त झाला 8 ऑगस्ट ला
अहवालातील विलंबाची धक्कादायक माहिती उघड
अहवालातील विलंब ठरू शकतो जीवघेणा, राज्यातील परिस्थतीवर प्रश्न चिन्ह
कोल्हापुरातील शेकडो अहवाल अद्याप प्रतीक्षेत
28 मे रोजी आढळलेला रुग्ण सुरक्षित, रुग्णाचे दोन डोस झाले होते
महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांची माहिती
-
राज्यातील बारा कारखान्यांच्या भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रियेला राजू शेट्टी यांचा विरोध
कोल्हापूर :
राज्यातील बारा कारखान्यांच्या भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रियेला राजू शेट्टी यांचा कडाडून विरोध
कारखाने भाडेतत्त्वावर देण्यापूर्वी संचालकांच्या मालमत्ता जप्त करा
राजू शेट्टी यांची मागणी
चालकांच्या मनमानीचा भुर्दंड शेतकऱ्यांना का?
कारखाने खासगीकरणाचा डाव हाणून पाडू
राजू शेट्टी यांचा इशारा
-
मोबाईल कंपन्यांनी पुणे महापालिकेचे 1500 कोटी थकवले
पुणे –
– मोबाईल कंपन्यांनी पुणे महापालिकेचे 1500 कोटी थकवले
– महापालिकेने आकारणी केलेल्या मिळकतकराच्या विरोधात 14 मोबाइल टॉवर कंपन्या कोर्टात,
– या कंपन्यांची तब्बल 1,500 कोटींची थकबाकी असून या प्रकरणी 2016 पासून न्यायालयीन स्थगिती असल्याने पालिकेचे नुकसान,
– त्यामुळे या दाव्यांची सुनावणी लवकर घ्यावी, महापालिका कोर्टाला करणार विनंती.
-
गीतांजली टॉकीज चौकात झालेल्या गोळीबार प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक
गीतांजली टॉकीज चौकात झालेल्या गोळीबार प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुश्रीक खान आणि कामरान अहमद
अन्य तीन आरोपींचे नाव देखील निष्पन्न झाले असून लवकरच त्यांना अटक केली जाईल
मोसीन नावाच्या गुंडावर काल पहाटे झाला होता गोळीबार
काही दिवसांपूर्वी मोसीन आणि आरोपींचा आमना सामना झाला तेव्हा एकमेकांकडे बघून खुन्नन दिल्याने संतापलेल्या आरोपींनी मोसीनला धडा शिकवण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याचं निष्पन्न झाले आहे
आरोपी आणि फिर्यादी यांच्यात जुने वैमनस्य आहे. २०२० मध्ये मोसीन खान यांनी आरोपींच्या विरोधात कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
२०१५ मध्ये सुद्धा दोन्ही गटात मारामारी झाली होती
या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपी मुश्रीक खान आणि कामरान अहमद यांनी मोसीन वर गोळीबार केला
-
सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरण, आणखी दोन साखर कारखान्याचे व्यवहार ईडीच्या रडारवर
सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरण
आणखी दोन साखर कारखान्याचे व्यवहार ईडीच्या रडारवर
दोन साखर करखाण्याचे पेपर ईडीने घेतले ताब्यात
नंदुरबार येथिल पुष्परेंद्धेश्वर आणि अमरावती येथील अंबादेवी सहकारी साखर कारखान्याचे पेपर घेतले ताब्यात
ईडीने घेतले ताब्यात
ईडीने काही दिवसांपूर्वी सातारा येथील जरेंडेश्वर सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे
त्यानंतर आता ईडीने या दोन करखाण्याच्या व्यवहारची चौकशी सुरू केली आहे.
-
घाईघाईमध्ये केलेला उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा अंगलट, शिवसेनेचे वरिष्ठ नेते करणार उद्धव ठाकरेंकडे तक्रार
नाशिक – घाईघाईमध्ये केलेला उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा अंगलट
शिवसेनेचे वरिष्ठ नेते करणार उद्धव ठाकरेंकडे तक्रार..
खासदार हेमंत गोडसेंकडून शिवसेना नेत्यांना देखील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचे निमंत्रण नाही
छगन भुजबळ यांनी यापूर्वीच जाहीर केली होती नाराजी
-
ओबीसी जनमोर्चाकडून मुख्यमंत्र्यांना 4 पानी निवेदन
– ओबीसी जनमोर्चाकडून मुख्यमंत्र्यांना 4 पानी निवेदन
– कर्नाटक तामिळनाडूच्या धर्तीवर ओबीसींची महाराष्ट्रात जातनिहाय जमगणना करावी
– राजकीय आरक्षण पुर्ववत होईपर्यंत कोणतीच स्थानिक स्वराज्य निवडणुक होऊ नये
– महाज्योती अर्थसहाय्य, ओबीसी अधिकारी प्रवर्गनिहाय श्वेतपत्रिका, वसतीगृहे, 100 बिंदू नामावली यांसारख्या 17 मुद्दांचा समावेश
-
मुबंई-पुणे एक्सप्रेस हायवेवर ट्रकची अन्य वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू
खोपोली
मुबंई-पुणे एक्सप्रेस हायवेवर ट्रकची अन्य वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू
खोपोली एक्झिटने खोपोलीकडे उतरताना मुबंईकडे जाणारा ट्रक रस्त्याच्या बाजुला असलेल्या अन्य एका ट्रक आणि टोईंग वनला धडकली
अपघातग्रस्त ट्रकमध्ये दोन जणांचा मृत्यू
एकाचा जागीच मृत्यू तर अन्य एकाचा रुग्णालयात जाताना रस्त्यातच मृत्यू
-
नाशकात आईची आत्महत्या, तर चिमुकल्या बाळाचा आढळला मृतदेह
नाशिक – पाथर्डी परिसरात धक्कादायक घटना
आईची आत्महत्या ,तर चिमुकल्या बाळाचा आढळला मृतदेह..
बाळाची हत्या करून आईने आत्महत्या केल्याचा संशय..
आत्महत्येच कारण मात्र अद्याप स्पष्ट नाही
पोलिसांना आढळून आली सुसाईड नोट..
मात्र सुसाईड नोट मध्ये कोणालाही जवाबदार धरू नये असा उल्लेख..
-
कोरोनानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाची ही फैलाव
कोल्हापूर
कोरोनानंतर आता जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाची ही फैलाव
महिन्याभरात जिल्ह्यात चिकन गुणीयाचे 73 त्यानंतर डेंग्यूचे 21 रुग्ण
कोरोना संसर्गामुळे इतर आजाराकडे नागरीकांचा दुर्लक्ष होत असल्याचं निरीक्षण
-
कोल्हापूर शहरात आढळला डेल्टा प्लसचा रुग्ण
कोल्हापूर
कोल्हापूर शहरात आढळला डेल्टा प्लसचा रुग्ण
पश्चिम उपनगरातील महिलेला लागण
कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येत असतानाच डेल्टा प्लस रुग्ण आढळल्याने खळबळ
महापालिकेच्या आरोग्य विभागाची आज तातडीची बैठक
आरोग्य यंत्रणा गतिमान होणार, आधुनिक महिला व रुग्णाच्या लक्षणे वर लक्ष ठेवण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना
-
नागपुरात आगामी महापालिका निवडणुकीत उतरणार संभाजी ब्रिगेड
नागपूर :
नागपुरात आगामी महापालिका निवडणुकीत उतरणार संभाजी ब्रिगेड,
वॉर्डनिहाय संपर्क अभियान राबवून युवा कार्यकर्त्यांची दौज उभारण्याची रणनीती,
दक्षिण, पश्चिम आणि आणि दक्षिण-पश्चिम मतदार संघात करणार लक्ष केंद्रीत,
पश्चिम महाराष्ट्रानंतर आता विदर्भात निवडणुकीत नशीब आजमवणार संभाजी ब्रिगेड,
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता
-
सोलापूर शहरातील 39 लसीकरण केंद्रांवर मिळणार आज लस
सोलापूर शहरातील 39 लसीकरण केंद्रांवर मिळणार आज लस
प्रत्येक केंद्रावर 55 ऑनलाइन पद्धतीने तर स्पोर्ट 55 डोसचे नियोजन
शहरातील प्रादुर्भाव आटोक्यात मात्र शहराला पुरेसा लसीचा पुरवठा नाही
शहरात दोन किंवा तीन दिवसाआड लसीकरणाचे नियोजन
-
उद्यापासून सोलापूर शहरातील 16 रुग्णालयांची तपासणी होणार
सोलापूर –
उद्यापासून शहरातील 16 रुग्णालयांची तपासणी होणार
अग्निशमन यंत्रणा उभारणार केल्याबद्दल शहरातील 16 रुग्णालयांना पालिकेने बजावली आहे नोटीस
राज्यातील काही रुग्णालयांमध्ये आग लागून झाला आहे अनेकांचा मृत्यू
त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शहरातील रुग्णालयांना फायर ऑडिट करून या अग्निशमन यंत्रणा उभारण्याचे दिले होते आदेश या आदेशाकडे 16 रुग्णालयांनी केले आहे दुर्लक्ष
या रुग्णालयांना देण्यात आली होती 48 तासांची मुदत
-
नागपुरात आज कोव्हिशिल्ड लसीचं लसीकरण बंद
– नागपुरात आज कोव्हिशिल्ड लसीचं लसीकरण बंद
– लसीचा साठा उपलब्ध न झाल्याने लसीकरण बंद
– कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी लोकांची प्रतिक्षा वाढली
– नऊ शासकीय व मनपा केन्द्रांमध्ये आज कोव्हॅक्सीन उपलब्ध
-
सोलापुरातील दोन नगरसेविकांच्या अपात्रतेचा फैसला आता निवडणूक आयोगाच्या दारात
सोलापूर – दोन नगरसेविकांच्या अपात्रतेचा फैसला आता निवडणूक आयोगाच्या दारात
महापालिकेच्या आरोग्य समितीच्या सभापती अनिता मगर ,भाजपच्या नगरसेविका राजश्री चव्हाण यांना न्यायालयाने ठरविले आहे अपात्र
याबाबतची माहिती निवडणूक आयोगाला
त्यानुसार त्यांच्या यंदाच्या वर्षाचा भांडवली व वॉर्डनिधी रोखण्याचे प्रशासनाने दिले संकेत
नगरसेविका अनिता मगर आणि राजश्री चव्हाण यांना तीन अपत्ये असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रतिस्पर्धी उमेदवार यांनी केली होती मागणी
सर्वोच्च न्यायालयात या दोघींचे सदस्यत्व पद रद्द करण्याच्या दृष्टीने देण्यात आला आहे निकाल
सदस्यत्व रद्द करण्यासाठी आता प्रशासनाला निवडणूक आयोगाच्या निर्णयाची प्रतीक्षा
-
पिंपरी चिंचवड शहरात आज 59 केंद्रांवर फक्त ‘कोव्हॅक्सिन’ची लस मिळणार
– पिंपरी चिंचवड शहरात आज 59 केंद्रांवर फक्त ‘कोव्हॅक्सिन’ची लस मिळणार
-महापालिकेला ‘कोविशिल्ड’ची लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना आज फक्त ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला,दुसरा डोस मिळणार
-किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या, ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या आणि कोविन ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप नोंदणीद्वारे लाभार्थ्यांचे होणार लसीकरण
-
पुणेकरांनी खासगी लसीकरण केंद्रांकडे फिरवली पाठ
पुणे :
पुणेकरांनी खासगी लसीकरण केंद्रांकडे फिरवली पाठ
खासगी लसीकरण केंद्रात चार लाख 61 हजार लसींचा साठा पडून
जिल्ह्यातील खासगी दवाखान्यांकडे उपलब्ध असलेला लसींचा साठा जिल्हा प्रशासन उधारीवर घेणार
या माध्यमातून लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रशासनाचा विचार असून त्या बदल्यात खासगी दवाखान्यांना नव्या लसींचा साठा पुरवण्यात येणार
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली माहिती
या लसींची एक्सपायरीडेट या मुळे संपून हे डोस वाया जाण्याची भीती
यामुळे जिल्हा प्रशासनाने ही अभिनव संकल्पना राबविण्याचा घेतला निर्णय
खासगी दवाखान्यांना शासनाला लस द्यायची असल्यास कोेरेगाव पार्क येथील लस साठवण केंद्राशी किंवा जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सचिन एडके यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन
-
सोलापुरात वर्षभरात 1496 गुन्ह्यापैकी 608 गुन्हे उघडकीस
सोलापुरात वर्षभरात 1496 गुन्ह्यापैकी 608 गुन्हे उघडकीस
सावकाराविरुद्ध घेण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान आत्तापर्यंत शहरात 90 गुन्हे दाखल तर 97 सावकारावर कारवाई
वर्षभरात आठ जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई
तीन वर्षात 22 लोकावर एमपीडीएची कारवाई
गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी तडीपारचे 94 प्रस्ताव 182 गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई
सोलापूर पोलीस पोलीस आयुक्तालयाच्या वर्धापनदिनानिमित्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मांडला लेखाजोखा
-
नागपूर सुधार प्रण्यासमध्ये शिवसेनेची वर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस वेटिंगवर
– नागपूर सुधार प्रण्यासमध्ये शिवसेनेची वर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस वेटिंगवर
– शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप इटकीलवार एनआयटीच्या विश्वस्तपदी
– राष्ट्रवादीचे नाव जाहिर न झाल्याने चर्चेला उधान
– अंतर्गत रस्सीखेचमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव अद्याप ठरेना
– नागपूरातील नेते घेणार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट
-
मराठवाडा विभागात 26 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
औरंगाबाद –
मराठवाडा विभागात 26 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार पदावरील 26 अधिकाऱ्यांच्या बदल्या..
26 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे शुक्रवारी काढले आदेश..
पुढील आठवड्यात पुन्हा विनंती नुसार होणार बदल्या..
-
डी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय युवकाची आत्महत्या
औरंगाबाद
डी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय युवकाची आत्महत्या..
पैठण तालुक्यातील रामनगर विहामांडवा येथील रामनगर येथे आत्महत्या..
घरातील फॅन ला दोरीच्या साहाय्याने फास लावून केली आत्महत्या..
युवकाने का आत्महत्येचे पाऊल उचलले याचे कारण अस्पष्ट..
-
औरंगाबादेत बदलत्या वातावरणामुळे राज्यातील 77% पीक क्षेत्रावर परिणाम
औरंगाबाद –
बदलत्या वातावरणामुळे राज्यातील 77% पीक क्षेत्रावर परिणाम
हवामानातील तीव्र बदलामुळे दुष्काळ आणि क्षीण झालेली जलसुरक्षा यामुळे अघात प्रवण
मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील एकूण 11 जिल्हे सर्वाधिक अपघात प्रवण
गहू,ज्वारी,तांदूळ,ऊस,काजू, नाचणी,बाजरी या पिकांना संकटाचा सर्वाधिक फटका बसू शकतो
राज्यातील तीन चतुर्थांश पीक क्षेत्र वातावरण बदलामुळे अपघातप्रवण झाले असल्याचे अभ्यासू झाले पुढे
-
मराठवाड्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा झाला शिरकाव
औरंगाबाद –
मराठवाड्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा झाला शिरकाव
औरंगाबाद जिल्ह्यात आणि बीड जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे प्रत्येकी एक एक रुग्ण
डेल्टा प्लस व्हेरियंटने मराठवाड्यात भीतीचे वातावरण
पूर्व खबरदारी घेतली जात असून नियमांचे पालन करावे अशी प्रशासनाचे आवाहन
राज्यात आतापर्यंत 45 डेल्टा प्लस व्हेरियंट असलेले रुग्ण आढळले
-
उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरुन खासदार हेमंत गोडसे अडचणीत
नाशिक –
उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरुन खासदार हेमंत गोडसे अडचणीत
उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला निमंत्रित न केल्याने सेनेतील अनेक जेष्ठ पदाधिकारी नाराज..
नाराज पदाधिकारी करणार थेट उद्धव ठाकरेंकडे तक्रार..
सेने सोबतच आघाडीचे अनेक नेते देखील गोडसेंवर नाराज..
भुजबळांनी नाराजी जाहीर केल्याने नाशिकमध्ये आघाडीत दुरावा वाढला
-
नाशकात कोरोना रुगणांचे होम क्वारंटाईन बंद, रुग्णांना थेट कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्याचे आदेश
नाशिक – कोरोना रुगणांचे होम क्वारंटाईन बंद
यापुढे रुग्णांना थेट कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्याचे आदेश
महापालिका आयुक्त कैलास जाधव यांचे आदेश..
दुसऱ्या लाटेत झालेल्या चुका सुधारण्याचा महापालिकेचा प्रयत्न
नगर मध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याने महापालिकेची तयारी..
तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी महापालिकेचे नियोजन सुरू..
-
पुणे शहरात रात्री अकरानंतर संचारबंदीचे आदेश लागू
पुणे
पुणे शहरात रात्री अकरानंतर संचारबंदीचे आदेश लागू
रात्री विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार
सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काढले संचारबंदीचे आदेश
पुढील आदेशापर्यंत रात्री अकरा ते पाच पहाटेपर्यंत संचारबंदीचे आदेश कायम राहणार
शहरातील निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी, जमावबंदीचे आदेश लागू
जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्यास कारवाई होणार
-
अंगणवाडी सेवीका सरकारने दिलेले मोबाईल परत करणार
– अंगणवाडी सेवीका सरकारने दिलेले मोबाईल परत करणार
– ‘पोषण ट्रॅकर’ ॲप सरकारने दिलेल्या मोबाईलमध्ये काम करत नाही
– अंगणवाडी सेविकांना इंग्रजी भाषेत माहिती भरुन पाठवायची आहे
– त्यामुळे संतप्त अंगणवाडी सेवीका सरकारने दिलेला मोबाईल परत करणार
– 17 ॲागस्टपासून अंगणवाडी सेवीका सरकारने दिलेला मोबाईल परत करणार
-
पुणे शहरात आज फक्त सात ठिकाणी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध
पुणे
पुणे शहरात आज फक्तसात ठिकाणी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध
सहा केंद्रांवर प्रत्येकी १ हजार तर एका केंद्रावर ५०० डोस उपलब्ध
कोव्हिशील्ड लस संपल्याने या लसीचे केंद्र बंद
-
महाराष्ट्रातील धुळे हे सध्या तरी पहिला कोव्हिड फ्री जिल्हा, राज्यसरकारच्या आकडेवारीत स्पष्ट
– महाराष्ट्रातील धुळे हे सध्या तरी पहिला कोव्हिड फ्री जिल्हा, राज्यसरकारच्या आकडेवारीत स्पष्ट
– नंदूरबारही कोव्हिड फ्री जिल्हा होण्याच्या मागावर
– आरोग्य विभागाच्या जिल्हा निहाय आकडेवारीत स्पष्ट
-
उन्हाळी परिक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार परत एक संधी
– उन्हाळी परिक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार परत एक संधी
– 14 ॲागस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान होणार फेरपरिक्षा
– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
– 20 पेक्षा जास्त अभ्यासक्रमाच्या होणार ॲानलाईन फेरपरिक्षा
– तांत्रिक अडथळ्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांना परिक्षा देता आली नाही
– परिक्षेपासून वंचित राहीलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा
-
पिंपरीमधील डिलक्स चौकात टोळक्याकडून तरुणाची हत्या
पिंपरी चिंचवड
– पिंपरीमधील डिलक्स चौकात टोळक्याकडून तरुणाची हत्या
– तू वेडा आहेस असे वारंवार उडवलेले तरुणाने काठीने मारहाण केली या कारणावरून टोळक्याने त्या तरुणाला बेदम मारहाण करून जखमी करून ठार मारले
– मनोज राजू कजबे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव
– पिंपरी पोलीस ठाण्यात सात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा नोंद,ह्यामधील दोन आरोपीना अटक करण्यात आलीय
-
विरारमध्ये आईच्या मारहाणीत 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू
विरारमध्ये आईच्या मारहाणीत 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू
विरार पूर्व फुलपाडा परिसरातील पारिजात आपर्टमेंटमधील घटना
मुलीच्या शवविच्छेदन अहवालावरुन विरार पोलीस ठाण्यात आई विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन तिला अटक केले
नानसी सोनुकुमार सोनी मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे
तर नेहा सोनुकुमार सोनी (वय 22) असे आपल्याच मुलीची हत्या केलेल्या आईचे नाव आहे.
आरोपी महिलेचा पती हा रिक्षाचालक असून, पत्नी गृहिणी आहे
या दाम्पत्याना 2 मुलीच आहेत, नानाशी ही मोठी मुलगी आहे, तर तिसऱ्यांदा पुन्हा आरोपी महिला गरोदर आहे
-
बोटीवर वाढदिसाची पार्टी साजरी करताना, सेल्फी काढण्याच्या नादात, बोट उलटून एकाचा पाण्यात बुडून मृत्यू
विरार –
बोटीवर वाढदिसाची पार्टी साजरी करताना, सेल्फी काढण्याच्या नादात, बोट उलटून एकाचा पाण्यात बुडून मृत्यू
विरार पूर्व नारंगी खाडीत रविवारी घडली घटना अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
शशिकांत गोविंद गुरव (वय 54) असे बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
10 ते 12 मित्रांसह विरार पूर्व नारंगी खाडीत नांगरलेल्या बोटीवर वाढदिवसाची पार्टी सुरू असताना सेल्फी फोटो काढत असताना घडली घटना
Published On - Aug 10,2021 6:30 AM