Maharashtra News LIVE Update | भंडाऱ्याच्या कार्यक्रमातील जेवणातून विषबाधा, 70 टक्के गावकरी बाधित, औरंगाबादमधील धक्कादायक घटना
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
भंडाऱ्याच्या कार्यक्रमातील जेवणातून विषबाधा, 70 टक्के गावकरी बाधित, औरंगाबादमधील धक्कादायक घटना
औरंगाबाद :
औरंगाबाद जिल्ह्यातील तुर्काबाद खराडी गावात शेकडो लोकांना विषबाधा
भंडाऱ्याच्या कार्यक्रमातील जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज
गावातील जवळपास 70 टक्के लोकांना झाली विषबाधा
आरोग्य विभागातील पथकाकडून गावातच बाधित लोकांवर उपचार सुरू
शेकडो लोकांना विषबाधा झाल्यामुळे खळबळ
-
सातारा जिल्हा प्रशासनाने घातलेले कोरोना निर्बंध 15 ऑगस्ट पासून होणार शिथिल
सातारा :
सातारा जिल्हा प्रशासनाने घातलेले कोरोना निर्बंध 15 ऑगस्ट पासून होणार शिथिल
जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने, उपहारगृहे नियम व अटींवर रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
बंदिस्त कार्यातील विवाह सोहळ्यासाठी 100 लोकांची मर्यादा
सिनेमा गृह व धार्मिक स्थळे अजूनही राहणार बंद
सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढले नवीन आदेश
-
-
मंत्री आणि नेत्यांनाचा कोरोना नियमांचा विसर, धनंजय मुंडेंच्या पदाधिकारी बैठकीला प्रचंड गर्दी
बीड: मंत्री आणि नेत्यांनाचा कोरोना नियमांचा विसर
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या पदाधिकारी बैठकीला प्रचंड गर्दी
राष्ट्रवादी भवन मधील बैठकीत सोशल डिस्टनसिंगचा फज्जा
काल युवा सेनेच्या संवाद मेळाव्यात होती मोठी गर्दी
आज मंत्री धनंजय मुंडेंकडूनच कोरोना नियमाला हरताळ
बीड जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून जाहीर
तरीही मंत्री आणि नेत्यांकडूनच नियम पायदळी
-
पुण्यात दिवसभरात 238 नवे कोरोनाबाधित
पुणे : दिवसभरात २३८ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात २३७ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ०८ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३. – १९८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८९९७०. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २१२५. – एकूण मृत्यू -८८३७. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४७९००८. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ९२११.
-
नागपूर जिल्ह्यात दिवसभरात 8 नवे कोरोनाबाधित रुग्ण
नागपूर :
नागपुरात आज 8 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
शून्य मृत्यू
तर 15 जणांनी केली कोरोना वर मात
एकूण रुग्ण संख्या – 492959
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 482717
एकूण मृत्यू संख्या – 10118
-
-
डोकेदुखी वाढली, अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 1155 नवे कोरोनाबाधित रुग्ण
अहमदनगर :
जिल्ह्यात आज तब्बल नव्या ११५५ बाधितांची रुग्ण संख्येत भर तर ६९८ रूग्णांना डिस्चार्ज तर
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०७ टक्के
बरे झालेली रुग्ण संख्या:२,९७,८२४
उपचार सुरू असलेले रूग्ण:५८३६
पोर्टलवरील मृत्यू नोंद:६३५५
एकूण रूग्ण संख्या:३,१०,०१५
-
मराठी माणसावर अन्याय झाल्यानंतर मार्मिकने धारधार वार केला : उद्धव ठाकरे
मार्मिकच्या कार्यक्रमातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे :
मार्मिकच्या वाटचालीत सर्व शिवसैनिकांचा सहभाग मार्मिकच्या माध्यमातून प्रेरणा मिळाली नोकरी सोडा आणि व्यवसायात पडा, हा विचार बाळासाहेबांनी मांडला होता बाळासाहेब ठाकरे यांनी त्याकाळात व्यंगचित्राचं साप्ताहिक सुरु केलं संयुक्त महाराष्ट्रच्या लढ्यात बाळासाहेब आणि माझे काका मावळा म्हणून व्यंगचित्र काढायचे मुंबई मिळाल्यानंतरही लढा सुरु होता मराठी माणूस अन्यायाविरोधात लढतो मुंबई महाराष्ट्राला मिळाल्यानंतर बाळासाहेबांनी मराठी माणसाला विरंगळा असावा म्हणून मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकाचा जन्म झाला सुरुवातीला त्याचं स्वरुप मनोरंजनाचं होतं. पण पाहतापाहता मराठी माणसावर अन्याय होऊ लागला. त्यामुळे मार्मिक अन्यायाविरोधात धारधार वार करणारी झाली. त्यानंतर लढा निर्माण झाला आणि त्यातून चळवळ निर्माण होऊन शिवसेनेची निर्मिती झाली
चित्रकलेचं पुढचं पाऊल हे व्यंगचित्र असतं चित्रकार हुबेहुबे चित्र काढतो. पण व्यंगचित्रकार त्यापुढचं काढतो.
-
राज्यपाल 12 जागा रिकाम्या ठेवू शकत नाहीत, हायकोर्टाचा निकाल
विधान परिषदेतील रिकाम्या 12 जागांवरील याचिका अखेर कोर्टाने निकाली काढली आहे. ळी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात समन्वय हवा. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना कळवायला हवं, असं कोर्टाने म्हटलं आहे. तसेच राज्यपाल उत्तर द्यायला बांधिल नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना निर्देश देऊ शकत नाही, असंही कोर्टाने यावेळी स्पष्ट केलं.
-
रानडे इन्स्टिट्यूटचं स्थलांतर अखेर स्थगित, पुणे विद्यापीठाची पत्रक काढून खुलासा
पुणे : रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराला पुणे विद्यापीठाने स्थगिती दिली आहे. पुणे विद्यापीटाने याबाबत पत्रक काढून खुलासा केला आहे. रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराला विद्यार्थी संघटनांनी तीव्र विरोध केला होता. त्यानंतर स्थलांतर रद्द करण्यात आलं आहे.
-
केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेला पंकजा मुंडे दाखविणार हिरवा झेंडा
जनआशीर्वाद यात्रा भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची प्रतिक्रिया
केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेला पंकजा मुंडे दाखविणार हिरवा झेंडा
गोपीनाथ गडावर दर्शन घेऊन यात्रेची होणार सुरुवात
केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यासह खा. प्रीतम मुंडे देखील राहणार उपस्थित
त्याच दिवशी 11 वाजता बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात कार्यशाळा
कार्यशाळा ठेवल्याने पुन्हा चर्चेला उधान
कार्यशाळेत पंकजा मुंडे यांच्या भूमिकेवर लक्ष
मराठवाड्यातील सर्वच नेते पदाधिकारी राहणार उपस्थित
मुळात यात्रेचा बीड मधून विरोध नव्हताच
भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची माहिती
16 तारखेला सोमवारी 8 वाजता निघणार यात्रा
यात्रेचा समारोप औरंगाबादला होणार
21 तारखेला होणार समारोप
-
सीईटी रद्द, राज्य सरकारचे आता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला सुरुवात करण्याचे आदेश
2021-22 मध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा CET लागू करण्यात आलेली होती. शासन निर्णय दि.11/08/2021 अन्वये सदर सामाईक प्रवेश परीक्षा CET रद्द करण्यात आलेली आहे. तसेच रिट याचिका क्र.1413/2021 मध्ये मा.उच्च न्यायालय मुंबई यांचे इ.11वी ची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याबाबत निदेश आहेत. त्यानुसार राज्यातील इ.11वी प्रवेशाची कार्यवाही सुरू करण्याच्या सुचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ.११वी चे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत. सदर ५ ठिकाणच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक यासोबत संलग्न आहे. उक्त पाच क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील.
-
महिलेची शारीरिक शोषणाची व्यथा टीआरपी वाटत असेल तर ही मग्रुरी कुणाच्या पाठबळावर करत आहात? : चित्रा वाघ
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :
माजी मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात कारवाई व्हायला हवी.
पीडितेने पत्रात जे लिहिलीय ते गंभीर आहे.
मी यवतमाळच्या पोलिसांकडेही चौकशी केली. त्यांनी संबंधित घटनेची तक्रार आल्याचं सांगितलं आहे
सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स यवतमाळच्या पोलिसांनाही लागू व्हाव्यात. महिलेच्या स्टेटमेंट घेण्यात यायला हवं.
पतीस पूर्ववत नोकरीवर घेण्यासाठी शरीर सुखाची मागणी केल्याची मागणी केली होती. तसेच आपलं शारीरिक आणि मानसिक छळ केलं, असा आरोप करण्यात आला आहे.
महिलेची शारीरिक शोषणाची व्यथा टीआरपी वाटत असेल तर ही मग्रुरी कुणाच्या पाठबळावर करत आहात?
हा सत्तेचा माज नाही तर काय?
-
राजकारणात विरोधक स्पर्धा न करता खोटे आरोप करतात – संजय राठोड
संजय राठोड –
– राजकारणात विरोधक स्पर्धा न करता खोटे आरोप करतात, राजकारण संपण्याचा प्रयत्न करतात
– आपली मोठी रेष न ओढता, दुसऱ्याची रेष छोटी करतात
– ब्रेकिंग न्यूजसाठी राजकीय करिअर उध्वस्त करतात
– कालच्या बातम्यामुळे व्यथीत झालोय, ही स्पर्धा जीवघेणी ठरतेय
– मी एका आश्रम शाळेचा पदाधिकारी होतो आता नाही, येथील तीन कर्मचारी गैरहजर राहत असल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आलं
– आता त्या संस्थेत तात्पुरते तीन पदं भरले
– यामुळे एका शिक्षकाचं काही प्रकरण झाल्याने त्याने सहाय्यक आयुक्ताने स्वत: राजीनामा दिला
– १३ एप्रिल २०१७ ला राजीनामा झाला
– मधल्या काळात ते शिक्षक संस्थेकडे आहे माझ्याकडे आले. मी त्यांना समजाऊन सांगितलं
– मी त्या संस्थेचा राजीनामा झाला
– माझ्या सहकाऱ्यांचं नाव संजय आहे, त्याच्या मोबाईलवरून मॅसेज केले. ते मॅसेज मी केल्याचा समज झाला
-
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर येणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी 16 ऑगस्टला सिंहगड सर करणार
पुणे
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर येणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी 16 ऑगस्टला सिंहगड सर करणार
जिल्ह्यात पर्यटन बंदी असताना राज्यपालाचा सिंहगड दौरा वादग्रस्त ठरण्याची शक्यता
15 ऑगस्टला राज्यपालांच्या हस्ते विधानभवनात होणार झेंडावंदन
त्यानंतर शिवसृष्टीत येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार
राज्यपालांनी शिवनेरी किल्ला केला होता पायी सर
त्यानंतर आता राज्यपाल सिंहगड पायी चढणार की गाडीने जाणार याची उत्सुकता
-
कोल्हापुरातील 32 तुकडा प्रकल्पांवर महारेराने आणली बंदी
कोल्हापूर
कोल्हापुरातील 32 तुकडा प्रकल्पांवर महारेराने आणली बंदी
प्रकल्पांमध्ये फ्लॅट, दुकाने खरेदी विक्रीला मनाई
ग्राहकांना वेळेवर ताबा न दिल्याने महारेरा चा कारवाई चा बडगा
चार वर्षापासून रेंगाळले आहेत शहरातील गृहप्रकल्प
संबंधित गृह प्रकल्पात फ्लॅट दुकानांसाठी गुंतवणूक केलेल्या ग्राहकांचे धाबे दणाणले
-
शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांचा 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर :
शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांचा 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाचा इशारा
जादा आणि सरसकट नुकसान भरपाईच्या मागणीसाठी करणार आंदोलन
ग्रामपंचायतीला टाळे ठोक आंदोलन केलेला सरपंचांवर गुन्हे दाखल केल्याने ही पूरग्रस्तांचा संताप
मार्ग काढण्यासाठी पूरग्रस्तांना दिली प्रशासनाला दोन दिवसांची मुदत
-
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग
३ सप्टेंबरपर्यंत प्रारुप यादी तयार करण्याच्या निवडणूक प्राधिकरणाच्या सूचना
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या हालचाली गतिमान
जिल्हा बँकेच्या 11 हजार 448 सभासदांपैकी आतापर्यंत 8500 संस्थांनी निवडणूक विभागाकडे केलेत ठराव दाखल
कोल्हापूर जिल्हा बँकेवर आहे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचं वर्चस्व
यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची शक्यता
निवडणूक बिनविरोध साठी मुश्रीफ करणार प्रयत्न
-
औरंगाबाद मुंबईत महामार्गावर भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
औरंगाबाद –
औरंगाबाद मुंबईत महामार्गावर भीषण अपघात
अपघातात दोन जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी
दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे झाला अपघात
एकाच दुचाकीवर तिघे जण करत होते प्रवास
मध्यरात्री एक वाजता घडली दुर्दैवी घटना
दुचाकीवरील तिघांपैकी दोघांचा मृत्यू
गणेश बाळू जाधव आणि नितीन अंबादास जाधव अशी मृतांची नावे
-
कोल्हापुरातून कोल्हापूर-नागपूर विमान सेवा सुरू होणार
कोल्हापूर
कोल्हापुरातून कोल्हापूर-नागपूर विमान सेवा सुरू होणार
मंगळवारपासून होणार विमान सेवेला सुरवात
कोल्हापूर अहमदाबाद विमानाद्वारेच नागपूर ला जाता येणार
आठवड्यातील तीन दिवस आहे कोल्हापूर अहमदाबाद विमानसेवा
कोल्हापूर नागपूर विमान सेवेच ऑनलाईन बुकिंग ही झाल सुरू
-
औरंगाबाद शहरात आज 6 हजार लसी उपलब्ध
औरंगाबाद –
औरंगाबाद शहरात आज 6 हजार लसी उपलब्ध
43 लसीकरण केंद्रावर होणार लसीकरण
सहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर उपलब्ध झाल्या लसी
प्रत्येक लसीकरण केंद्रावर 150 नागरिकांना दिल्या जाणार लसी
टोकन वाटप करून केले जाणार लसीकरण
-
नाशिक शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा धोका वाढला
नाशिक शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा धोका वाढला
ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांत डेंग्यू रुगणांची शंभरी
तर चिकनगुनिया चे 78 रुग्ण आढळल्याने खळबळ
कोरोना पाठोपाठ डेंग्यूचा प्रसार वाढल्याने आरोग्य विभाग सतर्क
-
सोलापूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्त डाॅ. प्रीती टिपरे यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचा उत्कृष्ट तपास अधिकारी पुरस्कार जाहीर
सोलापूर –
सहाय्यक पोलीस आयुक्त डाॅ.प्रीती टिपरे यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचा उत्कृष्ट तपास अधिकारी पुरस्कार जाहीर
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वतीने देशातील 152 पोलिस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून पुरस्कार
152 अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यामध्ये सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांचा समावेश
डाॅ. प्रीती टिपरे या सोलापूर पोलीस आयुक्तालयात मागील दोन वर्षांपासून सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग २ पदावर कार्यरत
-
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार देशमुख यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू
सोलापूर –
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार देशमुख यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू
एक वर्षासाठी सभापती पद दिले होते आता दोन वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे त्यामुळे सभापती पदावरून हटविण्याची या हालचाली सुरू
स्थानिक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांची अविश्वास ठराव आणण्यासाठी चाचपणी सुरू
काल उपसभापती सुशील नरोळे यांनी दिला होता राजीनामा
-
नागपुरात 11 दिवसानंतर कोरोनामुळे एका मृत्यूची नोंद
नागपूर –
नागपुरात 11 दिवसानंतर कोरोनामुळे एका मृत्यूची नोंद
तर 8 नवीन रुग्णांची नोंद
काल 24 तासात 6हजार 362 चाचण्या झाल्या
134 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू
शहरात पॉझिटिव्हीटी रेट 0.09 तर ग्रामीण भागात 0.08
-
लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर यांची अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव
नाशिक – लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर यांची अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव
8 लाखांच्या लाच प्रकरणात,वैशाली झनकर-वीर फरार
अटक टाळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल
त्यांच्या वतीने ऍड अविनाश भिडे यांनी दाखल केला अर्ज
अटकपूर्व जामिन अर्जावर उद्या होणार सुनावणी
-
सोलापूर शहरात आज उद्या उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार
सोलापूर शहरात आज उद्या उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार
संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एका वेळेसाठी एक दिवसाने पुढे जाणार
यामुळे शहर व हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा उशिरा ,कमी वेळ आणि कमी दाबाने होणार
जलशुद्धीकरण केंद्र येथे महावितरण कडून नवीन केबल टाकण्याचे काम चालू
त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा झाला नाही
-
औरंगाबादेत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला पुन्हा विलंब
औरंगाबाद –
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला पुन्हा विलंब
ऑगस्ट महिन्याची 10 तारीख उलटून गेली तरीही आणखी वेतन जमा नाही..
वेतन कमी आणि ते ही वेळेवर मिळत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना करावा लागतो अडचणींचा सामना..
सततच्या वेतन विलंबाने एसटी कर्मचारी हैराण..
कर्मचाऱ्यांच्या वेतन विलंबामुळे येत आहेत तक्रारी.
-
आज नागपूर महानगरपालिका तसेच शासकीय केंद्रांवर कोविशील्ड लस उपलब्ध नाही
नागपूर –
आज नागपूर महानगरपालिका तसेच शासकीय केंद्रांवर कोविशील्ड लस उपलब्ध नाही
मात्र कोव्हॅक्सीनसाठी निर्धारित असलेल्या ९ केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध राहील.
या ९ केंद्रांवर १८ वर्षावरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला व दूसरा डोज नागरिकांना घेता येईल,
कोव्हीसील्ड च लसीकरण मात्र होणार नाही
-
नागपुरात वाढला चंदन चोरांचा सुळसुळाट, मेडिकलमधील चंदनाचे झाड चोरीला
नागपूर –
नागपुरात वाढला चंदन चोरांचा सुळसुळाट
मेडिकलमधील चंदनाचे झाड गेलं चोरीला
काही दिवसांपूर्वी एका आयपीएस अधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या परिसरातील चंदनाचे झाड चोरीला गेले होते
आता गजबजलेल्या मेडिकल परिसरातील झाड कापून नेले
चंदन चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याची शक्यता
-
नागपूरकरांमध्ये किती अँटी बॉडीज निर्माण झाल्या हे जाणून घेण्यासाठी प्रशासनाची तयारी
नागपूरकरांमध्ये किती अँटी बॉडीज निर्माण झाल्या हे जाणून घेण्यासाठी प्रशासनाची तयारी
दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाचा निर्णय , मेडिकलच घेणार सहकार्य
तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता घेण्यात आला निर्णय
सिरो सर्वेक्षणाची जबादारी विभागीय आयुक्त यांनी मेडिकलकडे सोपविली
दुसरी लाट अतिशय भयंकर होती त्यामुळे।किती लोकांना नकळत कोरोना होऊन गेला याची मिळणार माहिती
त्यानुसार तिसऱ्या लाटेसाठी तयारी ठेवावी लागणार
-
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर जिल्ह्यात भाजप – शिवसेना एकत्र
– देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर जिल्ह्यात भाजप – शिवसेना एकत्र
– बुटीबोरी नगर परिषदेत भाजप आणि शिवसेना युती
– सभापती निवडीसाठी भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष आले अकत्र
– भाजपचे पाच तर शिवसेनेचा एक सभापती बिनविरोध
– शिवसेना खा. कृपाल तुमाने आणि भाजप आ. समिर मेघेंच्या प्रयत्नाने दोन्ही पक्ष एकत्र
– बुटीबोरीतील युतीचा फॅार्म्यूला राज्यात राबवण्याची नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी व्यक्त केली इच्छा
– बुटीबोरीत भाजपचे बबलू गौतम नगराध्यक्ष
– बुटीबेरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेली नगरपरिषद
-
रायगड जिल्ह्यामध्ये डेल्टा प्लसचे दोन रुग्ण आढळले
रायगड जिल्ह्यामध्ये डेल्टा प्लसचे दोन रुग्ण आढळले
उरण येथील 44 वर्षीय महिला व नागोठणे येथील 69 वर्षीय पुरुष यांना डेल्टा प्लसची लागण
नागोठणे येथील डेल्टा प्लस रुग्णं मृत
Published On - Aug 13,2021 6:31 AM